गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका ठराविक कालखंडानंतर कान, डोळे सगळे मिटूनच घेतल्यासारखे झालेय.

अगदी अगदी.... सध्याचे काहीच पाहावत आणि ऐकवत नाही Sad आणि वर अत्याचार म्हणजे ज्यांच्यात एखाद्या गोष्टीचे अजिबात टॅलेंट नाही त्याची त्याचे लोक त्याच्यात नेमके त्याच गोष्टीचे टॅलेंट ओसंडुन वाहतेय म्हणुन तोंड फाटेस्तो कौतुक करतात (ह्यातला बराचसा भाग अहो रुपम अहो ध्वनी: हाच असतो Happy )

मी अनुराधाची खुप मोठी फॅन आहे असेही नाही. मला तिचा आवाज आवडतो. लता-आशाची नक्कल करायचा प्रयत्न करणा-या मंडळींच्या गर्दीत तिचा वेगळा आवाज उठुन दिसायचा. >>>>>साधनाशी सहमत.
मी सुद्धा अनुराधा पौडवाल यांचा फॅन नाही, पण मला त्यांची काही गाणी खुप आवडतात. अजुनही माझ्या प्लेलिस्ट्मध्ये त्यांची गाणी असतात. Happy
मान्य आहे कि इतर गायिकांचे श्रेय अनुराधा पौडवाल यांनी घेतले असेल, पण त्यांनी गायलेली (ओरीजनल), "सजणा कशासी अबोला, रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली, बेभान या रात्री बेबंध झाले रे, डोळ्यावरून माझ्या उतरून रात गेली, कुहु कुहु येई साद उधळीत मनी वनतुषार, का हासला किनारा पाहुन धुंद लाट, माझ्या मातीचे गायन, कुण्या देशीचे पाखरू, रसिका मी कैसी गाऊ गीत, भले बुरे जे घडुन गेले, अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने, ओलेत्या पानात सोनिया उन्हात, बंदिनी स्त्री हि, मी वार्‍याच्या वेगाने आले, प्रिया आज आले मैफिलीत माझ्या, चंद्र वाटेवरी एकटा चालतो, मी अशी हि बांधलेली" हि आणि अजुन अशी बरीच गाणी विसरता नाही येणार. (अर्थात हे माझे मत :)).

रच्याकने,
@साधना, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती या तिघींनी "बटवारा" या चित्रपटात "तेरे वास्ते रे सजन नैन मेरे जागे रे, सारी सारी रैन जागे, तु मेरा कौन लागे" हे गाणं एकत्र गायले आहे. (चित्रपटात, डिंपल कापडीया, पूनम ढिल्लो आणि अमृता सिंग).

मी खूपदा विचार करतो, कि नेमकं काय बिनसलय किंवा मला न आवडण्याची कारणे काय ?
तर मला वाटते ते असे.

१) कविता किंवा काव्य सुंदर नाही, असे नाही. अजूनही दर्जेदार कविता लिहिल्या जाताहेत.

२) गायनाची पद्धत मात्र बदललीय. मोकळा आवाज नसतो आणि गाणे सहज नसते. अनेकदा बाल कलाकार विचित्र रितीने गळ्यांच्या शिरा ताणून गाताना दिसतात. अशा गायनाचा पुढे त्रास होण्याचीच जास्त शक्यता आहे.

३) वाद्यसंगीत. मला वाद्यसंगीताचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. इतकी वाद्ये आणि इतक्या जोरात का वाजवली जातात ते मला कळत नाही. गाण्यात ती गायक कलाकारांवर कुरघोडी करताहेत असे वाटत राहते, आणि मग त्यानंतर गायक कलाकार त्या वाद्यकल्लोळाशी स्पर्धा केल्यासारखा गात राहतो. गाण्यात ताल जोरकस हवा, हे खरेय पण गायकाशी स्पर्धा नको. वादन जर खरेच चांगले असेल, तर त्यासाठी खास जागा निर्माण करता येतात. (चांदणे शिंपित जाशी मधला जलतरंग, गणराज रंगी नाचतो मधला मृदुंग, रेशमाच्या रेघांनी मधली ढोलकी ) पण गायकाचे गायन सुरु असता मात्र, वाद्याने साथसंगतच करावी असे वाटते. सध्याच्या गाण्यात, तालात काही वेगळेपण असेल, तर ते प्रकर्षाने जाणवत नाही.
पुर्वी वसंत देसाई, सी रामचंद्र पण तालबहाद्दूर होते. त्यांनी नवनवीन तालवाद्ये पण आणली. (उदा म्हणून कैसी ये मुहोब्बत की सजा हे लताचे झनक झनक पायल बाजे मधले गाणे ऐकून बघा, आणि सी रामचंद्रांनी केहरवा मधे बांधलेले, देख हमे आवाज ना देना, हे जून्या अमरदीप मधले गाणे ऐका.) पण कधी त्यांच्या रचनेत, गायकांवर कुरघोडी केली नाही.

४) मेहनत कमी पडतेय. एखादे गाणे यशस्वी झाले तर त्याच्या कार्बन कॉप्याच काढल्या जातात. गणपतीच्या दिवसात, किती सिडीज येतात बाजारात ? आणि त्यातल्या किती लक्षात राहतात ?
स्वतःहून काहि वेगळे प्रयोग केल्याचे दिसत नाही. अशी मेहनत ऋतू हिरवा च्या वेळी घेतली होती, म्हणून ती गाणी थेट मनात जाऊन बसली. गायक कलाकारही आपल्या आवाजावर मेहनत घेताना दिसत नाहीत. कधी एकदा सीडी बाजारात येतेय, अशी घाई असते.

५) अति जाहिरातीमूळे कमी दर्जाची गाणी पुढे येतात, आणि उत्तम दर्जाची मागे पडतात. आपल्या जयश्री अंबासकरच्या एका सिडीच्या प्रकाशन सोहळ्यात, वैशाली सामंत म्हणाली होती. की माझ्याकडे जी गाणी येतात, ती मी गाते. माझ्यापरीने उत्तम गाते, पण कुठली गाणी यशस्वी करायची ते सर्वस्वी तूमच्या हातात आहे.

६) हे चांगले का वाईट ते माहीत नाही, पण काहि काळापासून मी बघतोय, कि लांब पल्ल्यांचे चालक, काही खास प्रकारची गोंगाटी गाणी पसंत करत आहेत. गाड्या चालवताना झोप येऊ नये, एवढीच माफक अपेक्षा असते त्यांची. आणि या प्रकारात, या प्रकारच्या गाण्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय.

विषयांतर झाले का ? पण निदान माझ्या मनात नवीन गाणी न घुसण्याची हि कारणे आहेत.

धन्यवाद दिनेशदा .... पण youtube वरून तर download करन सोप्पं आहे मग हे गाण का download नै होणार ...

दिनेश तुमच्याशी पुर्णपणे सहमत.

टिवीवर नौशाद वगैरे मंडळी कायम जुन्या गाण्यात 'मेलडी' असते असे म्हणत. हा मेलडी प्रकार काय हे मला नेमके कळायचे नाही. गेल्या १०-१२ वर्षांत मात्र मला मेलडी हा प्रकार काय असतो हे हळूहळू कळायला लागले Happy हल्लीच्या गाण्यामध्ये ही मेलडीच नेमकी हरवली आहे. गायकाच्या आवाजाच्या वरताण वाद्यमेळाचा आवाज हे जे तुम्ही लिहिलेत ते अगदी खरे आहे. मुळात गायकाच्या आवाजातच ती ताकद राहिली नाही. म्हणजे तसे आवाज आता बनत नाहीत असे नाही तर मुळ आवाजावर चुकीचे संस्कार घडताहेत.

चांगल्या आवाजाचे आणि रियाजाचे गायक आजही आहेत, चांगले कवीही आज आहेत. सुश्राव्य संगीत देणारे काही संगितकारही आहेत्च की.. पण चांगले गीत, त्याला तितकेच साजेसे असे संगित आणि गाणारा ताकदीचा गायक असे मिळुन जे रसायन बनायचे ज्याला मेलडी म्हणायचे तेच आता नाहीसे झालेय Sad

टिना, यू ट्युब वरुन व्हीडिओ डाऊनलोड करायला एक वेगळे सॉफ्टवेअर वापरावे लागते, ते असेल तर प्रश्नच नाही.

साधना,
हा मुद्दा आणखी स्पष्ट करायला मला एक गाणे सापडले.
आपला मुद्दा असा आहे कि तालाच्या बरोबरीने आवाजाचा लगाव असला तर गाणे खुलून जाते.
ताल आणि स्वर यांचा एकमेळ ध्रुपद गायकीत असे. त्यात आलापांना स्थान नव्हते. धुपदाच्या दमदार ठेक्यावर ते ते स्वर नेमके लावावे लागत. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीचे हे गायन असे. ते गायला फार अवघड असल्याने, ते गायन मागे पडले आणि थोडेसे विचारांचे स्वातंत्र्य असणारे, खयाल गायन पुढे आले.

मराठीतले ध्रुपद गायनाचे उदाहरण मला आठवत नाही. (नाही म्हणायला सखी मीरा, या एकपात्री नाटकात, किर्ती शिलेदार ध्रुपद गात असे. पण त्या नाटकाचे फारसे प्रयोगच झाले नाहीत.)

हिंदीत सप्तसूरन तीनक्राम हे एक सुंदर ध्रुपद आहे. ही रचना खुद्द तानसेनाची आहे, आणि ती सैगल, मन्ना डे आणि लता यांनी स्वतंत्रपणे गायली आहे.

इथे एक वेगळे उदाहरण देतो. हे पण संगीत सम्राट तानसेन या चित्रपटातीलच गाणे आहे. सुध बिसर गयी आज, असे शब्द आहेत. मन्ना डे आणि रफिंनी गायलेय. रफिनी बहुदा हेतूपुर्वक खालची पट्टी वापरलीय.
यातल्या तालाच्या दमदार ठेक्यावर एकेक सूर कसा कोंदणातल्या हिर्‍यासारखा बसवलाय. इतके शास्त्रोक्त गाणे असून, भावदर्शनात कुठेही उणीव नाही.
हे गाणे इथे बघता येईल, अवश्य बघा..

http://www.youtube.com/watch?v=N3NwQlXcMH0

हो माधव, ती द्रुत चीज ( आज मोरी सुध बिसर गयी ) आहे माझ्याकडे. पण तो खयाल आहे आणि हे ध्रुपद आहे.

"सुरेश वाडकर" माझ्या आवडत्या गायकांपैकी एक.
सुरेशजींनी गायलेले "जे मनात तुझिया, तेच माझिया मनात असुनी, बोलल्याविना ह्रदयामधुनी गेले निघुनी" हे माझे आवडते गाणे. पूर्वी दूरदर्शनच्या मराठी चॅनेलवर "अजिंक्य देव आणि निवेदिता जोशींवर चित्रित (बोटीत बसलेले) हे गाणे नेहमी दाखवायचे. प्रविण दवणेसाहेबांनी लिहिलेल्या या गीताला संगीत बहुदा अशोक पत्की यांनी दिले आहे. हे गाणे खुप शोधले पण नाही मिळाले. आंतरजालावरील एका मित्राने हे गाणे पाठवले, पण ते अर्धेच आहे :(. कुणाकडे असल्यास प्लीज प्लीज सांगा किंवा सीडी/कॅसेटचे नाव कळवा.

शुक्रवारी ऑफिसमधुन घरी जाताना ठिकठिकाणी लावलेले बोर्ड वाचले आणि मन सुन्न झाले. लोकशाहिर विठ्ठल उमप यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन :(.
लोकसंगीताचा झेंडा अटकेपार नेणार्‍या विठ्ठल उमप यांच्या जाण्याने लोकसंगीतात कधीही न भरणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आमच्या कन्नमवार नगरात (विक्रोळी) संगीतकार/गायक कै. श्री. विठ्ठल उमप, संगीतकार/गायक कै. श्री. विठ्ठल शिंदे (येऊ कशी तशी मी नांदायला, नित्यवाचे प्रभूनाम, खेळताना रंग बाई होळीचा, जवा नविन पोपट हा, इ. गाणी), गायिका शकुंतला जाधव ("बाबू टांगेवाला माझ्या जिवाचा मैतर झाला" आणि इतर लोकगीते), नाटककार श्री. प्रेमानंद गज्वी (गांधी विरूद्ध गांधी), जनार्दन लवंगारे, चित्रपट कलाकार संजय नार्वेकर, इ. अनेक मान्यवर होऊन गेले/आहेत.

शाळेत असताना कै. श्री. विठ्ठल शिंदे यांच्याकडुन गायनाचे काही धडेहि मिळाले (काहि काळ ते आमच्य शाळेत गायनाचे शिक्षक होते) याचा अभिमान वाटतो.

मित्राच्या घरी जाताना कै. श्री. विठ्ठल उमप (त्याच बिल्डिंगमध्येच कै. श्री. विठ्ठल उमप यांचे तळमजल्यावर घर होते) यांचे कधी कधी दर्शन व्हायचे, घरात मांडुन ठेवलेल्या पुरस्कारांकडे लक्ष जायचे. आपल्या कार्याचा जराही गर्व न बाळगणारा हा लोकशाहिर आज आपल्यात नाही हे खरंच वाट नाहीयं :(.

अशा या लोकशाहिराला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

ब-याच वर्षांपुर्वी जयश्री गडकरचा एक मराठी चित्रपट टिवीवर पाहिलेला, नाव आठवत नाही. त्यात

डोळे असुनी डोळे भरुनी तुला साजना
पहायचे ना पहायचे ना मला साजना

असे काहीतरी गाणे होते. आता नक्की हेच बोल की मला तेव्हा असे ऐकु आलेले देव जाणे Happy . चित्रपटाचे नाव कदाचित आंधळी कोशिंबीर किंवा तत्सम काही असेल. कोणाला आठवतेय का काही??

गोविंदा रे गोपाळा, असा पण एक संच होता, त्यात छोटा गंधर्व, सुरेश हळदणकर, आशा, उषा, माणिक वर्मा, कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल अशा अनेक कलाकारांनी गायलेली कृष्णाची गाणी होती.
हे सगळे कॅसेटच्या जमान्यातले. यांच्या सिडीज निघाल्या का, त्याची कल्पना नाही.>>>>>दा, हि गाणी आहे माझ्या संग्रहात Happy
हे दोन्ही संच म्हणजे संगीतप्रेमींसाठी मेजवानीच आहे.
हि लिस्ट माबोकरांसाठी Happy

संच १

१. उठ मुकुंदा, उठ श्रीधरा (स्वरः अनुराधा पौडवाल)
२. नंदाघरी नंदनवन फुलले (स्वरः सुमन कल्याणपूर)
३. म्हणे यशोदा माझा कान्हा, म्हणे देवकी माझा तान्हा (स्वरः आशा भोसले)
४. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एक पायानी लंगडा (स्वरः छोटा गंधर्व)
५. पैंजण हरीची वाजली (स्वरः माणिक वर्मा)
६. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला (स्वरः मन्ना डे)
७. कान्हा तुझे घोंगडी (स्वरः छोटा गंधर्व)
८. लुटुलुटु धावत, खुदुखुदु हासत हरी आला गं माझ्या अंगणी (स्वरः सुमन कल्याणपूर)
९. तव भगिनीचा धावा ऐकुन, धाव घेई गोपाला, लाज राख नंदलाला (स्वरः माणिक वर्मा)
१०. नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरूनी आनंद (स्वरः आशा भोसले)
११. हरी भोवती नित्य नाचतो भक्तांचा मेळा, हरी भक्तीचा भुकेला (स्वरः माणिक वर्मा)
१२. गोविंद गोविंद मना लागलिया छंद (स्वरः छोटा गंधर्व)
१३. मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम एकदा दर्शन दे घनश्याम (स्वरः सुमन कल्याणपूर)
१४. चरणी तुझिया मज देई वाट हरी (स्वरः माणिक वर्मा)
१५. मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण चरणी तुझिया मज देई वाट हरी (स्वरः कृष्णा कल्ले)
१६. गोविंदा रे गोपाळा (स्वरः सुरेश हळदणकर)
१७. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता (स्वरः पं उदयराज गोडबोले)

संच २
१. काम धाम संसार विसरली, हरी भजनी रंगली राधिका (स्वरः सुमन कल्याणपूर)
२. हसुनी एकदा मला मुकुंदा (स्वरः आशा भोसले)
३. श्यामसुंदरासवे रंगली राधा गोकुळची (स्वरः माणिक वर्मा)
४. बोले स्वर बासरीचा राधेला छंद तुझा (स्वरः स्नेहल जोशी)
५. रंगला रे हरी यमुना किनारी (स्वरः महेन्द्र कपूर)
६. नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहानभूक हरली (स्वरः सुरेश हळदणकर)
७. सावरे शाम श्रीहरी, मी झाले तुजवीण बावरी (स्वरः ???)
८. तु माझा कैवारी, अरे अरे श्रीहरी तु माझा कैवारी (स्वरः उषा मंगेशकर)
९. ह्याचे हातीचा वेणु कुणी घ्या गं (स्वरः ???)
१०. पदी घुंगुर माझ्या वाजती रे (स्वरः आशा भोसले)
११. मजवरी माधव रुसला बाई (स्वरः आशा भोसले ??)
१२. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी ग कान्हा (स्वरः आशा भोसले)
१३. राधिकेचा रंग पाहुनी कृष्ण दंग जाहला (स्वरः ???)
१४. दह्या दुध्याची करतो चोरी, नंदाचा हरी, गवळींनो जाऊ नका बाजारी (स्वरः सुरेश हळदणकर)
१५. तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे (स्वरः माणिक वर्मा)
१६. सलील श्याम सुंदरा (स्वरः ???)
१७. कशी रे आता जाऊ घरी, सांग मला श्रीहरी (स्वरः कृष्णा कल्ले).

दिनेशदा खालील गाण्यांसाठी स्वर कुणाचा आहे ते सांगा ना. Happy

७. सावरे शाम श्रीहरी, मी झाले तुजवीण बावरी (स्वरः ???)
९. ह्याचे हातीचा वेणु कुणी घ्या गं (स्वरः ???)
११. मजवरी माधव रुसला बाई (स्वरः आशा भोसले ??)
१३. राधिकेचा रंग पाहुनी कृष्ण दंग जाहला (स्वरः ???)
१६. सलील श्याम सुंदरा (स्वरः ???)

हे गाणे कोणाला माहिती आहे का?
'तुला मानिला देव मी प्राण माझा अशी एक पन्चारती वाहू दे
तुझे बोल हिन्दोळत्या आसवान्चे मला गाउ दे रे मला गाउ दे'
लहानपणी ऐकले होते, चाल खूप छान आहे पण नन्तर कुठे सापडले नाही. गायिका कोण ते ही माहीत नाही.

मजवरी माधव रुसला, आशाचेच.
राधिकेचा रंग पाहुनी, हे कुणी भजनी कलावंताने गायलेले होते. अमोल आणि चित्रा पालेकरच्या, आक्रित सिनेमातले ते गाणे. अमोल पालेकरने त्यात मुर्कुटराव अशी खतरनाक भुमिका केली होती. तो सिनेमा प्रौढांसाठी होता त्यामूळे बघायचा राहिलाच, तो महाराष्ट्रातील एका हत्याकांडावर आधारीत होता.
ह्याचे हातीचा वेणू कुणी घ्या गं, पण अशाच भजनी मंडळाचे आहे बहुतेक चाल आठवतेय पण कलाकार नाही.
सलील शाम सुंदराची पण चाल आठवतेय, आता सगळी गाणी मिळाली म्हणा !!

९. ह्याचे हातीचा वेणु कुणी घ्या गं >> वीणा भक्ती मंडळ
१६. सलील श्याम सुंदरा >> ज्योत्स्ना हर्डीकर

माझ्याकडच्या अल्बममधली गाणी वेगळी आहेत थोडी.

तो सिनेमा प्रौढांसाठी होता त्यामूळे बघायचा राहिलाच
आता बघायला हरकत नाही Happy

सर्वसाक्षी हा चित्रपट मानवत हत्याकांडावर आधारीत होता वाटते. मी तो टिवीवर पाहिलेला. स्मिता आणि जयराम हर्डीकर.. दोघेही आज नाहीत Sad आक्रितबद्दलही ऐकलेले पण आता नीटसे आठवत नाही.

कोणीतरी माझा प्रश्नही वाचा आणि असल्यास उत्तर द्या Happy

कोणीतरी माझा प्रश्नही वाचा आणि असल्यास उत्तर द्या>>>>साधना, नाही माहित हे गाणे Sad

सर्वसाक्षी हा चित्रपट मानवत हत्याकांडावर आधारीत होता वाटते. मी तो टिवीवर पाहिलेला. स्मिता आणि जयराम हर्डीकर.. दोघेही आज नाहीत >>>>>>माझ्याकडे आहे या चित्रपटाची सीडी. खास आशा भोसले यांच्या "बांधले मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले....शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले" या गाण्यासाठी घेतली होती. Happy (संगीत: भास्कर चंदावरकर आणि कथा, दिग्दर्शकः रामदास फुटाणे). या चित्रपटात जयराम हर्डीकर यांची नायिका अंजली पैंगणकर होती.
याच चित्रपटात उषा मंगेशकर यांचे "डोळ्यात वाकुन बघतोस काय, जाल्यात मासोली घावाची न्हाय" हे आणि रविंद्र साठे यांचे "बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला" हि गाणी देखील आहेत. Happy

भरत, दिनेशदा, माधव माहितीबद्दल धन्स Happy

भरत "सलील श्याम सुंदर" ज्योत्स्ना हर्डीकरच Happy

माझ्याकडच्या अल्बममधली गाणी वेगळी आहेत थोडी>>>>>माधव, जेंव्हा वेळ असेल तेंव्हा ती गाणी येथे अपडेट करा ना, Happy

साधना, नाही माहित हे गाणे

हाय राम.. मला त्याची चालही माहित आहे. इतक्या वर्षात कुठेही ते गाणे ऐकले नाही. बहुतेक आशाने गायलेय. चित्रपटही सुंदर होता, विनोदी अंगाने जाणारा...

मला वाटतं आक्रीत मानवत हत्याकांडावर आधारित होता- मूल होण्यासाठी नरबळी.
यात पण एक गाणे होते - वर वर पाहिले तर कृष्णाचे पण खरे कृष्णकृत्यांबद्दल.
नंदाचा कान्हा गोकुळी पहाना...असे काहीसे शब्द होते.
बांधले मी बांधले - शब्द इंदिरा संत
डोल्यात वाकून- शान्ताबाई.
बंद ओठांनी निघाला पेटलेला 'एकला' असणार.

बंद ओठांनी निघाला पेटलेला 'एकला' असणार.>>>>धन्स भरत, ते गाणे "एकला" असेच आहे.
"बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला, दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा"

मला वाटतं आक्रीत मानवत हत्याकांडावर आधारित होता- मूल होण्यासाठी नरबळी.>>>सर्वसाक्षी हा मानवी हत्याकांडावर आधारित होता- मूल होण्यासाठी नरबळी.

आणि रविंद्र साठे यांचेच "हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा...." हे गाणे "आक्रीत" मधले आहे.

बहुतेक आक्रित आणि सर्वसाक्षीचा विषय सारखाच होता. पण सर्वसाक्षीमध्ये तो जरा बाजुने आलेला. अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा डॉक्टर आणि त्याच अंधश्रद्धेला बळी गेलेली त्याची बायको हा विषय तिथे होता. तिथेही त्याच्यावर मुल होण्यासाठी बळी द्यायला मदत केली हा आरोप येतो, पण प्रत्यक्ष बळी देणे, असे देणारे आणि त्यांना मदत करणार यांची मानसिकता याकडे चित्रपट फारसा जात नाही. शिवाय स्मिताचे उपकथानकही आहे त्यात. आता फारसे आठवत नाही, पण तिचा नवरा नसतो, गावात ती शिक्षिका वगैरे काहीतरी असते आणि जयरामच्या बायकोला धीर द्यायचे काम ती करते.

आक्रित मी पाहिला नाहीये पण मुल किंवा धनप्राप्तीसाठी नरबळी देणारे लोक आणि मांत्रिक यांच्या मानसिकतेवर तो चित्रपट आहे. आक्रित मानवत हत्याकांडाच्या फार जवळ जाणारा आहे, सर्वसाक्षी मध्ये हत्याकांड एवढे प्रभावाने येत नाही. आक्रितची पोस्टर्स अजुनही मला आठवताहेत. अमोल पालेकरचा एकदम टाईट क्लोजप आणि त्यात त्याच्या चेह-यावर भयाण क्रूर भाव .....

म्हणून तर आक्रित अजून बघवणार नाही मला. चित्रा पालेकरचे मोठा लालभडक टिळा लावलेले चित्र पण असायचे त्या पोष्टरवर.
आता देवगाणी या अल्बमचा शोध घ्या रे. तो पण एक खजिनाच आहे.

Pages