अजून एक निसर्गचित्र

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२००९च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नचिकेताने पहिल्यांदा हातात सीरीयसली रंगपेटी घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या साथीमुळे पुणं गप्पगार पडलं होतं, तेव्हा घरात नुसतंच खेळताना हा चाळा लागला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे पहिलं सीरीयस चित्र त्याने काढलं-
http://www.maayboli.com/node/10456

माझ्या दृष्टीने अगदीच फसलेलं हे चित्र (प्रपोर्शनच्या मानाने) मायबोलीच्या अनेकांनी उचलून घेतलं. मग सुरू केली चित्रकलेची शिकवणी. शिकवणीतही ताईने काढून दिलेली चित्रंच मुलं थोडी डार्क करून रंगवत आहेत. म्हणून त्याला स्वतंत्रपणे चित्र काढूनच मग रंगवायला प्रोत्साहन देत राहिलो. सुरूवातीला अर्थातच जमलं नाही. मग तो हौसेनी स्वतःच काढायला लागला. खूप भारी चित्र नाही जमलं तरी चालेल, पण मनात जे आहे, ते समजलंय त्याला आणि म्हणूनच उतरवायला येतंय आता. तो अजूनही 'डोंगर, नदी, सूर्य' यातच आहे पण कल्पना अजून स्पष्ट होत आहेत.

त्याला काही चित्रकार वगैरे बनवायचं ध्येय वगैरे नाहीये Happy एका जागी बसावा, थोडं कल्पनेत रमावं, रंगात बुडावं इतपतच विचार होता चित्रकलेच्या शिकवणीचा. त्याला आवड लागली आपोआपच ते बघून छान वाटतं, म्हणून हा सगळा प्रपंच. ज्यांनी ज्यांनी त्याला नकळत का होईना, प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांना एक झलक दाखवायची होती, म्हणून हे चित्र-

सध्या सुट्टी सुरू झाल्यामुळे क्रिकेट जोरात चालू आहे. आमचा हा क्रिकेटपटू टोपी, बॅट, बॉल घेऊन सदैव तयार असा असतो Happy

drawing1.JPG

प्रकार: 

झक्कास अगदी.. मला चित्र पाहून ती जाहिरात आठवली:
एनर्जीने भरलेली मुलं मारतात सिक्स
उन्हाची होते टांय टांय फिस्स्स
Happy

मस्तच गं.. झाडे आवडली Happy

माझ्या लेकीलाही नर्सरीत जायच्या आधीपासुन चित्रकलेचा क्लास लावला होता, ओळखीतल्या एकाने सुरू केलेला म्हणुन.. तिची चित्रकला तर ब-यापैकी झाली पण इंग्रजी व देवनागरी अक्षरही खुप सुधारले त्यामुळे.

किती छान वाटलं .. ही प्रस्तावना वाचून मग चित्र पाहताना.. थेट चित्र बघण्यापेक्षा, चित्र काढणारी मुलं बघणं हे नेहमीच मनोहारी चित्र असतं! Happy
नचिकेतला सांग, मस्त चित्र!

http://www.maayboli.com/node/9991

अनिशा, गणेशोत्सव २००९ ह्या ग्रूपमध्ये सामिल हो. वर लिंक दिली आहे, त्यावर सगळी चित्र आहेत.

हो आशू Happy इतका तल्लीन होऊन रंगवत असतो, की मलाच बघवत नाही. मी जाऊन जाऊन त्रास देते त्याला मुद्दाम Proud आता रंगवतानाच्या पसार्‍याचा फोटो काढून टाकेन इथे Happy

मस्त
सानुने असच एक निसर्ग चित्र काढल गेल्या आठवड्यात्.डोंगर दोन डोंगरांमधे मानवी चेहरा असलेला सुर्य वगैरे. पण एकाखाली एक दोन सुर्य काढले. काय तर म्हणे एक आई नी एक बाळ सुर्य Proud एक्स्प्लेनेशन काय तर प्रत्येकाला आई ही असतेच Proud

>>>> मला सगळी लहान मुलं सुर्याला मानवी चेहरा का देतात हा प्रश्न पडतो
टण्या, मग तुझा लगेच "अन्धश्रद्धानिर्मुलनाचा" विचार असेलच, नाही? Proud

पूनम, किती नेटकं काढलंय गं चित्र. गणेशोत्सवातलं तुझ्या ब्लॉगवर पाहिलं होतं. ते प्रपोर्शन वगैरे सगळ्या आपल्या कल्पना बरं का. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी विचार असणार तसं काढताना. मला तेही फार आवडलं होतं.
खूप खूप शुभेच्छा छोट्या चित्रकाराला Happy
कविता, तुझ्या मुलीचे एक्सप्लनेशन पण भारी एकदम Happy

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy

नारळाच्या झावळ्या जरा वाळक्या आल्यात असं म्हटलं त्याला, तर 'आता ऊन आहे ना, झाडं वाळतात अगं' असं बोलून झक्क सारवासारव केली! Proud

काल त्याला अपलोड केलेलं चित्र आणि तुमचे अभिप्राय दाखवले. एकदम खुश झाला Happy पुन्हा धन्यवाद.

कविता Happy अगदी पर्फेक्ट लॉजिक आहे की गं, आपली तर बोलतीच बंद! Happy

मस्त काढलय चित्र... सूर्य तर मस्ट आहे प्रत्येक चित्रामध्ये Happy
माझ्या लेकाच्या कोणत्याही चित्रात हसणारा सूर्य तर हवाच हवा, अगदी चंद्राशेजारीपण Happy

>>>>>काय तर म्हणे एक आई नी एक बाळ सुर्य एक्स्प्लेनेशन काय तर प्रत्येकाला आई ही असतेच <<<<<
कित्ती निष्पाप असतात नै मुलं......
मला आठवतंय मी लहान असताना आईने मला चित्रकलेच्या class ला घातलं होतं पण माझा आणि चित्रकलेचा ३६ चा आकडा. त्यामुळे तो उपक्रम ४-५ दिवसांपेक्षा जास्त चालला नाही. अगदी प्रयोगवहीतल्या म्युकर आणि स्पायरोगायरा वगैरे वगैरे भयानक आकृत्या सुद्धा मी स्वतः नाही काढल्या कध्धी! सगळ्या आकृत्या माझ्या बाबांनी complete काढून दिल्या. Wink

पूनम
चित्रकलेची आवड निर्माण होतेय नचिकेतला हे छानच आहे. हे चित्रपण मस्त आलय.
बाकी माझ्यामते मुलांकडून अगदी प्रमाणबद्ध, सुसंगत रंगसंगती इ. असलेल्या चित्राची अपेक्षा करू नये असे मला वाटते. त्यांना त्यांचे विचार हवे तसे चित्रात मांडता येणे हे जास्त महत्वाचे. (जसे झाड वाळली आहेत ना उन्हात म्हणून अशी वाळकी काढली).
अश्या कितीतरी गोष्टींचा मुले विचार करत असतात जे आपल्या गावीही नसते. त्यामुळे आपल्याला ते सुसंगत वाटत नाही.
त्यांना विचारले की मग ते सांगतात हे असे का काढलय ते. अश्याच विषयावर लोकसत्तामध्ये काही दिवसांपूर्वी शनिवारच्या चतुरंग मध्ये राजीव तांबे यांचा लेख आला होता.

Pages