मासे १७) रावस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 November, 2010 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रावस (कापुन, धुवुन) (रावस हा बाजारातुनच कापुन मिळतो कारण हा मासा मोठा असतो कोळणी त्याचे तुकडे करुन विकतात.)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.

तळण्याचे साहित्य :
रावसाच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती:

रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर रावसाच्या तुकड्या घालाव्यात. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.

रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
कठीण आहे सांगणे.
अधिक टिपा: 

तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. नाही घातला तरी चालतो.

कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या फोटोतल्या तारखा बघु नका. एक वर्षाचा फरक आहे. पण आता आक्खा रावस मिळणे कठीण आहे म्हणून जुना फोटो टाकला आहे. तो रावस आम्हाला भेट पाठवला होता.

जागू जागू.... नको गं ईतके अत्याचार करुस. Proud
>>तो रावस आम्हाला भेट पाठवला होता>> जल्ला अश्या पण भेटी देतात तुमच्यात. ए ते न

जागू, अख्खे रावस मिळतात की.
कालवणातल्या तुकडींना तिखट हळदीचा मसाला लावला नाहीये का? पांढरे कसे दिसतात?
तळलेल्या तुकडी मस्त दिसतायत Happy

>>तळलेल्या तुकडी मस्त दिसतायत>> तेच नं.. कॉम्प्युच्या स्क्रीनातून पदार्थ मिळायची सोय असती तर कित्ती बरं झालं असतं नै Happy

भ्रमर, शैलजा आख्खे रावस मिळतात पण बर्‍याचदा आमच्याकडे मोठ्या रावसाचे तुकडेच आणले जातात.

निलू Happy कोळी लोक ह्या माश्यांचिच भेट देतात. त्यामुळेच मी इथे आख्या माशांचे फोटो टाकु शकते.

शैलजा लावल आहे ग. गॅस मंद असल्यामुळे ह्याचा रंग आला नाही. ह्या घे थोड्या करपलेल्या तुकड्या.
<Ravas4.JPG

जागू, मी एका कथेत अहिर नावाच्या माशाबद्दल वाचले होते (बहुतेक भूक हि कथा. ती म्हातारी कोळीण, आजारपणात नदीवर मासे पकडायला जाते...) तो माहीत आहे का ? मी कधीच तो पाहिला नाही वा त्याबद्दल ऐकलेही नाही.

कलवणात वाटण असेल तर फारच छान नाहीतर रस्सा फारच पातळ लागतो... अर्थात रावस असल्याने तसा रस्साही मस्तच लागतो. तळताना लसूण हवाच. फार छान माहीती जागू... तों.पा.सु. Happy

हजर Happy कालवण एवढं नाही आवडलं कारण बहुतेक मासे असे पांढुरके दिसताएत त्यामुळे, तळलेल्या तुकड्या भारी दिसताएत. बाकी करणार्‍यांनी करा, खाणार्‍यांनी खा. मी आणि केश्वी फोटो बघतो Happy

शाळेत कुठल्यातरी परिक्षेची तयारी करत असताना एका जीवशास्त्राच्या पुस्तकात हा मासा पाहिला होता आणि आता इथे.. Happy

तुकड्या सही दिसतायत !!

जागू... क्या रावस है!!!!!!!!!! तोंपासू.. सगळ्यांना लाळेरी(Bibs) दे आता फोटोंबरोबर Proud

जागू, मासे खूप आवडत असले तरी काटे जास्त असलेल्या माशांची मला जाम भिती वाटते ( काटेवाल्या माशांना जास्त चव असते हे माहिती आहे Wink ) त्यामुळे जेव्हा जेव्हा घरी मासे केले गेले तेव्हा रावस, सुरमई, पापलेट हेच आणले जायचे. एकदोनदा बोंबिल पण आणले आहेत.
रावसाच्या तळलेल्या तुकड्या पाहून फार त्रास झाला आज Happy

वर्षा १ वर्षाच्या अंतराच स्पष्टीकरण मी वरच्या पोस्ट मध्ये दिलेल आहे ग बयो.

मंजिरी,

दिनेशदा मला कथेची लिंक द्या.

भ्रमर इस्वण म्हणजे काय ?

डॉ. कैलास, चातक, स्वाती, सिंडरेला, पराग, दिपान्त अगो धन्यवाद.

अश्विनी तुझ्या कॉमेन्टस अपेक्षीत आहेत. नुतसी डोळे फिरवु नकोस.

Pages