तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय का?

Submitted by आयडू on 12 February, 2011 - 03:25

तुमच्या गाडीतलं पेट्रोल ( इंधन!) संपलंय का?

तुमची गाडी रिझर्व्हला आली आहे का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होय असेल अन् जर तुम्ही बाटली / कॅन वगैरे घेऊन पेट्रोल पंपावर सुटं पेट्रोल मागायला गेलात तर कदाचित तुम्हाला सुटं पेट्रोल मिळणार नाही! अगदीच लकी असाल तर मिळेल ही कदाचित.

पण तुमच्यावर कधी अशी वेळ येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच -

काल रात्री १०:०० ची गोष्ट माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि मी नेहेमीप्रमाणे (हो तसं पेट्रोल बरेचदा संपतं Sad ) एक लिटरची बाटली घेऊन पेट्रोल पंपावर गेलो होतो. तेंव्हा पेट्रोल पंपावरच्या कॅशिअरने सुट्टं पेट्रोल देण्यास नकार दिला. व कारण विचारताच ८/२/२०११ रोजी मानपाडा पोलिसांनी लावलेली नोटिस दाखवली. सदर नोटिस मध्ये सुट्टं पेट्रोल विकण्यास बंदी घातली होती. तसेच ते विकल्यास व नागरिकानं तक्रार केल्यास विकणा र्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वगैरे वगैरे...

अधिक चौकशीसाठी मानपाडा पोलिसस्टेशन मध्ये गेलो असता तिथल्या अधिका र्‍यांनी असं सुट्टं पेट्रोल विकणं हा गुन्हा असून सुट्टं पेट्रोल विकायची परवानगी देता येणार नाही असं सांगितलं. शिवाय गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दल ही नियम आहेत हे सांगितलं. मात्र ह्याच मानपाडा पोलिसस्टेशन शेजारी असलेल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळेल काय ह्या चौकशीसाठी गेलो असताना तिथं पेट्रोल मिळालं. पेट्रोल मिळालं आणि ठरवलं ह्यापुढे गाडी रिझर्व्हला आल्या आल्या पेट्रोल भरून घ्यायचं

सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी हवीच उशीरा का होईना ती आली हे बरंच झालं पण...

मग प्रश्न पडले की शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला दुसरा न्याय कसा व का?

गाडीत पेट्रोल किती असावं ह्याबद्दलचे नियम काय आहे?

आत्ताच सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी का आली? अन् सुट्टं पेट्रोल न विकता एका गाडीतून दुस र्‍या गाडीत पेट्रोल ट्रान्सफर करता येणार नाही का? म्हणजे मग बंदीचा उद्देश सफल होत नाहीच.

जाणकारांनी माहिती द्यावी.

गुलमोहर: 

पेट्रोलचा विषय आहे. ज्वालाग्रही वळण अपेक्षित >>> बरोबर माझ्या आधीच लक्षात यायला हवे होते Lol

तर लगे रहोच!

आत्ताच सुट्टं पेट्रोल विकण्यावर बंदी का आली? अन् सुट्टं पेट्रोल न विकता एका गाडीतून दुस र्‍या गाडीत पेट्रोल ट्रान्सफर करता येणार नाही का? म्हणजे मग बंदीचा उद्देश सफल होत नाहीच.<<<
आत्ताच नाही पण बंदी येण्याचं मला माहित असलेलं कारण ९३ च्या दंगलीत झालेला पेट्रोल बॉम्बचा वापर हे होतं. आणि बंदीमुळे काही प्रमाणात का होईना तो वापर कमी झाला असावा.

लय जबरी.....

मित्रा अभिजीत.. सध्या बर्‍याच गाड्यांचा रिझर्व्हचा कॉक काढून टाकलेला आहे... त्या ऐवजी पेट्रोल इंडीकेटर असतो... आणि तो महान असतो.. बर्‍याच वेळेस तो बंदच असतो... तेव्हा गाडी कधी रिझर्व्हला आलीये तेच समजत नाही... त्यामुळे एकदा काय तो गाडीचा अ‍ॅव्हरेज काढायचा.. किती पेट्रोल भरतो ते लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार तेव्हढे किमी झाले की गाडी पंपावर न्यायची...

मी तर आजकाल कधीही गाडी पंपावर नेली की टाकी फुलच करतो.. दर दोन दिवसानी कोण पंपावर चक्कर मारत बसणार... त्यापेक्षा एकदा टाकी फुल केली की पुढचे पंधरा दिवस पंपावर जायची भानगडच नको...

नीधप, वापर कमी झाल्याचं कुठेही दिसून येत नाही. हा भडका दिवसे न दिवस वाढतच आहे. अजुनसुद्धा काही गावखेड्यांमधे असेच पेट्रोल, डिझेल , रॉकेल मिळते अन तेही अव्वाच्या सव्वा भाव आकारून. याचे जास्त प्रमाण दुर्गम डोंगरी भाग आणि बर्‍यापैकी मच्छिमारांसाठी राखीव असलेली बंदरे. याचा हिशेब लावला तर कदाचित महागलेलं इंधन अन त्यावर पोसली जाणारी महागाई डायन केव्हाच पसार होईल. हा संसर्गजन्य रोग आहे. त्याला लस टोचायची झाली तर थोड्याप्रमाणात तो आटोक्यात येतो पण फायनल असं औषध अजुन कुठेच सापडलेलं नाहीये. पेट्रोल पंपावर दिवसा ढवळ्या नाही पण रात्री हाय-वे वर काही पवळ्यांची हि चंगळ चालूच असते. हायवेवरचे उद्योग अन उद्योगपतींचा ग्राफ एवढ्या गोष्टीनेच वाढत आहे. ज्याचे ज्याचे लायसन्स घ्यावे लागते त्याचा काळाबाजार हा ठरलेला आहे आपल्या देशात.

हिरकु

तुम्ही नॉन गिअर गाड्यांविषयी बोलताय का ?

गिअर वाल्या सगळ्या गाड्यांना तर आहे रिझर्व कॉक ची सोय.

बाय द वे, तुमची ऑटोग्राफ द्या.... महान आहात टाकी फुल्ल करणं म्हणजे काय चेष्टा झाली होय Happy

मला समजलेली माहिती..
सुट्टं पेट्रोल बाटलीत देत नाहीत, कारण बाटलीचं तोंड लहान असतं, त्यात तो पेट्रोलचा पाईप नीट जात नाही, आणि ते भरताना थोडं सांडतं. ग्राहक भरलेल्या पेट्रोलचे पैसे देतो, सांडलेल्या नाही, त्यामुळे जे काही ३-४ थेंबांचं नुकसान असेल ते विक्रेत्याला सोसावं लागतं. (असे दिवसभरात किती लोक नेतात माहित नाही. )उलट कॅनमधे ते नीट भरता येतं, त्यामुळे नुकसान नाही होत.
माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि मी १ लि. ची बाटली नेली तेव्हा हे मला समजलं. मग कुठूनतरी कॅन आणून वगैरे घेतलं पेट्रोल.

अरे अभिला टाकी फुल करण्याचं एवढं का अप्रूप वाटतय राव.....

अभि, मी अ‍ॅक्टिव्हा काय माझ्या एस्टीमची पण ताकी नेहमीच फुल करतो.... प्रत्येक ट्रीपचे अ‍ॅव्हरेज काढण्याची सवय लागलीये... जेणेकरून पर्फॉर्मन्स डाऊन झाल्यासारकं वाटलं (मायलेज) तर लगेच आवश्यक अ‍ॅक्शन घेता येते..... Happy

अभि, कुठे भेटतोस ऑटोग्राफ घ्यायला........ Proud येताना ऑटोग्राफ बूकच आण रे, कारण एस्टीमची टाकी अ‍ॅक्टिव्हापेक्षा लई म्हणजे लईच मोठी असते.... Rofl Lol

बाय द वे, अभि..... दिल पे मत ले Light 1

च्यामारी, १० चक्का किंवा ४० फुटी कंटेनरची टाकी फूल करून दिली कि आमच्या पट्टीच्या ड्रायव्हरांची अन किन्नरांची चंगळच. मग काय कँडातून डिझेल अन बाटलीतून दारू हे समीकरण ठरलेलं आहे. अन हे ढाब्यांवर सर्रास पहायला मिळतं.

नीधपला अनुमोदन......

९३ नंतरच खरं तर सुटं पेट्रोल मिळत नाही.... सुदैवाने अशी वेळ नाही आली, पण एकदा आली होती तेंव्हा पेट्रोल पंपवाल्याने (गोरेगावला) सुटे देणार नाही पेट्रोल सांगितलं.... "आता वं काय करायचं??"

बाजुच्या पानवाल्याकडे गेलो, त्याच्या हातात बाटली दिली.... सांगितलं मुझे १ लिटर पेट्रोल लाके दे... ये रही बॉटल...... पानवाल्याच्या पोराला त्याच बाटलीत पेट्रोल भरून मिळालं..... त्याच पंपावर... Happy

मी पण खूष आणि माझी अ‍ॅक्टिव्हा पण..... Proud

नाही भुंगा मी येणार नाही.......
तुमच्या सारख्या थोरामोठ्या लोकांकडे म्या पामराने कुठल्या तोंडाने यावं.

कहां राजा भोज और कहां गंगू तैली...... Happy

मी तर पोलिसालाच सांगतो हे १०-२० रु वर घ्या अन पेट्रोलचे आणा. तो देतो आणून.

लोकांना RDX पण देतात ते, मागायचे त्यांनाच!

आपल्याकडे अजून कोणती "पेड सर्विस" चालू झाली नाही का? रस्त्यावर तुमचे पेट्रोल संपले तर १-२ लिटर आणून टाकीत घालतील, टायर बसला तर तात्पुरता बदलून देतील किंवा "टो" करून दुकानापर्यंत नेतील अशी?

उसगावात बरीच वर्षे AAA चे लोक ते करतात. काही इन्श्युरन्स वाले ही करतात. खूप उपयोगी आहे. सहसा अर्ध्या तासात येतात.

आपल्याइथे नाक्यानाक्यावर टायरची दुकानं असतात. फोन करून बोलवेपर्यंत टायर बदलून होतंय.
एक्स्प्रेस हायवेसाठी ठीक आहे ही व्यवस्था. Happy

यावर एक सोपा उपाय म्हणजे गाडीत पेट्रोल भरले की घरी आल्यावर त्यातले थोडे काढून घेउन एका छोट्या ऑइलच्या कॅनमध्ये भरायचे.... आणि तो कॅन डिकीत ठेउन द्यायचा .... इमरजन्सी म्हणून..... संपला की परत भरुन ठेवायचा Proud

यावर एक सोपा उपाय म्हणजे गाडीत पेट्रोल भरले की घरी आल्यावर त्यातले थोडे काढून घेउन एका छोट्या ऑइलच्या कॅनमध्ये भरायचे.... आणि तो कॅन डिकीत ठेउन द्यायचा .... इमरजन्सी म्हणून..... संपला की परत भरुन ठेवायचा

>>>>

हे शक्य नाही (निदान मुंबईत). कारण तीच गाडी घेऊन जेंव्हा तुम्ही मॉल, एखादं कॉर्पोरेट ऑफिस यांच्या पार्किंग लॉबीमधे जाता तेव्हा डिकी चेक करतात...... पेट्रोलने भरलेला कॅन ईज नॉट अलाऊड....
अर्थात, करणार्‍याला काहीही शक्य आहे हेही खरंच...... Wink

नाही भुंगा मी येणार नाही.......
तुमच्या सारख्या थोरामोठ्या लोकांकडे म्या पामराने कुठल्या तोंडाने यावं.

कहां राजा भोज और कहां गंगू तैली......
>>>>

बस क्या अभि...... उघड उघड शिव्या दे रे त्यापेक्षा...... "राजा भोज" काय??? Rofl Proud

हं, आता तेल (पेट्रोल) नेहमीच भरतो म्हणून मला जर "गंगू तेली" म्हणत असशील तर मग ठीक आहे....... तू हो राजा भोज... Lol Biggrin

पानवाल्याच्या पोराला त्याच बाटलीत पेट्रोल भरून मिळालं..... त्याच पंपावर...

..
पोलीस बनावट गिर्‍हाइके पाठवतात पम्पावर म्हणून अनोळखी लोकाना नाही. ओळखीच्या लोकाना देतात.
पेट्रोलची बाटली गाडीत ठेवणे अतिशय धोक्याचे आहे.

इतका आळशीपणा आणि दुर्लक्ष का करायचं? पेट्रोल निम्म्यापेक्षा कमी झालं कि भरून घ्यायचं म्हणजे अशा त्रासाला सामोरं जावं लागणार नाही.

लहानपणापासुन, पन्च्याहत्तर पैसे लिटर पासुन जी दरवाढ बघतो आहे ती आता ६० च्या वर गेलीये>>> लिम्ब्या तेव्हाच टाकी फुल्ल करून ठेवायची होतीस.... गाडिची नाही तर घरावर बन्धून घेऊन!

.... महान आहात टाकी फुल्ल करणं म्हणजे काय चेष्टा झाली होय>>>>>

अभि, काही अवघड नाहीये टाकी फुल्ल करणं, उलट आपलंच पेट्रोल आणि पैसे वाचतात.

माझ्याकडे तीन गाड्या आहेत हंक, प्लेझर आणि पॅशन, आजपर्यंत कधीही कुठलीही गाडी रिझर्व्हला येत नाही Happy

<<माझ्याकडे तीन गाड्या आहेत हंक, प्लेझर आणि पॅशन, आजपर्यंत कधीही कुठलीही गाडी रिझर्व्हला येत नाह<<>>
तूझ्या गाडीच्या टाक्या काय द्रौपदीच्या थाळीच्या मटेरीयलच्या बनवल्यात काय रे ?

तूझ्या गाडीच्या टाक्या काय द्रौपदीच्या थाळीच्या मटेरीयलच्या बनवल्यात काय रे ? >>>

नाहि. त्यांच्याकडे तीन गाड्या आहेत असे म्हणाले ते. ते असे थोडेच म्हणाले की ते या गाड्या चालवतात ?

त्यांच्याकडे तीन गाड्या आहेत असे म्हणाले ते. ते असे थोडेच म्हणाले की ते या गाड्या चालवतात ?

तूझ्या गाडीच्या टाक्या काय द्रौपदीच्या थाळीच्या मटेरीयलच्या बनवल्यात काय रे ?

>>> lol.gif

चला, आता पेट्रोल्चा पण भडका उडायची वेळ जवळ आली तर...... Proud

>>
नाहि. त्यांच्याकडे तीन गाड्या आहेत असे म्हणाले ते. ते असे थोडेच म्हणाले की ते या गाड्या चालवतात ?

>>>

Rofl

टाकी फुल्ल केल्याने पैसा कसा वाचतो ते कळाले नाही बुवा....

एकदम टाकी फुल्ल केल्यावर काय तुम्हाला डिस्काउंट मिळतो का हाय वे ला गेल्यावर (मनपा च्या हद्दी बाहेर) टाकी फुल्ल करुन आणता....

जरा आम्हालाही सांगा.... आम्हीही पुण्यनगरी मधे राहतो तेव्हा पैसे वाचविण्याचे जे जे काही मार्ग असतिल ते आम्ही शोधतच असतो. Happy

जरा आम्हालाही सांगा.... आम्हीही पुण्यनगरी मधे राहतो तेव्हा पैसे वाचविण्याचे जे जे काही मार्ग असतिल ते आम्ही शोधतच असतो.

>> वेळ वाचतो, यापेक्शा अजुन काय हवे आहे? टाकी फुल्ल केल्याने नक्किच पैसे पन वाचतात. कारण, इतके पैसे एक्दम गेल्यावर गाडी जपुन चालवली जाते.

अभिजीत, गाडी रिझर्ववर कमीतकमी चालवावी. रिझर्ववर आल्याआल्या लगेच पेट्रोल भरावे.मेंटेनन्स कमी लागतो. वाचलेच ना पैसे.

जरा आम्हालाही सांगा.... आम्हीही पुण्यनगरी मधे राहतो तेव्हा पैसे वाचविण्याचे जे जे काही मार्ग असतिल ते आम्ही शोधतच असतो.
>>>>>>

अरे अभि, अजून एक मुद्दा असा आहे की, काही मेकॅनिक म्हणतात की मेटल टँक असल्याने तो जितका ओपन (म्हणजे टाकीत पेट्रोल कमी) राहील तितका पटकन करोड (गंज चढणे) होतो अर्थात टाकीच्या आतल्या बाजुने, जो भाग दर्शनी नाही...... खरं खोटं माहित नाही...... कारण कधी पेट्रोल टाकीच्या आत डोकवायची वेळ आली नाही Proud पण लॉजिकल मात्र वाटतेय....... Happy

पाण्याच्या मेटल टँक जश्या कधी फूल भरलेल्या असतात, आणि नंतर जर पाणी फूल भरलं जात नसेल तर उघडा राहणारा टाकीचा आतला मेटल सर्फेस हा गंजत जातो.... तसेच.... !!

Pages