केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं तिनचार दिवसांनी धुणेही जीवावर येते.. पण इथल्या हवेत आणि धुळीत केस खराब होतात, त्यामुळे आठवड्यातुन दोनदा धुवावे लागतात. रविवारी रासन्हानाचा कार्यक्रम ठेवते आता..

साधना,

आवळ्याची पावडर विकत आण. रोज संध्याकाळी किंवा सकाळी अर्धा तास अगोदर भिजवून ती केसांना लाव. फार जलद गतीने केस काळे होतात. वर जुई म्हणते तशी एकचं गोष्ट तू सातत्यांनी कर. बदामाची काहीचं गरज नाही.

केस धुताना आधी तेल जाव म्हणून शांपू लाव व मग शेवटी पावडर भिजवलेली असते ती डोक्यावर लावून त्यातले पाणी डोक्यावर घ्यायचे. असे केले के शांपूचे वाईट परिमाण कमी होतात. आधी पावडरीची पाणी डोक्यावर नको घेऊस.

पावडर तयार करताना शिकेकाई सगळ्या वस्तूंच्या १० पट जास्त घ्यायची. एकून प्रमाण हे १०:१:१:१:१:१ असे असायला हवे. अर्थात रिठा, नागरमोथा, माका, ब्राम्ही, आवळाकंठी हे सर्व फक्त १ असायला हवे.

आवळ्याची पावडर स्वस्त मिळते. ती एक दोन किलो विकत आण. मला अकोल्याला ह्या सर्व वस्तू छान मिळाल्यात. आवळ्याची पावडर पातळसर भिजवून तिचा लेप केसांना लावून तो लेप अर्धा तास ठेवून मग केस धुवून टाकायचे. हे असे रोज केले तर उत्तम.

मेंदी लावल्यानंतर केस कोरडे होऊ नये म्हणून दुसर्‍या दिवशी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.

रुनीने सांगितलेलं मागे की संत्र्याची साल पाण्यात उकळून ते पाणी केस धुतल्यावर शेवटी केसांवर ओतायचं. सध्या इथे क्लेमेंटाईन्स खूप मिळताहेत तर त्याच्या साली उकळून हा प्रयोह स्वत:च्या अन लेकीच्या केसांवर केला. एकदम छान सुळसुळीत अन तजेलदार दिसताहेत केस.

बी, मेधा, रुनी धन्यवाद ... हे सगळे प्रयोग करणे मला जमण्यासारखे आहे.
आवळा पावडर लावताना केसात तेल नसलेले चांगले ना?

साधना, आवळा पावडर तेल नसतानाचं जास्त छान लागेल.

मिनोती, वावडींगचे पाणी प्यायला सांग नवर्‍याला.

मी लग्नाआधी बी म्हणतात तसे आवळ्याचा लेप केसांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावायचे. खरच खुप फरक जाणवतो. आता माझा मुलगा लहान असल्याने जमत नव्हते, पण आता निदान पंधरा दिवसातून तरी एकदा दोनदा करण्याचा विचार आहे.

मी आवळ्यापावडरबरोबर नागरमोथा, संत्र्याच्या सालींची पावडर, ब्राम्ही, माका पावडर, दही ,आणि अंड्याचा पांढरा बलक असे चांगले मिक्स करून केसांना लावायचे आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवावेत. मी माईल्ड शॅम्पू वापरायचे. शिवाय महिन्यातून एकदा तरी केसांना मेंदी असायचीच. Happy

मी माईल्ड शॅम्पू वापरायचे.
>>
बेबी शॅम्पु सगळ्यात बेश्टे. थंडीत डोक्याची त्वचा अज्जिबात कोरडी पडत नाही. फक्त एरवीपेक्षा थोडा जास्त घ्यावा लागतो इतकच.

लहान मुलींच्या केसाची काळजी कशी घ्यावी? माझी मुलगी साडेतीन वर्षाची आहे. तिचे केस अगदी पट्टीने आखल्यासारखे सरळसोट आणि चमकदार होते. फार लांब नाही पण ब्लंट कट म्हणता येतील इतपत. आता केस एक्दम निर्जिव झाल्यासारखे वाटतायत. चमक गेली आहे एकदम. इथल्या न्यु जर्सीतल्या पाण्याचा परिणाम आहे की काय कळत नाही.
आणि दुसरे म्हणजे तिला केस वाढवायची फार हौस आहे तर केसवाढीसाठी आणि परत पहिल्यासारखे केस होण्यासाठी काही घरगुती उपाय?

अंजली, मुलीचे केस आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा धुऊ नका. डव्ह सारखा माइल्ड शॅम्पू वापरा, कंडिशनर आवर्जून वापरा ( लोरिआलचे मुलांचे शॅम्पू असतात त्याने केस फार कोरडे अन रफ होतात .)
धुण्याच्या आदल्या दिवशी थोड्या कोमट तेलाने , हलक्या हाताने मसाज करा. बाहेर जाताना केसांवर टोपी / हूड असेल याकडे लक्ष द्या. थंडीच्या दिवसात वार्‍याने सुद्धा केस कोरडे पडतात.

फ्रुक्टिस किंवा पॅन्टीन चे लीव्ह इन कंडिशनर सुद्धा वापरु शकता. संत्री / क्लेमेंटाईन यांची साल कपभर पाण्यात उकळून त्या पाण्याने शेवटचे रिंस केल्याने पण फायदा होतो.

तिच्या जेवणात भरपूर फळे, पालेभाज्या, स्निग्ध पदार्थ असावेत याकडे लक्ष असू द्या.

जुई/बी, आवळ्याची पावडर मेंदीसारखी मुळापासुन टोकांना लावायची काय?

मला मेंदीसाठी नुपुरचे एक मोठे आणि एक लहान इतकी पावडर भिजवावी लागते. आवळा पावडरही तशीच लावायची आणि तीही दररोज तर विकत घेतानाच भरपुर घ्यावी लागेल.

मेधा, खूप खूप धन्यवाद मी लॉरिअलचाच वापरत होते लहान मुलांचा शॅम्पू मग तो बदलला आणि आताही लहान मुलांचाच आहे. हो, खाण्यात तिच्या फारशी फळे, पालेभाज्या येत नाहीत. संत्र्याच्या सालीचा पण उपाय करून पाहिन नक्की.

मि नविन सभासद आहे.

माझे केस खुप लाब आहेत पन खुप गळतात. अस वाटत जे आहेत ते तरि राहतात कि नाहि.
काहि उपाय आहे का?

बिअर कशि लावायचे केसाना....नारळाचे दुध हा उपाय खुप छान आहे...

.

भारतात मिळणारी dove किंवा तत्सम उत्पादने duplicate किंवा खराब दर्जाची असतात्.त्यामुळे आपण पैसे मोजले तरी माल चांगला असेलच नाही.एवढच काय रविवार पेठेत किंवा मेडिकल दुकानात जे शेहनाझ म्हणुन विकले जाते ते सुधदा बर्‍याचदा duplicate असते.
lux सारखे भारतीय उत्पादकही त्यांचा सर्वात दर्जेदार माल दुबइसारख्या देशात पाठवितात, भारतात ते जे विकतात ते second /third grade material असते.
त्यामुळे महागडी उत्पादने घ्यायचीच असतील तर ती बाहेरुन घ्या, भारतात cosmeticsसाठी quality check कुणीच करत नाही.किंवा सरळ घरगुती आयुर्वेदीक उपाय वापरणे चांगले.

.

जान्हवी, तुमच्या वरच्या प्रतिसादात 'संपादन' असा शब्द दिसतोय त्यावर क्लिक करून तुमची ती पोस्ट एडिट करू शकता.

मी कधिच केसांना डाय किंवा मेंदी लावली नव्हती. पण उर्जिता जैनचे ग्रेनिल वापरुन पाहिले. खूप छान रंग आला आणी केसांचे textureही सुधारले.

नमस्कार सर्वांना.. माझे केस तसे सिल्की आहेत (ब्लॅक सनसिल्क शाम्पू वापरत होते) पण खुप गळतात म्हणुन मी हर्बल शम्पू (ऑलीव्हीयाचा आमला-शिकाकाई) वापरायला सुरवात केली, चांगला वाटला केस नाही गळत आता पण या शाम्पुने केस रफ होतात,
पुर्वी मोकळे सोडल्यावर सरळरेषेत असणारे केस आता कोरडे होऊन स्वतंत्र भुरभुरत असतात, कोरडेपणा घालवण्यासाठी काही उपाय आहे का कोणाकडे?

केस उदवण्यासाठि जो धुर करतात त्यात नक्की काय काय टाकतात? आणि ह्याचे नक्कि काय फायदे होतात? केसाला फक्त छान वासच येतो कि अजुन काहि??

Pages