केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hi Dreamgirl,
केला गं प्रयोग, पण ना, ओले असतना मस्त वाटले केस, अन वाळल्यावर dry dry वाटले गं जरा... तुला पण जाणवतं का असंच?

नवीन तेल वापरून पाहिलं, तर केस जरा जास्तच गळतात का? Sad

बर, कोणाला केसांच्या होमियोपाथिक ट्रीटमेन्ट्चा काही अनुभव आहे? डॉ. बत्रा, डॉ. शहा वगैरेंची होमियोपथिक क्लिनिक्स आहेत फक्त केसांच्या समस्यांसाठी. त्याचा उपयोग होतो का?

पौर्णिमा, तेल लावण्याचा आणि केस गळण्याचा काडीचाही संबंध नाहीय. केस मुळापासुन वेगळे झाले की गळतात. असे मुळापासुन वेगळे झालेले किंवा त्या स्टेजमध्ये आलेले केस जरा जरी धक्का लागला किंवा मसाज केला तर हातात येतात. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीय. कधी कधी केस धुतल्यावर सुद्धा असंच होतं पण शॅम्पु केला म्हणुन केस जास्त गळले, तेल बदललं म्हणुन केस गळले असं होतं नाही.

पूनम, तू हेअर ट्रिटमेंट घेतली आहेस का? श्रद्धाने ते एक पार्लर सुचवलं होतं बघ हेअर ट्रिटमेंटसाठी... त्या बायका जितक्या कसोशीने तेल लावून देतात, मुळांमधे जिरवतात, त्यावर वाफ देतात, हेअर पॅक वगैरे लावण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी करणं अशक्य असतं. एकदा केस सुधारले की मग घरी त्याची काळजी घेता येते, पण बिघडलेला पोत सुधारून घेणं ही एक महत्वाची गोष्ट असते. तर ती तू करून बघ.
माझे केस घनदाट आहेत, त्यामुळे त्यांना गळती लागली तेव्हा मला जरा बरं वाटलं होतं. पण टोकाशी झाडू झाला तेव्हा मी जागी झाले आणि निमूट जाऊन हेअर ट्रिटमेंटची ६ सिटिंग्ज घेतली तेव्हा जरा कुठे पहिल्यासारखे केस झाले.

>> शॅम्पु केला म्हणुन केस जास्त गळले, तेल बदललं म्हणुन केस गळले असं होतं नाही. >>
माझं होतं असं. शँपू बदलला की माझे केस प्रचंड गळतात.

>> हेअर ट्रिटमेंटची ६ सिटिंग्ज घेतली तेव्हा जरा कुठे पहिल्यासारखे केस झाले >>

मंजूडी, कुठे घेतलीस ट्रीटमेंट?

पूनम, हेड मसाज घे बरे वाटेल. माझ्या केसांची या दोन चार वर्षांत वाट लागली आहे. दोनदा हेड मसाज केल्यावर फरक लगेच जाणवू लागला. थांबल्यावर जैसे थे. आता परत लक्ष दिले पाहिजे.
सध्या उन्हामुळे जास्त चिपचिप वाटतीये. हेल्मेट वापरत असशील तर केस दर दोन दिवसांनी स्वच्छ कर.

sac.jpg

अमि, वर बघ. २र्‍या किंवा ३र्‍या स्टेजला जर केस आला असेल तर तो धक्क्यानेही बाहेर पडतो. तु शॅम्पु करताना खुप जोरजोरात लावतेस का??

व्हॅनी, मंजूतैंनी सुचवलेला हेअर ट्रीटमेंट घेण्याचा पर्याय एकदम बेस्ट.
अजून एक म्हणजे त्या आगोम कंपनीच्या 'केशरंजना गुटिका' असतात त्यांनीपण केस चांगले होतात / राहतात. ते तेलही सूचनेनुसार इतर तेलात मिसळून वापरायचं.

तू आधी हेअर ट्रीटमेंट घे. मग केशरंजना वापर.

मी घेतल्या होत्या 'गुटिका केशरंजना', पण तितकासा फरक जाणवला नाही मला. आधी केस रिपेअर कर मग त्यांची काळजी घे नीट.

माझं निरिक्षण: टेन्शन, स्ट्रेस, आहारात बदल ह्या गोष्टींनीही केसांवर परिणाम होतो. माझे आता आता केस थोडे बरे झालेत. मध्ये ४-५ महिन्यांपुर्वी जाम बकवास झाले होते. कोरडे, रुक्ष, अज्जिबात जीव नसलेले, हा अस्सा फुलोरा झालेले. पण डॅन्ड्रफसाठी ट्रीटमेंट घेताना पुन्हा पहिल्यासारखे चांगले झालेत. ऑल क्रेडीट गोज टु माय पार्लरवाली Happy

उन्हाळा चालु झालाय तेव्हा मुलींनो, नेहमी स्कार्फ बाळगा जवळ. ट्रेन, बस, बाईकवरुन जाताना नेहमी केस स्कार्फने झाकुन घ्या.

योडी, १००% अनुमोदन. तुटणारा केस हा तुटतोच.

पूनम, तुम्ही आहारात नीट कॅलशियम, बी कॉम्प्लेक्स घेत असाल तर त्रास कमी होतो.
भरपूर झोप व मानसिक ताण कमी ठेवला तर केस बरे रहातात हा स्वानुभव आहे.

तसेही, अनुवाशिंक कारणे ही असतात केस कमी होण्याचे वय वगैरे असे माझी डॉक्टर म्हणाली. म्हणजे आई/वडिल टकले होत असतील तर मुलेही त्याच वयाच्या आसपास टकले होतात. Happy

डॉ.बात्रा यांची हेअर ट्रीटमेन्ट अजिबात घेऊ नकोस पूनम. अत्यंत महागडी आणि शिवाय थातूरमातूर व तात्पुरती उपचार पद्धती आहे. ती चालू असे पर्यंतच केसांमधे फरक जाणवतो आणि ट्रीटमेन्टचा कालावधी संपत आला की त्यांचे डॉक्टर पद्धतशीरपणे तुमच्या केसांना अजून उपचारांची कशी गरज आहे, ते नाही घेतले तर अजून उलटा परिणाम होऊ शकतो तेव्हा ट्रीटमेन्ट पुढचं वर्षही चालू ठेवा असा आमचा सल्ला आहे वगैरे वगैरे ब्रेनवॉश चालू करतात. त्यांना नकार दिला की अ‍ॅग्रेसिव्ह फोन कॉल्स सुरु होतात. ज्या दिवशी त्यांचे प्रॉडक्ट्स वापरण थांबवाल त्याच्या दुसर्‍या दिवसापासून केस जैसे थे होतात. माझ्या मोठ्या मुलीच्या केसात खूप कोंडा झाला होता आणि त्यामुळे हेअरफॉल आणि पिम्पल्सचा त्रास तिला सुरु झाला म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरुन डॉ.बात्रा ट्रीटमेन्ट सुरु केली. दोन महिन्यातच कळलं की नुसता दिखावा आहे. तरी पुढे कंटीन्यू केली वेड्यासारखी आणि पैशापरी पैसे गेले वर काहि फरक नाही.
सुट्टीत माझ्या आईने तिला महिनाभर भीमसेनी कापूर, तीळाचे तेल, जास्वंद जेल, वाटलेली मेथी लावणे वगैरे केलं तर अगदी मिरॅक्युलसली केस हेल्दी झाले.
तु चांगल्या पार्लरमधे हेअर ट्रीटमेन्टचे रेगुलर सिटिंग्ज घे. मला ब्यूटिकचा अत्यंत चांगला अनुभव आहे.
स्पा ट्रीटमेन्ट्चा आग्रह काही पार्लर्स धरतात पण त्यात काही अर्थ नसतो फक्त जास्त महाग.

योडि, मी खुप जोरात नाही लावत गं. केस धुतानाच नाही गळत्..नंतर गळतात. मला असं वाटतं की, शांपू बदलल्याने स्काल्पची त्वचा नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त कोरडि किंवा तेलकट होते, त्यामुळे केसांवर परिणाम होतो, असे मला जाणवले होते. अचानक शॉक दिल्यासारखे होत असावे.

ओले असताना विंचरतेस का?? तसं केल्यानेदेखील केस गळतात/ तुटतात. >> माझे केस कुरळे वगैरे आजीबात नाहीत.. पण ओले असताना गुंता नाही काढला तर नंतर खुप तुटतात.. Uhoh

अमि, एरंडेल तेल लावून बघ केसांना...... त्याविषयी ह्याच बाफवर साधारण १० व्या वगैरे पानावर असेल माहिती आणि अनुभव.

आपण ओले केस झटकतो, त्यानेही मुळांना धक्का बसुन केस गळु शकतात. त्यामुळे ओले केस झटकणं, विंचरणं टाळावं शक्यतो.

माझ्या मैत्रिणीला फोन कर घरी येऊन हेअर स्पा/ हेड मसाज ची ट्रीटमेंट देईल. उपयोग होतो. आत्ता हेअर स्पाच करून घेतेय..

माझ्या केसातही कोंडा येतो जातो, मी head & shoulder चा शाम्पु वापरते. पण फारसा फरक नाहीय अजुन कमी जास्त होत राहातो, रविवारी लिंबु लावले धुण्याआधी, तर स्काल्पची त्वचा आणखीनच कोरडी झालीय, केस तर भयानकरीत्या गळतायत, नुसता हात जरी फिरवला तरी हातात येतात. तेलकट, तिखट कमीच खाते, पण सध्या विलक्षण तणावाखाली आहे. पण तरी काही तरी उपाय सुचवा प्लीज....
वर हेअर ट्रीटमेंट बद्द्ल लिहिले आहे, तर मुंबई(बोरीवलीच्या जवळपास) एखादे खात्रीलायक पार्लर सांगाल काय?? किती चार्जेस वगैरे प्रत्येक सिटिंग्जचे असतात??

हो ग, जरा लांबच पडेल.. पण तरी चांगल असेल तर सांगुन ठेव..... नाहीच जवळपासच मिळाल तर जावच लागेल मग, पार वैतागलेय ग केसगळतीला....

अनेकानेक धन्यवाद मैत्रिणींनो.
शर्मिला, बरं झालंस डॉ. बात्रांचं सांगितलंस ते. अनेक लोकांप्रमाणे तेही नाव मोठं लक्षण खोटंवालेच निघाले तर Sad
ब्युटिकला जाता येईल. नीरजा, मैत्रिणीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव ईमेल करशील का? मलाही केशरंजनाचा फायदा नाही झाला काही. एरंडेल तेलाचाही Sad उन्हाळ्याचे जास्त वेळा केस धुतले जातात. म्हणजेच जास्त केसगळती Sad मी सेसा तेल लावतेय. त्यात गुडघ्यापर्यंत दाट केस असलेल्या बाईचं चित्र आहे. माझी आशा तिच्यावरच आहे आता Proud

मी हिमालयाचा शांपू वापरतेय... डेली केअर -सॉफ्टनेस एंड शाईन.... मला खुप चांगला वाटला. माईल्ड आहे. केस कोरडे झाले असतील तर उपयोगी आहे.

Pages