ऊटी

Submitted by प्रकाश काळेल on 20 November, 2010 - 17:32

मदुमलई फॉरेस्ट

प्रामुख्यानं निलगीरी फॉरेस्टमध्येच आढळणारं सोनेरी केसांचं माकड दीसलं पण त्याचा फोटो नाही घेता आला. ही सगळीकडं दीसणारी भिडस्त जमातही भरपूर होती.

निलगीरी फॉरेस्ट

या वरच्या फोटोंवरुन कदाचित झांडाच्या उंचीचा अंदाज आला नसेल तर या फोटोंवरुन नक्की येईल!

सूर्य की चंद्र?

पायकारा लेक

दोडा बेट्टा(निलगिरी पर्वतरांगातील सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.

ऊटी लेक

ऊटी-कूनूर टॉय ट्रेन

ऊटी बॉटनिकल गार्डन:

गुलमोहर: 

वॉव.. क्या बात है!! पिक्चर पोस्टकार्ड्स बनतील सहज ..
मदुमलाई ला कधी गेलास?????
मिलिन्द वाटवे यांनी मदुमलाई फॉरेस्टवर खूप इन्टरेस्टिन्ग पुस्तक लिहिलय..अभयारण्य म्हणून.. त्या पुस्तकातही असेच सुरेख फोटो आहेत..

फोटो छान आहेत ...१क्लास...... पण काही फोटोंत वॉटर मार्क जास्त ठळ्क दिसत आहेत...
फोटो पाहण्या एवजी लक्ष तेथेच जात आहे.(वॉटर मार्क फोटोंच्या डाव्या किंवा उजव्या बाजुला टाकल्यास उत्तम).

कोणत्या कॅमेर्‍याने घेतले हे जरूर कळ्वा.

अप्रतिम फोटोज,
<<<<इतक्या दिवसानंतर आलास ते एकदम जबरदस्त आलास रे. एक एक प्रकाशचित्र अप्रतिम आहे. वॉटरमार्क स्टाईल खासच..>>>>अनुमोदन

प्रकाशजी परत उटीला जाऊन आल्यासारख वाटल...खुप सुंदर
<<दोडा बेट्टा(दक्षीण भारतातले सर्वाधिक उंचीचे ठीकाण)वरुन दीसणारं ऊटी शहर.>>
दोडा बेट्टा हे निलगीरी पर्वतरांगा मधील सर्वात उंच शिखर आहे आणि अनामुडी (Anamudi - मुन्नार, केरळ) हे दक्षिण भारतातले सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे.

Anamudi => http://en.wikipedia.org/wiki/Anamudi

Doddabetta => http://en.wikipedia.org/wiki/Doddabetta

निलगिरी फॉरेस्ट, तिथले धुक्यातले फोटो, चंद्र कम सूर्य,त्याच्यानंतरच्या एकांड्या झाडा खालचा तुझा वॉटरमार्क, हिरवाईतले उटी लेक, ट्रॉय ट्रेन मधली चिमुरडी ( ट्रेनच्या स्पीडसह),... अप्रतिम फोटो. शब्द संपले माझे !
शेअर केल्याबद्दल धन्स रे Happy

सर्वांचे मनःपुर्वक आभार. Happy
आशिष धन्यवाद,चूक दुरुस्त करतो. जालावर आधी कुठेतर चुकीचे वाचले त्यामुळे गफलत झाली.
लिहीण्याआधी खात्री करुन घ्यायचा कंटाळा केला.

कॅमेरा - कॅनॉन-पॉवरशॉट एस-३, ६ मे.पी.

.

मधले काही फोटो पाहून मला रोझा सिनेमामधला तो अतिरेकी पकडून नेतात ना त्या सीनची आठवण झाली.

फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच.

प्रकाश,
बर्‍याच दिवसानी मायबोलीकडे फिरकलो आणि हे फोटो पाहून थक्क झालो. ही 'प्रकाश'चित्रे म्हणजे अप्रतिम प्रतिमा आहेत असे म्हणावेसे वाटते. खूप खूप आवडले.
-मुकुंददा

Pages