गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेशने अनंताक्षरी मध्ये शोभा गुर्टुंचे पिकल्या पानाचा देठ हे गाणे लिहिले त्यावरून मला त्यांची इतर गाणी आठवली.
१) उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे
विरहात वेचताना घटना सुखातल्या
उठता तरंग देही हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजुनी, भेटी वनातल्या
हासोनियी खुणावी ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या

२) त्यांनीच छेडिले ग माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला दारी उभी मी होते
करपाश तोची आले कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने मी ग अबोल होते
अपराध काही नसता शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी गं मी बंदिवान होते
दिनरात साजणाचे बेबंद वागणे हे
असते सुखात जर का मी बालिकाच होते
हे गाणे हिंदीत पण आहे -आशाच्या आवाजात गैरफिल्मी
शाम निकस गए ना मैं लडी थी.....
...इस ब्याहे से मैं कुंवारी भली थी
आणि लताच्या आवाजात एक चित्रपटगीत.
३) माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा हाए रे जुळेना
४) रे नंदलाला तू छेडू नको
धरुनिया पदराला ओढू नको

वरची सगळी उमाकांत काणेकर- श्रीकांत ठाकरे.

भरत धन्स रे सगळ्या गाण्यांसाठी Happy
शोभाजींचे अजुन एक गाणे चित्रपटः तांबडी माती - "नजरीया लागे नही कही और" (गाणे हिंदी चित्रपट मात्र मराठी :-))

अवांतरः
आणि लताच्या आवाजात एक चित्रपटगीत.>>>>भरत, ते गाणे "सत्यम शिवम सुंदरम" चित्रपटातील का?
रंगमहल के दस दरवाजे
ना जाने कौनसी खिडकी खुली थी
सैंया निकस गये मै ना लडी थी
सर को झुकाये मै तो चुपके खडी थी
सैंया निकस गये मै ना लडी थी

सैंया निकस गये, हि रचना कमाई या कबीर च्या लेकीची आहे.

कहत कमाई, कबीर की बेटी
इस ब्याहेसे तो मै, कंवारी भली थी

अशा शेवटच्या ओळी आहेत. हि रचना मी मालिनी राजूरकर यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकलीय. मला नाही वाटत ती त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहे.

आणखी एक मराठी सिनेमा होता, त्यात मिनू मूमताज ने भुमिका केली होती (रंगल्या रात्री अशा ?)
त्यात तिची सगळीच गाणी हिंदी होती.

"सर्वसाक्षी" या चित्रपटाची सीडी मी खास "बांधले मी बांधले..." या गाण्यासाठीच घेतली होती. आशाचे हे गाणे आवडीचे, खुप शोधले पण नाहि मिळले शेवटे महाराष्ट्र ग्रामोफोन (दादर) येथे चित्रपटाची सीडी मिळाली, पण दुर्दैवाने त्यात गाणे फक्त एकाच कडव्याचे होते Sad नंतर आंतरजालावरील एका मित्राने पूर्ण गाणे पाठवले. Happy हा चित्रपट शनिवारी (जर घरी असेल तर ;-)) नीट पाहतो.
आक्रीतची पण सीडी आता बघायला पाहिजे. Happy हा चित्रपट ऑनलाईन उपलब्ध आहे का?

(अवांतरः अमोल पालेकरने एका हिंदी चित्रपटातही खलनायकाची भुमिका केली आहे ना? चित्र्पटाचे नाव बहुदा "दामाद" (but Not Sure).

रच्याकने, स्मिता पाटिलचा विषय निघालाच (सर्वसाक्षीच्या निमित्ताने) आहे तर कुणी सांगू शकाल का कि तिचा पहिला "मराठी" चित्रपट कोणता आहे?
"सामना" या चित्रपटात "कुणी तरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेन काय? या टोपीखाली दडंलय काय?..." या गाण्यात (गायकः रविंद्र साठे, श्रीराम लागू, चित्रपटातः श्रीराम लागू)
"चमचमणार्‍या चांदण्याजैसी
मोगरीवरल्या दवाजैसी
स्पर्श झाला कि कणाकणाने
विरघळणार्‍या आसवांजैसी......." या कडव्यात स्मिता पाटिल आहे, तोच तिचा पहिला चित्रपट का? (या चित्रपटात वरील गाण्यातील एका कडव्यापुरतीच भूमिका आहे.)

अवांतरः अमोल पालेकरने एका हिंदी चित्रपटातही खलनायकाची भुमिका केली आहे ना? चित्र्पटाचे नाव बहुदा "दामाद"

कै च्या कैच हा योग्या.. ह्या चित्रपटात तो हिरो आहे.. आणि चित्रपट एकदम मस्त आहे. सिडी मिळाली तर पाहाच पाहा....

सामनामधले ते छोटेसे काम हेच बहुतेक तिचे पहिले काम असावे.

सैंया निकस गये हे गाणे हिंदीत पण आहे -आशाच्या आवाजात गैरफिल्मी
आशाच्या आवाजातले मी ऐकलेय... शोभा गुर्टूची वरची सगळी गाणीही ऐकलीत. सुंदर आहेत अगदी.

आज १००.६ वर ८.३० ते १० लताआशाची डुयेट्स होती सगळी. Happy

अमोल पालेकरने खलनायक म्हणून दोन हिंदी चित्रपटात काम केलेय.
एकात ट्रेनमधे खून होत जातात. आणि दुसर्‍यात तो शबाना आझमी बरोबर आहे. दोघांनी त्यात स्वतःच्याच भुमिका केल्या आहेत. तरीही अमोल पालेकर त्यात खलनायक आहे.

शबानाबरोबर खामोश. तो ट्रेनवाला तिसरा कौन? मी शबानावाला पाहिलाय. ट्रेनवाला शोधायला पाहिजे

अवांतरः Happy
ह्या चित्रपटात तो हिरो आहे.. >>>>धन्स साधना!!! या चित्रपटात रंजिता हिर्वीन आहे ना? "जिंदगी के सफर में ना जाने, मिलते है कुछ अंजाने" हे गाणे आहे या चित्रपटात (दामाद). Happy

येस्स्स. आता आलास तु लायनीवर Happy यात अशोक सराफही आहे. श्रीराम लागु बहुतेक अमोलचे थोरले बंधू असतात. पिक्चर सोल्लीड विनोदी आहे... (म्हणजे तेव्हा मला तसा वाटलेला, आता पाहिला तर मत बदलु शकते)

सुरेश वाडकरांचे "सुहास्य तुझे हे मनासी मोहे..." हे "संसार" या चित्रपटातील गाणे मी शोधत आहे. कुणाकडे असल्यास पाठवा Happy किंवा गाण्याची/चित्रपटाची सीडी कुठे मिळेल ते कळवा :-).

सुरेश वाडकर (सोबत अजुन कुणीतरी आहे. आठवत नाही) यांचे आवडते अजुन एक गाणे "कथा दोन गणपतरावांची" या चित्रपटातील
"कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना
कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरून चालणे हे नवे
कशी वळशी नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा

जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना
असे बदलायचे बरे नव्हे अरे मना......" असेच काही शब्द आहे. छान शब्द, संगीत आणि अर्थातच आवाज.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशेंची जुगलबंदी आहे. दोन जिवलग मित्र आणि नंतर त्यांच्यात होणारे वैर अशी विनोदी अंगाने जाणारी काहीशी कथा होती.

सुरेशजींची ऑल टाईम फेव्हरीटः
१. पाहिले न मी तुला तु मला न पाहिले
२. तु गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे
३. जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
४. पहाटे पहाटे मला जाग आली

आणि खुप खुप खुप सारी गाणी Happy

सुहास्य तुझे, हे मूळ मा. दिनानाथांचे गाणे, ते कृष्णार्जून युद्ध या चित्रपटातले.
आशाच्या मी मज हरपून बसले गं, या गाण्यावर पण याच सूरांची छाया आहे.

धन्यवाद दा, अधिक माहितीसाठी.
माज्याकडे मा. दिनानाथ आणि आशा भोसले यांच्या आवाजातले गाणे आहे. मागे एकदा FM Gold वर संसार चित्रपटातील हे गाणे सुरेशजींच्या आवाजात ऐकले होते.

हो, त्या सिनेमात आहेच ते.
त्यात बाकी पण सुंदर गाणी होती.
दयाघना उरलो बंदी तूझा मी ( राग बिभास, मूळ चीज रसोलल्ला करजो बेडा पार हमार )
मला वाटते सुमती टीकेकरच्या आवाजात एक झोपाळ्याचे गाणे होते.

आणि उषा नाईक वर चित्रीत झालेले, लताचे अप्रतिम गाणे.. वारा गाई गाणे..
त्यात यशवंत दत्त आणि आशा काळे होते बहुतेक.

माधव, ईमेल मिळाला. खुप खुप धन्यवाद Happy

मला वाटते सुमती टीकेकरच्या आवाजात एक झोपाळ्याचे गाणे होते.>>> अजुन एक गाणे "गीत होऊन आले सुख माझे आले साजणा....." हे आहे त्या चित्रपटात.

उत्सव मधले सुरेश वाडकरचे, सांझ ढले, हे पण त्याच रागातले.
नाट्य सुरेश असा एक संच त्यांचा नाट्यगीतांचा आहे. नेहमीच्या गाण्यांना थोड्या वेगळ्या चाली आहेत.

सुरेशजींच्या गाण्यांचा मी पंख आहे Happy
मागे एकदा ई टिव्ही मराठीवर त्यांचा "सूरमयी शाम" हा कार्यक्रम व्हायचा. अख्खा कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवलाय (ऑडियो फॉर्मेटमध्ये).

तरी बरं, माझे गाण्यांसाठी केलेले आणि मी करत असलेले उद्योग माहित नाहीत लोकांना !!

या आठवड्यात गोविंदराव टेंबे यांच्यावरती अप्रतिम कार्यक्रम चालू आहे ईप्रसारण वर.

हा मराठी गाण्यांचा बीबी आहे हे माहीत असूनही थोडा आगाऊपणा करतोय.
वर बिभास रागाचा उल्लेख झालाय, तो एक उदास करणारा राग आहे. तसाच एक राग शिवरंजनी.
यातली गाणीही तशी हुरहुर लावणारीच.
जाने कहा गये वो दिन (मुकेश, मेरा नाम जोकर ) बहुत दिन बीते (लता, संत ज्ञानेश्वर )
तेरे मे बीच मे (लता, एक दूजे के लिये )
आणखी दोन गाणी, मेरे नैना सावन भादो, हे लताचेच, मेहबूबा मधले. मला वाटते हेच गाणे किशोरने पण गायलेय. बहुत दिन बीते सोडले तर मला बाकिची विशेष आवडत नाहीत.
पण मेरे नैना सावन भादो असेच शब्द, हाच राग असलेले एक जूने गाणे आहे,चित्रपट विद्यापती, गायिका लताच. पण तिने त्या गाण्याला अशा काही उंचीवर नेऊन ठेवलेय...

ऐका इथे ..
http://www.youtube.com/watch?v=iOH8gdViwSw

हे गाणे ऐकले आणि मला साधना, योगेश, भरत, माधव आदी संगीत प्रेमींची आठवण आली.

माधव, खुप खुप धन्यवाद "सुहास्य तुझे मनासी...." साठी. मन भरून ऐकतोय आज. Happy

हा मराठी गाण्यांचा बीबी आहे हे माहीत असूनही थोडा आगाऊपणा करतोय.>>>दा, आगाऊपणा चालेल Happy :).

गायिका लताच. पण तिने त्या गाण्याला अशा काही उंचीवर नेऊन ठेवलेय...>>>>पहिल्यांदाच ऐकले. धन्यवाद दा, गाण्याची माहिती आणि ओळख करून दिल्याबद्दल Happy

सुरेशजींचे अजुन एक आवडीचे गाणे

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला

एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला ............

जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला ............

प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू
की खुलाशांचाच सार्‍या अर्थ मग बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला ............

(मूळ गीतात अजुन काही कडवे आहेत जे गाण्यात नाही आहे. गीतकारः चंद्रशेखर सानेकर)

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला

एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला

तो कधी झाला न माझा, जो कधी नव्हता कुणाचा
एक होता चेहरा जो आरसे चुकवून गेला

वाटले त्याला, बघावे एकटा जगतो कसा मी
एवढ्यासाठीच मजला तो घरी भेटून गेला

जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला

टाळला मी आरसा तर चेहरा विसरून गेलो
पाहिला, तर सर्व पारा आतला निखळून गेला

आजही सांगू न शकलो त्यास माझी यातना मी
आजही जखमेवरी तो आसवे बरसून गेला

शेवटी अश्रूंत माझ्या चेहरा माझाच दिसला
जो दिलासा भेटला तो आरसा देऊन गेला

तो तुझा नव्हता कुणी तर का तुला मंजूर होता?
तो तुझा होता कुणी तर का तुला जाळून गेला?

प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू
की खुलाशांचाच सार्‍या अर्थ मग बदलून गेला

मस्त आहे रे योग्या..

रच्याकने आज सकाळी वारा लबाड आहे.. लागलेले. तुझ्याकडे आहे काय??
(तुझा मिस कॉल पाहिला Happy घाईत होते Happy )

साधना हे घे संपूर्ण गाणे: Happy

लपत, छपत, बिचकत, दबत, सननन करत, अन् गुणगुणत
वारा.....वारा...वारा..... वारा निघे लपाया

झाडात आड आहे
गिल्ला करुन पाने
सांगून राहिली की
वारा लबाड आहे
वारा.....वारा...वारा..... वारा लबाड आहे

झाडात मोहराचे
सारे घबाड आहे
वाकून एक फ़ांदी
सांगून राहिली की
भुंगा ........भुंगा ......... भुंगा ......
भुंगा उनाड आहे
वारा लबाड आहे

वाड्यास भोवताली
राई उफ़ाड आहे
पडवीवरील बोले
छपरी ........छपरी ......... छपरी ......
छपरी उजाड आहे
वारा लबाड आहे....

चोरून दे मुका तू
वस्ती चहाड आहे
वा-यास साखळी ही
सांगून राहिली की
उघडी....... उघडी....... उघडी
उघडी कवाड आहे..
वारा लबाड आहे....

अल्बमः अबोलीचे बोल
संगीतः श्रीधर फडके
स्वरः श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल
गीतः शिरीष गोपाळ देशपांडे..

सुहास्य तुझे पं जितेंद्र अभिषेकींचे नाही ऐकले कुणी? ते ऐकल्यावर आनखी कुणाच्या आवाजात आणि गळ्यात नाही ऐकवत. (शौनकच्या चालेल)
योगेश तुझ्या विपु मध्ये लिंक दिलीय.

Pages