रंगभूमी

सुटकेस ५ (restored)

Submitted by जव्हेरगंज on 7 May, 2020 - 16:17

कथा या भागापर्यंत ठीक चालली होती असं प्रतिसादावरून दिसतंय. मात्र हा भाग भरकटला आहे किंवा अतिरंजित झाला आहे असे अनेकांनी कमेंटमध्ये सुचवले आहे. आणि ते पटलेही आहे. म्हणून हा भाग पुन्हा लिहिणार आहे किंवा अतिरंजित घटना टाळून सरळ पुढचा भाग टाकणार आहे. आपल्या दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद.

पुढील भाग येथे टाकला आहे. सुटकेस ६
************************
भाग ५ हा असा होता :

सुटकेस ४

Submitted by जव्हेरगंज on 7 May, 2020 - 08:56

सुटकेस ३
------------------------------
ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार!

शब्दखुणा: 

सुटकेस ३

Submitted by जव्हेरगंज on 2 May, 2020 - 15:53

सुटकेस २
-------------------------------
चुर्रर..!
ऑम्लेटचा खमंग वास दरवळला आणि भूक भडकली. टिव्हीवर बातम्या कमी आणि जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. पण साली आपण ही चूक केलीच कशी? एवढ्या रात्री परत तिकडे जायची काय अवदसा सुचली. देव देतो आणि कर्म नेते दुसरे काय!
चिऊ पळत आली. आणि हातात रिमोट देत म्हणाली. "घे.."
मी चॅनल बदलला. आणि कार्टून लावले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाहीतर तिने आकाश पाताळ एक करायला कमी केले असते.

शब्दखुणा: 

सुटकेस

Submitted by जव्हेरगंज on 28 April, 2020 - 07:24

टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की.

शब्दखुणा: 

दामले : तुम्ही म्हणाल तसे !

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:44

१२०००+ पेक्षा जास्त नाट्यप्रयोग , ३४ पेक्षा जास्त नाटके , ३ नाटकांचे १००० + अधिक प्रयोग अणि एका दिवसात सलग ५ नाटकांचे प्रयोग करण्याचा "Guinness book of World record" असा नेत्रदीपक प्रवास करणारा रंगकर्मी म्हणजे अर्थातच "प्रशांत दामले ".

अ परफेक्ट मर्डर

Submitted by Ravi Shenolikar on 20 September, 2019 - 07:36

काही दिवसांपूर्वी "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक पाहिले. अल्फ्रेड हिचकाॅकचा गाजलेला चित्रपट "Dial M for murder" चे हे सुंदर नाट्यरूपांतर. पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवणारे. चित्रपट खूप वर्षांपूर्वी पाहिला असला तरी पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाटकाचे लेखन फार उत्तम झाले आहे. अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री ह्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: पुष्करने पोलिस ऑफिसरची भूमिका मस्तच केली आहे. हे नाटक ते भूमिकांची अदलाबदल करून सुद्धा सादर करतात. त्यामुळे तुम्ही नाटक बघाल तेव्हा पुष्कर वेगळ्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

Submitted by पाषाणभेद on 22 June, 2019 - 17:58

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)

एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!

दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?

पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.

मराठी नाटक -एका लग्नाची पुढची गोष्ट

Submitted by me_rucha on 3 June, 2019 - 04:48

थोडया दिवसांपूर्वी एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक पाहिलं. नाटकाचं कथानक थोडक्यात पुढील प्रमाणे सांगते.

विषय: 

भो भो २०१६ - चित्रपट

Submitted by कटप्पा on 2 June, 2019 - 20:30

मुळात असा एखादा चित्रपट आहे हेच मला माहित नव्हते। सहज तूनळी वर दिसला, प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, केतकी चितळे सारखी स्टारकास्ट पाहिली, बघायला सुरुवात केली, खूप ओरिजिनल थ्रिलर मिस्ट्री आहे.
एक फ्लॅट आहे आणि पोलीस दरवाजा तोडून आत शिरतात तर तिथे दिसते स्मिता चा मृतदेह आणि बाजूला बसलेला एक कुत्रा. स्मिता च्या शरीरावर कुत्र्याने हल्ला केलेल्या खुणा दिसतात, पोलीस कुत्र्याला ताब्यात घेतात आणि केस फाईल करतात.
स्मिता ची एक करोड ची इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तिचा नवरा विनायक ला पैसे नको असतात, ते पैसे सरळ स्मिता च्या आई ला देण्यात यावेत असे त्याचे म्हणणे असते.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी