अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

Submitted by अ'निरु'द्ध on 29 May, 2021 - 14:09

अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

या आधीचा भाग : अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..

रेवा घरी पोहोचली तेव्हा आईने दार उघडलं.
चल जेवून घे पटकन. आमची जेवणं आज लवकरच झालीयत.
नकोय आई, बाहेर झालंय माझं खाणंपिणं. नाही भूक आता.
खरं तर ती थोडसं जेवू शकली असती पण आईचा स्वभाव बघता तिचे प्रश्न टाळण्यासाठी आता न जेवणंच तिला श्रेयस्कर वाटलं.
रेवा झोपली ती संध्याकाळच्या भेटीचा विचार करत.
नचिकेतच्या प्रश्नाने तिची झोपतानाही पाठ सोडली नव्हतीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबल वरती दादा, बाबा आणि आई तिची वाटच बघत बसले होते. शनिवार असल्यामुळे सगळेच निवांत होते.
रेवा बसल्या बसल्या दादाने चेष्टेखोर चेहरा करुन प्रश्न विचारला, काय मग कशी काय कालची भेट ?

एरवी अशा प्रत्येक भेटीनंतर न आवडलेल्या माणसाचं काय आवडलं नाही याबद्दल भरभरुन बोलणारी रेवा आज मात्र कालच्या आवडलेल्या भेटीबद्दल काही बोलायलाच तयार नव्हती.

शेवटी ती म्हणाली. भेट तशी चांगलीच झाली. मुलगा छान होता. बोललाही छान. गप्पाही चांगल्या झाल्या. नेहमीचे प्रश्न नव्हते. पाॅझिटिव्हही वाटला खूप. बरं, बोलण्याच्या नादात जरा उशीर व्हायला लागला तर त्यानेच मला निघायची आठवण केली.
म्हणजे इथपर्यंत सर्व ठिक होतं पण..

पण काय ?

पण निघताना मात्र एकदम एक विचित्र प्रश्न विचारला आणि तो ही असा की मला काही कळलंच नाही. अगदीच अनपेक्षित.

तिघांनी एकदमच विचारलं, काय प्रश्न होता तो ?

की तू तुझ्या पगाराचं काय करतेस ?

आई पटकन म्हणाली, मुलगा लोभी दिसतोय. अजिबात परत भेटायला जाऊ नकोस.

बाबा म्हणाले, एवढा चांगला वागणारा मुलगा विनाकारण असं विचारणार नाही.

दादा : मुलगा जाम स्मार्ट असणार. There must be some Reason behind the Question.

आवडला नसेल तरी त्या प्रश्नामागचं कारण समजून घ्यायला भेट त्याला.

बाय द वे, या प्रश्नामुळे आता नाहीच आवडलाय नं तो तुला ?
दादाने डोळे बारीक करत चेष्टेनं तिला विचारलं.

मी काही झालं तरी हिला अशा मुलाला परत भेटायला पाठवणार नाही. आईने टेप वाजवलीच.

बाबा : हे बघा तिला उगाच गोंधळून टाकू नका. रेवा, एवढं होऊनही तुला शेवटी कसा वाटला मुलगा ?
म्हणजे मगाशीही आम्ही विचारलेलं पण ते तुझं पहिलं, उस्फूर्त उत्तर होतं. आता एवढं बोलणं झाल्यानंतर तुला काय वाटतंय..?

तो मुलगा मला खरंच चांगला वाटला. आधीच्या मुलांपेक्षा तर खूपच चांगला. त्याच्या कामात इंटरेस्ट घेणारा, नुसताच वर्कोहोलिक नसून मजेसाठी विकेंड प्लान करणारा, बॅलन्स्ड वाटला.
वेळेच्या आधी येणारा, मला वेळेवर घरी पाठवणारा, एकदम रिस्पॉन्सिबल.
बरं बोलणंही मजेदार, चतुर होतं. त्याच्याबरोबर जेवढा वेळ होते, अजिबात कंटाळा नाही आला.

मधेच आईने विचारलं, बिल कोणी दिलं ?
की निम्मं निम्मंच करायला लावलं त्याने ?

दादा : अगं आई, आपली रेवा आजची मुलगी आहे. स्वतःहूनच TTMM करणार.

थांब गं आई. तुझं नं, काहीही असतं.
खरं तर बिलाची पण मजाच झाली. बिल सगळं तोच देत होता पण मी त्याला थांबवलं. म्हटलं आपली आधीची ओळखही नाही शिवाय ही पहिलीच भेट आहे. तर आपण बिल इक्वली शेअर करुया. असं बिल तू एकट्याने देणं मला नाही आवडणार.
तर तो म्हणाला, म्हणजे काय, मलाही नाही आवडणार. आजच्या काळात शेअरच करायला पाहिजे.
पण तू एवढी कर्तबगार.. तुला असं अर्ध बिल कसं द्यायला लावू ? तेव्हा पुढच्या भेटीचं आख्खं बिल तूच दे.
मग मी काय बोलणार. त्यानंच दिलं मग कालचं आख्खं बिल.

दादा : भले शाब्बास.. थोडक्यात दुसरी भेट पठ्ठ्यानं कबूल करुन घेतली.
पण खरं तर हे बोलून भेट मागणारा तो जास्त चतुर की बिलाचा शेअर न देऊन दुसऱ्या भेटीला अप्रत्यक्ष मान्यता देणारी तू जास्त चतुर, हे मला अजून कळलेलं नाहीये.

तुमच्यात हारके जितनेवाला बाज़ीगर कौन है, हे आता ठरवायला पाहिजे.

ए दादा. मी 'भेटायचंच' असं काही ठरवलेलं बिरवलेलं नाहीये हां.

मग नकोच ठरवूस. तुझ्या पगारावर डोळा ठेवणारा हा मुलगा मला तरी आवडलेला नाहीये. आई तिचा मुद्दा सोडायला तयार नव्हती.

बाबा : पण रेवा तुला त्याला परत भेटावसं वाटतय कां ?
की नाहीच भेटावसं वाटतंय एकदाही ?

बाबा, म्हणजे पहिल्या भेटीच्या मानानं तर मुलगा मला आवडला. त्याच्याबरोबरची कम्फर्ट लेव्हलही छान होती. कुठेही अपरिचित असल्याचा फिल आला नाही. इंटरव्हयू घेतोय, पारखतोय, ॲसेसमेंट, तोलमोल, कॅल्क्युलेटीव्ह असंही काही वाटलं नाही.
हातचं राखून न ठेवता अगदी सहज, मैत्रीपूर्ण गप्पा.
फक्त निघतानाचा प्रश्न मात्र मला खरंच स्पेलबाऊंड करुन गेलाय. तो प्रश्न नसता तर मी त्याला भेटण्याचा नक्कीच विचार केला असता.

दादा म्हणाला.. रेवा, एक काम कर. तो त्याचा प्रश्न सध्या बाजूला ठेव. म्हणजे तो विचारलाच नव्हता, असं समजून बाकीच्या गोष्टींचा विचार कर. आणि जे उत्तर मनात येईल ते तू सांग.

बरं, आता तो प्रश्न आपण तात्पुरता बाजूला ठेवला तरी शिल्लक आहेच.
तुला नाही जावंसं वाटल, तर प्रश्नच मिटला… जायचाही आणि त्याचा विचारलेलाही.

आणि जावंसं वाटलं तर त्या भेटीत प्रश्नाचा खुलासा होईलच. जो मुलगा एवढ्या छान भेटीनंतर जाता जाता हा प्रश्न विचारतो, तो यावर आणखी काहीतरी बोलेलंच.

म्हणजे आधी त्याला विचारायचं नव्हतं पण न रहावून बोलला असेल तर आताही न रहावून बोलेल.
आणि त्यामागे त्याचा काही निश्चित विचार असेल तर त्या विचाराने काहीतरी बोलेल.
नाहीतर अजून एखादा असाच नवा विचित्र प्रश्न विचारेल.
थोडक्यात तुला, आपल्याला ठरवायला अजून काहीतरी गोष्ट असेल. अजून थोडा अंदाज येईल.
आणि तू दुसऱ्यांदा त्याला भेटायला गेलीस म्हणजे सगळं काही ठरलं असं नाही. तेव्हा माझ्या मते निदान अजून एकदा तरी भेटायला जा.

पण तुला नसेलच भेटायचं तर राहू दे. कशाला उगाच तुझ्या मनात नसेल तर.
रेवाने रुसका चेहेरा करुन दादाकडे पाहिलं.

बरं.. बरं.. पण तुमची दुसरी भेट ठरायची कशी ?
तो तुला काही बोलला होता का परत भेटायचं..?

हो. म्हणजे डायरेक्ट नाही पण झालेली भेट आवडली असेल तर परत भेटु म्हणाला होता.

हो मान्य. पण भेट ठरवणार कोण ? तू की तो ?

त्याला भेटायला आवडेल असं त्याच्या बोलण्यात आलं होतं, बिलाच्या प्रसंगातही त्याने आडून आडून सुचवलंच. म्हणजे आता मी काय निर्णय घेते त्यावरच अवलंबून असणार ना ?

मग आता..?

बघू तीन चार दिवस थांबून..

रविवारचा तर प्रश्नच नव्हता पण सोमवार, मंगळवार आणि बुधवारही तसाच गेला.
समोरून येणाऱ्या निरोपाची वाट खरं तर दोघंही बघत होते. पण आपण तिला आवडलोच नसू तर काय, या विचाराने नचिकेत गप्प होता.
आणि जवळपास त्याच विचाराने आणि संकोचाने रेवाही थांबून राहिली होती.

शेवटी वाट बघून गुरुवारी रेवाने नचिकेतला मेसेज टाकला,
Hi..

(क्रमशः)

अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast... Hya var cinema nighala tar mi Reema lagoo chap aai role madhye phukat kaam Karen.

मस्त भाग.... पटापट पुढचे भाग येऊ द्या...
मीदेखील त्या पगार विचारणाऱ्या मुलाचे काम करायला तयार आहे..

हा ही भाग मस्त..
मी असते तर ब्लॅंक मेसेज टाकला असता Happy

सुह्रुद, सीमंतिनी, च्रप्स, म्हाळसा

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार...

सीमंतिनी आणि च्रप्स : भूमिकांबद्दल तुमचा इंटरेस्ट नोंदवून ठेवला आहे. Happy
फक्त निर्मात्याचा रोल करणारा मिळाला की काम फत्ते. Biggrin

एक मनातला गोपनीय विचार : पात्रसंख्या भरमसाट वाढवावी काय...? (विचारात पडलेले ८,९ बाहुले) Wink

पात्रसंख्या भरमसाट वाढवावी काय...?>>>>>>>
मग काय जे रोल्स होते ते घेतले इतरांनी, मला काही उरलंच नाही. Wink Lol

कथा छान सुरू आहे....येऊ द्या पुढचा भाग पण लवकर.

जिज्ञासा, मृणाली, वीरु, पारंबीचा आत्मा.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

पाआ.. Biggrin अहो पडकी हवेली कशाला ?
एखाद्या मस्त हवेलीच्या दिवाणखान्यात त्यांना भेटवतो. आणि तुम्हाला टकाटक पण हाँटेड मनोराच देऊन टाकतो.. तो ही पर्मनंट.. Wink

छान आहे कथा..उत्सुकता आहे त्याने पगारासंबंधी प्रश्न का विचारला हे जाणून घेण्याची..पुभाप्र!

छान झालेत दोन्ही भाग!
तू तुझ्या पगाराचं काय करतेस ? >> नचिकेत 'फायर' वाला आहे का?

आसा., Rani_1, ए_श्रद्धा आणि स्वाती२

हा भाग/ही आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद..

@ स्वाती२, नाही. FIRE वाला नाही तो.

जे लोकं लवकर लवकर भाग टाकत नाहीत ते लोक मला आवडत नाहीत.
"ये धमकी नही चेतावनी है !" (कृ. दिवे घ्या!!!!!!!!!!)

कदाचित पुढच्या भागात तो ट्विस्टुन सांगेल की, लग्न झाला तरी तु तुझा पगार तुझ्या घरी देवु शकतेस.

मंजूताई, आभार..

जेम्स बाँड, मी बाकी कोणाच्या धमकीला घाबरत नाही..
पण बाँड की चेतावनी ऐसे कई धमकीयोंके उपर होती है.. Uhoh

तेव्हा प्रयत्न करतो पुढचा भाग लवकर टाकायचा..

मस्त. मुलगी अर्थसाक्षर आहे की नाही? आपल्या पैशाची गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, किती खर्च करावा याबद्दल जागरुक आहे की नाही? हे नचिकेतला जाणून घ्यायचं असेल.

कथा मस्त सुरू आहे. मी त्या हॉटेलात शेजारच्या टेबलावर बसून कॉफी पीत पुस्तक वाचनार्या बाईचा रोल करायला तयार आहे.

तेव्हा प्रयत्न करतो पुढचा भाग लवकर टाकायचा..>> लवकर टाका पुढचा भाग. नाहीतर तिकडे त्या दोघांचे लग्न होऊन जाईल आणि आम्ही इथे पुढचा भाग कधी हेच विचारत राहु.
आणि मुलामुलीचे चुलत, मावस, लांबचे दुरचे नातलग, शेजारीपाजारी, गल्लीतले, लॉण्ड्रीवाले, भाजीवाले यांनापण कथेत आणा म्हणजे भरपुर जणांना रोल करता येतील.

मी पुढील कलाकार सुचवतो -
नचिकेत - ऋन्मेष
रेवा - अर्चना सरकार
रेवाचा दादा- भास्कर
रेवाचे बाबा - अभिषेक

होऊन जाऊ दे एकपात्री प्रयोग Wink

च्रप्स. Rofl

आता पर्यंत पुरुष-स्त्री विवाह, स्त्री-स्त्री विवाह, पुरुष-पुरुष विवाह ऐकले होते. पण 'स्वतः -स्वतः' विवाह ही कॅटेगरी ऐकली नव्हती.. Biggrin

मामी, अगदी बरोबर.
आणि तुमचं Role Selection ही मस्त. बेस्ट सीट्स..
डायरेक्ट आँखो देखा हाल और कानो सुनी बाते.. Wink

वीरु : आणलीयत नवीन कॅरेक्टर्स. पण तुमच्या अपेक्षेएवढी नाहीत.
Lol

rmd : नाही. रेवा अजून एंगेज्ड नाही. Happy

मजेदार प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार..

आणि पुढचा भाग With New Characters पोस्ट केला आहे.