गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पं. भीमसेन जोशींच्या आवाजात सखि मंद झाल्या तारका इथे ऐका.
http://www.esnips.com/doc/ed231fc8-72e7-4b9b-976f-3d785b7f10b1/Sakhi-Man...

दिनेशदा,
ते परवाचे स्वप्निल बांदोडकरचे गाणे- दीनबंधू तु गोपाला रे (हंसध्वनीत आहे असं मला वाटलं होतं,
पण नंतर नंतर बराच यमन वाटतोय.)
http://www.4shared.com/audio/A4vW1qNi/Deenbandhu_Tu_Gopala.htm

- चैतन्य.

रच्याकने, काल कुंदा बोकील यांच्या आवाजातील "निळा सावळा नाथ जशी हि निळी सावळी रात..." हे सुंदर गाणे ऐकले. संगीत (बहुतेक) यशवंत देवांचे आहे,

पं. भीमसेन जोशींच्या आवाजात सखि मंद झाल्या तारका इथे ऐका.
http://www.esnips.com/doc/ed231fc8-72e7-4b9b-976f-3d785b7f10b1/Sakhi-Man...

दिनेशदा,
ते परवाचे स्वप्निल बांदोडकरचे गाणे- दीनबंधू तु गोपाला रे (हंसध्वनीत आहे असं मला वाटलं होतं,
पण नंतर नंतर बराच यमन वाटतोय.)
http://www.4shared.com/audio/A4vW1qNi/Deenbandhu_Tu_Gopala.htm

- चैतन्य.

मज सुचले गं सुचले मंजुळ गाणे
आशा- दत्ता डावजेकर
माझं अत्यंत आवडतं गाणं.
http://www.hummaa.com/music/song/Maj+Suchale+Ga+Manjul+Gaane/129353#

सैनिक हो तुमच्यासाठी हे सुद्धा या जोडीचे आणखी एक गाणे.

संगीत श्रीनिवास खळे >>>>>>भरत, धन्स रे माहितीकरता. Happy

रच्याकने, "ती मी नव्हेच" या चित्रपटात "शारदा" यांनी एक गाणे गायले आहे ना? कुणाला गाण्याचे बोल आठवत असेल तर सांगा. याच चित्रपटातील "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट....सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट" हे गाणे पण आहे ना?

आकाशवाणीवर 'खंडाळ्याचो घाट'साठी गायकस्वर शारदा असं सांगतात!

श्रीनिवास खळे यांनी लता आशा सुमन उषा शिवाय अन्य गायिकांकडून गाऊन घेतलेली भावगीते :
लाजर्‍या कळीला भ्रमर सांगतो काही, शोधू नको मना रे तू अर्थ जीवनाचा, वादळाचा वेग घेउन चांदणे मी प्यायले, जाहले धुंडुनिया गोकूळ : डॉ अपर्णा मयेकर
तू अबोल होउन जवळी मजला घ्यावे, रामप्रहरी रामगाथा, अशी नजर घातकी बाई ग्(लावणी) - कृष्णा कल्ले
हा मदिर भोवताल, येउनी स्वप्नात माझ्या तु सख्या जाऊ नको रे, आला पाउस मातीच्या वासात ग - पुष्पा पागधरे
-------
देवाघरच्या फुला - अरुण दाते हे सोबती या चित्रपटासाठी. अरुण दाते यांनी (आणखी) चित्रपटगीते गायलीत का?

आकाशवाणीवर 'खंडाळ्याचो घाट'साठी गायकस्वर शारदा असं सांगतात!>>>>>भरत, अजुन एक गाणे आहे फक्त शारदाच्याच आवाजात. "खंडाळ्याचो घाट" जयवंत कुळकर्णी, शारदा आणि कोरस यांच्या आवाजात आहे.
I am not sure कि ते "ती मी नव्हेच" या चित्रपटातीलच आहे, कदाचित दुसर्‍या एखाद्या चित्रपटातीलही असावे. गाण्याचे बोल आता आठवत नाहीये Sad

खंडाळ्याचा घाट मध्ये जयवंत कुलकर्णी आणि कोरस ऐकू येतात. शारदाबाईंनी काय गायलंय त्यात? गाडीच्या इंजिनाचा आवाज दिलाय का?
शिरीष कणेकरांमुळे मला शारदागीतांची भीती वाटते!

हे मिळालं.
http://www.in.com/music/tee-mee-navhech/songs-60509.html
बाईंचा आवाज कन्फर्म करण्यापुरतं ऐकलं.
तेवढं हिंदीत आहे. पुढे मराठीत नसेल तर बरं.

इथे सगळी मिळाली
शारदा - २ मराठी १ हिंदी.
यातलं राया असं पाहु नका डोळ्यात ऐकलं होतं आधी
http://www.muzigle.com/#!album/tee-mee-navhech

ही लिंक का होत नाही?
अ‍ॅड्रेस बारमध्ये कॉपी पेस्ट करून चालतंय पण.

खंडाळ्याचा घाट मध्ये जयवंत कुलकर्णी आणि कोरस ऐकू येतात.>>>>>अगदी अगदी

शारदाबाईंनी काय गायलंय त्यात? गाडीच्या इंजिनाचा आवाज दिलाय का?>>>>:फिदी:

ते पहिलं गाणं आता घरी जाऊन ऐकतो.:-)

रच्याकने, कुणाकडे पुष्पा पागधरे यांचे "नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली" हे गाणे आहे का?
किंवा कुठल्या अल्बमध्ये किंवा ऑनलाईन कुठे ऐकता येईल का ते प्लीज सांगा. Happy

नको नको रे पावसा : पुष्पा पागधरे?
ती इंदिरा संत यांची कविता आहे. म्हणजे गायिका पद्मजा फेणाणी असेल(?)

नको नको रे पावसा : पुष्पा पागधरे?
ती इंदिरा संत यांची कविता आहे.>>>>>हो भरत, इंदिरा संत यांचीच कविता, मी खुप आधी एकदा ऐकलेले. तो आवाज नक्कीच पद्मजा फेणाणी यांचा नव्हता.

इथे सगळी मिळाली
शारदा - २ मराठी १ हिंदी.
यातलं राया असं पाहु नका डोळ्यात ऐकलं होतं आधी
http://www.muzigle.com/#!album/tee-mee-navhech>>>>>>भरत, याच लिंकमध्ये ते गाणं आहे जे मी विचारत होतो Happy

गाण्याचे बोल "कशी मी सांगु राजा, जगाचा रिवाज" Happy

तु दिलेल्या लिंकमध्ये एकुन ३ मराठी आणि १ हिंदी गाण आहे. Happy
रच्याकने, यात संगीतकार "सुरज" असे दिले आहे. यांच्या बद्दल काहि माहिती???

या शारदाने हिंदीत आणि मराठितही धुमाकूळ घातला होता. रायास पाहू नका डोळ्यात (?) अशी एक लावणी पण गायली हहोती.
ज्योत्स्ना भोळे यांनी एक नाटक पण लिहिले होते. संगीत आराधना या नावाने अशी अनोखी माहीती आणि त्यांच्या शास्त्रीय गायनाचे दुर्मिळ रेकॉर्डींग इप्रसारण वर ऐकता येईल. (नाट्य पराग मधे )
तसेच हार्मोनियम वर तिलंग देस हा जोड राग ऐकता येईल. हे वादन अत्यंत खास आहे, या शैलीतले वादन मी आधी कधीही ऐकले नव्हते, यात काय ते समजा.

या शारदाने हिंदीत आणि मराठितही धुमाकूळ घातला होता.>>>>>> Proud

शारदाबाईंनी काय गायलंय त्यात? गाडीच्या इंजिनाचा आवाज दिलाय का?>>>>>>>>भरत, आता हेच गाण आणि त्यातल्या "इंजिनाचा" आवाज ऐकतोय. Proud

अरे ते 'कशी मी सांगू राया, जगाचा रिवाज, दुनिया चाले उलटी खर्‍याचे नाही राज' हे गाणे आहे का? ते मला पण हवय. खूप लहानपणी ऐकले होते आणि का कोण जाणे आवडून गेले होते. शारदाने गायलय हे नव्हते माहित तेंव्हा! बाकी शारदा म्हटले की मला 'तितली उडी'च आठवते.

बघतो घरी गेल्यावर ती लिंक!

योगेश HMV ची www.hamaracd.com ही एक साईट आहे. तेथे बरीच गाणी आहेत. त्यात बघ आहे का तुला हवे असलेले गाणे. त्यावरून गाणी निवडून CD रेकॉर्ड करून घेता येते.

शारदाचे बक्कम्मा बक्कम्मा बक्कम्मा यंकन कोतोरा, ऐकलय का ?>>>>>मी पहिल्यांदाच ऐकतोय या गाण्याबद्दल Happy

रच्याकने, "चले जाना जरा ठहरो....." हे देखील शारदाचेच आहे ना?

हो दिनेश ऐकलय. आता निट आठवत नाहिये पण ते duet आहे ना?

शारदाचा आवाज आवडत नसला तरी शंकरने तिला अनेक चांगली गाणी दिली आणि त्याच्या संगितामुळे ती लक्षात रहातातच आणि मग अपरिहार्यपणे तिचा तो गेंगाणा आवाजही!

रच्याकने 'तितली उडी आशाने गायले असते तर?' असे मला कायम वाटत रहाते.

योगेश, हिंदी गाणे आहे ते. मजेशीर आहे. मेहमूदचा पण आवाज होता त्यात.
तूम्हा लोकांच्या दूर्गभ्रमणाचे लेख वाचले कि मला हमखास, आशाचे, देश हा देव असे माझा, ते तडफदार गाणे आठवते. त्यावरचा उमाचा अभिनय पण (धन्य ते संताजी धनाजी )

उमा मल्हारी मार्तंड मधे सहनायिका होती. पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदेश्वरी, हे सुमन कल्याणपूरचे गाणे तिच्या तोंडी आहे.
यात जयश्री गडकर नायिका होती. पण उमा स्वतः उत्तम नर्तिका होती. तिच्या एका तमाशापटाचे नाव विसरलो, पण त्यात एक पारवाळ घुमतय मनामधी अशी मस्त लावणी होती.

हर्‍या नार्‍या जिंदाबाद हा पण एक मजेशीर सिनेमा होता. दिसं म्हातारी हाय पर तरणी, कशी नखर्‍यात चालतीया गिरणी, हे गाणे बहुदा त्यातलेच. चोळी माझी ग दंडावर फाटली, हि वाणी जयरामने गायलेली लावणी त्यातली.

पुढारी हा पण एक मस्त चित्रपट होता. उषा चव्हाण आणि लिला गांधी होत्या त्यात.
आला गं चावट भुंगा, भवतीन ग बाई बाई घालतोय पिंगा
तसंच
चोर पावलानं घरात शिरला, हात धरला गं द्वाडानं धरला

या दोन्ही लावण्या त्यातल्याच.
शिवाय आशाची, अजून सजणा मी धाकटी, नका येऊ असे अंगचटी. पण त्यातलीच
त्या काळात आशाने अनेक उत्तम लावण्या गायल्या होत्या. बरीच वर्षे त्यांचे संकलन शोधतोय. कुठेच मिळत नाही. अगदी कोल्हापूरमधेदेखील नाही मिळाले.

भरत हो बहुतेक. एक भोंडल्याचे पण गाणे होते का त्यात ?
गणानं घुंगरु हरीवलं, गणानं घुंगरु हरीवलं
हरीवलं तर हरवू दे, गणाला माज्या घेऊन ये..

Pages