आनंदयात्री

एक उनाड दिवस

Submitted by आनंदयात्री on 27 April, 2012 - 05:48

(अष्टाक्षरीचं शीर्षक वाचून मला याच शीर्षकाचा माझा जुना अनुभव आठवला. तो इथे पोस्टतोय)

विषय: 

रायगड : छोट्या दोस्तांसमवेत (अंतिम भाग २)

Submitted by आनंदयात्री on 24 April, 2012 - 00:16

रायगड : छोट्या दोस्तांसमवेत (भाग १)

लहान मुलं किती लोळतात!!! १८० अंशात वळण्यापासून बसून झोपलेले सापडण्यापर्यंत अनेक प्रकार मुले ट्राय करत असावीत! कुण्या एका लहान मुलाने लोळत लोळत खाली सरकताना मारलेली तिसरी हलकीशी लाथ तोंडावर बसल्यावर मी वैतागून जागा झालो आणि त्याला नीट झोपण्यासाठी सांगणार तेवढ्यात महेंद्र म्हणाले, 'अहो नचिकेत! वर सरका! झोपेत सरकत किती खाली गेलात!' मी अवाक आणि गप्प! (क्षणभर लहान झाल्याच्या आनंदात!)

विषय: 

रायगड : छोट्या दोस्तांसमवेत (भाग १)

Submitted by आनंदयात्री on 22 April, 2012 - 23:55

शिवतीर्थ रायगड! एका अद्भूत इतिहासपुरूषाने उभ्या केलेल्या सार्वभौम साम्राज्याची तितकीच मनोहर राजधानी! कुणी त्याला 'गरूडाचं घरटं' म्हटलं, तर कुणी 'पूर्वेचं जिब्राल्टर'! कितीही वेळा रायगडाला भेट द्या, समाधान आसपासही फिरकत नाही, हे विशेष! पुन्हा पुन्हा तो परिसर डोळे भरून पाहावासा वाटतो, इतिहासातील सर्व वाद बाजूला ठेवून मनातल्या शिवरायांची पूजा करावीशी वाटते आणि त्या महापुरूषाच्या सद्गुणांसमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं. यावेळीही तेच झालं!

विषय: 

बिचकते आयुष्य माझे

Submitted by आनंदयात्री on 11 April, 2012 - 08:35

बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असते कमविलेल्या अपयशावर

मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)

ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!

वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्‍या पावलांवर

ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्‍यावर!

जवळ कायमचे नको आहे तुला कोणी कधीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!

गुलमोहर: 

समीकरण

Submitted by आनंदयात्री on 27 March, 2012 - 04:58

समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या
की त्याला 'इक्वेशन सॅटीस्फाय' होणं म्हणतात...
कुठलीही एक बाजू वरचढ झाली की
समीकरण संपतंच!
समीकरण अस्तित्वात आल्या दिवसापासून
ते 'सॅटीस्फाय' व्हावं म्हणून माणूस
त्या 'क्ष' ला शोधतोय - अजूनही सापडत नाहीये!

नात्याचंही समीकरणासारखंच की!
नात्यामधला 'क्ष' तरी कुठं सापडलाय अजून?

फरक फक्त एवढाच आहे -
समीकरणामधल्या 'क्ष'चा शोध येणार्‍या पिढ्या
तितक्याच आतुरतेने घेत राहतील जगाच्या अंतापर्यंत!
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध कुणाच्याही
इच्छा-अनिच्छांना न जुमानता थांबेल - प्रत्येकाच्या अंतापाशी!

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

खांदेरी-उंदेरी: सार्थकी लागलेला एक रविवार

Submitted by आनंदयात्री on 21 March, 2012 - 00:36

सध्या ऊन वाढायला लागलंय. गडमाथ्यांवरचे आणि आडवाटांवरचे पाणीसाठेही आटायला लागलेत. सकाळी दहा-अकराच्या उन्हात टेकडी जरी चढायची म्हटलं तर शरीर घामेजायला लागलंय आणि घसा कोरडा पडायला लागलाय. 'जलदुर्ग' हा अशा वातावरणात हौस भागवणारा पर्याय असू शकतो.

विषय: 

गजलोत्सव २०१२

Submitted by आनंदयात्री on 6 March, 2012 - 05:23

रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे! यात अनेक माबोकरही होते, म्हणून इथे फोटो पोस्ट करत आहे. (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्‍यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्‍यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))

प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -

गुलमोहर: 

हमी

Submitted by आनंदयात्री on 5 March, 2012 - 04:03

(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्‍यामध्ये सादर केलेली गझल. दोन मतले सुचले होते, दोन्ही इथे देतोय)

जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी

गुलमोहर: 

झाडपण

Submitted by आनंदयात्री on 24 February, 2012 - 03:54

सकाळ-संध्याकाळ-रात्र
तेव्हा गात्रांमध्ये एकच गाणं असायचं...
तू नव्हतीस कधीच,
कारण येण्याआधीच तुझं नेहमी जाणं असायचं...

मागे उरायचे फक्त आभास...
सावल्यांवर स्वार होणार्‍या काही
काळोखी पोकळ्या...
आणि अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे
आयुष्य असतेच गं असे फसवे...

दरवेळी उरामधलं ओझं हलकंच वाटत राहिलं
माझ्याच अनुभवांचं गाव माझ्यासाठीही परकंच राहिलं

तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"

मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,

गुलमोहर: 

वार्‍यामागे पळतो आहे

Submitted by आनंदयात्री on 16 February, 2012 - 01:17

वार्‍यामागे पळतो आहे, क्षणभर उसंत नाही
वारा कोठे नेतो हा मुद्दाही ज्वलंत नाही

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही

- नचिकेत जोशी (२५/११/२०११)

******************
लेकीच्या लग्नाची त्यांना फार काळजी आहे
(गाडी, बंगलाही नसणारा मुलगा पसंत नाही!)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री