मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची.. मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point किव्वा किरणचा strong point म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu.. त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...
धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...
Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धोबीघाटची डीव्हीडी वगैरे आली
धोबीघाटची डीव्हीडी वगैरे आली आहे का? पायरेटेड नव्हे.
धोबीघाट या चित्रपटा वर आपल्या
धोबीघाट या चित्रपटा वर आपल्या सगळ्या मान्यवरांचे लेख वाचले.......छान आहे....
मी सुद्धा पाहीला चित्रपट........
फक्त एकच सांगा........चित्रपटाची कथा काय आहे.....आणि त्यातुन काय साध्य केले गेले.....????...
हि एक आर्ट फिल्म पण नाही आहे नाही मसाला फिल्म आहे......हा एक मॉडन चित्रपट आहे...जसे पेंटिग असते तसे...हुसेन चे......कुठला ही कलर कुढेही लावा....चित्र पुर्ण झाल्या वर छान दिसते......होत असताना नाही...
समजन्याच्या भाषेत म्हणावे तर ....गोदडी पण म्हणु शकतात....अनेक ठिगळे लावुन जोडलेली.....
आमिर च्या कथे तुन व इतर सगळ्यांच्या कथेतुन काय म्हणायचे आहे ते स्पष्ट केले नाही.....बस फक्त मांडल्या गेल्या आहेत....छान पध्दती ने....
बस....या तुन काय पहाट होणार आहे...?...असे चित्रपट एक चव म्हणुन ठीक वाटतील.......एकदाच बघतील लोक.....परत परत नाही......सगळ्यांनी यांच्या पावलावर पाउल ठेवले तर......५ दिवसांनी नवीन चित्रपट लावावा लागेल चित्रपटगृहात......
सुमितजी, आपल्या मते चित्रपट
सुमितजी,
आपल्या मते चित्रपट म्हणजे नक्की काय? एक हीरो, हिरोइन, व्हीलन आणि मग they lived happily ever after अशी कथा म्हणजे चित्रपट आहे का? आणि असं ज्याला वाटत असेल त्यांच्यासाठी हा सिनेमा नाहिये...
एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यातली एखादी घटना जर तुम्हाला सांगितली तर त्याचं पुर्वायुष्य, बाकी गोष्टी माहीत नाही म्हणुन तुम्हाला ती interesting वाटणार नाही का? या सिनेमाचं काहीसं तसच आहे... ४ आयुष्य कोणत्यातरी कारणाने एकत्र जोडल्या गेलेल्या काळाची कथा आहे ही.. एक कालखंड आहे... बास... आणि त्यामुळे वास्तवाच्या जास्त जवळ जाणारा आहे सिनेमा... म्हणुनच भारी आहे...
>> आमिर खानच्या शेजारी
>> आमिर खानच्या शेजारी राहणारी व्रूद्ध स्त्री दाखवण्याचे प्रयोजन काय? <<
अरे, याचे उत्तर कोणी दिलेच नाही का अजून?
मुक्ता जी.... चित्रपट एक अशी
मुक्ता जी....
चित्रपट एक अशी गोष्ट आहे.........जिच्यात आपण स्वप्न पाहु शकतो.....हिरो हिरोईन यांना महत्व का असते ?
माहीत आहे ...कारण ते आपल्या मनातील व्यक्तिरेखा पडद्यावर साकार करतात....जे जे आपणास माहीत नसते ते ते आपण विविध माध्यमातुन माहीति करुन घेत असतो..त्यात चित्रपट महत्वाची भुमिका आहे....
गुजारिश सुध्दा याच पठडीतला........चित्रपट....पण त्याला एक कथानक आहे...तरी ...पण दर्शक त्याला जोडले गेले नाही..पण अशाच कथानकाचा मराठी चित्रपट सुखांत.......हा मात्र चालला.....त्यात प्रत्येकाला एक महत्व होते.......एक एक व्यक्तिरेखा जोडली गेली होती......प्रत्येक मुलाला अतुल जवळचा वाटत होता....प्रत्येक स्वावलंबी बाई ला ...अतुल ची आई प्रेरणा वाटत होती....
अशी एक ही गोष्ट धोबी घाट चित्रपटात नव्हती........
धोबी घाट आवडला. प्रतिक एकदम
धोबी घाट आवडला. प्रतिक एकदम जोरात. आमिर मात्र पार गडबडला आहे, अर्थात तो आमिर असल्याने मला कसाही आवडतोच.
तरीही, एकदम 'नवी पहाट' वगैरे म्हणणे, जरा घाई होते आहे. 'नवी पहाट'चा अर्थ 'ट्रेंड सेटर' असा घेतला तर या सिनेमाची तेवढी ताकद आहे असे वाटत नाही. आणि प्रत्येक 'इंटेलेक्चुअल' सिनेमा 'नवी पहाट' असतो हे ही अमान्य.
@सुमितजी, चित्रपट एक अशी
@सुमितजी,
चित्रपट एक अशी गोष्ट आहे.........जिच्यात आपण स्वप्न पाहु शकतो.....>>> आपलं असं मत असेल तर आपली आवड ठीक आहे...
माझ्यामते चित्रपटात प्रत्येक वेळी स्वतःचं रूप दिसणं गरजेचं नाहीये.. एक कथा एवढाच अर्थ घेवुन मी तो बघते.. अर्थात हे माझं मत आहे..
@आगाऊ, हा सिनेमा
@आगाऊ,
हा सिनेमा इन्टेलेक्चुअल असुनही मास ला खेचु शकतो म्हणुन नवी पहाट...
@ मी अमि जी, मलाही नीटसं कळलं
@ मी अमि जी,
मलाही नीटसं कळलं नाही पण मला वाटतं effect enhance करण्यासाठी दाखवलं असावं तसं.. इतक्या भरगच्च गर्दीच्या ठिकाणी पण शेवटी त्याला गरज वाटते तेव्हा एकटाच असतो तो.. आणि त्या बाई तशा दाखवुन कदाचित प्रसंग जरा अजुन भयानक वाटुन जाइल अशी योजना असावी...
त्या बाईची पण एक कथा असू शकते
त्या बाईची पण एक कथा असू शकते (तिच्याघरी सगळे सामान असूनही, बाकी कुणीच नसते, हे जरा खटकतं) म्हणजे इतर पात्रांच्या बाबतीत, तूम्हाला थोडासा भूतकाळ कळतो. भविष्याबद्दलचे आडाखे बांधता येतात.
पण त्या बाईच्या बाबतीत डायरीची सर्व पाने कोरी. कुठल्याच प्रसंगावर तिची काहीच प्रतिक्रिया नाही. यास्मिनलाही ती तशीच दिसते.
आपण किंवा कुणीही डायरी का लिहितो, तर त्या दिवसांच्या काही आठवणी रहाव्यात म्हणून. पण इथे तर काहि आठवणीच नाहीत. किंवा त्या आठवायच्या नाहीत. कदाचित आठवणी दु:ख्द असतील किंवा एकच धक्कादायक प्रसंग असेल..
बाकी सर्व पात्रांच्या मनावर कालचे / आजचे / उद्याचे ओरखडे आहेत. पण ती सर्वाच्या पलिकडे गेलेली...
@दिनेशदा, अनुमोदन.. पण
@दिनेशदा,
अनुमोदन.. पण तिच्याशिवाय त्या घरात कोणी दखवलं नाहीये म्हणजे तिचं ती सगळं नीट करतेय.. करु शकतेय.. मग ती कोणाशी बोलत का नाही?
शेवटी तिची नजर जरा हललेली दखवलीय.. त्याचा अर्थ काय असावा?
हा सिनेमा इन्टेलेक्चुअल
हा सिनेमा इन्टेलेक्चुअल असुनही मास ला खेचु शकतो म्हणुन नवी पहाट...>> मला नाही वाटत हा चित्रपट मास ला खेचु शकतो..आत्ताचे मास ला खेचू पाहण्याचे मुन्नी, शीला वगैरे टाईप चे अटेम्प्ट बघता..
एक आर्ट फिल्म जी मेन स्ट्रीम मधे आणायचा प्रयत्न केला गेला आहे..एवढंच मी धोबी घाट बद्दल म्हणु शकेन..
मी अमि,
मला ती बाई अश्या लोकांचं प्रतिनिधीत्व करतांना वाटली, ज्यांच्या समोर एवढ्या घडामोडी,प्रचंड कोलाहल, त्रास, चीड सगळ्ं काही होत असतांना त्यांची आतली रिअॅक्षन काहीही असली तरी त्यांना परिस्थिती मुळे म्हणा किंवा अजुन कशामुळे आतली धडपड कधीच व्यक्त करता येत नाही. किरण राव ला हतबलता दाखवायची असावी त्या बाईंना दाखवून..
बाकी सर्व पात्रांच्या मनावर
बाकी सर्व पात्रांच्या मनावर कालचे / आजचे / उद्याचे ओरखडे आहेत. पण ती सर्वाच्या पलिकडे गेलेली.>> अगदी एक्झॅक्ट शब्दांत मांडलंय दिनेशदा.
जो चे लॉजिक पुढे चालवले तर
जो चे लॉजिक पुढे चालवले तर यास्मिनच्या जीवनातील घटनांमूळे, तिच्याशी कसलाच संबंध नसलेला अरुण, एक माणूस म्हणून हादरतो, ते बघून त्या प्रतिक्रिया न देणार्या समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या स्त्रीचे मन पण पाझरते, असा काहीसा अर्थ लावता येईल.
ह्म्म्म... जो.. पटतय आपलंही
ह्म्म्म...
जो.. पटतय आपलंही म्हणनं.. पण परत तेच.. एखाद्या चांगल्या सिनेमाला अर्ट फिल्म म्हणुनच का अडकवुन ठेवायचं? कमर्शिअल पण इन्टेलेक्चुअल म्हणुन बघितलं गेलं पाहीजे अशा सिनेमा कडे...
'नवी पहाट' म्हणवला जाण्यासाठी
'नवी पहाट' म्हणवला जाण्यासाठी सिनेमा 'इंटेलेक्चुअल' असला पाहिजे आणि त्याने गल्लाही जमवला पाहिजे हे मला पटत नाही.
शोले, हम आपके है कौन, हे काही 'इंटेलेक्चुअल' सिनेमे नव्हेत पण तरीही ते त्यांच्या काळातले ट्रेंड सेटर आहेतच.
कमर्शिअल पण इन्टेलेक्चुअल >>
कमर्शिअल पण इन्टेलेक्चुअल >> हो हो तसंच बघतोय आपण ...पण मास ला अपील नाही होऊ शकत हा चित्रपट एवढंच म्हणायचंय..या किंवा अश्या चित्रपटांचा एक स्पेसिफिक प्रेक्षक वर्ग आहे..त्यांना तो भावला..पटला..
आगाऊचे म्हणणे पटले.
आगाऊचे म्हणणे पटले. व्यावसायिक दृष्ट्या यश आणि सिनेमाचे वेगळे असणे याचा काही संबंध लावता येत नाही.
चित्रपट आवडला म्हणून काही खूप वेगळा, आजवर असा झालाच नाही अशा उंचीवर बसवण्याइतका वगैरे नाहीच. नवी पहाट वगैरेही नाही. खूप असे इंटेलेक्चुअल सिनेमे लोकांना आवडलेलेही आहेत. पूर्वी फक्त ते त्यांच्यापर्यंत जास्त पोचायचे नाहीत. वेगळ्या सिनेमांचं लोकं नेहमीच कौतुक करतात. ते लागले की गर्दीही करतात. अगदी प्यासा, गर्महवा पासून हजारो ख्वाहिशे किंवा खोसला का घोसला पर्यंत.
शिवाय धोबीघाटला इंटेलेक्चुअल न्यू वेव्ह किंवा आर्टफिल्म अशा कोणत्याही कॅटगरीत बसवण्याची आता काहीच गरज नाही. अशा सिनेमांना आता मेनस्ट्रीमपासून वेगळं पाडत नाहीत. प्रेक्षक तितके नक्कीच सुबुद्ध झालेत. असे कितीतरी सिनेमे कालांतराने येत असतात. सामान्य लोकही त्यांचं कौतुक करत जमेल तसं बघतही असतात. धोबीघाटच्या बाबतीत त्याला वेगळा पाडतोय तो फक्त आमिरचा वरदहस्त. त्याच्या मागे आमिरची मार्केटिंग, पब्लिसिटी आणि वितरण व्यवस्था नसती तर हाही सिनेमा इतर न्यू वेव्ह (!) सिनेमांसारखाच आणि तितकाच गाजला असता.
सामान्य माणसांना (ज्यांना
सामान्य माणसांना (ज्यांना सिनेमा दिग्दर्शन, कथा वगैरे क्षेत्रातील शिक्षण नाही असे) जर चित्रपट कळला नाही तर त्याला इन्टेलेक्चुअल किंवा आर्ट चित्रपट म्हणायचे काय. पूर्वी डाव्या (नॉन ब्रूर्झ्वा) लोकांना इन्टेलेक्चुअल म्हणायची फॅशन होती. आता इन्टेलेक्चुअल चा अर्थ काय आहे कोण जाणे.
हिंदी चित्रपटाच्या बाबतीत बोलयचे झाले तर सुखांत नसलेला, अंग प्रदर्शनावर आधार नसलेला असा कुठलाही चित्रपट चाकोरी बाहेरचा म्हणायला लागेल. असे अनेक आर्ट/इन्टेलेक्चुअल व बॉक्स ऑफिसवर हिट असलेले चित्रपट यापूर्वीही येउन गेलेत.
मला ती बाई म्हणजे वास्तूचे जिवंत प्रतिक वाटली.
शर्मिलाला अनुमोदन. मलाही तसेच
शर्मिलाला अनुमोदन. मलाही तसेच वाटते.
सामान्य माणसांना (ज्यांना
सामान्य माणसांना (ज्यांना सिनेमा दिग्दर्शन, कथा वगैरे क्षेत्रातील शिक्षण नाही असे) जर चित्रपट कळला नाही तर त्याला इन्टेलेक्चुअल किंवा आर्ट चित्रपट म्हणायचे काय. >> हो आणि नाही दोन्ही याचं उत्तर आहे. अमूर्त चित्रकारिता बघायला जशी प्रशिक्षित नजर असली तर मदत होते पण ती नसली तरी चित्र 'भिडू' शकते त्याप्रमाणेच हे आहे. सिनेमाची स्वंत्र भाषा कळण्याची प्रत्येकाची आपली एक नजर असते. ती अंगभुत असते किंवा त्याबद्दल जास्त वाचून, जाणून घेऊन ती विकसितही करता येऊ शकते. एक वरची पायरी चढायची मनाची तयारी फक्त हवी.
मस्त चर्चा!!
मस्त चर्चा!!
पुर्ण चित्रपटात फक्त
पुर्ण चित्रपटात फक्त यास्मिनच्या टेप्सनी मला बांधून ठेवले. तिचे पुढे काय झालं या एकाच उत्सुकतेने आपण पुढे चित्रपट पाहतो. बाकीचे प्रसंग नसते तरीही चालले असते.
एक वरची पायरी चढायची मनाची
एक वरची पायरी चढायची मनाची तयारी फक्त हवी.>>> 'वरची' पायरी म्हणालात, की 'म्हणजे आम्ही काय खालच्या पायरीवर आहोत का?' हा वाद सुरु होतो. म्हणून, 'वेगळ्या वाटेवर जायची मनाची तयारी फक्त हवी' हे जास्त बरोबर वाटते!!!
माझ्या मते प्रत्येक यशस्वी सिनेमा हा थोडाफार चाकोरीबाहेरचा असतो म्हणूनच लोकांना तो भावतो.
रच्याकने, 'धोबी घाट'ने त्याच्या निर्मितिचा खर्च वसूल केल्याने गल्ल्याच्या दृष्टीने तो 'हीट' झाला आहे.
हो वरची पायरी चूकच खरं तर.
हो वरची पायरी चूकच खरं तर. वेगळी वाट योग्य आहे.
नमस्कार
नमस्कार ...................हाच चित्रपट.....आमिर खान च्या प्रोडक्शन खाली नसता तर.....आणि तो नसता तर....
जर किरन राव त्याची बायको नसती तर............
हा चित्रपट बघण्यास गेले असते का कोणी.....?
किंबहुना इतकी स्तुती झाली असती का............??
@सुमितजी, हा सिनेमा आमिर च्या
@सुमितजी,
हा सिनेमा आमिर च्या बायकोचा आहे हा माझ्यसाठी तरी निव्वळ योगायोग आहे.. तिच्या दिग्दर्शनात असलेला रॉनेस् दखवुन देतो की त्यात आमिर ची ढवळाढवळ नाही जी चांगली गोष्ट आहे... ती त्याची बायको नसती तरी मी या सिनेमाची एवढीच स्तुती केली असती.. आमिरच्या नावाने पब्लिसिटी झाली पण म्हणुन तिचं टॅलेंट कमी ठरत नाही... किंवा तिचा प्रयत्न नजरेआड्पण करणं योग्य नाही..
सुमित, कदाचित कमी लोकांनी
सुमित, कदाचित कमी लोकांनी बघितला असता. पण आता वेगळ्या वाटेवरचे चित्रपट पण अवश्य बघितले जातात (उदा. तेरे बिन लादेन, यात नाव असलेले कुणीच नव्हते.) मनमोहन देसाईंच्या फॉर्म्यूला सिनेमांचे दिवस सरले की. त्यापुर्वी स्मगलर्स ची चलती होती कुठलाही सिनेमा त्याच मार्गाने जात असे मग तो संन्यासी असो कि शर्मिली.
आता अगदीच टाईमपास म्हणून बनवलेले तीस मार खान काय किंवा अंजाना अंजानी काय, लोक नाकारतातच.
@शर्मिलाजी, आगाऊ, मी पुन्हा
@शर्मिलाजी, आगाऊ,
मी पुन्हा पुन्हा या गोष्टीवर जोर देतेय की हा पहिला प्रयत्न नसला तरी याला विशेष महत्व यामुळे आहे की यात मास आणि क्लासला एकत्र आणण्याची क्षमता आहे.. आता तुम्ही म्हणाल की हे असे प्रयत्न आधीही होत होते आणि त्यांचं कौतुक पण झालं.. मान्य आहे... पण ते कौतुक एका ठराविक वर्गापुरतं होतं.. त्यापलिकडे कधी कोणी गेलं नाही.. हा सिनेमा मास ला खेचु शकतो कारण आर्ट फिल्म मधला एक न कळणारा, अनुत्तरीत रहाणारा फॅक्टर यात नाहीये.. सिनेमा शेवटी असा सोडला असता की, मुन्ना तिला अरुण चा पत्ता देतो की नाही... ती जाते की नाही.. किंवा कोणती व्यक्तिरेखा अर्धी ठेवुन ती समजुन घेण्याची जबाबदारी जर प्रेक्षकांवर सोडली असती तर तो आर्ट च्या कॅटेगरीत गेला असता.. पण त्यांनी असं नाही केलं. सगळ्या व्यक्तिरेखा स्पष्ट आहेत.. कथा स्पष्ट आहे.. पण कथा आणि मांडणी वेगळी आहे.. नाच्-गाण्यातुन बाहेर पडुन चित्रपट अशाही प्रकारात असु शकतो आणि तो लोकांना कळु शकतो हे दखवुन देण्याचं काम या चित्रपटाने केलय...
नवी पहाट याचा अर्थ ट्रेंड सेटर नव्हे... किंबहुना कोणताही ट्रेंड सेट न होणं हेच या चित्रपटाचं यश राहील.. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.. मनोरंजनाच्या विश्वातील सर्वात नविन प्रकार आहे.. त्याच्या क्षमतेचा आपण किती आणि कशा कशाप्रकारे वापर करु शकतो याची जाणिव एका ठराविक वर्गाला असली तरी त्याबाहेरील लोकांना ते जाणवुन देण्याचं काम हा चित्रपट करु शकतो असं माझं मत आहे...
सामान्य माणसांना (ज्यांना
सामान्य माणसांना (ज्यांना सिनेमा दिग्दर्शन, कथा वगैरे क्षेत्रातील शिक्षण नाही असे) जर चित्रपट कळला नाही तर त्याला इन्टेलेक्चुअल किंवा आर्ट चित्रपट म्हणायचे काय. >> हो आणि नाही दोन्ही याचं उत्तर आहे. अमूर्त चित्रकारिता बघायला जशी प्रशिक्षित नजर असली तर मदत होते पण ती नसली तरी चित्र 'भिडू' शकते त्याप्रमाणेच हे आहे. सिनेमाची स्वंत्र भाषा कळण्याची प्रत्येकाची आपली एक नजर असते. ती अंगभुत असते किंवा त्याबद्दल जास्त वाचून, जाणून घेऊन ती विकसितही करता येऊ शकते. >>> अतिशय सुंदर लिहिलत हे शर्मिलाजी...
Pages