बोरे

बोरांचे दिवस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 January, 2018 - 23:29

डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्‍या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं.

विषय: 
शब्दखुणा: 

बोरे (लोकसत्ता-चतुरंग मध्ये आज प्रकाशीत)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 October, 2011 - 01:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बोरे