वार्‍यामागे पळतो आहे

Submitted by आनंदयात्री on 16 February, 2012 - 01:17

वार्‍यामागे पळतो आहे, क्षणभर उसंत नाही
वारा कोठे नेतो हा मुद्दाही ज्वलंत नाही

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही

- नचिकेत जोशी (२५/११/२०११)

******************
लेकीच्या लग्नाची त्यांना फार काळजी आहे
(गाडी, बंगलाही नसणारा मुलगा पसंत नाही!)

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_16.html)

गुलमोहर: 

छान आहे..

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही>>>>>>> हे जास्त आवडलं

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही >>> खासच.....

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो >>> मिसरा छान...

आवडली Happy

अप्रतिम गझल....... सलग दोन सामन्यात शतकं ठोकल्यासारखं वाटलं..... Wink

तुझ्या तिसर्‍या शतकाच्या प्रतिक्षेत Happy

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही

यातली विनम्रता खूप भावली... मस्त गझल आहे नचि..

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही>>>>>>
हा फारच आवडला
आणि खास म्हणजे संपुर्ण गझलेत शब्दांची जराही ओढाताण वाटली नाही

ये ब्बात नचिकेत..
अश्याच इंटरवेल ने गझला पोस्टत जा, छान काव्य वाचायला मिळतं Happy

वार्‍यामागे पळतो आहे, क्षणभर उसंत नाही
वारा कोठे नेतो हा मुद्दाही ज्वलंत नाही>> मुद्दाही ज्वलंत नाही म्हणत, वार्‍यावर स्वतःला सोपवण्याची कल्पना सुंदर!

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही>> क्या बात! सरळ- साधा, पण अप्रतिम आशय!

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही>> अह्हा!! मला यात विनम्रतेपे़क्षाही हलकी चीड जाणवली समहाऊ! Happy

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही>> प्रवास! क्लास..

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही>> काय म्हणावे, खयाल मस्त!

तर शेवटी काय की, संपुर्ण गझल आवडली..
जियो Happy

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

सुरेख.

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही...सुंदर शेर

चांगली गझल

छानच.

धन्यवाद दोस्तहो! Happy

यातली विनम्रता खूप भावली... मस्त गझल आहे नचि..

मला यात विनम्रतेपे़क्षाही हलकी चीड जाणवली समहाऊ!
त्या शेरामध्ये विनम्रताच पोचवायची होती...पण नंतर वाचताना चीड जाणवू शकते हेही जाणवलं. धन्यवाद Happy

भुंगा, वैभव१२३४५६७८...(:P) - पेशल आभार Happy

मंदार - हम्म्म समजलं.. Happy

नचि, जामच आवडली ही गझल. एक एक शेर आवडला रे. जबरी लिहितोस तु.
लेटेस्ट तुझं जे काही वाचलं त्यामुळे तुझं सगळं जुनं लेखन या शनिवारी-रविवारी खणुन काढावंच लागणार मला. Happy

लेकीच्या लग्नाची त्यांना फार काळजी आहे
(गाडी, बंगलाही नसणारा मुलगा पसंत नाही!) Lol एकपण कमेंट नाही यावर. आश्चर्य आहे. Wink

बागेश्री +१ .... सहमत...

खयाल सहज सुंदर, तितकीच मांडणीही... Happy

(अवांतर- खरे तर या काफियांची ईतकी अप्रतिम गझल होवू शकते यावर विश्वासच बसत नाही)

धन्यवाद दोस्त्स! Happy

लेटेस्ट तुझं जे काही वाचलं त्यामुळे तुझं सगळं जुनं लेखन या शनिवारी-रविवारी खणुन काढावंच लागणार मला.
मग काय ममा? लावलीस का खणती? काय सापडलं Wink

तु काय ऐकत नाही बाबा !!

अरे विश्वेश, बास का राव! मी तुझं कधी ऐकलं नाही का? Proud

आज सहज तुमचे लेखन पुन्हा पाहिले आणि ही गझल पुन्हा वाचायला मिळाली

सगळेच शेर सुरेख

=============

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही
>>

व्वा व्व्वाह

तुला मिळवणे हाती नाही, गमावणेही नाही - सुरेखच

तरहीसाठी ओळ द्यावी अशी गझल

मस्त

(अवांतर - आयला बरेच दिवस साचलेले आता गझलेत गुंडाळावेसे मलाही वाटू लागले आहे) Proud

सुरेख गझल.. सर्वच शेर आवडले..

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही >> लाजवाब!

धन्यवाद.. पुलेशु Happy

Pages