बावीसतेवीस वर्षांपूर्वीचा काळ माझ्यासाठी संक्रमणाचा होता. व्यावसायिक जगात स्थिरावण्याचा, आपले कुटुंब आणि नजीकच्या वर्तुळाने बनवलेल्या आपल्या धारणा जगाच्या वास्तवाशी ताडून बघण्याचा आणि आपली जी काही मते असतील ते अंतिम सत्य मानून कडाडून वाद घालण्याचा काळ. बरेचदा मित्रांशी नास्तिकता, देव नाही वगैरे वाद व्हायचे आणि ते, "तू काय देव नाही म्हणतो आहेस? दरवर्षी गणपती बसवतोस तू!" या भरतवाक्याने संपायचे. दरवर्षी बसणारा गणपती म्हणजे त्यांचा "सीमेवर सैनिक" प्रकारचा युक्तिवाद होता. त्यापुढे काही अपील नाही आणि अपील करावे अशी परिस्थितीच नव्हती. आमच्या घरी खरोखरच गणपती बसायचा.
✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू
✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश
✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश
✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ
✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण?
✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण
✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं
निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न, बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ
तर्क बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ
प्रस्तावना : मायबोलीच्या वाचकांसाठी हा लेख आहे. यात स्वयंपाकघरातील कामगारांचे स्वरूप, अर्थकारण, वेतन/मेहनताना आणि कार्यपद्धती यावर सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हढी माहिती मिळाली ती दिली आहे. वैयक्तिक मर्यादा असल्याने खूपशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे वाचक आपल्याकडची माहिती या धाग्यावर देऊन हा उपक्रम समृद्ध करू शकतात. जागतिक पटलावर हा उपक्रम संख्येने खूपच कमी दिसतो. पण एक सुरूवात म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. याचे फायदे तोटे यावर प्रतिसादात बोलूच. जगभरात किचनची जबाबदारी स्त्रीकडेच असते त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा वाटतो.
राहूल गांधी यांचा छात्रों की गूंज चा चौथा कार्यक्रम २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यांत झाला. सोशल फीड मधे या क्रार्यक्रमाबद्दल अनेक विडिओ, फोटो, आणि टिप्पण्या बघायला मिळाल्या. मग YouTube वर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शोधला. संपूर्ण कार्यक्रम एका बैठकीत बघितला. राहुल गांधी फार उत्साहवर्धक वाटले आणि प्रश्न हाताळण्यात त्यांनी दाखवलेली सहजता, सहृदयता यामुळे मे मी भारावलो.
https://youtu.be/61WUM1Zv-mE?si=aFwhbT9oUlT2OOYV
पुण्याजवळ असलेल्या सिंहगडावर पर्यटक येतात पण ते गडाचे पावित्र्य राखत नाहीत अशी तक्रार गडाची देखभाल करणाऱ्या गडकिल्ले संस्कृती श्रीवर्धन संस्थेचे लोक नेहमी करत असतात.
गडावर मांसाहार, दारू बंद करण्यात आली. पण लोकांनी पावित्र्य राखण्यासाठी आता समस्त हिंदू बांधव समितीमार्फत खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते?


“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राणं घेतलं हाती” हे शांता शेळके लिखित मराठी मनाला वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारे वीररसयुक्त गीत. हे गाणं केवळ सुश्राव्य स्फूर्तिदायी गीत म्हणून ऐकून सोडून न देता, ते प्रत्यक्ष आयुष्यात जगणारा शूर मराठी सरदार म्हणजे इंदूरचा सुपुत्र ‘वैभव भागवत’. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या ‘शौर्य चक्र’ विजेत्या ‘पायलट ऑफिसर’ वैभवची कहाणी युवा पिढी आणि समस्त नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशीच.
तुम्हाला असे काही पाहुणे माहिती आहेत का जे घरी आले कि सगळ्या सोहळ्याचा ताबा घेतात.
सगळे जमलेले नातेवाईक, पै पाहुणे त्यांच्या पुढे पुढे करतात. ते सेलेब्रिटी असतात. प्रत्येक जण आपल्या लेकरांना या पाहुण्यांना विविध कलादर्शन करायला सांगतो. त्यांनी शाबासकी दिली कि मूठभर मांस चढते.
हे जरा वरच्या वर्तुळात ऊठबस असलेले असतात. पण ते कधीही आपल्या उपयोगी पडत नाहीत. कधीच आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा नोकरी व्यवसायासंबंधी करीयर मधे मदत करत नाहीत. पण नको त्या लोकांच्या उपयोगी पडतात.
जंतर मंतर छू छू मंतर
भक्त आंधळे, देव भयंकर
शिमगा आधी, कवित्व नंतर
जंतर मंतर छू छू मंतर
गर्दी मध्ये माझे पंटर
शानपत्तीवर जबरा हंटर
जंतर मंतर छू छू मंतर
माफ अगोदर, शिक्षा नंतर
नया जमाना, नवीन तंतर
जंतर मंतर छू छू मंतर
छप्पन इंची थर्थर थर्थर
प्रधान पैला राजा नंतर
वृद्धाश्रमातील संचालक व काम करणारे सह्कारी मदतनीस लोक यांनीच खर्या अर्थाने वृद्धांचे पालकत्व स्वीकारलेले असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मृत्यूची वाट पहात जगणार्या बेडवरील वृद्ध रुग्णांच्या समस्या समजून घेण्यासाठी बुद्ध्यांका पेक्षा भावनांक अधिक लागतो. वृद्धकल्याण शास्त्राचा अकॅडमिक शिस्तीत अभ्यास करुन केलेले एखादे संशोधन, लेखमाला, पुस्तक यांच महत्व आपल्या जागी आहेच. पण कधी कधी विद्वत्ताप्रचूर सल्ल्यापेक्षा एखादी निर्बुद्ध वाटणारी कृति देखील रुग्णाची भावनिक गरज भागवते. मला इथे विचारवंत लेखक राम बापटांची आठवण आली.