गोडाचा शिरा

Submitted by सायो on 9 September, 2008 - 15:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेला बारीक रवा १ वाटी, साजूक तूप- २ टे.स्पून, साखर-१ ते सव्वा वाटी(किंवा चवीप्रमाणे), गूळ-सुपारीएवढा खडा, वेलची पूड-अर्धा ते एक टीस्पून, केशर-४,५ काड्या, पिस्ते,बदाम्,काजू, बेदाणे (चवीप्रमाणे), पाणी -२ वाट्या, दूध- अर्धी वाटी.
(रवा, पाणी,दूध,साखर ह्यांची मापाची वाटी एकच असावी)

क्रमवार पाककृती: 

गोडाच्या शिर्‍याची ती कसली रेसिपी टाकायची असा विचार मनात आला लिहिण्यापूर्वी. सगळ्यांचे घालण्याचे जिन्नस जरी तेच असले तरी मला आवडतो तसा शिरा जमायला बराच वेळ जावा लागला. आणि शेवटी जमला म्हणून रेसिपी इकडे टाकते आहे.तुम्हांलाही आवडेल अशी आशा आहे.
कृती:
रवा बारीक गॅसवर थोडं तूप घालून खमंग भाजून घ्यावा.(अगदी लालसर करायची गरज नाही). भाजून झाल्यावर बाजूला ठेवून नॉनस्टीक पॅनमध्ये २ वाट्या पाणी उकळत ठेवावं. उकळी आल्यावर त्यात साखर, गूळ, वेलची पावडर घालावी. अर्धी वाटी दूध गरम करुन त्यात केशर घालावं म्हणजे छान रंग येईल. पाण्यात घातलेली साखर विरघळली की त्यात दूध घालावं. नीट ढवळून काजू,बदाम, पिस्ते, बेदाणे घालावेत. उकळी आली की त्यात भाजलेला रवा पेरत पेरत घालावा. एका हाताने ढवळत राहावं म्हणजे गुठळी होणार नाही. मिडियम गॅसवर झाकण घालून वाफ काढावी व पाणी आटल्यावर गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांकरता
अधिक टिपा: 

मी ह्यात एवरेस्टचा केशरी दुधाचा मसालाही घालते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन रेसिपी.. मी आज पहिल्यांदाच पाहिली इथे.

उद्याच करुन बघते.

आज सिंधी मावा शिरा केलेला, उद्या गोडाचा शिरा करते... Happy

साधना

सायो, थँक्यु थँक्यु!
अश्या प्रकारे कधीच केला नव्हता शिरा. एव्हरेस्टचा केशरी दूध मसाला पण आहे घरी. नक्की करते.

रेसिपी छान आहे. Happy
आणखी एक टिप् : एखादा चमचा तूप अगदी शेवटी घातलं (गॅस बंद केल्यावर लगेच घातलं तरी चालेल) आणि नीट परतून मिसळून घेतलं की छान मोकळा होतो शिरा.

अमेरिकेत जी साखर मिळते त्याला भारतातल्या साखरेइतका गोडवा नसतो की काय कोण जाणे. पण दूध घालुन शिरा करताना हमखास सव्वापट साखर घातली तर बरी लागते.

माझी मम्मी अप्रतीम शिरा करते. तिच्याच प्रमाणाने केलेला शिरा माझा बरा झाला तरी मी स्वतःला धन्य समजेन.

सायो, रेसिपी छानच आहे. तूप कमी आहे त्यामुळे करुन पहाणेत येईल.

तूप काय नी साखर काय, कमी जास्त करणं शेवटी आपल्या हातात आहे. ह्या मापाने मऊ शिरा होतो, अगदी मोकळा (उपम्यासारखा) नाही हे इच्छुकांनी ध्यानात घ्यावे. Proud

शिरा खावासा वाटतोय. आता वीकएंडला रुनी इष्टाइल अ‍ॅपल केक करु की शिरा?
-एक कनफ्युज्ड इच्छुक.

सायो, उद्या करुन पाहणार Happy

अजुन एक : फळांचा शिरा

रवा एक वाटी घेतला असेल तर मिश्र फळांचे तुकडे (संत्र, मोसंब, सफरचंद, केळं, चिकू, असल्यास आंबा) एक वाटी घ्यावेत. बाकी साहित्य वर सायोने दिलं आहे त्याप्रमाणेच, फक्त साखर घ्यावी, गूळ घालू नये. फळं घालायची असल्यास तूप जरा जास्त लागतं.

रवा खमंग भाजून घ्यावा आणि बाजूला काढावा. तूपावर चिरलेली फळे खमंग परतून घ्यावीत. परतताना त्या फळांना रस सुटतो, तो पूर्ण आटू द्यावा. मग रवा घालून पुढे नेहमीसारखा शिरा करावा. रव्याच्या सम प्रमाणातच साखर घ्यावी नाहीतर फारच गोड मिट्ट होतो शिरा.

मी पण, मी पणः-
१ वाटी रवा, अडीच वाट्या दूध, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी ड्राय फृटचा चुरा (काजु, बदाम, आक्रोड), पाउण वाटी साखर, पाव वाटी तूप. दुध छान घट्ट नसेल तर पाणी घालु नये, तीन वाट्या दुधच घ्यावे. ड्राय फ्रुटसाठी मी बदामाचे काप करायची किसणी वापरते.

रवा आणि ड्राय फृटचा चुरा तूप घालुन छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. एकीकडे दुध/पाणी गरम करुन घ्यायचे. त्यातच केशर घालुन ठेवायचे. रवा भाजला की त्याच कढईत दुध घालायचे आणि भराभरा हलवुन एकसारखे मिश्रण करायचे. झाकण घालुन एक वाफ आणायची. सगळे दुध शोषले गेले नसेल तर जरा हलवुन दुध अटु द्यायचे. साखर घालुन पुन्हा एकजीव मिश्रण करुन एक वाफ घ्यायची.

ह्या पद्धतीने केलेला शिरा गार झाल्यावरही छान मोकळा रहातो. फार गोड होत नाही. रवा चांगला तुपात थबथबेल इतके तुप घातले तर उत्तमच Happy पण वाढत्या वयाचा आणि आकारमानाचा विचार मनात असू द्यावा Proud

सायो, आत्ताच केला शिरा त्यात एवरेस्टचा मसाला घातला. छान चव आलीये आणि पिस्त्याचे हिरवे तुकडे अगदी १/कॉस सी दिसताएत Happy

मंजूडी, थॅन्क्स. फळांचा शिरा मी कधी केलेला नाही. केळं घालून करतात हे माहितेय, खाल्लेलाही आहे. करुन बघायला हवा.

जयावि चं हे पोस्ट जुन्या हितगुज वरचं.. या कृतीने शिरा अगदी मस्त होतो, स्वानुभव आहे (करण्याचा, नुसता खाण्याचा नाही :))
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मी रवा (इथे ३-४ प्रकारचे रवे मिळतात) Turkish superfine semolina वापरते....... हा अगदी बारीक असतो. सव्वा वाटी रवा अगदी तेव्हढ्याच तुपात मस्त खमंग भाजून घ्यायचा. वर मस्तपैकी तूप तरंगतं. रवा भाजतांनाच त्यात बदाम, काजू, पिस्त्याचे जे तयार काप असतात ते टाकते म्हणजे ते सुद्धा खरपूस लागतात.

दुसरीकडे सव्वाच्या दुप्पट दुध घ्यायचं म्हणजे अडीच वाट्या आणि तापायला ठेवायचं. ह्यात केशर घालयचं. दुधाला उकळी आली की हे केशराचं दुध रव्याच्या कढईत हळुहळु ओतायचं. छान मस्तपैकी मिसळायचं. मग त्यात २ वाट्या साखर आणि २ केळी अगदी बारीक करून घालायची. व्यवस्थित मिक्स केल्यावर अगदी मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत झाकून ठेवायचं. साधारण ३-४ मिनिटं लागतात. हे झालं की मग थोडा वेळ शिरा तसाच झाकून ठेवायचा म्हणजे मस्त शिजतो.

माझं हे प्रमाण तुला जरा विचित्र वाटेल पण इथल्या वस्तू वापरुनच हे प्रमाण मी ठरवलंय. फ़ारच सुरेख लागतो हा शिरा आणि रंगही छान मंद केशरी दिसतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ पोस्ट येथे आहे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=867470#P...

सायोच्या कृतीने केला शिरा आज . अगदी मस्त झाला.
पुढच्या वेळेस जयावि च्या पद्धतीने करुन पाहीन

जयावीच्या कृतीने शिरा करून पाहीला. खूपच छान झाला होता. मला कधी शिरा फारसा जमलाच नाही (आणि त्यामुळे आवडलाही नाही फारसा) पण या कृतीने एकदम मस्त! तीन दिवस खात होते Happy

क्रीम ऑफ़ व्हीट , हा रवा म्हणुन मी कधी कधी वापरते. हा खुप चांगला फुगतो .
५०% लोह असल्या मुळे जरा खाताना समाधान.
~ कीर्ति

आज पाडवा म्हणून वरच्या शिर्याची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त झाला आणि पहिल्यांदाच करुन पण पटकन जमला.

असुदे>> खरेच अरे मी दर शनिवारी शनिमहात्मय वाचून मग नैवेद्य म्हणून असलाच गोड लुसलुशित शिरा करत असे पण आता महिन्यातून एकदाच करते. फार मोह पडू लागला त्या शिर्‍याचा. शिरा गरम गरम, त्यात केशर, वेलची. अहाहा. त्यात पहिले खाउन होईतो बारीक ग्यास वर ठेवायचे म्हणजे एक खरपुडी तयार होते तीतर अफलातून लागते. करून बघ. जळले नाही पाहिजे, हल्के ब्राउन व्हायला हवे.
आज एवरेस्ट चा ­­मसाला घेतेच घरी जाताना. नवी आयडिया आहे. एरवी आपण उपम्याचे धनी.

सोनेरी ब्राउन मामीसा, बटाट्याची काप शॅलो फ्राय करताना येतो तसा.

:नाकपुड्या अजूनच फेंदारुन वास घेणारा सश्याच्या शेपमधला भावला:

सिंडे, १ वाटी रव्याला, अडीच वाट्या दूध आणि अर्धीच वाटी पाणी? म्हणजे एरवीच्या दूध-पाणी मापाच्या उलट आहे बरोब्बर हे. चिकट होत नाही का इतक्या दूधामुळे?

मी केलेला शिरा मोकळा होत नाही कधीच Sad जास्त तूप घातलं, दूध अगदी कमी, समप्रमाणात दूध-पाणी, फक्त पाणी, जास्त हलवला, कमी हलवला, फक्त बारिक आचेवर केला, दणादण आच ठेवून केला- सुचतील ते सर्व प्रकार केले, पण दरवेळी शिरा, दोन वाफा दिल्या की गच्च! मोकळाच होत नाही Sad Sad ’रवाच चांगला नाहीये’ म्हणत नेहेमी माघार घेतली आहे Sad

ओके, पुरेशी निळी झाली आहे. माझ्यावर दया आली असेल तर टिप्स द्या- हमखास मोकळा शिरा कसा करावा?

पूनम आता फक्त दूध घालून पहा. तेवढेच दिसले नाही तुझ्या पोस्टीत.
मी पाणी घालतच नाही. छान होतो तसाच.

सिंडीचे प्रमाण तिकडच्या हवामान/पदार्थांसाठी योग्य असेल गं.

पौर्णिमा, रवा थोडा खरपुस भाजून बघ. रवा कमी भाजला जात असेल तर शिरा गच्च होउ शकतो Happy
रैना Happy पण कधी कधी फक्त पाण्यातला शिरा पन आवडतो मला, करून बघच एकदा .

अमा, अन त्यात तूप, रवा, पाणी अन साखर फक्त. वेलची पूड, बेदाणे, ...(माझ्या लेकाच्या भाषेत कचरा) काही टाकायचे नाही Happy

आरती>> व्हय व्हय. लैच पोस्टीझाल्या काय माझ्या, आणि शिरा होतो किती झट्पट. आता पॉझिटिवली टळते. रवा भाजल्याचा वास काम करू देइना.

तूपाचं प्रमाण वाढवून बघ थोडं. छान गुलाबी रंगावर भाजतेस ना ? Wink

रवा फार बारीक आहे का तुझ्याकडे ?

रैना, भारतात पण ह्योच परमाण गं बाई Happy

पूनम, हा वर लिहिलेला शिरा अगदी मोकळा नाही होत पण मला जरा गच्च गोळाच आवडतो. खायला जास्त सोप्पा वाटतो. हवं तर ह्यात पाण्याचं प्रमाण जरा कमी करुन बघ. आणि रवा चांगला खरपूस, खमंग भाज.

पूनम
जाड रवा वापर, खरपुस भाज. पाणी+दूध रव्याच्या दुप्पट किंवा सव्वा दोन पट प्रमाणात घेवून बघीतलेस का कधी अडीच-तीन पटीऐवजी? कदाचित त्याने मोकळा होईल. म्हणजे माझा तरी होतो.

Pages