Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाळलेल्या माशाला मानसे ओळखता
पाळलेल्या माशाला मानसे ओळखता येतात. आय क्यान प्रूव्ह बर्का.
तुझ्या बाबतीत शक्य आहे. तु पाळलेले मासे 'मेरा नंबर कब आयेगा' असा चेहरा करुन पाहात असतील तुझ्याकडे आणि रोज तु एकेकाला बाहेर काढुन जागुकडे पाठवत असशिल कालवण करायला....
पाळलेल्या माशाला मानसे ओळखता
पाळलेल्या माशाला मानसे ओळखता येतात. आय क्यान प्रूव्ह बर्का.
रोज सकाळी 'असुदे' उठतो मग फिशटँक मध्ये खाद्य टाकताना त्याचा मासा त्याला शेपटीने दोन फटके देउन त्याची विचारपुस करतो.
(No subject)
रच्याकने, ह्या शीनेमाचे नाव
रच्याकने, ह्या शीनेमाचे नाव 'आर्या-२' असे आहे.
>> रोज सकाळी 'असुदे' उठतो मग
>> रोज सकाळी 'असुदे' उठतो मग फिशटँक मध्ये खाद्य टाकताना त्याचा मासा त्याला शेपटीने दोन फटके देउन त्याची विचारपुस करतो. <<
स्वतःहूनच उठतो का !! मला वाटले त्या शिणूमात दाखवल्याप्रमाणे मासा त्याला फटके देऊन उठवतो.
स्वतःहुन थोडाच उठणार तो????
स्वतःहुन थोडाच उठणार तो???? इमू येऊन चोचा मारुन उठवतो तेव्हा तर हा उठतो...
मग स्वतःचे उदरभरणम झाल्यावर माशाला खाद्य... मग पोट भरल्यावर (माशाचे) मासा ह्याचे बोट धरुन घरात एक फेरी मारतो. दोघांसाठीही एवढा मोर्निंगवॉक पुरेसा..
गेल्या आठवड्यात घरी
गेल्या आठवड्यात घरी 'अंजाना-अंजानी' बघावा लागला.
हिरविनीला अटलांटीक समुद्रात पोहायची इच्छा होते म्हणुन दोघेही बोट घेऊन समुद्रमध्यभागी जातात. तिथे गेल्यावर तिला आठवते आपण पोहायचे कपडे आणले नाही. हिरो तिला 'मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझ्याशिवाय इथे दुसरे कोणी नाही, त्यामुळे सगळे कपडे काढुन पोहलीस तरी फरक पडत नाही' असा प्रॅक्टीकल सल्ला देतो तर ती रागावुन अंगावरच्या कपड्यांनिशी पाण्यात उडी मारते. (एरवी चित्रपटभर दिड वितभर टिशर्ट आणि अर्धा वित शॉर्ट घालुन फिरणा-या त्या बाईला नेमक्या ह्याच दृश्यात फुल लेंग्थ बाह्यांचा शर्ट आणि बेलबॉटम जीन्स घालायची बुद्धी का झाली निर्मात्यालाच माहित). मग तिला वाचवण्यसाठी पोहायला न येणारा हिरो पाण्यात उडी मारतो. मग अर्धा तास ते दोघे पाण्यात डूंबत होते. हे पाहिल्यावर मला अटलांटिक समुद्र म्हणजे बेलापुरच्या वायेम्सीचा स्विमिंग पुल वाटायला लागला....
डीस्कव्हरी चॅनेलात दिसणारे
डीस्कव्हरी चॅनेलात दिसणारे हजारो प्रकारचे जीवघेणे मासे, पाणसाप,ओक्टोपस, शार्क आणि काय्काय असं तिथे का पोहोचत नाहीत अशा वेळी !:अओ;
हो ना आणि तेवढ्याच भागात थंड
हो ना आणि तेवढ्याच भागात थंड पाणीही नसावे बहुतेक. किंवा यांनी बरोबर नॉर्मल पाण्याच्या करंट मधे उडी मारली असावी. वाळवंटात भरदिवसा गुढघ्यापर्यंत येणारे लेदर बूट्स घातलेला फोटो यातलाच ना?
वाळवंटात भरदिवसा
वाळवंटात भरदिवसा गुढघ्यापर्यंत येणारे लेदर बूट्स घातलेला फोटो यातलाच ना?
हो..... त्या वाळवंटात प्रवास करत असताना हिरोइनीला अचानक सुसु लागते (शाहरुखला परदेसमध्ये कशी लागली नाही ह्याच वाळवंटातुन प्रवास करताना????????) मग ती झुडुप शोधायला लागते, वाळवंटात एकही झुडूप नाही
मग एक खुरटलेले झुडुप सापडते शेवटी. तिथे गेल्यावर ती हिरोला ओरडुन डोळे आणि कान बंद करायला सांगते. हिरोने डोळे आणि कान बंद केल्यावर त्यांची गाडी चोर पळवतात. हा बेक्कार, फडतुस सिन का घातला असावा असा मी विचार करत होते, गाडी चोरीला गेल्यावर लक्षात आले डिरेक्टरला काय दाखवायचे होते ते.... काय अप्रतिम कल्पनाशक्ती लाभली त्या माणसाला.
हो ना आणि तेवढ्याच भागात थंड पाणीही नसावे बहुतेक
अटलांटिकचे पाणी झिरो डिग्रीखाली असते असे मी वाचलेले, पण इथे अर्धातास डुंबुन, हिरोची चड्डी त्याने पाण्यात उडी मारल्यावर कमरेवरुन निसटुन पाण्यात वाहात जाणे वगैरे सगळे प्रकार करुन झाल्यावर त्यांना थंडी वाजायला लागते. झिरो डिग्रीखालच्या पाण्यातली थंडी अंगात मुरायला इतका वेळ लागला त्यांना. बहुतेक त्यासाठीच हिरोइनीने मुद्दाम फक्त याच दृश्यासाठी अंगभर कपडे घातलेले आणि हिरो फक्त अर्ध्या चड्डीवर....
साधना एक डीटेल परिक्षण
साधना
एक डीटेल परिक्षण येउदे!!!
साधना.....
साधना.....
एक डीटेल परिक्षण
एक डीटेल परिक्षण येउदे!!!
म्हणजे तेवढ्यासाठी परत बघु की काय हा चित्रपट??????????????? वेड लागेल मला...
एक डीटेल परिक्षण
एक डीटेल परिक्षण येउदे!!!>>म्हणजे तेवढ्यासाठी परत बघु की काय हा चित्रपट??????????????? वेड लागेल मला... >>>>>:D
शिनुमा : गिरफ्तार अॅक्टर :
शिनुमा : गिरफ्तार
अॅक्टर : The Great Rajnikant
व्हिलन मंडळी रजनी ला तुडव तुडव तुडवतात (Hard to Belive Na) , त्याच्या पंजां वरुन ट्रॅक्टर घेऊन जातात आणि त्याला मारतात, पण आपला रजनी एव्ह्ढं सहजा सहजी थोडी ना मरणार, त्याच्यात अजुन जरा जीव बाकी असतो, रजनी किती तरी दूर असलेल्या व्हिलन वर नेम धरुन पिस्तुल चा घोडा आपल्या गळयातल्या चेन ने ओढतो आणि व्हिलन चा खातमा करतो (Tough Competition for Abhinav Bindra).
साधना, डोळे उघडे ठेउन लोकांनी
साधना, डोळे उघडे ठेउन लोकांनी कसा बघितला असेल हा सिनेमा ?
म्हमईकर, या सीनच्या तूलनेत, अंजेलिनाच्या सॉल्ट मधला शेवटचा सिन अवश्य बघा. ती निशस्त्र, हातात बेड्या, त्यातून हात मागे. खलनायक जिन्यात बसलेला, असे असताना ज्या चपळाईने ती त्याला मारते, ते बघण्याजोगे आहे. ती एवढी नाजूक असूनही, तिच्या या सिनेमातल्या साहसदृष्याबाबत कुठेच मनात शंका येत नाही.
साधना मला पण अंअ दोनदा बघावा
साधना मला पण अंअ दोनदा बघावा लागला अतित्रासदायक आहे. सर्व चित्रपट प्रेमींच्या लक्षात आलेच असेल कि नायक किंवा नायिका आपण नक्की कोणाच्या प्रेमात आहोत अश्या गोंधळात अस्तात मग महाग कपडे,
डेट्स, दारू पिणे, जग भर भटकणे ( प्रोड्युसर च्या खर्चाने ) वगिअरे दोन तास करून झाल्यावर त्यांना आपले प्रेम नक्की कोणावर आहे ते कळते त्यासाठी फालतूचे साहस म्हणजे एअर्पोर्ट ते पूल पळत जाणे, शिडीवरून
मुलीच्या रूम मध्ये जाणे वगिएरे हीरो करतो. मग मेडप नायिकेचे एकदाचे मन नक्की होते. अति शॅलो
सिनेमे.
१) लव आज कल
२) आय हेट लवस्टोरीज
३) आयेशा
४) अजब प्रेम की गजब कहानी
५) अंजाना अंजानी.
६) झूठा ही सही.
सर्व एकावर एक ठेवता येतील इतके सारखे आहेत.
म्हमईकर मी गिरफ्तार बर्याच
म्हमईकर मी गिरफ्तार बर्याच वर्षांपूर्वी पाहिला, पण एवढे झाल्यावर सुद्धा मरायच्या आधी दोन मिनीटे सिगारेट ओढण्याएवढा वेळ त्याला मिळतो असे काहीतरीही होते
सर्व चित्रपट प्रेमींच्या
सर्व चित्रपट प्रेमींच्या लक्षात आलेच असेल कि नायक किंवा नायिका आपण नक्की कोणाच्या प्रेमात आहोत अश्या गोंधळात अस्तात
काय???????????// हा गोंधळ चित्रपट अर्धा झाल्यावर निर्माण झाला असेल बहुतेक...... मी सुरवात पाहिली तेव्हा दोघेही आपण आत्महत्या करावी या ठाम विचारावर होते. फक्त वाईट एवढेच की त्याना ती करायला जमत नव्हती. (पहिल्याच रिळात जमली असती तर मग काय सोने पे सुहागा
). मग आता आत्महत्या करणारच आहोत तर एकदा जीवाचे जग तरी करुन घेऊया असे ठरवतात बहुतेक......
कधी कधी अगदी वेगळा विषय
कधी कधी अगदी वेगळा विषय म्हणून काही चित्रपट लक्षात राहतात. वर आत्महत्येचा उल्लेख झालाय, त्यावरुन मला विनोद खन्ना, उत्पल दत्त चा वादा हा चित्रपट आठवतोय.
आर्थिक अडचणींमूळे विनोद खन्ना आत्महत्या करायला जातो, तर उत्पल दत्त त्याला अडवतो. तो त्याला कारणं विचारतो. मग एक विचित्र सौदा करतो. तो त्याचा मोठा विमा उरवणार. त्या बदल्यात त्याला पैसे देणार. त्या पैशातून त्याने सर्व जबाबदार्या पार पाडायच्या. मग तो सांगेल त्या रितीने त्याने आत्महत्या करायची. शेवट अपेक्षित तरी उत्कंठावर्धक होता. आठवतोय का ?
हा चित्रपट टिवीवर पाहिल्याचे
हा चित्रपट टिवीवर पाहिल्याचे आठवत नाही. विनोद खन्ना-उत्पल दत्त हे कॉम्बो कधीच पाहिले नाही. शोधुन पाहायला पाहिजे.
विनोद खन्ना-उत्पल दत्त हे
विनोद खन्ना-उत्पल दत्त हे कॉम्बो कधीच पाहिले नाही>>> हे काँबो 'शक'मधे पाहिले आहे, पण दिनेशदा सांगताहेत तो सिनेमा अजिबात माहिती नाही.
वादा किंवा सौदा, असे नाव
वादा किंवा सौदा, असे नाव असेल. योगिता बाली पण होती त्यात.
विनोद खन्नाचा, लगाम नावाचा पण चांगला सिनेमा होता. त्याची आई दिना पाठक असते, आणि तिने त्याच्या हिंसेला लगाम घातलेला असतो, पण अत्याचाराचा अतिरेक झाल्यावर तो लगाम सूटतो, अशी कथा होती.
अचानक बद्दल तर बोलायलाच नको.
अचानक बद्दल तर बोलायलाच
अचानक बद्दल तर बोलायलाच नको.
अचानक अतिशय छान चित्रपट होता (माझ्या मते). विनोद खन्नाने काय सुंदर काम केलेय त्यात. विश्वासघाती बायकोची अतिशय कठोरपणे हत्या करणारा आणि त्याच वेळी तिच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी जीवावर उदार होणारा, तिच्यावर प्रेम करणारा सैनिक त्याने अप्रतिम उभा केलाय....
बेंजामिन गिलानीचा चित्रपटातील तंत्रांवर आधारित एक कार्यक्रम शनिवारचा दाखवायचे, त्यात हा चित्रपट त्यातल्या आठवणीमघल्या आठवणी दाखवण्याच्या तंत्रात ह्या चित्रपटाचा उल्लेख होता (फ्लॅशबॅकमध्ये फ्लॅशबॅक). तेव्हा ह्या चित्रपटातली दृश्ये प्रथम पाहिली. नशिबाने थोड्याच दिवसात दुरदर्शनने पुर्ण चित्रपटही दाखवला. पुर्ण चित्रपट तुकड्यातुकड्यातल्या फ्लॅशबॅकमधुन उलगडत जातो. परत पाहायला मिळाला तर काय बरे होईल......
अचानक ची पटकथा हा एक वेगळाच
अचानक ची पटकथा हा एक वेगळाच विषय आहे. त्या पटकथेतील वळणे एवढी गुंतवून ठेवतात, (नूसते फ्लॅशबॅक नाहीत तर फ्लॅशबॅक मधे फ्लॅशबॅक आहेत. ) कि शेवटी तो एक फाशीची शिक्षा झालेला कैदी आहे, हे सत्य अपेक्षित तितक्या अचानकपणे समोर येते.
दिनेशदा बघीन तो
दिनेशदा बघीन तो चित्रपट.
फारएण्ड : काय करणार, आदत से मजबुर, गचकल्या नंतर वरती मिळणार का, म्हणुन शेवटचा दम.
थोडे विषयांतर : विंग्रजी चित्रपटात सुद्धा असे अतर्क्य सीन्स असतात. मॅट्रिक्स मध्ये किणु रीव्स कसे एकटा २०-२५ जणाना ळोळवतो, ते आपण फार कौतुकाने बघतो आणि म्हणतो कि काय कल्पना शक्ति आहे ह्या गो-या लोकांची, माणसां मध्ये xeon processors, wow. (pls correct me if i'm wrong)
मनजीं (Manmohan Desai) च्या चित्रपटात तर अतर्क्य सीन्स चा नुसता सुळसुळाट असतो.
शिनमा : मर्द.
सीन : दारा सिंह आपल्या बाळाच्या छाती वर सु-यांनी कोरतो "मर्द" आणि म्हणतो कसा "मर्द को दर्द नही होता " आणि कहर म्हणजे सु-यांनी लिहित असताना बाळ हसत असतं
ह्याच चित्रपटात दारा सिंह विमानाला धावपट्टी वरुन टेक ऑफ करताना गोफ फिरवतात तसे रस्शी फिरवुन विमानाला रोखुन धरतो.
क्रिश शिनमात सुद्धा असे भरपुर सीन्स आहेत, नंतर लिहिन
- म्हमईकर
अचानक अतिशय छान चित्रपट होता
अचानक अतिशय छान चित्रपट होता (माझ्या मते). विनोद खन्नाने काय सुंदर काम केलेय त्यात. विश्वासघाती बायकोची अतिशय कठोरपणे हत्या करणारा आणि त्याच वेळी तिच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी जीवावर उदार होणारा, तिच्यावर प्रेम करणारा सैनिक त्याने अप्रतिम उभा केलाय.... >>>> मला अंधुक आठवतोय हा सिनेमा, यात तिची शेवटची इच्छा म्हणुन तिच्या अस्थी गंगेत की कुठेतरी टाकायच्या असतात ना त्याला? पोलिस व माग काढणारे कुत्रे मागे असतात आणि तो कलश घेउन पळत असतो असं काहीतरी आठवतंय..
विंग्रजी चित्रपटात सुद्धा असे
विंग्रजी चित्रपटात सुद्धा असे अतर्क्य सीन्स असतात. मॅट्रिक्स मध्ये किणु रीव्स कसे एकटा २०-२५ जणाना ळोळवतो, ते आपण फार कौतुकाने बघतो आणि म्हणतो कि काय कल्पना शक्ति आहे ह्या गो-या लोकांची>>> म्हमईकर, 'द मॅट्रीक्स' परत एकदा पहा, त्या सार्या अचाटपणाचे अत्यंत पटेल असे लॉजिक त्यात दिले आहे. मिथूनने-रजनीने २५ जणांना फेकणे आणि तुम्ही म्हणताय तो सीन यात फार फरक आहे हो.
अर्थात मिशन इंपॉसिबल-२ वगैरे सिनेमे इंग्रजी मिथूनपटच होते.
अचानक अतिशय छान चित्रपट होता
अचानक अतिशय छान चित्रपट होता (माझ्या मते). विनोद खन्नाने काय सुंदर काम केलेय त्यात. विश्वासघाती बायकोची अतिशय कठोरपणे हत्या करणारा आणि त्याच वेळी तिच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी जीवावर उदार होणारा, तिच्यावर प्रेम करणारा सैनिक त्याने अप्रतिम उभा केलाय.... >>>>
मलाही हा नीट आठवतोय पण चित्रपट काही खास वाटला नव्हता. विनोद खन्नाने काम सुरेख केले याबद्दल शंकाच नाही.मला वाटते contrasting human emotions दाखविण्यात चित्रपटाचे कथानक कमी पडते. कथेचा आत्मा असा आहे की "पत्नीने केलेला विश्वासघात सहन न होउन तो तिचा आणि मित्राचा खुन करतो, पण त्यांच्या प्रेमाचे प्रतिक मंगळसुत्र गंगेत टाकुन तो एकप्रकारे ते पावित्र्य restore करु पाहतो" यात दिग्दर्शकाने पाठलाग द्रुश्ये, flashbacks छान केले पण एक मोठी चुक केली की हिरोची
पार्श्वभुमी नीट खुलवली नाही त्यामुळे तो हे का करतो हे स्पष्ट होतच नाही. एक अशाच प्रकारचा spanish movie मग काही काळाने पाहिला, त्यात हिरो तिला कुठल्या तरी धार्मिक स्थळी घेउन जाणार असतो, पण
ते जास्त पटते कारण त्यांच्या प्रेमाची उत्कटता आधी खुलवली होती, शिवाय उगाच पाठलाग वगैरे टाकला नव्हता हिरो २० वर्षांनी सुटुन आल्यावर तिथे जातो.
आर्थिक अडचणींमूळे विनोद खन्ना आत्महत्या करायला जातो, तर उत्पल दत्त त्याला अडवतो. तो त्याला कारणं विचारतो. मग एक विचित्र सौदा करतो. तो त्याचा मोठा विमा उरवणार. त्या बदल्यात त्याला पैसे देणार. त्या पैशातून त्याने सर्व जबाबदार्या पार पाडायच्या. मग तो सांगेल त्या रितीने त्याने आत्महत्या करायची.
>>>
हा छान चित्रपट होता आठवतो. पैसे मिळाल्यावर अर्थात आत्महत्येचे विचार कसे फेफरतात ते छान दाखवले. यात उत्पल दत्त आठवत नाही अर्थात लहानपणी पाहिलेला आहे. दुरदर्शनवर लागलेला.
पण त्यांच्या प्रेमाचे प्रतिक
पण त्यांच्या प्रेमाचे प्रतिक मंगळसुत्र गंगेत टाकुन तो एकप्रकारे ते पावित्र्य restore करु पाहतो"
त्याच्या बायकोने त्याला एकदा सांगितलेले असते की ती मेल्यावर तिचे मंगळसुत्र त्याने गंगार्पण करायचे म्हणुन. खुन केल्यावर मला वाटते तो स्वतःहुन पोलिसांच्या स्वाधिन होतो पण नंतर त्याला हा मंगळसुत्राचा एपिसोड आठवतो आणि तो पोलिसांच्या तावडीतुन पळुन तिची इच्छा पुरी करायच्या मागे लागतो. पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी तो सैन्यात त्याला शिकवण्यात आलेल्या युक्त्या वापरतो. हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात तो गोळीने जबर जखमी होतो आणि त्याला इस्पितळात दाखल केले जाते. हे सगळे दाखवताना फ्लॅशबॅक, त्यात परत फ्लॅशबॅक अशी गुंतागुंत आहे. दिग्दर्शन गुलजारने केले आहे.
याशिवाय वरच्या कथानका व्यतिरिक्त चित्रपटात 'एखाद्याला जर कायदा नंतर मारणारच आहे तर त्याला डॉक्टरांनी स्वतःचे ज्ञान, वेळ आणि सरकारी पैसा पणाला लाऊन बरे करण्यात वेळ घालवावा काय? ठणठणीत झाल्यावर नाहीतरी त्याला फासावरच चढवणार आहेत' यावरही बराच खल आहे. तो हॉस्पिटलात असताना तिथले डॉक्टर आणि नर्स त्याच्यात खुप गुंतले जातात आणि मग आपण प्रयत्नपुर्वक ज्याला बरे करण्यासाठी झटतोय तो बरा झाला की लगोलग फासावर चढणार याचा त्यांना खुप मानसिक त्रास होतो. अर्धा चित्रपट फ्लॅशबॅक आणि अर्धा हॉस्पिटलात आहे...
Pages