पुणे - श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी गटग - १३ नोव्हेंबर, २०१०

Submitted by चिनूक्स on 1 November, 2010 - 23:47
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणार्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मित्रहो,

श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१० रोजी गटग आयोजित केलं आहे.
वेळ - सकाळी ११ ते दुपारी २.

मुंबईचे व इतरत्र असलेले मायबोलीकर यांनी या गटगला उपस्थित राहावे, ही खास विनंती.

कृपया या धाग्यावर नावनोंदणी करावी म्हणजे पुढची व्यवस्था करणं सोपं जाईल. Happy

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 13, 2010 - 00:30 to 03:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मज्जा आली नेहेमीप्रमाणेच गटगला Happy मल्टी स्पाईस मस्तच हॉटेल आहे, जेवण एकदम खास होते. हे हॉटेल सिलेक्ट केल्याबद्दल चिनूक्सासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत Proud खूप लोक आले होते गटगला, किमान ३० तरी असतील, काही नवीन लोकांशी, काही जुन्या लोकांशी भेटी झाल्या, हास्यविनोद, खेचाखेची तर नेहेमीचीच. वेमांशीही दिलखुलास बोलणे झाले. टण्यामामाने माझे सर्व सामान दिले आहे. एकूणात, ऑफिसामधून माबो अ‍ॅक्सेस करतोच, २ तास माबोकरांना भेटायला ऑफिसातून बाहेर पडणे तितकेच मजेचे असते Wink

खूप छान झाले गटग Happy
वेमांना भेटून खूप छान वाटले. बर्‍याचजणांना पहिल्यांदाच भेटले आणि गप्पा करुन एकदम मस्त वाटलं अगदी!
केश्विनी, पावसकर तुमच्या गिफ्ट्सबद्दल धन्यवाद Happy

मूळ गटग मग रेंगाळलेले गटग असं संपवत आत्ता अर्ध्या तासापूर्वी घरी आले. अर्थातच मजा आली.
भरपूर लोक आणि कमी वेळ अश्यामुळे काही लोकांशी बोलायचं राहून गेलं. नेक्स्ट टाइम!!

हे हॉटेल सिलेक्ट केल्याबद्दल चिनूक्सासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत>>>>>पूनम, हे लिहिताना तुझ्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज असेल अशी आशा आहे Proud

खुप मजा आली. बरेच जण भेटले. काहीकाही जणांना पहिल्यांदाच भेटले पण असं वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटतेय. मी पावणे सातला घरी सुखरुप पोहोचले. दिमडूने मला स्वतःचे घर मल्टीस्पाईसच्या जवळ आहे याचा मला पत्ता आधी लागू न देता (मी "अगं मग नको तू एवढ्या लांब यायचा त्रास घेऊन" हे म्हणेन म्हणून) मला स्वारगेटला तिच्या घोड्यावरुन सोडलं Happy

आज एकाच दिवसात परत आले तरी काही शीणच नाही आला. सकाळी नीरजाच्या कृपेने फुलासारखी पुण्यास गेले आणि तिकडचं मनाजोगं सगळंच आणि परतीचा प्रवासही छान झाला.

अजय, जीएस, प्राची, साजिरा, आशूडी, आरती२१, रैना, डूआय, अश्विनीके, नीरजा, स्वाती, देवा, श्रेयस, पूनम, मिल्या, शैलजा, रूमा, मयूरेश, अरभाट, टण्या, ह बा, शंतनु, चिनूक्स, दिमडू, अग्निपंख, वळसंगीकर, अनंत पावसकर, प्रॉस्पेरिटी इतक्या लोकांनी या जीटीजीला हजेरी लावली. पोट आणि गाल दुखेस्तोवर हसलो. सकाळी अकराला सुरू झालेले जीटीजी रेंगाळलेल्या जीटीजीच्या स्वरूपात वरच्यांपैकी निम्म्या लोकांसह संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालले. मी वृत्तांत नाही, पण क्षणचित्रे टाकणार. वृत्तांत डूआय लिहिणार आहे. सोमवारी. कृपया. कळावे. धन्यवाद.

खरच मजा आली . वेमांना भेटून खुप छान वाटलं. एकदममोकळे पणाने बोलले Happy
बाकीच्या सगळ्यांशी ओळख झाली ( काहींशी फक्त तोंड ओळख ).
नव्या मैत्रिणी मिळाल्या.
केआश्विनी आणि पावसकर धन्स - गिफ्ट्साठी Happy
मी पहिल्यांदाच या सगळ्यांना भेटले, पण मला नवख्यासारखे वाटले नाही. पुन्हा भेटूच Happy
साजिरा, सगळ्यांचे फक्त एकेकच आयडी लिहिलेस. त्यांचे डुआय कोण लिहिणार Wink
खरा डूआय - वाट बघतेय वृंताताची Happy

कैतरी काय बाजो ! मी आणि रैनाने आणि दिमडूने तर तुम्हाला मधे बसवून कित्ती मारल्या - गप्पा ! Rofl एवढ्यात विसरलात गटगला येऊनसुद्धा? Angry

.

छान झाले गटग Happy

काही नवीन माबोकरांशी व काही जुन्या (माबोवर पडिक!!!)लोकांशी भेटी झाल्या... मज्जा आली Happy

हम्म! मस्त धम्माल केलेली दिसतेय लोक्स. फोटो आणि वृ टाका की लवकर. फार फार उत्सुकता लागु रहिलेय Happy

वा वा! सही मज्जा आलेली दिसतेय. क्षणचित्रे आणि वृत्तांत कधी वाचायला मिळेल, असं झालंय... Happy

Pages