मासे १७) रावस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 November, 2010 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.

तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती:

रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.

रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
कठीण आहे सांगणे.
अधिक टिपा: 

तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.

कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्वे अग कुरीयरने शिजवुन आला तर तो कुरीयरवाला निदान न राहवुन खाउन तरी टाकेल. पण कच्चा पाठवला तर नको असणार्‍या वासाने टाकुन देईल.

रावस भयानक महाग मिळतो
अगं बेलापुरला रु ४००-४५० किलो ह्या दराने रावस जातो.

मी जागुचे लेख वाचुन बाजारात गेल्यावर अर्धा वेळ 'ह्याचे नाव काय्,नी त्याचे नाव काय?' ह्याच्यातच वेळ घालवते. जागुच्या यादीतले लहान मासे स्वस्त मिळतात आणि मस्तही लागतात. (जल्ला अजुन खुबे आणले नाही.... मासळीबाजारात जायला वेळच नाही)

कालवं काल होती. पण लेकीला 'कुर्ल्या' खायच्या होत्या म्हणुन त्याच नेल्या. मोठ्या कुर्ल्या काल १२०० रु डझन! Sad

भ्रमर खुपच किंमत आहे तुमच्याइथे. आमच्याकडे मोठ्या २००-३०० ला मोठ्या ६-७ मिळतील.

मी अंधेरीला.
४ बंगला माक्रेट मध्ये. महा भयंकर महाग आहेत मासे सध्या. मला कुर्ल्या येत नाहीत म्हणुन घेतल्या नाहित कधी. एकदा करायच्या आहे. मी एकटी खाणारी नवरा खात नाहि मासे त्यामुळे रावस घेतलाच नाही. १० तुकड्या घ्यायच्या म्हंट्ल्या तरी ७०० होत होते. कोळीण म्हणाली अख्खाच घे. पण अख्खा घेउन खाणार कोण? मी आणी १.५ वर्षाची मुलगी Wink

हो नक्कीच भ्रमर. तुम्ही सग्ळे येत असाल तर मी उद्यापासून टोपली घेउनच बाजारात बसते. चांगला धंदा होईल माझा.

हाय जागू,
तू केलस म्हणजे चवदार असेल. आम्ही आपले नुसत बघणार. करणार्याने करावे आणि खाणार्‍याने खावे. Happy

निकीता तु छोटा पिस म्हणतेस का ? छोटे छोटे आपण कालवणात करुन टाकतो ते पिस ७०० ला १० मिळतात का ?

शुभे आळशी कुठली. दिवा घे.

तुझ्या फोटोत रावस आहे ना त्याच्यापेक्शा जरा मोठ्या रावसाची एक आडवी तुकडी तळायला वापरु अशी. तिला परत कापता येणार नाही. मध्यम आकाराच्या सुरमईची असते तेवढी. माझी कोळीण जरा जास्तच महाग आहे पण डोळे झाकुन घेतलं तरी शिळ देणार नाही अशी म्हणुन मी तिच्याकडुन घेते. तिच्यकडे सगळे मोठे आनी महाग मासेच मिळतात, पापलेट, सुरमई, मोठी कोलंबी, रावस, हलवा.

निकिता, रावस एवढा महाग नाही मिळत. अंधेरी मार्केट तर आमच्यापेक्षा स्वस्त आहे. लहान रावस १००-१५० ला मिळतो. तो आणुन खा की.

लहान रावस पाहीला नाही कधी. ह्या रविवारी शोधेन.
जागु तुमच्याकडे यायचं तर आहे पण रावस नाही निवट्या, खुबे हे खाडीतले मासे खायला.

व्हेज वाल्यांनी त्यातला कांदा, टोमॅटो, हिंग, हळ्द, मसाला, तेल, लसूण हे व्हेज पदार्थ निवडून खायचे.

Pages