फजिता

Submitted by गिरिश देशमुख on 7 February, 2011 - 05:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मक्याचे दाणे बारीक वाटून --- २ कप,
दूध -------- १/२ कप,
दही (फेटुन) -------- १/२ कप,
हिरव्या मिरच्या --- २ किंवा ३
आले ------ १/२ इंच तुकडा,
मीठ, साखर ----- अंदाजे, चवीनुसार,
फोडणीचे साहित्य- १ टे. स्पून तेल, मोहरी, जीरे, हिंग,
कोथींबीर -- सजावटी साठी

क्रमवार पाककृती: 

ओले मक्याचे दाणे मिक्सर मधे वाटतांनाच त्यात हिरव्या मिरच्या, आले, थोडे जीरे घाला, सरबरीत वाटून घ्या.
कढईत तेल, मोहर्‍या, जीरे, हिंग यांची फोडणी करा, त्यात मक्याचे वाटण घाला, थोडे पाणी घालून शिजवून घ्या.
अर्धवट शिजले, की दही आणि दुध घाला, मीठ घालून पूर्ण शिजवून घ्या. आवडीनुसार कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करा.
कोथींबीर घालून सूप बाउल मध्ये सर्व करा.

fajj.jpg

(दही + दूध यांच्यामुळे या पदार्थाला एक छान तलम, स्निग्ध पोत येतो, तो मला फार आवडतो.)

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१)बाउल मध्ये सर्व करताना वरून थोडे फ्रेश क्रीम किंवा साजूक तूप घालावे.
२) फजिता म्हणजे दाटसर सूप सारखा प्रकार असतो.
३) व्हेरिएशनः फ्लॉवर चे तुकडे, गाजर, मटार वाफवून घालता येतील. ताजे मक्याचे दाणे उपलब्ध नसल्यास मक्याचा रवा वापरून सुद्धा फजीता करता येतो. मक्याचा रवा + कैरी किंवा मक्याचा रवा + आंब्याचा रस असं व्हेरिएशन सुद्धा करतात.

माहितीचा स्रोत: 
ही पाकृ माझ्या आईला तिच्या आजीने (माझी पणजी) शिकवली होती. म्हणुन माहितीचा स्त्रोत :- आई, पणजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंय हे. सोप्पं एकदम.
आधी फईटा बद्दल लिहिलंय का म्हणून बघायला आले कारण त्याचं पण स्पेलिंग फजिता असंच असतं ना. Happy

रेसिपी मस्त आणि सोप्पी वाटते आहे. करून बघणार!
बादवे, फजिता/ फईटा म्हणजे मक्याच्या पिठाच्या पोळीत भाज्या/ मांसाचे स्टफिंग भरून असले काहीतरी असे मला आत्तापर्यंत वाटायचे!

फजिता/ फईटा म्हणजे मक्याच्या पिठाच्या पोळीत भाज्या/ मांसाचे स्टफिंग भरून असले काहीतरी असे मला आत्तापर्यंत वाटायचे! <<
ते फईटा. मेहिकन प्रकरण

हे वरती आहे ते वेगळं. हा देशी पदार्थ आहे.

बढिया पाककृती. मेथी/पालक पराठ्यांबरोबर चटणीसारखं किंवा नुस्तंच खायला पण काय मस्त लागेल! आज करणार. Happy

fajita चा उच्चार 'फाहीटा/ फाहीता'.

मी दही न घालता करते आणि कोथिंबीरी बरोबर थोड ओल खोबर घालते.
पण ते सुप सारख नाही तर तांदळाच्या उकडी सारख दिसत त्याला मक्याची उसळ म्हणतात.
पण आता दही घालुन करुन बघेन.

आमच्याकडे मक्याचा फजिता असा करतातः
मक्याची कणसं (शक्यतो स्वीट कॉर्न नको) किसून घ्यायची..
मोहरी जिरे मिरची कढीपत्ता हळद ह्याची फोडणी करून त्यात किसलेला मका घालायचा..
ओलं खवलेलं खोबरं घालायचं (भरपूर).
मीठ लिंबू घालायचं - एक वाफ आली की कोथिंबीर घालायची आणि गरम गरम खायचं..
अमेझिंग लागत हे !

मला पण नानबाची कृतीच माहीत होती. पण तिला फजिता म्हणतात हे नाही. आम्ही मक्याची वाटली डाळ म्हणतो. खूप छान लागते.

>>> यासाठी स्विट कॉर्नस वापरावे लागत असतील ना कंपल्सरी?>>

नाही, कंपल्सरी नाही.

कारण की मी फक्त खातो, बायको करते ते सगळं खातो

तरीच तुम्हाला वाइजमॅन म्हणतात ! Happy

नवीन पदार्थ समजला. आता करुन बघेन. मला वाटते थंडीच्या रविवारी सकाळी खिडकीत उन्हात बसून ओरपायचा प्रकार असणार हा..

आंब्याच्या फजित्याची मी वाचलेली(करून पाहिलेली नाही) ही कोकणी कृती.
एका पिकलेल्या हापूस आंब्याचा गर आणि चार वाट्या ताक एकत्र घुसळून मीठ साखर घालायचे. आणि वरून तुपातली जिरे मोहरी मेथी लाल मिरचीची फोडणी.
मला वाटतं गुजराती फजितो पण असतो. शोधून बघतो.