धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42

मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची.. मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point किव्वा किरणचा strong point म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu.. त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...

http://merakuchhsaman.blogspot.com/

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम चित्रपट. उत्कृष्ट अभिनय, छायाचित्रण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उत्तम दिग्दर्शन.
चित्रपटातलं एकही दृश्य अवांतर नाही. प्रत्येक फ्रेम थेट काहीतरी सांगते. निव्वळ लाजवाब.

एक उत्तम चित्रपट.. खूप आवडला..

चित्रपटातलं एकही दृश्य अवांतर नाही. प्रत्येक फ्रेम थेट काहीतरी सांगते....>>> पूर्ण अनुमोदन.

आवडला. फ्रेश वाटला. खोटा नाहीये. अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. सुदैवाने आमिरची लुडबुड दिग्दर्शनात नाहीये हे कळतं आणि ते बरं वाटतं.
कंटाळा बिलकुल येत नाही.
पण It did not touch my heart!
>>>नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.<<<
हे अगदी अगदी. खूप सारे जागतिक सिनेमाच्यांतले क्लीशे वापरल्याचं जाणवलं. पण किरण रावची पहिली फिल्म आहे आणि त्यामुळे हे साहजिकच. पेंटरच्या मागे बेगम अख्तर यांची ठुमरी हा ठार क्लीशे असला तरी मला आवडला. Happy

आमिर मिसफिट एकदम. त्याची देहबोली पेंटरची नाहीच वाटत. पेंटींगची सुरूवात तो पिवळ्या, लाल रंगातून करतो, त्याच्या टेक्निकमधे/ हात चालवण्यात तो अक्षरशः कॅनव्हासवर तुटून पडताना दाखवलाय, त्याच्या स्ट्रोक्समधे प्रचंड अनरेस्ट आणि रॉ इमोशन दिसते. पण बाकीच्या वेळेला तो फारच ढोबळ आणि डेड परफॉर्म करतो. तो टिपिकल बॉलिवूड काढू नाहीये शकलेला स्वतःतून. आणि एक अगदी बारीक गोष्ट पण मला खूपच खटकली ती म्हणजे पेंटींग पूर्ण होतं तेव्हा कॅनव्हासवर आपल्याला यास्मिनचा चेहरा दिसतो. too much realistic आणि त्या चेहर्‍याच्या लाइन्सची शैली ग्राफिक डिझायनर्स सारखी जास्त वाटते. त्या चेहर्‍याची स्टाइल (स्केचिंगची स्टाइल) ही बाकी पेंटींगशी किंवा त्याच्या तोवर दाखवलेल्या स्टाइलशी मेळच खात नाही.
पण आमिरचा अभिनय बाजूला ठेवला तर स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शन पातळीवर त्याचं कॅरेक्टर स्केच कुठेही लूज एन्डस नसलेलं वाटलं. का कुणास ठाउक पण बास्किया चित्रपटातील स्क्रीनप्ले व दृश्य हाताळणीचा प्रभाव आमिरच्या, विशेषत: त्याच्या चित्रकला जगताच्या अनुषंगाने येणार्‍या सीन्समधे खूपच ठळकपणे जाणवला.

यास्मिनचा प्रेझेंस मस्तच आहे. पण ती जेव्हा दिसत नाही आणि बोलते ते आणि दिसते तेव्हा बोलते ते यात सेन्सिटीव्हिटी, व्यक्तिरेखा या पातळीवर खूप म्हणजे खूपच फरक जाणवतो. दोन वेगळ्या व्यक्तिरेखा असाव्यात इतपत. पण ही अ‍ॅक्टर फारच मस्त आहे. काय चेहरा आहे तिचा मस्त.

शायचं कॅरेक्टर आणि देहबोली कुठेही खटकत नाही. मस्त केलंय तिनं. पण शर्मिला म्हणाली तसंच तिचं फोटोग्राफर असणं हे मुंबई दाखवण्यासाठीचं डिव्हाइस खूप क्लीशे आहे. बाकी दोघांकडे एकच धोबी कपडे धुवत असणं हा थोडा जास्त घडवलेला योगायोग वाटला.

आता मला फारच आवडलेला म्हणजे प्रतिक... मी ठार झालेली आहे. Happy
शर्मिलाने वरती मेन्शन केलेले १-२ क्षण सोडता खटकलेली एकच गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरचं जिगलो असणं. फिल्मला त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याने काही भरही पडत नाहीये आणि मुन्नाचा वावर, देहबोली यामधे जिगलो असण्याने आलेलं एक निर्ढावलेपण किंवा तत्सम काही दिसतही नाहीये.
प्रतिक टू मच आवडेश.... Happy

सिनेमॅटोग्राफी सुरेख.
पण मुंबईचं कॅरेक्टर खूप नेहमीसारखं पाउस, समुद्र, गणपती विसर्जन, गर्दीच्या गल्ल्या, लोकल ट्रेन, भाई एवढंच का हा प्रश्न नक्की पडला. यास्मिनच्या नजरेतून ते बघतोय तिला हेच पटकन दिसणारे इत्यादी मुद्दे मान्य केले तरी हा दिग्दर्शनातला रॉनेस असं म्हणावसं वाटतं.
पण पावसामधे मुन्नाच्या घरात पाणी गळणं, वरती त्याने प्लास्टीक घालणं हे खूप खरं आणि प्रामाणिक होऊन जातं त्यामुळे तो रॉनेस माफ बाईंना. Happy
>>>मुंबई टिपायला कॅरेक्टरचं फोटोग्राफर असणं हेही आता खूप क्लिशे झालय आणि मधे मधे दाखवलेल्या फोटोस्लाईड्सही एरवी फोटोएक्स्झिबिशन्समधून वगैरे अनेकांनी अनेकदा टिपलेल्या त्यामुळे क्लिशे वाटणार्‍याच होत्या पण हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बहुधा पहिल्यांदाच आल्या त्यामुळे हेही ठिक आहे(डबेवाले वगैरे). <<<
याबद्दल शर्मिलाला अनुमोदन.

पण नक्की नक्की पहावा असा चित्रपट. २ लोकांबद्दल माझ्या अपेक्षा वाढल्यात मात्र. किरण राव आणि प्रतिक.

नी,
प्रतीक जिगलो आहे? तसं कुठे दाखवलं आहे सिनेमात? 'फ्रेश माल है' या संवादावरून म्हणत असशील तर सलीम कोकेनबद्दल बोलत असतो. Happy

धोबीघाट पाहिला व आवडला .
हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट वगैरे म्हणता येणार नाही , कारण हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक सिनेमाज येऊन गेलेत , हे काही नवीन नाही.

धोबीघाट बघितला, आवडला Happy पण खुपच कॅलक्यूलेटेड, बंदिस्त वाटला ! कुठेतरी काहीतरी कमी पडतय असं वाटलं त्यामूळे सिनेमा पुरेशी उंची गाठू शकला नाही! पण असो! एकंदरित हिन्दी सिनेमाच्या तुलनेत 'धोबीघाट' आशय आणि ट्रिटमेंट यां बाबतीत नक्कीच उजवा आहे!

मला आमीर आत्तापर्यंत सर्वात जास्त ह्या चित्रपटात आवडला Happy त्याचं यास्मिनमध्ये गुंतत जाणं, पहिल्यांदा व्हिडियो पाहताना ती ज्या जागी बसली आहे, ती जागा परत पाहणं, त्याची गंमत वाटणं, त्याचा डीग्लॅमराईज्ड लूक आणि त्याचे डोळे!! ह्म्म! Happy

मोनिका डोग्रा- टू टू नॅचरल! अतिशय आवडली.
यास्मिनही खूपच भारी.
ह्या दोघींनाही रिप्लेसमेन्ट नाही ह्या सिनेमात. पर्फेक्ट फिट्स.

प्रतिक मला इतका भारी नाही वाटला. ही फिट्स द बिल, पण शाय आणि यास्मिनला जशी तोड नाही, तितकं प्रतीकबाबत वाटलं नाही.

नीरजा, नथिंग पर्सनल Happy Light 1

मी अजुन पाहिला नाही, पण पाहणार आहे.

वर आनंदयात्री यांनी डोअरकिपरचे जे मत लिहिलेय तसेच सेम मत मला अजुन एकाकडुन ऐकायला मिळाले. सांगणा-याने चित्रपट पाहिला नव्हता, पण त्याच्या ऑफिसात ज्यांनी पाहिले त्यांनी असे मत प्रदर्शीत केले. मी 'त्यांना चित्रपटात काय पाहायचे हे त्यांना कळले नाही बहुतेक.' असा शेरा मारला. आता मी पाहुन बघते Happy

आता मी पाहुन बघते>> किंवा बघून पहा आणि काय दिसले ते लिही. मी टीवीवर दिसेल तेव्हा बघणार. सर्व मासिकांच्या कव्हर वर आमीर व किरण यांचे गोड फोटो आलेत ते फार इनोदी आहेत. आत तीच मुलाखत सर्वत्र आहे.

वोक्के. पब्लिकला रापन्झेलचे तिकीटदेवुन मग बघता येइल. ए सर्टफिकेट आहे का? जिगलो प्रकरण समजावून सांगता येणार नाही हाच प्राब्लेम आहे.

गरज नाही. तो शब्दही नाहीये. आणि शंका पण येणार नाही इतक्या सटली सगळं आहे. पण बहुतेक चित्रपट ए रेटिंग आहे.

वेल काही शब्दांच्या इथे 'बीप' वाजत नाही.
विषय मुलांना समजण्याच्या पलिकडे आहे.
शाय आणि अरूण संदर्भातले काही संवाद शब्द साधे असले तरी मुलांची चौकसबुद्धी नको तिथे जागृत होण्याइतके आहेत.

होहो. रेटिंग ए आहे म्हणजे मुलांना न्यायचा प्रश्नच नाही गं.
फक्त दृश्यस्वरूपात काही आक्षेपार्ह नाही एवढेच म्हणायचे होते. Happy
काही दिवसात टीव्हीवर दाखवतील तेव्हा बीप टाकतील का काय कोण जाणे. असो.

टिवीवरच्या हॉलिवुडपटात पात्रांच्या तोंडी एक शब्द असतो आणि त्याच्या सबटायटलमध्ये त्याच अर्थाचा पण प्रचंड मवाळ असलेला दुसरा शब्द असतो. तो तोंडचा शब्द ऐकायला येतो आणि त्याचवेळा खाली भलताच शब्द वाचुन माझा जाम गोंधळ होतो Happy

टिवीवरच्या हॉलिवुडपटात पात्रांच्या तोंडी एक शब्द असतो आणि त्याच्या सबटायटलमध्ये त्याच अर्थाचा पण प्रचंड मवाळ असलेला दुसरा शब्द असतो. तो तोंडचा शब्द ऐकायला येतो आणि त्याचवेळा खाली भलताच शब्द वाचुन माझा जाम गोंधळ होतो>>>>>>>>> टीवी वर सेंसर बोर्ड असतो......ना......मग.....

जस्ट क्युरीअस ! आमीरचा एक्झिबिशन मधल भाषण हे स्कोर सेटल (मनसे, मराठी वाद) करणार नाही वाटलं? तसही पावसा संदर्भातल सगळ मोनसून वेडींग च्या तिव्र प्रभावाखलील वाटल. शाय, अरूणची बॅकस्टॉरी पुर्ण गंडलेली वाटली त्यामुळे दोन्ही कॅरॅक्टर्स कर्डबोर्ड कटाऊट वाटले.

एकंदरीतच बोलीवूड चित्रपटांची पातळी, सिनेमॅटिक व्हेल्यु इतकी घसरलिये कि हा चित्रपट अंधो मे काणा राजा असेच अजुनही वाटते.

मी जाम enjoy केला धोबी घाट, direction, ठुमरी, प्रतिकचे expressions तर मस्तच, मला चित्रपटाचा शेवट हि आवडला जरी पुर्ण पणे क्लीयर झाला नाही तरी Happy .... लफंगे परींदे, दबंग टाईप पेक्षा बराच वेगळा. (बहुदा निट डब न केल्याने सुरवातीला लीप मोमेन्टस खटकतात सगळ्यांच्या)

"स्प्लीट वाईड ओपन" पण ह्याच टाईपचा वाटतो, मुंबई दाखविणारा.

नीरजाच्या निरीक्षणांना अनुमोदन. शिवाय 'क्लिशे' वगैरे आणि 'अंधो मे काणा राज'' बद्दल पण. Happy

या सिनेमात टिपिकल बॉलीवुड कथा नाही, हे गृहित धरलंच होतं, त्यामुळे कथेची बांधणी आणि लुज एंड्स याकडे लक्ष दिले नाही. पण सारीच पात्रे कच्ची ठेवल्यागत वाटले. चित्रकार, धोबी, फोटोग्राफर आणि 'मुंबई' यासारखी नेहेमीची यशस्वी कॅरेक्टर्स घेऊन जास्तीत जास्त प्रेक्षक कसे मिळतील याचा विचार करून ठेवल्यागत वाटलं. आमिरला चित्रपटात घेतल्याबद्दलही तेच. आमिरखानचे कॅरेक्टर नीट समोर न आल्याने आपण आमिरबद्दलचे अनेक पुर्वग्रह ठेवून बघतो, आणि तिथेच लोचा होतो. प्रतीक आणि मोनिका ठीक, पण आमिरैवजी एखादा अजिबात ग्लॅमर नसलेला अभिनेता हवा होता असं वाटलं. अर्थातच आपल्यासारखाच किरण रावनंही विचार केला पाहिजे असं नाहीच. बाकी कॅमेरा काही ठिकाणी अतिच हलवल्याने त्रास होतो.

साजिरा अनुमोदन. चित्रपट आवडला पण हा काही पहिलाच प्रयत्न नाही. बलराज सहानी च्या गर्म हवा, पासून हे होतच आलेय.
धोबी घाट आवडला, इथे सर्व जाणकारांनी लिहिलेच आहे. मला आढळलेले आणखी काही मुद्दे.

प्रतीक छानच आणि रॉ वाटतो. पण त्याला पॉलिश्ड करुन लवकरच गाता नाचरा बाहुला बनवण्यात येईल.

यास्मिन ने व्हीडिओ टेप्स करुन ठेवणे हा फारच सोपा मार्ग वाटला. तिने पत्र लिहून ठेवली असती, तरी चालले असते. समुद्रकाठच्या वाळून ती आपले नाव उर्दू मधे लिहिते, मग टेप्स वर हिंदीत का लिहिते ? ते उर्दूत असते तर अरुणला वाचता आले नसते. मग त्याने त्या टेप्स वेगळ्या क्रमाने बघितल्या असत्या, तरी मजा आली असती.
त्याच्या पेंटींगमधला तिचा चेहरा फारच रेखीव आहे. आणि तो पेंटींगच्या बाकिच्या शेलीशी पूर्ण विसंगत आहे. त्याने टेप्स न बघता, पत्रातून त्याला जाणवलेला तिचा चेहरा, चितारला असता तर ?
आमिर कधी नव्हे ते फार स्टिफ वाटलाय. त्याचा चेहरा अजिबात हलत नाही.
मुंबईतील जनजीवनाचे चेहरे फारच रुटीन वाटले (तरी डबावाला नव्हता ) शायची तिथली उपस्थिती, थोडे संवाद आणि मग फोटो आला असता, तर जिवंतपणा आला असता.
प्रतीकच्या मुन्नावर बरीच मेहनत त्याने आणि दिग्दर्शिकेने घेतल्याचे जाणवते. भुयारी मार्गात त्याचे रेलिंगवरुन घसरणे, रस्त्याने जाताना शायच्या खांद्याच्या बाजूला तिला स्पर्श न करता हात धरणे, लिफ्टमनवर उगाचच डाफरणे असे अनेक प्रसंग माझी दाद घेऊन गेले. त्याच्या कपड्यांची निवडपण त्याच्या भुमिकेशी पूर्णपणे सुसंगत आहे.
शाय आणि यास्मिनच्या भुमिकेतील कलाकारांचे योग्य ते कौतूक झालेच आहे पण दोघी हिंदी सिनेमाच्या नजरेतून, सुंदर नसल्याने पुढे कधी दिसतील का याची शंकाच आहे.
खूप दिवसांनी दिसलेली, कौशल्या उर्फ किट्टु गिडवानी खूप आवडली.


चित्रपट हिंदीत डब केलाय हे जाणवत रहातं आणि रसभंग होतो. मात्र वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या भाषेचा लहेजा ओरिजिनल ठेवलाय हे छानच.

<<< हिंदीत कुठे डब केलाय सिनेमा ?
कि भारतात वेगळं व्हर्जन आहे ?
मला तर प्रतीकचे संवाद सोडून सगळे संवाद मोस्ट्ली इंग्लिशच असलेलाच सिनेमा पहायला मिळाला.

असो, आवडला धोबीघाट ..शेवट पर्यंत कथा-संवाद गुंतवून ठेवतात पण शेवट मात्र थोडा अपूर्ण वाटला.
शाय, यास्मिन, प्रतीक आणि आमिर सगळ्यांचीच कामं आवडली :).
मुंबईची वातावरण निर्मिती मस्तं !
मिनिका डोगरा (शाय) , यास्मिन सर्वात जास्तं आवडल्या, अगदी खर्‍या खुर्‍या वाटतात !
प्रतीक खूप आवडला, पण खरं सांगायचं तर ' एक धोबी-उंदिर मारणारा' म्हणून थोडा जास्तं चकाचक किंवा थोडा फिल्मी वाटला ( अर्थात त्याला हिंदी सिनेमाच हिरो बनणे ही अँबिशन आहे म्हंटल्यावर थोडं फार समजु शकतो :). )
मला तरी आमिर टिपिकल मसाला बॉलिवुड टाइप नाही वाटला यात .
त्याची बॉडी लँग्वेज, अजागळ अपिअरन्स यात मला तरी कुठे ' लार्जर दॅन लाइफ सुपरस्टार आमिर खान ' नाही दिसला.
अर्थात आमिर खान च हवा असा रोल नाहीये , एखादा टोटल नवीन चेहरा किंवा मग टिपिकल मसाला मुव्ही न करणारे इरफान खान, के.के मेनन, रजत कपुर सारखा एखादाही चालला असता.
कदाचित सिनेमाच्या कमर्शिअल सक्सेस साठी आमिर ला स्वतः ला तो रोल करावासा वाटला असेल , शेवटी आमिर चे मोठे फॅन फॉलॉइंग निदान आमिर चं नाव पाहून एखादा वेगळा सिनेमा बघायला जात असतील तर ते ही नसे थोडके :).
असो, पण जसं बर्‍याच लोकांनी लिहिलय कि आमिर मिसफिट्/फिल्मी वाटला तो कदाचित मसाला मुव्हिज मधे ओव्हर एक्स्पोजर , ओव्हर ग्लॅमरस इमेज, स्टारडमचा परिणाम असु शकेल का ?
लेटेस्ट पीपली लाइव्ह, वेलकम टु सज्जनपुर मधली लोकं जशी खरी वाटतात किंवा जुने दिग्गज स्मिता पाटिल-शबाना-नासिरुद्दिन- रघुवीर यादव- पंकज कपुर असे अ‍ॅक्टर्स 'रिअल कॅरॅक्टर्स' वाटतात तितके ' खरे खुरे 'टिप्पिकल मसाला मुव्हिज मधले कोणीच वाटत नाहीत ( अपवाद जुन्यां मधे नुतन, वैजयन्तीमाला, अग्निपथ मधला अमिताभ , सदमा मधे श्रीदेवी, लेकिन मधे डिंपल , नवीन पैकी ओमकारा मधला सैफ ,वेल डन अब्बा मधे मनिषा लांबा).
मला तर सुप्रसिध्द उत्सव मधे सर्व कॅरॅक्टर्स अतिशय उत्तम रेखाटली गेली होती , कॉस्च्युम डिझायनरचं काम , रेखाचं अ‍ॅक्टिंग कितीही उत्तम असलं तरीही रेखा ही रेखाच वाटली, वसंतसेना मुळीच वाटली नाही , अगदी उमरावजान मधे सुध्दा रेखा कितीही आवडली तरी मला ती कायम ' स्टार रेखा' च वाटली.
असो, तर सांगायचा मुद्दा काय तर टिपिकल बॉलिवुड पटातल्या इमेज चा हा तोटा असु शकतो !

कंटाळा आला नाही, पण बंडल पिक्चर आहे.

काय सांगायच आहे हे न ठरवता आल्याने उगाचच सरमिसळ.
एडिटिंग न जमल्यामुळे म्हणा किंवा मुदाम तसे दाखवल्याने म्हणा चित्रपट विस्कळीत वाटतो.
मी उगाचच कारण नसताना बेनेगल ,स्मिता पाटील , तारे जमिपर असे काही तरी डोक्यात धरून पाहिला. एकदम अपेक्षाभंग.

ही कसली नवी पहाट?. एक वेगळा चाकोरी बाहेरचा चित्रपट येवढच फार तर म्हणता येइल. जस गुजारीश ला पण.

पण बहुतेक याच चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अमिर सलग आठ दिवस बाहेर न येता एका चाळीत राहिला होता. बाहेर कुणालाही कळल नाही. ग्रेट कमिटमेंट. .

त्रिविक्रमाक्रा,
मला तर अजिबात विस्कळित वाटला नाही.. उलट प्रत्येक प्रसंग अगदी नीट, ठरवुन बनवल्यासारखा... तिच्या दिग्दर्शनात अजुन रॉनेस आहे.. पण तो ठिक आहे... बेनेगल, स्मिता पाटील इतकी उंची यायला थोडा वेळ लागेल पण ते कौशल्य नक्कीच आहे तिच्याकडे आणि प्रतिभापण.. बाकी, नवी पहाट यासाठी म्हटलं की, बेनेगल, स्मिता ही नावं जशी आर्ट फिल्म च्या चौकटित अडकुन पडली तसं न होता, हा सिनेमा मास ला पण दर्जेदार आणि इन्टेलेक्चुअल सिनेमाकडे वळवु शकतो...

Pages