अर्थकारण

किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Submitted by ढंपस टंपू on 17 July, 2023 - 21:49

विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.

नोट बन्दी पुन्हा

Submitted by हस्तर on 19 May, 2023 - 12:03

२००० च्या नोटा बन्द करन्यात आल्या आहेत
तसे पाह्ता ह्या चलनातुन गायब झाल्या होत्या , ये टी म. मशिन मधुन पण गायब झाल्या होत्याच
पण आता मागच्या चुका पुन्हा होतिल का ?

इज ऑफ डुइन्ग बिझनेस !

Submitted by चंपक on 29 March, 2023 - 04:58

नमस्कार!

गेली तीन वर्ष सातत्याने शेती, शेतकरी आणि कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावर स्वतः फिल्डवर काम करत आहे. या कामासाठी येणाऱ्या शासकीय, सामाजिक आणि राजकीय अडचणी समजावून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कुठलाही उद्योग उभारायचा म्हणजे अडचणी या येणारच! भारतासारख्या अतिशय क्लिष्ट रचनेच्या देशामध्ये नियमांच्या जंजाळात अडकून नवीन उद्योजकाचा गळफास बसून मृत्यू व्हावा अशी परिस्थितीवर आहे. आम्ही सारे अभिमन्यू अशा प्रकारची अवस्था उद्योजकांची झालेली असते. यातील जे लोक चक्रव्युव्ह भेदून बाहेर पडतील, ते मग यशस्वी उद्योजक म्हणून समाजात वावरताना दिसतात. त्यांचे अभिनंदन !

डॅलस मधील चांगली कम्युनिटी

Submitted by च्रप्स on 2 February, 2023 - 23:13

डॅलस मधील मायबोलीकर- डॅलस उपनगरात एखादे अपार्टमेंट किंवा हाऊस घ्यायचा विचार आहे. चांगल्या जागा सुचवाल का जिथे रेंट ने आरामात जाईल घर... इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणार आहे... मी डॅलस मध्ये आतापर्यंत कधीच राहिलो नाहीय...

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

अर्थाअर्थी -(भाग-०६) - नचिकेतच्या वहिन्या..

Submitted by अ'निरु'द्ध on 28 January, 2023 - 08:25

NRI भारतात गुंतवणूक

Submitted by च्रप्स on 28 November, 2022 - 12:03

नमस्कार- मला भारतात चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायची आहे...
hdfc संचय प्लस प्लॅन कसा आहे.. 7.38% रिटर्न आहे ग्यारेंटेड... आणखी चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुचवता का प्लिज...

जगाच्या डोक्यावरच्या घडामोडी

Submitted by पराग१२२६३ on 19 November, 2022 - 00:16

उत्तर धृव महासागराचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये अमेरिकेनं या महासागरात पार पाडलेली Rapid Dragon क्षेपणास्त्राची चाचणी. हे अण्वस्त्रवाहू क्रूझ क्षेपणास्त्र असून ते मालवाहू विमानातून सोडता येतं. त्याचीच ही चाचणी होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला 950 ते 1900 किलोमीटर इतका आहे. या चाचणीच्या काही काळ आधी रशियानंही आपलं उत्तर धृव धोरण जाहीर केलं होतं.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 15 October, 2022 - 07:21

यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !

Submitted by हेमंतकुमार on 9 October, 2022 - 21:59

मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो.

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण