आनंदयात्री

साक्षात्कार

Submitted by आनंदयात्री on 8 February, 2012 - 06:25

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

गुलमोहर: 

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)

Submitted by आनंदयात्री on 2 February, 2012 - 00:41

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

रतनवाडी! सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!
गावातून दिसणारा रतनगड आणि खुट्टा -

खुट्टा क्लोजअप -

विषय: 

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

Submitted by आनंदयात्री on 31 January, 2012 - 23:46

तुम्ही जर मुरलेले भटके असाल, तर शीर्षक वाचताक्षणीच समजायचं ते समजून गेला असाल. आणि नसाल तर, तुम्हाला सांगताना मला विलक्षण आनंद होतोय - ही एक सह्याद्रीमधल्या फारशी प्रसिद्ध नसलेल्या आणि कदाचित म्हणूनच अप्रतिम आडवाटांमधली, भ्रमंती आहे! पार रतनवाडीपासून कात्राबाईला वळसा घालत, आजूबाजूचा अप्रतिम नजारा डोळ्यांत साठवत, कातळ-कपार्‍यांतून चालत, अगदी गुहेरीच्या दारापर्यंत आणि पुढेही थेट कोकणात उतरणारी ही वाट दिवस पूर्ण सार्थकी करते.

तर, त्याचं असं झालं -

विषय: 

मनातली 'शाळा'

Submitted by आनंदयात्री on 24 January, 2012 - 23:50

तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्‍या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो.

विषय: 

बंद पडलेल्या घड्याळासारखं...

Submitted by आनंदयात्री on 20 January, 2012 - 03:43

असं वाटतं, बंद पडलेल्या घड्याळासारखं आयुष्य कायमचं थांबून जावं!

धावणार्‍या काट्यांसारखे एकमेकांसोबत क्वचित,
पण एकमेकांमागे नेहमीच आपण फिरत असतो...
जरा दम घ्यावा म्हटलं तर तिसरा लाल काटा
जणू क्षणांची जमावबंदी असल्याप्रमाणे पळवत असतो...

सगळे व्याप, ताप, भोग, रोग,
जखमा, औषधं, रंगत, संगत,
याच फिरण्यामध्ये बसवायचं असतं!
आणि वेळ चुकली की दरवेळी न बोलता
घड्याळ पुन्हा वेळेप्रमाणे लावायचं असतं!

कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे!
काटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा?

गुलमोहर: 

देहरीचा गोरखगड (प्रकाशचित्रे)

Submitted by आनंदयात्री on 17 January, 2012 - 23:52

पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.

सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

Submitted by आनंदयात्री on 11 January, 2012 - 23:24

सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान

Submitted by आनंदयात्री on 10 January, 2012 - 23:53

सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट

Submitted by आनंदयात्री on 8 January, 2012 - 23:18

सह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा

Submitted by आनंदयात्री on 3 January, 2012 - 23:26

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री