गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, परवीन सुलताना यांचे "हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते" (कुदरत) हे एकच गाणे माहित आहे :(.
त्यांनी मराठीत सुद्धा गायले आहे काय? (माझे घोर अज्ञान दुसरे काय....:().

भरत, परवीन सुलताना यांचे "हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते" <<< योग्या, ते गाणं खूप सही आहे, डिप्लोमाला असताना ईस्क्वेअर मॉल मधे बसून कित्येकदा ह्या गाण्याची फर्माईश असायची.

त्यातलं सगळ्या स्पेशल कडवं म्हणजे..

तूम्हे कोई ओर देखे तो,
जलता है दिल..
बडी मुश्किलों से फिर,
संभलता है दिल...

थोडेसे अवांतरः Happy

सुकि, अरे ते कडवे "किशोर कुमारच्या" आवाजातले.
तेच गाणे परवीन सुलताना यांनीही (चित्रपटात अरूणा इराणी) गायले आहे.

कोई जो डारे तुमपे नजरीया
देखा ना जाए मोसे सावरीया
जले मोरा मनवा, जले मोरा मनवा
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना......

हे कडवे परवीन सुलताना यांच्या आवाजत आहे.

योगेश, तुला आवडलेली अशी दुर्मिळ गाणी रोज मला २ २ करून पाठवत जा मेल वर. Happy

माझ्याकडे सुद्धा असं बेस्ट कलेक्शन होईल.

बेगम परवीन सुलताना यांनी मराठीत बहुदा, रसिका मी कैसे गाउ गीत, हे गाणे गायले आहे. (चुकलं !! हे गाणे पौडवाल बाईंनी गायलेय.)
हिंदीत बरीच आहेत.
बिछडत जाये मोसे कान्हा आणि देव पूजी पूजी हि दोन गाणी कुठल्या चित्रपटातील ते माहीत नाही.
पाकिजा (हो पाकिजा च) साठी त्यांनी, कौन गली गयो शाम, ही ठुमरी गायली होती.
रझिया सुलतान (हेमामालिनीचा ) साठी त्यांनी आणि दिलशाद खान यांनी, शुभ घडी आयो रे, असे गाणे गायले होते. त्यावर गोपीकृष्ण चा नाच होता.
हिर रांझा साठी पण त्यांनी समुहगीत गायल्यासारखे वाटतेय.

दिनेशदा, धन्यवाद Happy

बेगम परवीन सुलताना यांनी मराठीत बहुदा, रसिका मी कैसे गाउ गीत, हे गाणे गायले आहे>>>अरेच्चा, हे गाणे मी अनुराधा पौडवालच्याच आवाजात ऐकले आहे. आता बेगम यांच्या आवाजात शोधायलाच पाहिजे.

बाकी इतर गाणी अजुन नाही ऐकली Sad

रच्याकने,
"तांबडी माती" या चित्रपटात शोभा गुर्टु यांनी गायलेले "नजरीया लागी नही कही और..." हे सुद्धा ठुमरी याच प्रकारातील आहे ना?

रसिका तूझ्याचसाठी, मी एक गीत गाते
ह्रुदयात दाटलेली, भावांजली वहाते

असे शब्द आहेत, परवीन सुलताना यांनी गायलेल्या गाण्याचे.
गंगाधर महांबरे यांचे शब्द आणि राम फाटक यांचे संगीत.
(बाकी पौडवाल बाईंचे श्रेय लाटायचा अजिबात हेतू नव्हता.)

ठुमरी हा तसा लवचिक गायन प्रकार. यात भाव दर्शनाला महत्व, रागाचे नियम थोडे शिथील होतात.
मराठीतली अनेक नाट्यगीते, या मूळच्या ठुमर्‍याच आहेत.

पौडवाल बाईंचे श्रेय लाटायचा अजिबात हेतू नव्हता>>>>>दा, मला वाटले कि "रसिका मी कैसे गाऊ गीत" हे गाणे दोघींनी वेगवेगळे गायले आहे.
अनुराधा पौडवाल यांची प्रथमच ऐकलेली गाणी मला त्यांचीच वाटायची, नंतर तीच गाणी मूळ गायिकेच्याही आवाजात ऐकली. इथेही मला तसंच वाटले.

अनुराधा पौडवाल यांची काही गाणी (जी मी पहिल्यांदा त्यांचीच समजत होतो (मूळ गायिका)):

१. हरीनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते (मूळ गायिका: आशा भोसले)
२. ससा तो ससा कि कापूस जसा (मूळ गायिका: उषा मंगेशकर)
३. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने (मूळ गायिका: पद्मजा फेनाणी-जोगळेकर (चुभुद्याघ्या))
४. ओटीत घातली मुलगी विहिणबाई, सांभाळ करावा हिच विनवनी पायी (मूळ गायिका: ?? (या गाण्याचीहि मूळ गायिका अनुराधा पौडवाल नसावी - चुभुद्याघ्या).
५. शुक्रतारा मंद वारा

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने (मूळ गायिका: पद्मजा फेनाणी-जोगळेकर (चुभुद्याघ्या))

हे अनुराधाने आणि आधी पद्मजानेही गायलेय काय????????? मी ह्रुदयनाथ मं. च्या आवाजातच ऐकलेय. निवडूंग चित्रपटातही हे गीत घेतलेय, पण मी बहुतेक आधीही ऐकले होते. आता काळ नीट आठवत नाही.... Happy

साधना, तु म्हणतेय ते निवडुंग चित्रपटातील गाणे "वार्‍याने हलते रान..... हे आहे का? ते मात्र पंडितजींनीच गायलंय

मी म्हणतोय ते गाणे:

पाऊस कधीचा पडतो…
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा

कवी: ग्रेस

अल्बमः शुभ्र फुलांची ज्वाला (?????)not sure

वा-याने हलते पण त्यांचच आहे आणि पाऊसही मी त्यांच्याच आवाजात ऐकलेय... कधाचित पाउस निवडूंगमध्ये नसेलही. मला आठवत नाहीये आता. पण त्यांच्याच आवाजात कुठेतरी ऐकलेय.

ओक्के ओक्के,.. आता वरची कविता पुर्ण वाचल्यावर आठवले. माझ्या डोक्यात आहे ते 'ती गेली तेव्हा रिमझीम पाऊस निनादत होता'. हे गाणे मी ह्रुदयनाथांच्या आवाजात ऐकलेय.

पाऊस कधीचा पडतोय हे पद्मजाच्या आवाजात ऐकलेय. पेटुन कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ह्या ओळी मस्त म्हटल्यात तिने.

पेटुन कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ह्या ओळी मस्त म्हटल्यात तिने.>>>अगदी, अगदी.
बहुतेक त्या अल्बमचं नावही "शुभ्र फुलांची ज्वाल" असंच आहे.

आणि

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा>>>>>या साठी कवी ग्रेस यांना सलाम Happy

घातली ओटीत, हे आशाचे आहे. (मी वर उल्लेख केलाय.)
तसे आशा वर पहिल्यापासूनच अन्याय होतोय. खेड्यामधले घर कौलारु, पण आधी तिनेच गायले होते.

या पौडवाल बाईंवरुन, इथे माझा चाफा (चाफ्फा नव्हे ) या आयडीशी ऐतिहासिक वाद झाला होता. तेव्हापासून मी या बाईचा धसकाच घेतलाय.

हो ते गाणे एका चित्रपटातले होते. पण ते आता कुठे मिळत नाही.

शुक्रतारा पण गाऊन घेतलं का ? अरुण दाते चे गाणे आहे ते !!

शुक्रतारा पण गाऊन घेतलं का ? अरुण दाते चे गाणे आहे ते !!

अहो त्याने एकट्याने नाही गायलेय ते.. द्वंद्वगीत आहे. दातेबरोबर ब-याच जणींनी गायलेय. टीवीवर सगळ्यात शेवटचे अनुराधाने गायलेय. त्यानंतर मी तरी ऐकले नाही.

सुधा मल्होत्रा ने गायले होते ना ते ?
गीत रामायण पहिल्यांदा रेडीओवर, लता, आशा, माणिक वर्मा, ललिता देऊळगांवकर अशा अनेक जणींनी गायले होते. पण तेहि आता कुठे मिळायचे नाही.

'शुक्रतारा' LP वर सुधा मल्होत्रा यांनी गायले आहे.

योगेश, 'जोगिया' मला पण पाठव. Happy

पूर्वी कामगार सभा वगैरे मध्ये लागयची ती 'मूळ' कॉळीगीते, भारूड वगैरे कुठे मिळतील? मला नॉनस्टॉप, झंकार बीट्स वाली नकॉ आहेत.

माधव, अगदी अगदी.
शाहीर साबळे, शाहीर बालकराम वरळीकर, शाहीर दादा कोंडके (हो ), शाहीर अमर शेख आदी तडफदार गायक, ज्यांनी ऐकलेत. त्यांना पुढचे सगळे मिळमिळीतच वाटणार.
पुर्वी
फड फड फडकतो, भगवा झेंडा गगनात
अहो राजे हो, जी रं जी

असा एक पोवाडा लागायचा, कामगार सभेत. मला त्या लहान वयातही त्यातला जोश जाणवल्याशिवाय रहायचा नाही.
मध्यंतरी मी असे वाचले होते, कि आकाशवाणी ने त्यांच्या संग्रहातील सर्वच गाण्यांचे डिजिटलायझेशन केले आहे. त्यामूळे आपली आवड, सारख्या कार्यक्रमात सगळ्यांनी फर्माईश केली, तर नक्कीच ऐकवतील.

येस्स्स, शुक्रतारा "सुधा मल्होत्राच" (आठवतंच नव्हते नाव :().

घातली ओटीत, हे आशाचे आहे. (मी वर उल्लेख केलाय.)>>>>येस्स्स Happy

गीत रामायण पहिल्यांदा रेडीओवर, लता, आशा, माणिक वर्मा, ललिता देऊळगांवकर अशा अनेक जणींनी गायले होते. पण तेहि आता कुठे मिळायचे नाही.>>>>दा, यातील बहुतेक एक ओरीजनल गाणे माझ्याकडे असावे. शोधायला पाहिजे. Happy

योगेश, 'जोगिया' मला पण पाठव. >>>माधव नक्कीच Happy

इथे माझा चाफा (चाफ्फा नव्हे ) या आयडीशी ऐतिहासिक वाद झाला होता. तेव्हापासून मी या बाईचा धसकाच घेतलाय.>>>>> Happy Happy

नमस्कार मंडळी,
रोशन सातारकर यांची अजुन काही गाणी..
*सखा येईना ग
*करमेना दिवस जाईना
*मोत्याचं बाशिंग बांधा
*माझ्या नवर्-यानं सोडलीया दारू
*भामटा पुन्याचा
roshan.jpg
ही आणि अशी अजुन बरीच गाणी ऐकायला मिळतील ईथे-
http://www.in.com/music/artist/roshan-satarkar-26571-1.html

माधव, दिनेशदा
माझ्याकडे एक कॅसेट होती (बहुतेक टीसिरीज) "कोळीगीत" मी त्याला mp3 मध्ये convert केले होते.
त्यात खालील गाणी (सगळी गाणी ओरीजनल) होती

१. कावला पीपेरी वाजवतो, मामा मामीला नाचवतो
२. आगीनगाडी बोलते लगीनगाडी, गाडी चाललंय गो
३. फू बाय फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू
४. गौरी गणपतीचे सणाला गे बहिणी बेगीन चल संगे म्हायेराला

अजुन बरीच मस्त गाणी आहेत घरी जाऊन बघावी लागतील Happy

Pages