ऊशी

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 October, 2010 - 02:30

नीज समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या कुशी !
मग या रात्रीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गादी आणि मस्तक या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला....... Proud (इथे पोटफोड्या "ष" घातलास तर चालेल का मुक्तेश्वर....... नाही ना....... म्हणून "उशी" म्हणाव.... Proud :हहगलो:)

दुपार समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझी बशी !
मग या चहाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
कप आणि जमीन या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत फुर्रर्रर्रकण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी सपाट बशी !

तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !

मस्तच जमलिये. विनोदीही वाटते आहे. तुमच्या सर्वच कविता वाचल्या छान लिहीता तुम्ही. सदिच्छा!!!

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि हात या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत लडण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी चपळ माशी!>>>>>

Biggrin

आपत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या प्राक्तनाशी !
मग या आयुष्याच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
जीवन आणि दैव या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी वृषभ राशी !

एकांत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या ओठाशी !
मग या धुंदीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि हैवान या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी दारु देशी !

सानी... Biggrin

मंदार, आता उशी, बशी, माशी नंतर "जोशी" घेऊया का रे???? >>> भुंग्या तुझ्या कल्पनेवरुन...

सर्फिंग-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या स्क्रिनशी !
मग या माबोच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि दुरावा या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती आपली गगो जोशी ! Biggrin

Pages