कन्नड पदार्थ

सोप्पु सांबार - पालेभाज्या घालून सांबार

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी तुरीची डाळ
मेथी, पालक, आंबटचुका,चाकवत चवळी, लाल माठ , अरुगुला यातील मिळतील त्या भाज्या साधारण दोन जुड्या.

सांबार पावडर
मीठ , हळद, तूप, मोहरी. हिंग, सुक्या मिरच्या , कढीपत्ता.

आंबट चुका किंवा चाकवत नसल्यास छोट्या लिंबाएवढी चिंच.

क्रमवार पाककृती: 

डाळ थोडी हळद घालून कुकरमधून शिजवून घ्यावी.
पालेभाज्या बारीक चिरून , थोडा सांबार मसाला घालून शिजत लावाव्यात.
भाज्या शिजत आल्या की घोटलेली डाळ घालून अजून थोडा सांबार मसाला घालावा.
मीठ घालावे. चिचेचा कोळ घालावा.

दोन उकळ्या आल्या की तुपात मोहरी , सुक्या मिरच्या, कढीपत्ता,हळद, हिंग घालून फोडणी करावी व गरम गरम सांबारावर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जण
अधिक टिपा: 

मैसुर बंगळूर भागात करतात हा प्रकार. मी नक्की कृती अशी विचारली नाही, पण खाऊन पाह्यलाय अन मग अंदाजाने वरच्या प्रकारे करते.

सोप्पू म्हणजे पालेभाजी.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग