ट्युलिप यांचे रंगीबेरंगी पान

Mee Amour..

गार काळ्या कातळाखालून
तप्तशुभ्र झरा उसळी मारुन वर येताना
मी लाल बनारसी रेशिम असते
आणि त्यावर जरतारी बुंदके असतात.
माझ्यावरची नक्षी मला आवडते.
मी खेळत रहाते
तुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी
चमकत असतो तो.
माझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात
तेव्हा तुझ्यासाठी
भांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली
तुला आवडतात म्हणून
मला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं
तेव्हा
आणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही
मला आवडलेलं असतं.
मला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात
आणि बोरकरही
जेव्हा तुझ्या वीजेचं चांदपाखरु माझ्या कवेत असतं.

वह गली थी...

आपापली आयुष्य असतात. दिनक्रम असतात. ते सुरळीत चालू असतात. आणि मग चुकून एखादा रिकामा क्षण समोर येतो.. आणि नेमकी या माणसाची अशी ही जीवघेणी कविता वाचली जाते.
शब्दांवर काट मारण्याच्या सहजतेने नाती मिटवता येत नसतात. हे उशिरा आलेलं शहाणपण अशावेळी नव्याने जाणवतं फक्त!

मैं अपने बिझनेस के सिलसिले में,
कभी-कभी उसके शहर जाता हूं तो गुजरता हूं उस गली से |

वो नीम तारीक-सी गली,
और उसी के नुक्कड पे उंघता-सा
पुराना इक रोशनी का खंबा,
उसी के नीचे तमाम शब इंतजार कर के,
मैं छोड आया था शहर उसका !

बहुत ही खस्ता-सी रोशनी की छडी को टेके,
वो खंबा अब भी वहीं खडा है !

जोशी आणि जोशीण

(सायोने आज आठवण करुन दिली यांची किती दिवसांनी! म्हणून मग हलवलं त्यांना तिकडून इकडे फिदीफिदी)

---------------------------------------------------------------------------------

माझ्या आतली धारावी शोधून पहाताना.

ज्यु.कॉलेजमधे असताना पहिल्यांदा धारावी मधे गेले होते. लेदरच्या वस्तू तिथे खूप छान आणि स्वस्त मिळतात हे ज्ञान नुकतंच झालं होतं. इरॉसच्या बाजूच्या क्रॉसमैदानाबाहेर एक जण लेदरच्या ऍक्सेसरीज घेऊन बसायचा.

फ़िर पुकारो मुझे.. फ़िर मेरा नाम लो...

दोन आठवड्यापूर्वी मी पेडररोडवरच्या रशियन कॉन्स्युलेट जवळ असलेल्या कॉलेजलेनमधे गेले होते. काहीशी अचानक.

आणि काल न रहावून पुन्हा गेले.
मुद्दाम.

इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..

किरण नगरकरचं ककल्ड वाचून संपवलं.
पुन्हां एकदा तो दोन स्त्री पुरुषांच्या दरम्यानचा अनाम नात्याचा वेध.

अव्यक्ताच्या मागे कुठल्या अनावर आकर्षणातून जात रहातो आपण!

रेषेवरची अक्षरे...

रेषेवरची अक्षरे...०८
---------------------------->
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1

माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना,
संस्कृतीला धोका असताना,
ब्रेनड्रेन होत असताना,
साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना
माणसं लिहीत आलीयेत.

जाने क्यां तुने कही..

साहिर.. म्हणजे जादू.

सात आठ वर्षांपूर्वी पंचप्रयागच्या ट्रेकवर असताना साहिर दोन वेळा अचानक भेटला. आधीही भेटला होता पण आता भेटला तेव्हां .. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं हे जाणवून गेलं.

ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.

रॉयल - ए - रोमान्स

नुकती कुठे त्याची ओळख पटतेय असं वाटायला लागलेलं असतं.

ओळख तरी काय नजरेचीच फक्त.