भाषा
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.
त्यांना भक्तिची सप्तपदी अवगत होती
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते परिचयाच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
परस्परसंबंधांच्या असतात सतरा छटा अन्
भाषा
त्यांच्या भाषेत प्रेमाला एकही शब्द नव्हता.
त्यांना भक्तिची सप्तपदी अवगत होती
आदराचे अकरा स्तर ते जाणून होते अन्
जाणून होते ते परिचयाच्या वीस पातळ्या...
ते म्हणायचे,
परस्परसंबंधांच्या असतात सतरा छटा अन्
मार्टिन ऑयरबद्दल आधी एकदा सांगितले होते. 'तो काय करतो?', 'त्याच्याकडे का लक्ष द्यावे/देऊ नये ?' इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे बघा -
http://www.martinauer.net/
गारव्याची टाप
शुभ्र धुक्यात वाजतीये
दव थरथरतंय
तुझी आठवण
तुझीच साठवण गात्री
अशा कितीतरी रात्री
उन्हाचा तुकडा
माझ्या चाहुलीने हलला
फुलावर जाऊन बसला.
(आधारित)
मी लहान की महान ?
नव्हे, मी चंदन
मीच सहाण.
तर परवा आम्हाला नवीनच गोष्ट कळली. म्हणजे गोष्ट नवीन नव्हे, पण आता वयोमानापरत्वे गोष्टी पटपट कळत नाहीत आणि दुसरे म्हणजे कळल्या तरी वळत नाहीत. आता हेच बघा - तुकोबांची गादी की कायसेसे आहे म्हणे. आता हे आम्हाला नवीनच होते.
ती पत्रे यायला कधी सुरुवात झाली तो जानेवारीचा शेवटचा वीकेंड होता. पण त्याला त्या नावाने कोणी ओळखत नाही. त्या वीकेंडला एक नाव आहे, 'दुर्गा जसराजचा वीकेंड'. ही घटना अशा विचित्र प्रकारे लक्षात रहायला कारणही तसेच विचित्र आहे.
आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.
पूर्वी कधीतरी कोणी एक राजा निधन पावला. त्याच्या तरूण राजपुत्राने व्यवस्थित क्रियाकर्म केले. घाटावरून अस्थिकलश परत घेऊन येताना त्याने एका सतारवादकाचे वादन व गायन ऐकले.
शिक्षकदिनानिमित्त माझी एक फारावडती कविता -
'अनंता'चा साक्षात्कार
एखादा मास्तर असा भेटतो -
शाळेची जाम भीती घालतो
उठता बसता मारतो छडी
थरथर कापतात चिमणे गडी
विद्यार्थी ? छे, गोगलगाय
जीवनभर पोटात पाय !
सदा न् कदा छडी हाती
अहमदाबादमधल्या कारागिरांनी ढेरपोटे नसलेले गणपती बनवले आहेत आणि ते खपतसुद्धा आहेत. 'फिट' आधुनिक गणपती
गणपतीचे(सुद्धा) आधुनिकीकरण... भन्नाट कल्पना आहे !
तळ्याकाठच्या झाडावर
पाखरांची घरटी
फांदीफांदीला पालवी
मुसळधार पाऊस
दृष्टीसमोर ओघळते
संन्यासी हिरवे
मुसळधार पाऊस
तळे अस्वस्थ
बेडूक ध्यानस्थ
स्तब्ध पाण्यावर
पानांचे टपटप रंग
आवाजाचे तरंग