सात घडीची पोळी

Submitted by दिनेश. on 27 February, 2011 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३ रोट्या होतील
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वर लिहिलेय ते स्वाती हॉटेल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमी पोळ्या करताना येवढे खेळत बसायला वेळ नसल्याने बर्‍याच वर्षात केल्या नाहीत

मुंबईत हल्ली साधी घडीची पोळीही कोणी करत नसावेत. माझ्या ओळखीच्या सगळ्यांकडे फुलके लाटतो तसेच पोळीच्या आकाराचे अगदी जर्रासेच जाड फुलके लाटुन पोळीसारखे भाजतात. अजुन काही वर्षांनी तेलपीठ वापरुन दोनदा दुमडुन पोळ्या केल्या जात हेही कोणाला आठवणार नाही. Sad

आमच्या मातोश्री अजुनही करतात दोनदा दुमडून पोळ्या. त्या पोळ्या उतरल्या तव्यावरून की त्यावर शुद्ध तूप व गूळ नाहितर बटर व जॅम मस्त लागतो त्याच्या पदरात भरून.

अश्विनी, अगदी फुलक्याइतकी पातळ नसते पण खुप जाडही नसते. पहिली पोळी नीट नेहेमी सारखी केली की पुढची थोडी लहान केली जाते कारण घड्या चिटकायला नकोत म्हणून.

साधना, Sad असे व्हायला नको पण यावर उपाय नाही Sad

मला स्वतःला फुलके/रोटी वगैरे प्रकार कधीमधी खायला आवडतात. घडीची पोळी खुप आवडते. माझी बरी होते पण वेळेआभावी जे जमेल ते केले जाते.

साधना, मी अजून २ घडीच्या पोळ्या करते. माझ्या पोळीवालीलाही तश्याच करायला सांगते Happy

मी घडीच्याच पोळया करते.घडी घालायच्या आधी पूर्ण आकाराची पोळी लाटून मग घडी घालते.त्यामुळे पदर चांगले सुटतात.

सातपाडी रोटी म्हणतात ते हेच का?
आहे मस्त पण अवघड. तेव्हा आयते मिळाल्यासच खाण्याची शक्यता. Happy

बाकी आपल्या टिपिकल २ घड्या घालून त्रिकोण करून परत तो गोलात लाटणे या प्रकारापलिकडच्या पोळ्या मी कधी करायला जाणे शक्य वाटत नाहीये मला तर २ च्या वरच्या संख्येने घड्या घालून पोळ्या कोणी करणार असेल तर मला जेवायला बोलवा/ मी येणार असेल तेव्हा करा इत्यादी... Proud

छान रेसेपी. सुट्टीच्या दिवशी करून बघता येईल.
एरवी गाजर, गोबी, मुलीचे पराठे करताना, असेच दोन उंड्याच्यामध्ये सारण भरून करते मी. पण तिनपेक्षा जास्त लेयर्स नाही कधी केल्या.
घडीची पोळी नाहीच केली जात माझ्याकडे, पण ६-७ घड्यांचे चौकोनी पराठे मात्र जवळपास रोजच सकाळी नाश्त्याला करते मी.

वा! करून बघीन पण रविवारी. बिन तेलातुपाचं आठवडाभर खाऊन( रोज फुलके) नवरोबा कंटाळतात( आणि मी पण ...डोळा मारणारी बाहुली) पण वजनांची चिंता करावी लागते.

तर २ च्या वरच्या संख्येने घड्या घालून पोळ्या कोणी करणार असेल तर मला जेवायला बोलवा/ मी येणार असेल तेव्हा करा इत्यादी... >>>> मी रोजच करते !!!केव्हा येतेस जेवायला सांग नी Happy

मस्त दिनेशदा Happy
दिनेश तुम्ही 'थराच्या पोळ्या' नाव द्या हो. नाहितर काही लोकं नावावरूनच अनेक थराच्या पोष्टी पाडतील. स्मित<< अरे कुठल्या थराला जाताहात साध्या नावावरून पा.कृ महत्त्वाची ती नीट कळली ना मग झाले तर थराच्या म्हणा की घडीच्या म्हणा पदार्थ लै ब्येस आहे आणि तसा जमला पाहिजे ते बघा Happy

मीही करून बघणार आणी जमली तर बढाया मारणार.
एक शंका : जर या बेसन मधे पिठीसाखर किंवा गूळ घातला तर गोड पोळया होतील का?

एक शंका : जर या बेसन मधे पिठीसाखर किंवा गूळ घातला तर गोड पोळया होतील का?

>>>> Rofl एकदम बेसिक शंका.

मला स्वतःला फक्त बिन-घडीच्या, दोन आणि तीन घडीच्या पोळ्या येतात. चार घडीच्या पोळ्या एका मैत्रिणीच्या आजीकडून ऐकलेल्या. त्या खाण्याचा/शिकण्याचा योग आला नाही. दिनेशदा एवढे सुगरण, त्यांनी 'सात' 'घडी'च्या पोळीची कृती लिहिली म्हणून मी आवर्जून बघायला आले. पण ह्यात फक्त एकावर एक थर आहेत म्हणून तसं लिहिलं तर एवढे उचकले का लोक ?

बाकी दिनेशदा, तुम्हाला नावात आणि कृतीत विसंगती जाणवली तर तेव्हाच सांगायची होती. आणि रेसिपी पूर्ण वाचली असती तर हा प्रश्न पडला नसता. कारण मी टिप लिहिली आहे नावाबद्दल.

आजच ट्राय केलाय, पोट्भरिचा प्रकार असल्याने ब्रंचला मस्त आहे.
सात लेअर करण्यापेक्षा ३ लेअर केले तर जास्त चांगले लागेल.
मी एक वरिल पद्धतिने केला पण, डाळिच्या पिठाने लेअर चिकटतात मग, एक पोळिचा आणि एक डा.पिठाचा असे दोनच गोळे करुन पोळि लाटली मधुन चाकुने चिर देवुन त्रिकोणि घड्या smiley2.gifघातल्या तेव्हाही मस्त खुस्खुशित झाला.php0bI3EBAM.jpgphprqM7CsAM.jpg

प्राजक्ता.. एकदम खतरा दिसत्येय तुझी तीन लेयर पोळी... अगदी अत्ता तुकडा मोडुन तोंडात टाकावासा वाततोय Happy

इस विकेंड को ये पोळी करनेकोच मांगता.... Happy

प्राजक्ता, माझे पण असेच थर सुटले होते. पण खाताना फोटो नाही काढला. मी एका फसलेल्या प्रयोगाबद्दल लिहिले नाही. या दोन थरांच्या वळकट्या करुन बघितल्या (खाज्याच्या करंज्या करतो तसे) पण तो प्रयोग फसला.

सिंडरेला, काय एवढं मनावर घ्यायचे ? चला पोळी करुन खाऊ या.

मिनोतीच्या रेसिपिमधे आणि भरतकामात पारंपारिक कला जोपासलेल्या असतात त्या मला आवडतात. एखाद्या रविवारी, असा एखादा पदार्थ करुन बघितला, तरच या कला स्मरणात राहतील ना ?

ह्म्म.. मलाही करुन पाहायला हवी आता..

बाकी मुद्दाम करुन पाहण्याबद्दलचे तुमचे पटले दिनेश.. करुन पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि आपण करुन घातल्याशिवाय मुलांना असलेही काही आहे अस्तित्वात हे कळत नाही. नाहीतर मुले कायम पिज्जा आणि पास्तामध्ये रमलेली राहतात... (हाच विचार करुन काल रात्री १० वाजता संत्राकेक करायला घेतला Happy )

(आजपासुन १०वीची परिक्शा सुरू Sad Happy लेक पेपर लिहितेय तिकडे आणि मला इथे टेंशन आलेय.. ती इकडे आली की रोजचा डाळभात न करता ती स्वतःचा माबो आणि मिपा वरच्या रेसिप्या करणार आहे असे गेल्या रविवारीच ठरलेय आमचे. Happy )

Pages