तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय का?

Submitted by आयडू on 12 February, 2011 - 03:25

तुमच्या गाडीतलं पेट्रोल ( इंधन!) संपलंय का?

तुमची गाडी रिझर्व्हला आली आहे का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होय असेल अन् जर तुम्ही बाटली / कॅन वगैरे घेऊन पेट्रोल पंपावर सुटं पेट्रोल मागायला गेलात तर कदाचित तुम्हाला सुटं पेट्रोल मिळणार नाही! अगदीच लकी असाल तर मिळेल ही कदाचित.

पण तुमच्यावर कधी अशी वेळ येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच -

काल रात्री १०:०० ची गोष्ट माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि मी नेहेमीप्रमाणे (हो तसं पेट्रोल बरेचदा संपतं Sad ) एक लिटरची बाटली घेऊन पेट्रोल पंपावर गेलो होतो. तेंव्हा पेट्रोल पंपावरच्या कॅशिअरने सुट्टं पेट्रोल देण्यास नकार दिला. व कारण विचारताच ८/२/२०११ रोजी मानपाडा पोलिसांनी लावलेली नोटिस दाखवली. सदर नोटिस मध्ये सुट्टं पेट्रोल विकण्यास बंदी घातली होती. तसेच ते विकल्यास व नागरिकानं तक्रार केल्यास विकणा र्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वगैरे वगैरे...

अधिक चौकशीसाठी मानपाडा पोलिसस्टेशन मध्ये गेलो असता तिथल्या अधिका र्‍यांनी असं सुट्टं पेट्रोल विकणं हा गुन्हा असून सुट्टं पेट्रोल विकायची परवानगी देता येणार नाही असं सांगितलं. शिवाय गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दल ही नियम आहेत हे सांगितलं. मात्र ह्याच मानपाडा पोलिसस्टेशन शेजारी असलेल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळेल काय ह्या चौकशीसाठी गेलो असताना तिथं पेट्रोल मिळालं. पेट्रोल मिळालं आणि ठरवलं ह्यापुढे गाडी रिझर्व्हला आल्या आल्या पेट्रोल भरून घ्यायचं

सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी हवीच उशीरा का होईना ती आली हे बरंच झालं पण...

मग प्रश्न पडले की शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला दुसरा न्याय कसा व का?

गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दलचे नियम काय आहे?

आत्ताच सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी का आली? अन् सुट्टं पेट्रोल न विकता एका गाडीतून दुस र्‍या गाडीत पेट्रोल ट्रान्सफर करता येणार नाही का? म्हणजे मग बंदीचा उद्देश सफल होत नाहीच.

जाणकारांनी माहिती द्यावी.

गुलमोहर: 

दोन दिवस फिरती वर असल्याने आज माबो वर आलो.

भुंगा तुम्हि मेकॅनिक चे जे काही मत मांडले आहे ते काही पट्ले नाही. अहो पेट्रोलच्या टाकीला आत मधुन चांगले छान कोटिंग असते.

हा मेंटेनन्स कसा कमी होतो ते एकद विचारतो एक मित्र आहे त्याला.

वेळ वाचवायचा काही प्रश्न नाही भरपुर असतो आपल्या कडे Happy

माझ्या मेक्यानिकने जे सांगितले ते असे:
वेगवेगळ्या कारणानी ,पेट्रोल्सह टाकीत धुलिकण अथवा कचरा थोडा थोडा जातच असतो. जास्त पेट्रोल असल्यास तो डायल्युट होऊन ड्रेन होत राहतो. मात्र कमी पेट्रोल ठेवल्यावर , तो जवळ जवळ येऊन त्याची घनता वाढून तो इंजीनमध्ये डिपॉझिट होण्याची शक्यता असते.व त्यामुळे इंजिन काम काढू शकते.व खर्च वाढू शकतो. जसे जास्त पाणी पीत राहिल्याने युरिन स्टोन डिपॉझिट होण्याची शक्यता कमी होत जाते तसे.

बाजो... एकदम परफेक्ट.....

अभि, कोटिंग असते हे पण खरय आतून....... पण एक फुटलेली टाकी त्याने दाखवली होती..... अर्थात ती बाईक किती जुनी होती याची कल्पना नाही...... अ‍ॅक्सिडेंट झालेली बाईक होती.....

Pages