मराठी भाषा दिवस (२०११) - स्पर्धा आणि कार्यक्रम

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:44

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण मायबोलीवर साजरा केला. यापुढे करत रहाणार आहोत. यंदाही 'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे..

यावर्षी खालील उपक्रम/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.

१. केल्याने भाषांतर..

२. ये हृदयीचे ते हृदयी

३. "बाल"कवी

४. निबंध - माझे आवडते पुस्तक

५. बोलगाणी

पोस्टर्स -
"केल्याने भाषांतर..", बोलगाणी - अंजली
ये हृदयीचे ते हृदयी, निबंध स्पर्धा - मिनी
"बाल" कवी - बस्के

संयोजक - प्राजक्ता_शिरीन, मंजिरी, सशल, सावली, सुनिधी, सायो.

२०१० चा उपक्रम आपण इथे पाहू/ऐकू शकता.

http://www.maayboli.com/marathibhashadin/2010

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीभाषा दिनानिमित्त: महाराष्ट्रातील प्रत्येक मराठीभाषा प्रवाहातून- कोल्हापुरी, सोलापुरी, व-हाडी, विदर्भी, ई, कमीतकमी १०-१० शब्द "प्रमाणीत" मानल्या गेलेल्या मराठीत आणावेत व ते वापरावेत

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून का होईना पण २७ फेब्रुवारी हा दिवस आपण धुमधडाक्याने साजरा करता आहात... आनंद वाटला.

आम्हाला पण याच शुभदिनी जन्म घेण्याचं भाग्य लाभलेय बरं का. Wink

त्यामुळे मंडळींनो, धुमधडाक्यात होऊन जाऊ द्या.
(रेल्वे बरोबर कोळशाची यात्रा)

कारण इवलासा का होईना पण आखिर हमारी भी इज्जत का सवाल है के नही?....... Rofl

ये हृदयीचे ते हृदयीसाठी प्रवेशिका आल्या नाहीत का?
आणि केल्याने भाषांतर साठी एकच?
प्रताधिकाराची चर्चा वाचत वाचत मी मेल शेवटी ड्राफ्ट म्हणूनच ठेवलीय. Happy

आम्हाला पण याच शुभदिनी जन्म घेण्याचं भाग्य लाभलेय बरं का.

मुटेसाहेब, तुम्ही सगळ्या सदरांमध्ये प्रवेशिका पाठवायला पाहिजेत मग.... म्हणजे पाठवल्या असणार आतापर्यंत.... Happy

Pages