तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय का?

Submitted by आयडू on 12 February, 2011 - 03:25

तुमच्या गाडीतलं पेट्रोल ( इंधन!) संपलंय का?

तुमची गाडी रिझर्व्हला आली आहे का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होय असेल अन् जर तुम्ही बाटली / कॅन वगैरे घेऊन पेट्रोल पंपावर सुटं पेट्रोल मागायला गेलात तर कदाचित तुम्हाला सुटं पेट्रोल मिळणार नाही! अगदीच लकी असाल तर मिळेल ही कदाचित.

पण तुमच्यावर कधी अशी वेळ येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच -

काल रात्री १०:०० ची गोष्ट माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि मी नेहेमीप्रमाणे (हो तसं पेट्रोल बरेचदा संपतं Sad ) एक लिटरची बाटली घेऊन पेट्रोल पंपावर गेलो होतो. तेंव्हा पेट्रोल पंपावरच्या कॅशिअरने सुट्टं पेट्रोल देण्यास नकार दिला. व कारण विचारताच ८/२/२०११ रोजी मानपाडा पोलिसांनी लावलेली नोटिस दाखवली. सदर नोटिस मध्ये सुट्टं पेट्रोल विकण्यास बंदी घातली होती. तसेच ते विकल्यास व नागरिकानं तक्रार केल्यास विकणा र्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वगैरे वगैरे...

अधिक चौकशीसाठी मानपाडा पोलिसस्टेशन मध्ये गेलो असता तिथल्या अधिका र्‍यांनी असं सुट्टं पेट्रोल विकणं हा गुन्हा असून सुट्टं पेट्रोल विकायची परवानगी देता येणार नाही असं सांगितलं. शिवाय गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दल ही नियम आहेत हे सांगितलं. मात्र ह्याच मानपाडा पोलिसस्टेशन शेजारी असलेल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळेल काय ह्या चौकशीसाठी गेलो असताना तिथं पेट्रोल मिळालं. पेट्रोल मिळालं आणि ठरवलं ह्यापुढे गाडी रिझर्व्हला आल्या आल्या पेट्रोल भरून घ्यायचं

सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी हवीच उशीरा का होईना ती आली हे बरंच झालं पण...

मग प्रश्न पडले की शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला दुसरा न्याय कसा व का?

गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दलचे नियम काय आहे?

आत्ताच सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी का आली? अन् सुट्टं पेट्रोल न विकता एका गाडीतून दुस र्‍या गाडीत पेट्रोल ट्रान्सफर करता येणार नाही का? म्हणजे मग बंदीचा उद्देश सफल होत नाहीच.

जाणकारांनी माहिती द्यावी.

गुलमोहर: 

शहीद पोपट शिंदेच्या हौतात्म्यामुळं जाग आली असावी प्रशासनाला..
(गाडी ढकलण्याचे माझे अनुभव या धाग्याचा रंग पाहून देईन नंतर )

आत्ताच सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी का आली? अन् सुट्टं पेट्रोल न विकता एका गाडीतून दुस र्‍या गाडीत पेट्रोल ट्रान्सफर करता येणार नाही का? म्हणजे मग बंदीचा उद्देश सफल होत नाहीच. >>>

काहि का असेना, आपण आहे तो कायदा पाळणे हे उत्त्म नाहि का ? उगाचच का हे असे आहे , ते तसे आहे असे करत पळवाटा शोधायच्या ?

पेट्रोल मिळालं आणि ठरवलं ह्यापुढे गाडी रिझर्व्हला आल्या आल्या पेट्रोल भरून घ्यायचं >> बरोबर.

रिझर्व चा (किंवा fuel ) चा indicator प्रत्येक वाहनाला असतोच. मग वापरावा.

अजुन एक गोष्ट मी आठवणीने करतो ती म्हणजे गाडी रिझर्व ला आली कि मी लगेच ट्रिप मीटर झीरो करतो. म्हणजे गाडी रिझर्व ला येउन किती किलोमीटर झाले हे पण लक्षात राहते आणि गाडीचं मायलेज पण कळतं.....

सुट्या पेट्रोल विक्रीवर बंदी खूप वर्ष आहे ना? ९३ च्या बॉम्बस्फोटांच्या लगेच नंतरपासून बंदी कागदोपत्री लागू झाल्याचं आठवतंय. कॉलेजात जाताना लुना ड्राय होणे आणि ढकलावी लागणे हे नॉर्मली असायचं. पण तेव्हाही कायम पेट्रोल पंपावर सुटे पेट्रोल देण्यावर बंदी आहे अशी सुचना असायची हिराबाग आणि अभिनवच्या(हे दोन्ही पुण्यात आहे.) इथल्या पेट्रोल पंपांवर.

आमचे स्कूटर मॅकेनिक पण वैतागलेले असायचे त्यामुळे...

तस्मात ही बंदी नवीन नाही.

माझ्या माहितीनुसार सुटं पेट्रोल विकायला बन्दी आहेच. पम्पावाले नियम मोडून ते आपल्याला देतात तर आपण त्यालाच नियम समजतो.तसे च गाडीत कधीही एक लिटरर्पेक्षा (दुचाकी) कमी पेट्रोल ठेवू नये असे माझा सर्विसिंगवाला सांगतो. त्याने इन्जिनचे ७५ टक्के प्रॉब्लेम कमी होतात. अर्थात पेट्रोल सम्पून गाडी बन्द पडेपर्‍यन्त वाट पाहणे म्हनजे रिझर्वे मोड आणि फ्युएल गेज या संस्थेचा पराभव करण्यासारखेच आहे.
मग उशीरा आलेल्या मुलाला ग्राऊन्डला फेर्‍या मारायाला लागते तसे शिक्षेचा भाग म्हणून गाडी ढकलायला लागते Happy

गाडीत किती पेटोल ठेवावे याचा कायदा नसावा पण मेन्टेनन्स्चा नॉर्म असावा असे वाटते. म्हणजे किमान किती ठेवले म्हनजे हितावह.

हो तशी बंदी आहेच. आणि पेट्रोलच्या साठ्याचा हिशेबही ठेवावा लागतो.

मला माहित असलेल्या, पेट्रोल चोरायच्या दोन पद्धती

१) गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तो नॉझल आणि पाईप मधे थोडे पेट्रोल राहतेच. ते पेट्रोल कुणी नसताना, तिथले कर्मचारी, एका बाटलीत भरुन ठेवतात.

२) अगदी जमिनीखाली साठा असला तरी काही पेट्रोलची वाफ होऊन हवेत उडून जाते (आपल्याला पेट्रोलचा वास येतो तो त्यामूळेच) त्याचे काही एक मानक आहे. म्हणजे साठ्यातले अमूक इतके टक्के पेट्रोल असे उडून गेले असेल, असे मानून तशी सूट दिली जाते (जसे रेशनवरच्या धान्यात ३ टक्के दगड, माती, धोंडे वगैरे वगैरे असलेले चालते ) आणि त्या सूटीचा अर्थातच लाभ घेतला जातो.

या पोस्टचा तसा या बाफशी संबंध नाही (आणि हा सल्लाही नाही, असे सल्ले देण्याचे वेगळे पैसे आम्ही लावतो..)

एक माहीती हवी आहे... ह्या विषयाशी फारसा संबध नाही पण...

ज्या गाड्यांना रिझर्व्ह चा कॉक नाही. त्या गाडीचे ऐव्हरेज कसे काढायचे...

२ आठवड्यापुर्वी ची गोष्ट.
गाडी फिरवुन आल्यावर पार्क करुन ठेवली होती, घाई घाई मध्ये एका कार च्या जरा जवळच पार्क केली होती, नंतर बरोबर पार्क करु असा विचार केला आणि निघुन गेलो. २-३ दिवसांनी गाडी बरोबर पार्क करायला आलो, आणि गाडी स्टार्ट करत होतो तर स्टार्ट होईना, बघितलं तर पेट्रोल संपली होती.

गाडी मध्येच कॅन होतं, कॅन घेतली, गाडी लॉक केली आणि सरळ पेट्रोल पंपा वर गेलो आणि पॉवर पेट्रोल मागितलं, तर त्यानी सांगितलं पॉवर खतम हुआ है सादा ले लो, तर मी सांगितलो नही मुझे पॉवर ही चाहिए, त्यानी सांगितलं आगे के पेट्रोल पंप से ले लो.

मी गेलो पुढच्या पेट्रोल पंपावर आणि कॅन पुढे करुन त्याला सांगितलं ३ लि पेट्रोल दे, त्यांनी सांगितलं छुट्टा पेट्रोल नही मिलेगा, गाडी लेके आओ, त्यावर मी त्याला सांगितलं अरे गाडी तो रस्ते पे खडी है, पेट्रोल खतम हुआ है, ईसलिए तो कॅन लेके आया हु. यावर पंप वाल्याचे उत्तर, वोह हमे कुछ नही पता, पेट्रोल चाहिए तो गाडी लेके आओ. मी गेलो दुसर्‍या पंपा वर, तिथे ही परत सेम स्टोरी रिपीट, मग कंटाळुन सर्वात पहिल्या पेट्रोल पंपावर गेलो होतो तिथेच गेलो आणि त्याला सांगितले दे दे यार सादा पेट्रोल, तर सांगतो अभी पॉवर (वीज) नही है, मी सांगितले अरे यार पॉवर नही सादा चाहिए, तर ओरडुन सांगतो को कसा एक बार बोला ना बिजली नही समज मे नही आता क्या, २-३ घंटे के बाद आओ.

मग संध्याकाळी परत त्याच पंपावर जाउन ३ लि पेट्रोल घेतली आणि जेव्हा बिल मागितलं, तर सांगतो बिल नही मिलेगा. ३लि पेट्रोल साठी पुर्ण दिवस माझा वाया गेला.

मला वाटतं, भेसळ करत असणार म्हणुन तर बिल दिलं नसणार का ???

आणि एक, ज्यांनी ते छुट्टा पेट्रोल दिलं त्याला मी विचारलं, कि छुट्टा पेट्रोल क्यो नही देते, तर त्यांनी सांगितले के बोतल लेके जाओगे तो नही देंगे, कॅन लेके जाओगे तो देंगे.

ज्या गाड्यांना रिझर्व्ह चा कॉक नाही. त्या गाडीचे ऐव्हरेज कसे काढायचे..........

काय राव...काही ही काय........१ लिटर पेट्रोल टाका आणि गाडी चालवा........सरळ आहे..............

दोन लिटर पेट्रोल दोन वेगवेगळ्या बाटल्या मधे घ्या. जिथे पेट्रोल संपेल तिथे १ लिटर टाकित ओता. गाडी किती किलोमीटर जाते बघा. आणि मग रहिलेलं ओता आणि घरि जा.

कार असेल तर १ च्या एवजी ५ लि घ्या....

बाय द वे आज काल स्कूटी ल पण रिझर्व चा कॉक असतो. कोणती गाडी आहे हि?

१ लिटर पेट्रोल टाका आणि गाडी चालवा........सरळ आहे...... >>>>

त्यासाठी दोनदा टाकीचा खडखडाट करावा लागेल .......
सुरवातीला, आणि नंतर...
आणि दोन्ही वेळेला गाडी नेमकी पंपाजवळ यायला हवी, नाहीतर आहे परत.. बाटलीत पेट्रोल द्या ....
तो म्हणणार.. कॅन लेके आओ....:हहगलो:

आताच ऑफीस मधे एकाने लोजीकल सोलुशन सांगितले...

टाकी फुल करणे, रिडीग लिहुन/लक्षात ठेवणे ( समजा १०००).. पुढ्च्या वेळी पेट्रोल भरताना. ( टाकी संपायच्या आधी) परत रीडींग घेणे ( ११००) ..
आणि परत टाकी फुल करणे... जेवढे पेट्रोल भरावे लागले...समजा २.२० लिटर..

तर २.२० लिटर मध्ये १०० कीमी गाडी गेली............
म्हणजे... ४५ / लिटर..

ह्म्म्म.... जमले....

टाकी फुल्ल करणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
या जमान्यात ?

जागेपणी इतका अशक्य उपाय माणसाला सुचू शकतो ????????? Happy

आयुष्यात हि इछ्छा एकदा तरी पुर्ण होइल का माझी !!

टाकी फुल्ल करणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
या जमान्यात ?
>>>>>>>>>>

अहो काही काही अंबानी आहेत आपल्यात..........विसरलात वाटते..........मंगेश यांना बघा....... Happy

हे केलत कि मला एक ऑटोग्राफ द्या हं

संग्रही ठेवेन....

टाकि फुल्ल केलेला माझ्या ओळखी तला माणूस म्हणून ........ Happy

टाकी फुल्ल करणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
या जमान्यात ?

जागेपणी इतका अशक्य उपाय माणसाला सुचू शकतो ?????????

आयुष्यात हि इछ्छा एकदा तरी पुर्ण होइल का माझी !! <<<<<

अभिजीत,
तुझ्य संपुर्ण पोस्ट्ला अनुमोदन आणि Lol

आयला...
अ‍ॅक्टीव्हाची टाकी फुल करायला..हार्ड्ली ३००/- लागतात....
सो प्लीज......
( इतरवेळी ३००० कसे पण जातात ना...)

ह्म्म्म्म्म मी पण जस्ट गुगलुन पाहिलं. ५.७५ का ६ लिटर ची आहे....

तरी पण ३६७ वगैरे होतिल हो फुल्ल केली तर....

आम्ही कॉलेज ल असल्या पसुन २० रुपये चं टाका वाले...
आता २० चं ५० झालं इतकंच Happy

>>>>> आम्ही कॉलेज ल असल्या पसुन २० रुपये चं टाका वाले...

आमच दु:ख तुमच्याहून खतरनाक! Proud
लहानपणापासुन, पन्च्याहत्तर पैसे लिटर पासुन जी दरवाढ बघतो आहे ती आता ६० च्या वर गेलीये Sad
कुठे पन्च्याहत्तर पैसे? कुठे ऐन्शीच्या दशकातले अडिच पावणे तिन रुपये? नवद्दच्या दशकातले वीस ते तीस रुपये? अनु कुठे गेल्या दोन वर्षातले चाळीस ते साठ?
पब्लिक खपवुन घेतय म्हणून ही थेर चालताहेत, बाकी काही नाही!

अहो जेव्हा ४० रु लिटर होतं तेव्हा आम्हि २० च टाकायचो आता ६० चं झाल आणि ५० चं टाकतो म्हणजे प्रगती आहे कि नाही....... Happy

पब्लिक खपवून घेतय म्हणजे. ? साधा प्लम्बर एक नळ दुरुस्त करायचे पन्नास रुपये घेतोय. मजूर २०० रु. रोज घेतोय. तुम्ही स्वतः पाच आकडे कधीच पार केलेत तुम्हालाही आठवत नसेल... पगार ७५००० घ्यायचा गाड्या उडवायच्या अन पेटोल दराच्या नावाने मात्र कुंथायचे. स्वतःचा दर उतरवा पहिले. भटजी देखील ५००० च्या आत उतरत नाहीत आताशा ...

व्वा! छानच चर्चा!! Proud आता हळूहळू आखाती देश, पेट्रोल कंपन्या, कॉंग्रेसी (सध्या आहे म्हणून) जुलमी राजवट सगळे मिळून सामान्य जनतेला कसे लुबाडतात वगैरे वगैरेवरही चर्चा होईल...

लगे रहो!

लगे रहो! >>>>
दिप्या आयला , मी फक्त गाडीचे ऐव्हरेज कसे काढायचे. एवढेच विचारले.... पेटले की..

बाजो...
पुर्ण अनुमोद्न....

बाजो, शिन्च्या भटजी च्या दक्षिणेवर का रे तुझा डोळा?
साल्यो लग्नात नवर्‍याच्या वरातीच्या घोड्यावर पाचदहा हजार रुपये सहज उधळतात लोक, अन भटजीची शेपाचशे दक्षिणा देववत नाही. कलियुगिन कुठले! Proud
अन लेका मी महाराष्ट्रियन मारवाड्याकडे काम करतो रे भो! तुझे ते पन्च्याहत्तर हजार म्हणजे माझी वर्षाची कमाई, कळ्ळ?
इथे मजसारख्या सामान्याना काय वाट्टय याची चर्चा चाल्लीये रे भो, सरकारी जावयान्ना काय वाटत याची नाही! Angry

Pages