धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42

मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची.. मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point किव्वा किरणचा strong point म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu.. त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...

http://merakuchhsaman.blogspot.com/

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> आमिर खानच्या शेजारी राहणारी व्रूद्ध स्त्री दाखवण्याचे प्रयोजन काय? <<
>>अरे, याचे उत्तर कोणी दिलेच नाही का अजून?

मला तरी तिच्या चित्रपटात असण्याचे एकच प्रयोजन वाटले.... ज्या भाबड्या प्रेक्षकांना इतके सगळे बघुनही कळले नसेल त्यांना कळण्यासाठी की यास्मिन ज्या घरात आधी रहात होती त्याच घरात अरूण रहायला आलाय Proud
बाकी ती तशी का दाखवलीय याला वर जाणकरांनी केलेले अंदाज लागू पडावेत!

सुंदर छायालेखन आणि कलाकारांचा सहज वावर या नक्कीच चित्रपटाच्या जमेच्या बाजू पण कथा, तिची हाताळणी, शेवट आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे चित्रपटाचा "फायनल इंपॅक्ट" या सगळ्याच बाबतीत माझी तरी निराशा झाली Sad

मुक्ता जी........क्षमा असावी......वाद उत्पन्न केल्याने......आशा असेल कि आपण आणि इतर मान्यवर वयक्तिक घेणार नाही या वादास....चित्रपट एक अशी गोष्ट आहे.........जिच्यात आपण स्वप्न पाहु शकतो.....>>> आपलं असं मत असेल तर आपली आवड ठीक आहे...
माझ्यामते चित्रपटात प्रत्येक वेळी स्वतःचं रूप दिसणं गरजेचं नाहीये.. एक कथा एवढाच अर्थ घेवुन मी तो बघते.. अर्थात हे माझं मत आहे..

या वर मी आधीच सांगीतलेले आहे कि हा चित्रपट हा निव्वळ एक मॉडन आर्ट आहे....जो पर्यत पुर्ण होत नाही तो पर्यत दिसणार नाही.........मला तो पुर्ण वाटलाच नाही......काही जणाना वाटेल कि तो पुर्ण आहे....
एक एक धागे गाठ न मारता कसे सोडुन देतात...तसे आहे........

हा या चित्रपटात अभिनय अप्रतिम केला गेला आहे...........याच मुळे हा चित्रपटाला रेटिंग दिले गेले आहे....
बाकी अभिनय चांगला नसता तर.......कुणाला या चित्रपटातला का ठो कळाला नसता.....(हे माझे वयक्तिक मत आहे.)......
रेनकोट......हा चित्रपट अवश्य पहावा........मसाला टाईप या असे मॉडन आर्ट टाईप ...काही ही नाही .....तरी पण भरभरुन आहे....कथा आहे....अभिनय आहे......करुण्य आहे..हताशा पण आहे....त्याच हताशा बरोबर मदत केलेले समाधान सुद्धा आहे.....अजय देवगन आणि एश्वर्या राय....दोघांनी समर्थ पणे पेललेला आहे.. एकाच रुम मधे.......अध्यापेक्षा जास्त काळ चित्रपट चित्रित केलेला आहे .....

शर्मिला आणि आगाउ ला अनुमोदन.
मला फिल्म आवडली/ फ्रेश वाटली असली तरी याला नवी पहाट म्हणण्याचे मला धाडस होत नाही. पेशव्याच्या 'अंधो मे काणा राजा' इतकं तीव्र नसलं तरी काहीसं त्याच प्रकारचं माझं मत आहे.
किरण रावने स्वतःची पहिली फिल्म स्वतःच्या लार्जर दॅन लाइफ नवर्‍याच्या प्रभावाखाली न येता ही फिल्म स्वतःला हवी तशी केलीये ही माझ्या दृष्टीने फारच महत्वाची बाजू.

वरच्या चर्चेत जे वाचलं त्यात चित्रपट इंटेलेक्चुअल आहे म्हणजे काय हाच मला मुळात पडलेला प्रश्न आहे. आणि हा चित्रपट इंटेलेक्चुअल का म्हणायचा हे ही कळत नाही. मुळात अशी क्याटेगरी असावीच का तेच कळत नाही किंवा मान्य नाही. फिल्म प्रामाणिकपणे केलेली असते किंवा नसते बस्स. सगळ्या क्लीशेंसकट, मला वाटलेल्या दोषांसकट फिल्म प्रामाणिक आहे हे कळते. ते माझ्या दृष्टीने महत्वाचे.

या चित्रपटात न कळण्याइतकं अ‍ॅब्स्ट्रॅक्ट काय आहे हे ही मला समजत नाहीये. म्हणजे मुन्नी आवडणार्‍याला कळणार नाही असं काय आहे यात हे समजत नाहीये.

शेजारच्या घरातल्या म्हातार्‍या बाई हा मला एका तश्या बर्‍या चालू असलेल्या गायनात एखादी अर्धवट पण अनवट जागा लागून जावी अश्या वाटल्या. बुमरँग म्हणतो तसं जागा एकच आहे हे दाखवणे यासाठी हा डिव्हाइस असू शकतो.

सुमित तुम्ही मुळात चित्रपट आणि चित्रपटाचा व्यवसाय या दोन गोष्टींची गल्लत करताय.
आमिर खानचं नाव जोडलेलं असल्याने चित्रपटाला व्यावसायिक फायदा होत असेल तर वावगं काय?

बाकी मुन्नी आणि शीलाच्या इतका गल्ला नसेल जमला कदाचित पण तेवढी मेकिंग कॉस्ट पण नाही या फिल्मची.
गल्ला - मेकिंग कॉस्ट = नफा किंवा मेकिंग कॉस्ट:नफा हे गुणोत्तर एकदा काढून बघायला हवे नुसतं ग्रोस कलेक्शन वर न जाता.

इथे मतं दिलेल्या सर्वांचे आभार... Happy
सुमितजी, वाद आणि चर्चा यात फरक आहे.. चर्चेतुन जे बरे वाईट मुद्दे समोर येतात त्याचा फायदाच होतो असं वाटतं मला.. अर्थात तो वाद फक्त वादासाठी नसला तरच.. रेनकोट पाहिलाय.. मिसेस. राय बच्चन ना अभिनय येत नाही हे माझं स्पष्ट मत आहे जे कधीच बदलणार नाहीये... स्टोरी भारी आहे पण ओरिजीनल नाही.. मॅगीज गिफ्ट या ओ. हेन्री च्या कथेवर आहे सिनेमा...

नीधपजी, शर्मिलाजी, आगाऊजी,
इन्टेलेक्चुअल सिनेमा हा काही वेगळा प्रकार नाहीये... पण फक्त मसाला आणि पांचटपणा सोडुन एक काहितरी दिशा, कथा, शेवट आणि चित्रपट या माध्यमाचा प्रभावी वापर केलेला सिनेमा... असं म्हणतात की लतादिदींनी लोकांना क्लासिकल मध्ये रुची घ्यायला शिकवलं. त्यांच्या आवाजाचं ते एक मोठं यश आहे.. मग याचा अर्थ असा होतो का की त्या आधी क्लासिकल नव्हतं? किंवा लोक ते ऐकत नव्हते...? असं नाहीये.. पण एका ठराविक वर्गापुरतं होत... त्या गायल्या सिनेमा संगीत, पण अशा गायल्या की त्याला असलेला क्लासिकल चा टच सामान्य रसिकाला किंवा सहज म्हणुन गाणी ऐकणार्‍याला पण भावला... दाद द्यायला भाग पाडलं त्याने... सिनेमा संगीताला पण एक उंची मिळाली त्याने... भैरवी ऐकुन भरुन यायला किंवा बिस्मिल्ला खान साहेबांची सनई ऐकुन काळजातली तार हलायला आपल्याला पुरिया धनाश्री आणि बागेश्रीमधला फरक समजायलाच पाहिजे असं नाही... (मी किरन ची तुलना त्यांच्याशी करत नाहीये. कृपया असा अर्थ घेवु नये इथे) पण आपल्याला त्यातली सखोल माहीती नसली तरी तरी ते छान आहे.. बघावं असं आहे.. आणि कदाचित यातुनच कोणितरी त्यातली माहिती मिळवेलही उत्सुकतेने... तर किरनचा हा प्रयत्न लतादिदींच्या गाण्यासारखा आहे.. थोडं काहितरी वेगळं आहे, जाणुन घेवुया अशी इच्छा निर्माण करणारा... म्हणुन नवी पहाट.. एकदमच अवघड आर्ट सिनेमा पचणार नाही सगळ्यांना.. पण चांगल्या सिनेमाला प्रेक्षकांचा असलेला लिमिटेड प्रतिसाद यामुळे काही प्रमाणात तरी नक्किच वाढेल असं वाटतय मला....
(आपण सगळी मोठी माणसं आहात.. चु.भु.दे.घे. )

मला तरी त्या म्हातार्‍या बाईचं कॅरॅक्टर म्हणजे मुंबईत दिसणारी आकलनापलिकडची/कल्पनेपलिकडची विविधता वाटते .. अशी जीवनं/अशा गोष्टी पण आहेत इकडे ज्या तटस्थ असतात .. ती यास्मिन कौतुकाने ओळख काढायला, गप्पा मारायला जाते तरिही काही रिअ‍ॅक्शन नाही आणि अरुण रहायला जातो तेव्हाही काही रिअ‍ॅक्शन नाही .. यास्मिन च्या गोष्टीचा शेवट कळल्यानंतर आधारासाठी म्हणून अरुण त्या बाईकडे जातो तरिही ती मोस्टली तटस्थच ..

अशी माणसं, असे elements आहेत ना खरंच मग तेच दाखवलंय .. मुंबईचा आरसा आहे हा चित्रपट .. असं मला वाटतं ..

इन्टेलेक्चुअल सिनेमा हा काही वेगळा प्रकार नाहीये... पण फक्त मसाला आणि पांचटपणा सोडुन एक काहितरी दिशा, कथा, शेवट आणि चित्रपट या माध्यमाचा प्रभावी वापर केलेला सिनेमा<<<
नाही पटलं.
इंटेलेक्चुअल हा शब्दच मुळात नकचढा आणि लोकांना दूर ढकलणारा वाटतो. सो इज आर्ट फिल्म हा शब्द. असं लेबल मला तरी मान्य नाही. असो.

दिशा??? कशी?

लोकांनी स्वतःला जर चांगला सिनेमा समजण्याची आपली लायकी नाही या कॅटेगरीत ठेवलं तर त्याला आपला काही उपाय नाही... मुळात माझ्या व्याख्येत मी हेच म्हटलयं की असा सिनेमा म्हणजे काही वेगळ नाहीये..

मुक्ता, तुम्हाला आवडते ते सर्व चांगले आणि तुम्हाला जे आवडत नाही ते वाईट असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तुम्हाला आवडलेला सिनेमा ज्यांना आवडत नाही, त्यांचि चांगला सिनेमा समजण्याची लायकी नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

मी कधी असं म्हटलं?? मी एवढंच म्हटलं की लोकांनी स्वतःविषयी असे समज करुन घेतले असले तर त्याला कोणी काही करु शकत नाही.. उलट या वाक्यातुन असा अर्थ निघतो की स्वतःची क्षमता असुनसुद्धा लोक गैरसमज करुन घेतात समजणार नाही म्हणुन.. याचा अर्थ असा आहे की मी त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवतेय...

नमस्कार मुक्ता जी...............शुभ प्रभात.........तुम्हाला आवडते ते सर्व चांगले आणि तुम्हाला जे आवडत नाही ते वाईट असे तुम्हाला म्हणायचे आहे का? तुम्हाला आवडलेला सिनेमा ज्यांना आवडत नाही, त्यांचि चांगला सिनेमा समजण्याची लायकी नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? थोड्या प्रमानात अनुमोदन...

मिसेस. राय बच्चन ना अभिनय येत नाही हे माझं स्पष्ट मत आहे जे कधीच बदलणार नाहीये... स्टोरी भारी आहे पण ओरिजीनल नाही.. मॅगीज गिफ्ट या ओ. हेन्री च्या कथेवर आहे सिनेमा... तुमचे म्हणने नेमके काय आहे......रेनकोट मधे तिने जो केला तो काय होता अभिनय कि अजुन काही त्याच बरोबर गुजारिश मधे काय केलेले होते.......??......

स्टोरी कोणतीच ओरिजनल नसते.....कुठुन ना ति प्रेरितच असते........

तुम्हाला ती आवडत नाही याचा अर्थ तिला अभिनय येत नाही असा नाही होत.....मला सलमान आवडत नाही...तो अभिनय पण करत नाही.....तरी तसे बोलु शकत नाही आपण....कारण १०० पैकी सिन्स मधे २-३ सिन मधे तो असा काही अभिनय करुन जातो.....बाकिचे सिन्स आपन विसरतो.......

अभिनय सगळ्यांना येतो........फक्त तो योग्य त्या ठिकाणी अचुक करावा लागतो.......

अभिनय सगळ्यांना येतो........फक्त तो योग्य त्या ठिकाणी अचुक करावा लागतो.......
>>> आणि तो अचुक करता येणार्‍यांनाच अभिनेता/ अभिनेत्री म्हणतात... चुकुन अभिनय केलेल्यांना नाही...

>> मी एवढंच म्हटलं की लोकांनी स्वतःविषयी असे समज करुन घेतले असले तर त्याला कोणी काही करु शकत नाही.. उलट या वाक्यातुन असा अर्थ निघतो की स्वतःची क्षमता असुनसुद्धा लोक गैरसमज करुन घेतात समजणार नाही म्हणुन.. याचा अर्थ असा आहे की मी त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवतेय... <<

म्हणजे धोबी घाट हा चांगला सिनेमा आहे, पण लोकांना ते कळत नाहीय. त्यांची क्षमता आहे तो चांगला आहे, हे समजण्याची पण त्यांचा स्वतःविषयी गैरसमज आहे की, त्यांना धोबीघाट सारखा सिनेमा आवडणार नाही - मुक्ता, तुमच्या पोस्ट्सचा असाच अर्थ निघतोय.

तुम्हाला धोबीघाट आवडला म्हणून प्रत्येकाला आवडावा हे जरूरी नाही. एखाद्याला आवडला नाही तर त्याने स्वतःच्या क्षमतेविषयी गैरसमज करून घेतलाय, असा सरसकट निष्कर्ष कसाकाय निघू शकतो?

प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असू शकतात.

अमिजी,
धोबी घाट आवडणार नाही हा गैरसमज नव्हे हो... आर्ट फिल्म समजणार नाही हा गैरसमज.. आणि सरसकट निष्कर्ष काढणं चुकच.. तेव्हा ते मी करत नाही... फक्त एक शक्यता मांडली... निष्कर्ष नाही.. Happy

मन्-मानसीजी,
खूप खूप आभार.. Happy

पाह्यला एकदाचा धोबीघाट.
चित्रपट संपून जातो. काही सिन डोक्यातून नाही उतरत. ठुमर्‍यांचा चपखल वापर. तो पावसाचा सिन. तिघांचाही पाऊस वेगळा. पण त्यातही एक समान धागा. आमीर त्याच्या पेग मधे पावसाचं पाणी घेतो तो सिन तर कैच्याकै आवडला. डायरेक्टर नवीन आहे हे बर्‍याचदा जाणवत राहतं. लक्षात राहतो तो प्रतिक. छान काम केलंय त्याने.
आमीर निव्वळ जड वाटतो. भकाभका सिगारेट फुंकनं अन् मख्ख चेहरा यापलिकडे फारसं काही जमलंच नाही त्याला. तो यास्मीनच्या टेपचा शेवटचा सिन, तेव्हा गडी असा रियाक्ट होतो की अजून 'गजनी' तून सुटलाच नाहीये.
शाय लक्षात राहते ते आमिरच्या घरातून चिडून बाहेर पडताना. तिथे अजून रिटेक घ्यायला हवे होते. निव्वळ भंपक वाटली. अभिनय आवडला तर प्रतिक अन् यास्मीन या दोघांचाच. प्रतिकचं लाजणं, आरशासमोरच्या पोजेस, गर्दीत तीला स्पर्शही न करता खांद्यावर हात ठेवणं. शेवटी पळत जाऊन आमीरचा पत्ता देणं.. मस्त जमलंय.
यास्मीनला फारसा वाव नाहीये इतरांपेक्षा. पण तीचं संपूर्ण काम सुसह्य! पिक्चर संपला तरी तिचा आवाज लक्षात राहतो.
हे नवी पहाट, इंटेलेक्चुअल वगैरे नाही काही असं यात. असो.
अभय देओल नंतर प्रतिक बब्बर हेही नसे थोडके.
आमीर प्रेम कमी होत जातंय असं वाटू लागलंय!
धन्स!

नाही नाही.. चुकुन करते?? चुकुनही करत नाही........
ठिक आहे.....आपल्याला अभिनयाबद्दल......बहुतेक जरा जास्तच माहीत आहे वाटते..स्पेशली अमिरच्या अभिनयाबद्दल.....?? मग तर तुम्हाला... त्याचा आतंक ही आतंक , मेला.. असले त्याचे चित्रपट अतिशय आवडलेले असेल.....कारण तुमच्या मते....आमिर खान चुकुन अभिनय नाहि करत ... Happy

इतकही काही उपहासात्मक बोलायला नकोय... चांगला अभिनेता एका दिवसात बनत नसतो... त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत असते.. ती दिसली पाहिजे.. अभिनेता पण माणुस आहे. त्याच्याकडुन चुका होणारच.. त्या सुधारल्या पाहिजेत.. तुम्ही वर्षानुवर्षे तसाच अभिनय करत राहिलत तर त्याला काही अर्थ नाही... (मी ते सिनेमे पाहिले नाहियेत.. पहाणारही नाहिये)

सुमीत.... आमीरच्या ज्या सिनेमाची यादी वर दिली आहे ते सारे सिनेमे commercial या सदरात मोडतात... त्यामुळे मसाला timepass ह्या साठी हे सिनेमे बघायचे.... Acting च काही घेण देण नाही.... Ash च्या बाबतीत मुद्दा असा होता की off-bit सोडा पण मसाला मधे पण धड acting करत नाही.... मी मुक्ता.. चा हा मुद्दा असावा.... !!!

>> उलट या वाक्यातुन असा अर्थ निघतो की स्वतःची क्षमता असुनसुद्धा लोक गैरसमज करुन घेतात समजणार नाही म्हणुन.. <<

याला शक्यता व्यक्त करणे नाही तर निष्कर्ष काढणे म्हणतात.

>> लोकांनी स्वतःला जर चांगला सिनेमा समजण्याची आपली लायकी नाही या कॅटेगरीत ठेवलं तर त्याला आपला काही उपाय नाही... <<

>> धोबी घाट आवडणार नाही हा गैरसमज नव्हे हो... आर्ट फिल्म समजणार नाही हा गैरसमज.. <<

तुम्ही तुमची स्टेटमेंट्स बदलताय. सुरुवातीला 'चांगला सिनेमा' असा उल्लेख केलात. लगेच बदलून 'आर्ट फिल्म' वर आलात.

@अनय साहेब....(नाव बरोबर टाईप केले ना) & @ मुक्ता जी.....

मी फक्त अभिनयाबद्दल बोलतोय.....चित्रपटांबद्दल नाही......आपल्या मते.....फक्त आर्ट फिल्म आणि धोबीघाट (नविन ट्रेड असल्याने....त्याची कुठल्याही कॅटेगरी मधे नोंद करता येणार नाही.. आणि केली तर त्या कॅटेगरीच्या बाकिच्या चित्रपटांना कमी पणा वाटेल..) अशाच चित्रपटांमधे अभिनय आवश्यक असतो.....?

बाकिच्या चित्रपटांमधे........अभिनेते आणि अभिनेत्री काय करतात.......?? नाचु नाचु ??

मग तुमच्या सारख्यांच्या मते.....अमिताभ..माधुरी दिक्षीत.. कमल हसन ..शाहरुख खान..काजोल..रानी मुखर्जी..(ज्यांने ओफबीट चित्रपटात कधी काम नाही केले..) त्याच बरोबर अनुपम खेर..अमरिश पुरी.. हे तर अभिनय करतच नाही बरोबर......कारण commercial चित्रपटात अभिनय ची गरजच नाही .......(.सारे सिनेमे commercial या सदरात मोडतात... त्यामुळे मसाला timepass ह्या साठी हे सिनेमे बघायचे.... Acting च काही घेण देण नाही).......

बरोबर ना...........??????

सगळेच ओव्हररिअ‍ॅक्ट करायला लागले की.

>>>लोकांनी स्वतःला जर चांगला सिनेमा समजण्याची आपली लायकी नाही या कॅटेगरीत ठेवलं तर त्याला आपला काही उपाय नाही... मुळात माझ्या व्याख्येत मी हेच म्हटलयं की असा सिनेमा म्हणजे काही वेगळ नाहीये..<<<
तू एकदा ठरव इंटेलेक्चुअल सिनेमा ही कॅटेगरी आहे की नाही.
कारण एकीकडे तूच लेबलं, कंपार्टमेंटस, कॅटेगरी इत्यादीत अडकते आहेस. आणि एकिकडे असं काही वेगळं नाही हेही म्हणते आहेस. हे माझं मत आहे. तुझ्या मतासारखं वैश्विक सत्य बित्य नाही. आणि तसंही मला सिनेमातलं काय कळतं म्हणा....

सुमित, तुम्ही तर मुद्दामून वाद काढायला आल्यासारखेच बोलताय की.

बिल्कुल नाही......नीधप साहेब......ते बाकिच्यां विषय जे मत आहे.......ते मला पटत नाही.......

आपण जर माझे पोस्ट वाचले असाल तर....मी वाद करण्याची सुद्दा क्षमा मागीतली होती....फक्त त्यांनी मांडलेले मुद्दे पटत नाही......म्हणुन.....

ते बाकिच्यां विषय जे मत आहे.......ते मला पटत नाही.......<<<
कंपलसरी केलंय का तुम्हाला ते मत पटणं?

Pages