केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माया, इथे केसांबद्दल चर्चा आहे गं....

डोळ्याखालची काळी वर्तुळे तुझे अनारोग्य दाखवतात. तुला विकनेस वाटत असेल किंवा इतर काही तब्येतीच्या तक्रारी असतील, मानसिक तणाव असेल तर अशी वर्तुळे येतात. फक्त वरुन क्रिम लावुन जाणार नाहीत ती. उशीरा झोपुन उशीरा उठायची सवय असेल तरीही काळी वर्तुळे येतात. नक्की का येताहेत याचा शोध लाव.

सोन, मागची पाने वाच Happy
तुझ्या घरात आई/बहिण/मावशीचे केस लांब आहेत का? असतील तर तुझेही नीट काळजी घेतली तर होऊ शकतील. मागच्या पानांवर लिहिलेय केस्सांची काळजी कशी घ्यावी ते. वाढतील हळूहळी Happy

माझे केस पुर्वी खुप मोठे, सिल्कि आणि घनदाट होते पण लग्नानंतर हळु हळु दाटपणा कमी झाला आणि प्रेग्नंन्सी नंतर तर ते खुपच गळु लागले आहेत. सध्या पहिल्या असणार्‍या केसांचा १/५ भाग उरला आहे.. Sad माझ्या पार्लरवालीने संगितल्या प्रमाणे "सेसा" हे तील अणुन अलवत आहे. अत्तश्या फक्ता एकच आठवडा झाला आहे. ते पुर्वीसारखे परत कसे होतील? शनिवार रविवारच वेळ मिळतो. काय उपाय करु शकते मी शक्यतो घरच्या घरीच.. Sad Sad

सगळे उपाय चुकीचे सांगत आहेत इथे सर्व सर्व जण. तुम्ही कुणी आवळ्याची पावडर अर्थात आवळाकंठी, मण्डूर, माका, ब्राह्मी, शिकेकाई, बावची, बकुळ, जास्वंद, नागरमोथा, मेंदी, रिठा आणखी बरीच मोठी यादी आहे .. तर ही नाव कधी ऐकली नाहीत का? केसांसाठी हे सर्व घटक अत्यंत पोषक आहेत.

'दवे' कंपणीचं जास्वंदाचं तेल येत ते केसांचा कोरडेपण नष्ट करतो. केसांसाठी मुख्य म्हणजे आवळा, माका आणि ब्राम्ही सर्वात उपयुक्त.

रुपाली, तुझे दुर्लक्ष होतेय केसांकडे आणि त्याचाच हा परिणाम आहे Sad केसांना नीट तेल लाव, केस दिवसातुन दोनदा तरी पुर्ण विंचर, तब्येतीकडे लक्ष दे....

मी तुझ्यासारख्याच परिस्थितीत होते तेव्हा दोन दोन दिवस केसात फणी घालायलाही वेळ नसायचा. जरासे वरवरचे विंचरुन पळायचे ऑफिसात, सुट्टीच्या दिवशी कायम अंबाडा.... केसांची अशीच वाट लागलेली तेव्हा.

डोक्यात उवा जर झाल्या असतील सर्वात प्रथम आधी केस शक्य तेवढे कापून काढा. मंग रोज सकाळ संध्याकाळ कडूनिंबाच्या ठेवचलेल्या रसांनी डोक्यावर लेप लावून तो १५ मिनिटानी कोमट पाण्यानी डोके न घासता धुवून टाका.

दही लावल्यास कोंडा कमी होतो असे ऐकले आहे. कोंडा का होतो तर त्वचा रुक्ष होते म्हणून. अशावेळी कशामुळे केसांचे नीट नैसर्गिक conditioning होईल याचा विचार करा. मेंदी, शिकेकाई तर यासाठी १००% उत्तम आहे. फक्त आपण कसे लावतो योग्य ती पद्धत अमलात आणतो की नाही हे महत्त्वाचे. मी हे केले ते केले पण केले ते नीट केले का हे पडताळून पहा जरा.

खरच दुर्लक्ष खुपच होतय माझे ते मला मान्य आहे पण असेच होत राहिले तर एक दिवस एकही केस दिसणार नाही.. Sad तेल मी आठवड्यातुन २-३ वेळा लावतेच पण ते पुरेसं होत नाहीय बहुतेक.. Sad

तुम्ही कुणी आवळ्याची पावडर अर्थात आवळाकंठी, मण्डूर, माका, ब्राह्मी, शिकेकाई, बावची, बकुळ, जास्वंद, नागरमोथा, मेंदी, रिठा आणखी बरीच मोठी यादी आहे .. तर ही नाव कधी ऐकली नाहीत का? केसांसाठी हे सर्व घटक अत्यंत पोषक आहेत.

अरे बी बाबा मी हे सगळे ऐकलेय.. मी मंडुर पावडर वापरतेय सध्या मेंदीत. पण शिकेकाईने केसातले तेल जात नाही रे. मी एकदा गावाहुन खास आणलेली शिकेकाई पावडर. पण ते रात्री सगळे एकत्र करुन उकळा आणी दुस-या दिवशी लावा हे सगळे करायचा कंटाळा... Sad

आता तु एवढे सांगतोयस आणि माझ्याकडे वेळही आहे तर करते परत एकदा प्रयोग. मला नीट सांग एकदा हा घरगुती शांपु कसा बनवायचा ते. मी ग्लासभर पाण्यात दोन चमचे शिकेकाई पुड टाकायचे आणि रात्री बराच वेळ उकळल्यावर ते पाणी दुस-या दिवशी केस धुण्यासाठी वापरायचे. यात तु वर लिहिलेले बाकीचे घटक कसे आणि कधी वापरायचे ते सांग.

(केस धुताना मी शिकेकाईची पुड डोक्याला चोळायचे. ती केसात अडकुन बसायची. मग ती पुड माझ्या केसांमधुन घरभर सांडत बसायची, आई वैतागायची Happy )

रच्याकने, मी मंडुर म्हणुन जी पावडर आणली ती खुप जड वाटली. दुकानदाराला कसली पावडर आहे म्हणुन विचारले तर तो म्हणाला लोखंडाचे चुर्ण आहे. मंडुर पावडर हे लोखंडाचे चुर्णहे खरे आहे ना? मेंदित ही टाक्ली की मेंदी काळी होते एकदम.

साधना, मी यावेळी भारतात गेलो तेंव्हा घरुनचं ४ किलो पावडर करुन आणली. रात्री झोपताना दोन चमचे पावडर भिजवून सकाळी तेच पातेले थेट गॅसवर पाच मिनिटे ठेवतो. काय कष्ट आहे यात असे!!!!!!!!!!! सहज शक्य आहे अगदी.

तुला नंतर प्रमाण देतो.

मेंदीने डोक्याची त्वचा कोरडी होते, केस पण फार रफ होतात कधीकधी

माझे झाले होते.

माझ्या डोक्यात आता काळे केस शोधावे लागतात म्हणुन मी मेंदीचा आधार घेते. केस रंगव असे सगळ्यांनी सुचवलेय, पण केस मुळातुन पांढरे येतात आणि ते दर आठवड्याला १ सेंटीमिटर वाढतात त्याचे काय करणार? टचप किती वेळा करणार? म्हणुन मेंदीच लावणे बरे वाटते. मी मेंदीत दोन्-तिन चमचे खोबरेल तेल आणि १ अंडे टाकते. वास भयाण येतो पण केस कोरडे होत नाहीत.

काय कष्ट आहे यात असे

कष्ट???? हे सगळे करुन जेव्हा तेलाने माखलेले केस धुते तेव्हा तेल अजिबात जात नाही, आणि खुप राग येतो मग. केसांना बोटांनी चोळून पाहिल्यावर ती बोटे जर तेलकट वाटली तर मला केस धुतल्यासारखे वाटतच नाही... मग सरळ शांपु ओतायचे डोक्यावर.... आधि शिकेकाई मग वर शांपु.... काळे केस स्वतःचे तोंड कायमचे काळे करणार नाहीत तर अजुन दुसरे काय करणार Proud

रच्याकने, दोन आठवड्यांपुर्वी सहारा फेस्तिवल ला गेले होते. तिथे हेअरऑइलचाही एक स्टॉल होता. त्याच्याकडे केस काळे करण्याचे तेल होते.. रुपय ५०० एक बाटली... दोनदा स्टॉलवरुन परत गेले आणि मग धीर करुन ५०० रुपये त्याला दिले.. त्याने १०% डिस्काऊंट दिले Proud
केस काळे व्हायला हवेत ही लालसा माणसाकडुन काय काय करवते ना?? हल्ली रोज लावते ते तेल. तिन महिन्यात केस काळे होतील असे त्याने सांगितले. होणारच हा विश्वास ठेवतेय आणि असे काय होत नाही हे वाचलेले नजरेआड करते. औषधाचा इफेक्ट येण्यासाठी डोक्टरवर विश्वास ठेवणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. Happy

मला उपाय सुचवाल का हो पक्क्का?

सुचवलेले उपाय वापरुन पाहायचे.. केस शिल्लक राहिले तर उपाय चांगला होता असे मानायचे. Happy

माझी मुलगी ५ वर्षांची आहे. ह्या वयोगटातील मुलिंच्या केसांची निगा कशी राखायची ? तिचे केस कुरळे आहेत.

बी फॉर्मुला देतोय ना इथे, तो वापरायचा आपल्या लेकींसाठी. आपले केस गेले आता बाराच्या भावात, लेकिंचे तरी टिकवुया.

<<१ अंडे टाकते. वास भयाण येतो पण केस कोरडे होत नाहीत.>> साधना... तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा बलकच टाका, केस कंडिशनरही होतील आणि वासही येणार नाही , आणि मेंदित दही टाका (आंबट असेल तर उत्तम )

मेंदी फक्त कंडिशनर म्हणून लावायची असल्यास, मेंदी लो़खंडी भांड्यात भिजवायची आणि त्यात थोडेसे तेल मिक्स करायचे , २० मिनिटे किंवा अर्धा तास ठेवून केस साध्या पाण्याने धुवायचे.

<<तेल मी आठवड्यातुन २-३ वेळा लावतेच पण ते पुरेसं होत नाहीय बहुतेक.. >> रुपाली नुसतच तेल लावून काहिही फायदा नाही ग होत. तू केसासाठी लागेल ईतक तेल एका वाटीत घेऊन थोडस गरम कर आणि मग कापसाच्या बोळ्याने , किंवा बोटांनी केसाच्या मुळाशी हळूवारपणे लाव. थोडावेळ व्यवस्थित मालीश कर. नियमीत केल्यास नक्की फायदा होईल. आणखीन करायचे तर मालीश केल्यावर केसांना वाफ द्यायची , किंवा कोमट पाण्यात चांगला टॉवेल बुडवून , पिळून डोक्याला बांधावा म्हणजे ती वाफ केसांना लागेल.

आणि तेलाच म्हणाल तर, नुसतच खोबरेल तेल पुरेसे नाही ...

तेल घरीच बनवायचे असल्यास ... अर्धा किलो खोबरेल तेल, पाव किलो तिळाचे तेल, ब्राम्ही, माक्याची पाने , आवळा , बदाम , २०-२५ जास्वंदीची फुले असे एकत्र चांगले उकळून घेते, पाण्याचा अंश राहता कामा नये. तेलातली पाने फुले चांगली कडकडीत झाली पाहिजे. थंड झाल्यावर गाळून एका बाटलीत भरावे आणि त्यात थोडस कापूर टाकून ठेवावे. लावायच्या वेळी पुरेसे तेल थोड कोमट करून लावावे.

लवकर लिहा हो साहेब.. नव्या मुंबईत असले काही मिळत नाही. रविवारी दादरला गेले तर आणता तरी येईल आणि मग लगेच शुभस्य शीघ्रम.....शीघ्रम..शीघम.....

जुई, धन्स गं....
ब्राम्ही आणि माका जागुकडुन आणावा लागेल. आवळा आणि बदाम अख्खा की पुड चालेल?? आणि बदाम आपण खातो ते??

साधना ह्या सगळ्या पावडरी शिकेकाई पावडरमधे मिसळूनच ठेवायच्या. शक्य असेल तर संत्र्याच्या साली वाळवून ठेवायच्या. मिक्स पावडर आणि संत्र्याची साल एकत्र उकळायची आणि ते पाणी वस्त्रगाळ करून केस धुवायला घ्यायचे. तेल जात नाही. पण किंचित चिकटपणा असेल केसांना तर हरकत नसते. तेलाच्या ऐवजी जास्वंद जेल (तेल नव्हे) लावून मसाज करून मग धुवून टाकायचे केस. आठवड्यात एक दिवस असे रासन्हाण करणं शक्य असेल ना? तसं करायचं आणि आठवड्याच्या मध्यात आदल्या रात्री तेल आणि सकाळी शांपू-कंडीशनर..
तुझे केस तसे लांबही आहेत खूप त्यामुळे वेळ खूपच लागत असेल धुवायला, वाळवायला. म्हणजे केस धुणे हे दर ३-४ दिवसांनीच करत असशील ना तू?

ताजा आवळा असेल तर त्याच्या फोडी टाकाव्यात, किंवा मग बाजारात तयार तेल मिळतात ( ब्राम्ही, माका, बदाम ) ती सगळी तेल मिक्स करायची Happy

केसांसाठी आवळा फार महत्वाचा... शक्य असल्यास रोज एक चमचा आवळा पावडर आणि माका पावडर ( किंवा रस ) घ्यायचा. सुरूवातीला प्रमाण कमी घ्यायचे आणि नंतर थोडे थोडे प्रमाण वाढवायचे. म्हणजे केसांचे आतूनही पोषण होईल. सगळ्यात उत्तम च्यवनप्राश खायचे Happy

कोणालाही लगेच तुप खाऊन रुप येत नाही , तसेच कोणताही उपाय हा नियमीतपणे करावा लागतोच तरच त्याचा फायदा दिसून येतो. Happy

konda kami karnyasathi gharguti uppay sanga?

kes khup galtat.

Pages