गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेश वाडकरांनी गायलेलं माझी आवडती गाणी ....

१. जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
२. काळ देहासी आला खाऊ
३. पाहिले नं मी तुला, तू मला न पाहिले

सुहास्य तुझे पं जितेंद्र अभिषेकींचे नाही ऐकले कुणी? ते ऐकल्यावर आनखी कुणाच्या आवाजात आणि गळ्यात नाही ऐकवत.>>>>>>>भरत नाही रे पं. अभिषेकींच्या आवाजात नाही ऐकले अजुन :(. सुरेशजींच्या गाण्यांचा चाहता असल्याने हे गाणे मला त्यांच्या आवाजात देखील आवडते. Happy
"सूरमयी शाम" या कार्यक्रमात त्यांनी गायलेली "केतकीच्या वनी तेथे नाचला ग मोर" आणि "सरणार कधी रण प्रभो तरी हे" हि दोन्ही अनुक्रमे सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांची गाणी तितकीच आवडली. Happy
रच्याकने, लिंक नाही रे मिळाली. Sad

धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद?
जरि जीव हो श्रान्त
नाही तृषा शान्त
जलशून्य आभास शोधीत मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध

पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद

मंगेश पाडगावकर - श्रीनिवास खळे - सुरेश वाडकर.

हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे आणि ज्योत्स्ना भोळे या मराठी नाट्यसंगीतातल्या आदिमाया म्हणायला पाहिजेत. या तीन कलाकारांनी गायनाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

त्यापैकी हिराबाई आणि ज्योत्स्ना भोळे, यांची बरीच गाणी उपलब्ध आहेत. गेल्या आठवड्यात सरस्वतीबाई राणे यांचे. "ललना मना नच घलव शंका" हे एकच प्याला मधले नाट्यगीत ईप्रसारण वर ऐकले.
या नाटकात शरद नावाचे स्त्री पात्र आहे. (सुधाकरची बहीण) या भुमिकेत गायिका नटी असेल तरच हे गाणे गायले जात असे. या पात्राचा एकच प्रवेश आणि एकच गाणे, त्यामुळे हे गाणे मग नाटकात नसेच.
रजनी जोशी यांच्या आवाजात या गीताची ध्वनिमुद्रिका आहे, पण सरस्वती बाईंचे गाणे अप्रतिम होते.
या गाण्याचा राग पण अत्यंत अनवट, गरुड ध्वनी.

सरस्वती बाई म्हणजे भीमपलास मधली, बिना मधुर मधुर कछु बोल हे समीकरणच आहे.

सरस्वतीबाईंची नात मीना फातरफेकर त्यांचा वारसा चालवताहेत.
अवांतर : सरगम(हिंदी - सी रामचंद्र) चित्रपटात त्यांनी लताबरोबर तिनक तिन तानी गायलंय.

मी आताच सरगम मधलेच जब दिल को सताए गम, छेड सखी सरगम ऐकत होतो.
मी पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी गायलेले संगीत सम्राट तानसेन मधले एक सुंदर गीत ऐकत होतो. ते म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे चे वडील. त्यांनी मराठीमधे काही गायलेले ऐकले नाही कधी. बाकि आवाज आणि गायकी दोन्ही सुंदर आहे.

http://ww.smashits.com/sangeet-samrat-tansen/toot-gayi-mere-man-ki-beena...
इथे ऐकता येईल ते गाणे. सोबत आहे पूर्णा सेठ. (गाणे हिंदी आहे पण गायक मराठी आहे.)

साधना , हे तुमचे गाणे. आत्ता आकाशवाणी-अस्मिता वर ऐकले. काही काही शब्द नीट ऐकू आले नाहीत.
चित्रपट : कधी करिशी लग्न माझे
डोळे असुनी डॊळे भरुनी तुला साजणा
बघायचे ना बघायचे ना मला साजणा

नटुनी थटुनी येत आज
कपोलात असे रे लाज
हसत तेही हसत तू ही परि मला हसायचे ना बघायचे ना

मीलनात गात गीत
आलिंगुनी तुजसी प्रीत
हसत तेही हसत तूही परि मला हसायचे ना बघायचे ना

अरे ग्रेट.. मला तर आता हळुहळू संशय यायला लागलेला की चित्रपटात जसे हिरविनिला स्वप्नात पुढचे आयुष्य दिसते तसे मलाही स्वप्नातच हा चित्रपट दिसलेला की काय??? प्रत्यक्ष असे काही नाहीच की काय??? Proud

भरत धन्यवाद अगदी मनापासुन.. योगेश साहेब, गाणे कुठे मिळते ते शोधाल का?? आकाशवाणीवर लागलेले म्हणजे कुठेतरी मिळायचे चान्सेस आहेत... मस्त गाणे आहे. आशाने गायलेय का?? मला तरी तसाच भास होतोय Happy

साधना त्यांना फर्माईश करुन पुन्हा ऐकता येईल. जर एफ एम वाहीनी असेल, तर आयपॉड वापरुन रेकॉर्ड करता येते.
साधारण अशीच शब्दकळा असलेले
थांबते मी रोज येथे, रे तूझ्यासाठी, असे पण आशाचे गाणे आहे.

दिनेश चांगली कल्पना आहे. माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड करायची व्यवस्था आहे पण तिथे mw लागणार नाही. १०७ वाल्यांना सांगते फर्माईश.. Happy

रन्ध्रात पेरिली मी अषाढ दर्द गाणी - जितेन्द्र अभिषेकी
केवळ अप्रतिम.

`दिस जातील , दिस येतील , भोग सरल, सुख येईल' - हे गाण मी पहिल्यांदा पाहिल, तेव्हा मला (ऑलरेडी) काहीतरी प्रचंड दु:ख झाल होत (आता आठ्वत सुद्धा नाही ! ) त्यामुळे हे गाणं मला फारच अपील झाल होत. पण अजुनही हे ऐकल की `आपल' वाटत.

संगीतः श्रीधर फडके
स्वरः अनुराधा पौडवाल आणि कोरस.
गीतः शिरीष गोपाळ देशपांडे.
यांचे आणखी एक गाणे
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
माहेरच्या क्षणांचा क्षणकाल भास झाला.

भरत, धिंगाणा वर अबोलीचे बोल हा अल्बम आहे. वारा लबाड आहे गाणे त्यातलेच. वरचेही गाणे मला त्यात सापडले. इतर गाणीही मस्त आहेत.

साधना ते अबोलीचे बोल या अल्बममधीलच गाणे आहे. Happy
"अबोलीचे बोल" या अल्बममधील इतर काही गाणी:

१. अबोलीचे बोल, तसे माझे दु:ख खोल खोल (स्वरः श्रीधर फडके)
२. दिवे देहास स्पर्शाचे जळाया लागले होते, तुझ्या बाहुत मी जेंव्हा ढळाया लागले होते (स्वरः श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल)
३. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती (स्वरः श्रीधर फडके)
४. मना घडवी संस्कार (पूर्वी दूरदर्शनवर "संस्कार" नावाची मालिका होती. त्याचेच शिर्षक गीत) (स्वरः श्रीधर फडके)
५. मनी वसे स्वप्नी दिसे एक अशी अनाम, अवचित ती अवतरली सलाम सलाम सलाम स्वरः श्रीधर फडके)
६. पहिल्या सरीचा ओला सुवास आला, माहेरच्या दिसांचा क्षणकाल भास झाला. स्वरः अनुराधा पौडवाल)
७. वारा लबाड आहे (स्वरः श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल)

श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल यांचा अजुन एक सुरेल आणि माझा आवडत्या अल्बमपैकी एक "फिटे अंधाराचे जाळे". (संगीत: श्रीधर फडके)

१. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश (श्रीधर फडके)
२. भरून भरून आभाळ आलय (अनुराधा पौडवाल व कोरस)
३. कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले (अनुराधा पौडवाल)
४. माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीने कधी कानोसा देऊन ऐकशील का रे (अनुराधा पौडवाल)
५. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा (श्रीधर फडके)
६. ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले (अनुराधा पौडवाल)
७. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला, पैशात भावनेचा व्यापार पाहिला (श्रीधर फडके)

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
हे चित्रपटगीत ना? आशा -सुधीर फडके यांच्या आवाजात -संङीत श्रीधर फडके - चि: लक्ष्मीची पावले. अल्बम मध्ये कुणी गायिलेय?
त्या कोवळ्या फुलंचा....अत्यंत आवडते.

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

चित्रपटातलेच आहे ते. मराठी एफेमवाल्यांच्या खास आवडीचे. आठवड्यातुन एकदातरी ऐकवतातच Sad
अल्बममधले मी तरी कधी ऐकले नाही. श्रीधरचा अल्बम असल्याने त्याने परत गायले असेल.

आज स्मिता पाटिलचा स्मृतीदिन. १०.१० च्या सखी मध्ये तिची गाणी लावलेली (ऑफिसात येतात एफेम बंद पडते Sad )

भरून भरून आभाळ आलय (अनुराधा पौडवाल व कोरस)

ह्याच्या कोरसमध्ये 'गडद निळे गडद निळे जलद भरुन आले' हे आहे ना?? मी पहिल्यांदा जेव्हा ऐकले तेव्हा जाम गोंधळले. म्हटले कोरस एक कविता गातोय आणि मेन बाई दुसरेच काहीतरी गातेय Happy

५०० प्रतिसादांचा टप्पा ओलांडला. Happy

श्रीधरचा अल्बम असल्याने त्याने परत गायले असेल.>>>>होय भरत, अल्बम मध्ये श्रीधर फडकेंनी गायले आहे.

कोरस एक कविता गातोय आणि मेन बाई दुसरेच काहीतरी गातेय>>>>साधना, Happy

साधना, दा म्हणतायत ते बरोबर आहे. ते गाणे बहुदा वेगळे आहे.
"भरून भरून आभाळ आलंय" (चित्रपट: लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव) पुन्हा ऐकले. Happy

भरून भरून आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा
माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा
भरून भरून आभाळ आलंय........

कोरस: तुला चिंचा बोरं देऊ का ही देऊ का ही गं, काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं
अनुराधा: पान पानाला सांगून जाई
कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा
भरून भरून आभाळ आलंय........

अनुराधा: भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
कोरस: सई साजणी साजणी साजणी
अनुराधा: कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा
भरून भरून आभाळ आलंय........

कोरसः बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं, तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं
अनुराधा: तट तटाला झोका देई
पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई? जाई की मोगरा?
भरून भरून आभाळ आलंय........

कोरसः टपटप टपटप..टपटप टपटप..
लप पोरी लप पोरी घरात लप
जप पोरी जप जीवाला जप
अनुराधा: राहू आत जाऊ, कुणी बाई सावरा
भरून भरून आभाळ आलंय........

थोडे विषयांतर!

मौसम मधले 'रुके रुके से कदम' माझे प्रचंड आवडते गाणे. गुलझारच्या शब्दांना तितकीच समर्थ चाल दिलीये मदनमोहननी. पण हेच गाणे लताचा मदनभय्या किती महान होता ते सांगते. कारण मूळ काव्य गुलझारने एका बंगाली सिनेमाकरता लिहिले होते. त्याचा अर्थ पण वेगळाच अपेक्षीत होता. गाण्याला चाल सलिलदांनी दिली होती आणि गायले होते मुबारक बेगमने! हे गाणे इथे बघता येईल -

http://www.youtube.com/watch?v=uK-M4uHOf5M

पण मदनमोहनने तेच शब्द वापरून निव्वळ संगिताच्या जोरावर तो अर्थ अमूलाग्र बदलून टाकला - इतका की तोच त्याचा अर्थ आहे असेच आपल्याला वाटावे. दुसर्‍या (आणि मूळ) अर्थाची सावलीही मौसममधल्या गाण्यावर जाणवत नाही.

गडद निळे बोरकरांचे मला माहित आहे. शाळेत शिकलेय ना ही कविता, त्यामुळे अर्थही माहित आहे Happy

हे शब्द कोरसला आणि मग मेन गाणे वेगळे असे एक गाणे आहे. त्या गाण्यातली दोन्ही गाणी बोरकरांचीच असावीत.

कोरस मध्ये गडद निळे मधल्या

गडद निळे गडद निळे जलद भरुन आले
शितल तनु चपलचरण अनिलगण निघाले

या दोनच ओळी आहेत. गाणे सुरू झाल्यावर ह्या बहुतेक परत रिपिट होत नाहीत. शेवटी परत येत असाव्यात. एफेमवाल्यांच्या खास आवडीचे असल्याने मी पावसाळ्यात आठवड्यातुन दोन-दोनदा ऐकलेले आहे. आता पावसाळा संपल्याने एफेमवाल्यांनी ती सिडी कवरमध्ये घालुन ठेवलीय. पुढच्यावर्षी काढतील परत. तोवर कोणाला सापडल्यास कळवावे ही विनंती Happy

रच्याकने, जैत रे जैत मध्ये एकाच गाण्यात दोन कविता असा प्रयोग केलेला असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. बहुतेक मी रात टाकली हे गाणे असावे. महानोर आणि आरती प्रभु या दोघांच्या कविता एकत्र करुन त्या गाण्यात होत्या. गाणे हेच असेल का ते नक्की माहित नाही, पण वाचलेले आठवतेय.

मंडळी नमस्ते !
मला सांगाल का ? कि आपली मराठी आवडती जुनी,गाणी नेटवर कुठल्या वेब साईटवर (फुकट) ऐकणं हे सगळ्यात जास्त चांगल म्हणता येईल
गाणी ऐकली की काही एक्स्ट्रा चार्जेस पडतात का ?

मी कधी कधी ग्लोबलमराठी वर गाणी ऐकतोय ...
खुप दिवसांनी सुरेश वाडकर आणि लतादिदींनी गायलेली 'प्रेमरोग' मधली गाणी ऐकली आणी पुन्हा एकदा त्यांच्या त्या जादुई आवाजांनी वेडा झालो, इतिहासात गेलो !
Happy

अनिल : www.cooltoad.com वर बरीच मराठी गाणी उपलब्ध आहे. Download करून घेता येतात. रिजिस्ट्रेशन फुकट आहे. डाऊनलोडिंगचा स्पीड पण चांगला आहे ............ Happy

अर्थात ही एक सोईस्कर पळवाट आहे. मी शक्यतो मराठी गाण्यांच्या सीडीज् विकत घेतो आणि त्या rip करून comp वर किंवा iphone वर store करून ऐकतो........ Happy

अरूण, "काळ देहासी आला खाऊ" हे मलाही आवडते. >>>>>>> हे गाणं प्रथम मी सारेगमप लिटिल् चॅम्प्स मध्ये ऐकलं होतं, तेंव्हाच आवडलं होतं. त्यानंतर मग ओरिजिनल गाण्याचा शोध घेतला.

Pages