ऊशी

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 October, 2010 - 02:30

नीज समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या कुशी !
मग या रात्रीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गादी आणि मस्तक या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सानी Happy

भुंगेशा!!!! Wink

अभ्यासाची माझ्यापाठी
घोंघावती माशी
पण मी मात्र घेऊन
स्वप्नांची ऊशी

खेळत बसते सगळ्यांशी
वर्षावाली भिशी
कविता पाडते इकडे
पिऊन थोडी देशी

कंटाळा आला जरा
की क्लिकते गगो जोशी
आठवून देऊन अभ्यास
का देतोस मला फाशी??? Proud

तरी 'काशी' र्हायलेय अजून, कोण करणार? Wink
(प्रतिसाद अश्लिल वाटत असल्यास परस्पर उडवून टाकावा ही मान्नीय अ‍ॅडमिनना विणंती)

माझे झब्बू एन्जॉय करणार्‍या सर्वांचे आभार... आणि मुक्तेश्वरांचे तर खुपच आभार... प्रेरणास्त्रोत आहेत ना ते!!! Happy

दक्षे, तुला 'सुशी' म्हणायचेय काय?>>>> आगावा, तुझी पण विच्छा पूरी करतेय रे.... Proud

सुशी
=====
मंमं समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या टेबलाशी !
मग या सागरी राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
बोटे आणि तोंड या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत खादाडीचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी लिबलिबीत सुशी ! Proud

हे काही विशेष जमलं नाहीये... पण दक्षीची इच्छापूर्ती करण्याचा अयशस्वी प्रयत्न... Happy

ऋषी
===
ध्याना समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अंतरात्म्याशी !
मग या शांतीच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
मन आणि आत्मा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत एकाग्रतेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी साध्वी ऋषी !

लो भुंगेश, तुम्हारी भी हसरत पूरी हुई.... Proud

कुशी
====
निद्रे समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अस्वस्थतेशी !
मग या चल-बिचलतेच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
शांत आणि अशांत झोप या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत अनिद्रेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी बदलती कुशी !

सानी ऋषीवरून गदारोळ होऊ शकतो...... हे कोण्या आश्रमातल्या साधुचे काव्य तर नव्हे ना... >>> तुच करतोयस गदारोळ लब्बाडा Proud

भुंग्या....... कवितेच्या बाफवर चर्चा रंगलीय मित्रा.

मुक्तेश्,अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व. Happy

सानी, टकसाल हा मराठीतल्या टकसाळचा अपभ्रंश असावा. हिंदीत हा शब्द असाच आहे का माहीत नाही.
पण ज्या पध्दतीने टाकसाळीतून नाणी पडावीत तश्या तू कविता पाडतेय्स ते पाहून मला हा शब्द आठवला, आणि नव्यानेच हिट झालेल्या "मुन्नी बदनाम हुई" या गाण्यातली वरील ओळ मी इथे लिहिली. तसेही सगळेच कविता पाडतायत म्हणून दुनिया टक्साल हुई... Proud
हुश्श्श्स....... एवढे संदर्भासहित स्पष्टीकरण दहावीत लिहिले असते तर मराठीत टॉपर झालो असतो.. Lol

घेऊन मंदारची बशी
जातो आता काशी
सानीसाठी बनतो ऋषी
शंकराचे तीर्थ समजुन
घेतो दारु देशी
शंकराचा नंदी होऊन
मारतो एकएकास ढुशी

(तुमचा चर्चात्मक प्रतिसाद व त्यातुन निर्माण झालेल्या रचनांना शुभेच्छा व आभार)

शंकराचा नंदी होऊन
मारतो एकएकास ढुशी>>>> मुक्तेश्वर..... Rofl

ढुशी
====

फायटिंग समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते त्याच्या शिंगांशी !
मग या क्रोधाच्या राणीची
साथ सोडेल तरी तो कशी !
विवेक आणि हिंसा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत मारामारीचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण त्याची सखी
अं हं ती तर त्याची मुक्त ढुशी ! ('मुक्त' हा मुक्तेश्वरांचा शॉर्टफॉर्म आहे. Proud )

धन्यवाद कॅ. ला. सा. ( डॉ. कॅलास गायकवाड, लाजो, सानी)
तसेच इतर मान्यवर कवी

Pages