मायबोली चषक -

Submitted by आयडू on 12 April, 2010 - 01:08

जे जे उत्तम ते ते ह्या द्वारे इथं मांडण्याचा एक प्रयत्न.

का? कशाला?? आत्ताच कशाला??>>> वगैरेची उत्तरं नाहीत माझ्याकडे! हे ? पडणारही नाहीत कदाचित. पण जर पडले तर... म्हणून आधीच सांगून टाकलं Happy

बाकी तुमची मदत मोलाची ठरेल Happy

खालील अ‍ॅवॉर्डसाठी उमेदवार ( जास्तीत जास्त कितीही) सुचवा व त्या/तीची बहुमताने निवड करा (बेस्ट ३)

१)मायबोली बेस्ट रिक्षा अ‍ॅवॉर्ड

२)मायबोली बेस्ट वाद अ‍ॅवॉर्ड

३)मायबोली बेस्ट आयडी (ओरिजनल) अ‍ॅवॉर्ड

४)मायबोली बेस्ट आयडी (ओरिजनल) अ‍ॅवॉर्ड (जे आता माबोवर नाहीत / येत नाहीत / जुने जाणते अन् अद्रूश्य)

४)मायबोली बेस्ट आयडी (डूप्लीकेट) अ‍ॅवॉर्ड

५)मायबोली बेस्ट बीबी अ‍ॅवॉर्ड

६)मायबोली वर्स्ट (जाचदायक) बीबी अ‍ॅवॉर्ड

७)मायबोली बेस्ट सर्व्हे अ‍ॅवॉर्ड (सध्यातरी संयुक्ताचा असा एकच सर्व्हे आहे!)

८)मायबोली बेस्ट ब्लॉग अ‍ॅवॉर्ड (ब्लॉग= रंगेबेरंगी)

९) मायबोली बेस्ट (मला अतिशय आवडलेलं अस काही कथा / कविता/ गझल / ललित) अ‍ॅवॉर्ड (मॅक्स १०+ मिनिमम ३+)

अजून काही अ‍ॅड केलेले...

१०)मायबोली बेस्ट प्रोफाईल अ‍ॅवॉर्ड

११)मायबोली बेस्ट प्रकाशचित्र अ‍ॅवॉर्ड

अजूनही काही बेस्ट ऑफ द बेस्ट सुचवायच असल्यास यू आर फ्री टू अ‍ॅड ऑन Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरूप, असं पहा वादविवादयुक्त घनगंभीर चर्चा करणारे लोक सगळीकडेच असतात तसेच ते इथंही आहेत पण सगळ्यांनाच आपलं असं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि ह्या बीबीचा मूळ उद्देश चांगल्यातलं चांगलं (जे कदाचित तुम्ही / आम्ही मिस केलं असेल) (मायबोलीवरील) साहित्य (लिंक्सद्वारे वगैरे) एकत्रित करणे व लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे, तेंव्हा भांडखोर, पडीक, किंवा चमको वगैरे येथे नसावे कारण प्रत्येकाचा असा "अपना नजरिया होता है" असे वाटते.

तेंव्हा याशिवाय काही कल्पना असल्या तर जरूर सुचवा. वर दिलेल्या ११ कॅटॅगरीपैकी जर काही सुचवायच असेल तर स्वागत Happy

माझ्याकडुन एक सज्जेशन Happy

"मायबोली बेस्ट क्रिएटीव्हीटी अवॉर्ड"... हस्तकला, चित्रकला, डिजीटल आर्ट या बीबींसाठी

आरं डु आया लेकाऽ, हे असं 'अगं बाई' वगैरे शोभतं का तुला? मर्दानं असं म्हणू नेऽ... Light 1

बाकी अ‍ॅवॉर्डाची आयडीया भारी आहे हां काय! Wink

काय उपेग रे भारी आयड्या असून? कुणी एका कॅटॅगरीसाठी नावं सुचवत नाही Sad तू पण...

**

ह्या आधी असा बीबी कुठे असल्यास सांगा, मी हा पुसून टाकतो.

नॉमिनेशन फॉर - माबो लांबलचक पोस्ट अवॉर्ड
नॉमिनिज आर- लिंबूटिंबू आणि झक्की
विसू.- हे लांबलचक पोस्टचे अवॉर्ड आहे, असंबद्ध पोस्टचे नाही Wink

झक्की बाय ऑल मीन्स Wink हे म्हणजे परदेशातल्या सायबाचे कौतुक नव्हे बरं का Proud
आगाव, बघ हं माबो लांबलचक पोस्ट अवॉर्ड >> च्या ऐवजी माबो गहन गंभीर अन् दीर्घोत्तरी (माबो गगदी अवॉर्ड) पोस्ट अवॉर्ड असा बदल करुयात ? म्हणजे ते जरा भारदस्त (अन् कमी वादग्रस्त) वाटेल, निदान तसा फील येईल Lol

>>> विसू.- हे लांबलचक पोस्टचे अवॉर्ड आहे, असंबद्ध पोस्टचे नाही Angry
च्यामारी आगावा, मग "नको तिथे नेमके नाक खुपसणार्‍या" आमनधपक्या अवसानघाती पोस्टबद्दल कुणाला नॉमिनेट कर्तोस? Proud
अन ज्या आयडीच्या पोस्ट नन्तर तो तो धागाच बन्द पडू शकतो/टाळे लागु शकते या बद्दल कुणाला नॉमिनेशन?

लिंब्याभाऊ, 'अवसानघात' कुणाचा होतो? लिहिणार्‍याचा की वाचणार्‍याचा? Wink
आणि तुम्हाला राग आला असेल तर, असंबद्ध पोस्टसाठीही तुमचे नॉमिनेशन देऊ की!!! हाकानाका Proud

मायबोली बेस्ट प्रकाशचित्र अ‍ॅवॉर्ड मध्ये प्रचंड चुरस असेल. रोहित, जिप्सी, दिनेशराव, नमस्कर, रॉक्स, विशाल आणि अनेक (नावे राहिलेली असल्यास क्षमस्व!) असे सर्वचजण येथे प्रकाशचित्रे देतात. अरे हो, माझे आवडते बित्तुबंगाही!

यावर पॉल व्हावा असे वाटते.

(हा धागा आवडला.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मायबोली बेस्ट वाद अ‍ॅवॉर्ड
माय नोमिनेशन्सः

१. लालभाई
२. संतु
३. केदार
४. नंदिनी
५. सायो

माय्बोली बेस्ट चर्चा अवॉर्ड
माय नोमिनेशन्स

१. अस्चिग
२. स्लार्टी
३. सावट
४. अरुंधती कुलकर्णी
५. केदार

मायबोली बेस्ट आयडी (डूप्लीकेट) अ‍ॅवॉर्ड
नोमिनेशन

१. रार
२. विषकन्या
३. स्लार्टी
४. हह
५. लिंबूटिंबु

मायबोली बेस्ट
नोमिनेशन्स

१. बी : आईने अकबरी/ तरूण आहे रात्र अजुनी व अजुन बरेच काही
२. हह : कुजबूज
३. वैभवः गझल कर्यशाळा

धन्स पेशवा Happy ह्या पैकी -

वाद घातलेली मंडळी बरीच जुनी आहेत काय? संतू, लालभाई बघितल्याच आठवत नाही.

चर्चेला स्लार्टी अन् मायबोली बेस्ट हह (माझं मत!)

मीही काही नॉमिनेशन्स अ‍ॅड करतोय लिंक्स सकट -

बेस्ट ब्लॉग - ट्युलिप - http://www.maayboli.com/blog/48
slarti - http://www.maayboli.com/blog/103
पौर्णिमा - http://www.maayboli.com/blog/19

मायबोली बेस्ट सर्व्हे - संयुक्ता - http://www.maayboli.com/node/14814

या सगळ्या कॅटेग-यांसाठी एकमेव पात्र उमेदवार असावा हे आश्चर्यच नाही का ? ते नाव मी सांगितलं असतं पण स्वतःचं नाव घेणं बरं दिसत नाही Lol