पुस्तक
पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)
रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं?
अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला?
आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं?
आफ्रिकेतले देश इतके गरीब का?
चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे?
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात."
.
'धग’ - कादंबरी - पुस्तक परिचय
पुस्तक: ’धग’
लेखक: उध्दव ज. शेळके
’धग’ बद्दल आजवर खूप काही बोलले सांगितले लिहिले गेलेले आहे हे खरंच. उद्धव शेळकेंना ’कादंबरीकार’ म्हणून उदंड किर्ती मिळवून देणारी ही एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे हे सिद्ध झालेलेच आहे. मी अजून वेगळे काय सांगणार? तरिही हे पुस्तक वाचायला सुरूवात केल्यापासून वाचून संपल्यानंतरही काही काळ ज्या अनुभूतीतून मी विलक्षण प्रवास केला त्यावर लिहिल्यावाचून राहवत नाही. किमान माझा वाचन अनुभव आणि माझ्या या कादंबरीबद्दलच्या तिच्या प्रभावाखाली मी अजूनही असतानाच्या ताज्या भावना कुठेतरी नोंदलेल्या रहाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच!
द मिल हाऊस मर्डर्स (सुइशाकान नो सात्सुजिन): अयात्सुजी युकितो
"माझ्यापुरते सांगायचे तर डिटेक्टिव्ह कथा एकप्रकारचा बौद्धिक खेळ आहे. कादंबरीच्या स्वरुपात वाचक-डिटेक्टिव्ह, वाचक-लेखक अशा पातळ्यांवरील तर्काधिष्ठित खेळ. बस्स! त्यामुळे "शाकाई-हा" प्रवाहातल्या लेखकांच्या वास्तववादी कथा, ज्या जपानमध्ये कधीकाळी खूप लोकप्रिय होत्या, या कथाप्रकाराच्या मागण्या बिलकुल पुर्या करत नाहीत. कोणा ऑफिस लेडीचा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये खून होतो आणि टाचा झिजवून पोलिस तिच्या बॉसला अटक करतात. खुनाचे कारण काय तर - अफेअरमधून झालेले ब्लॅकमेल! भ्रष्टाचार, अंतर्गत राजकारण, आधुनिक समाजव्यवस्थेचे दुष्परिणाम इ. इ. मधून घडणारे ठोकळेबाज गुन्हे - आता ही कथानके पुरे!
पहिलवानांच्या गोष्टी
हे पुसतक कुठे वाचावयास मिळेल?
पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)
बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
पुस्तक परीक्षण: महानायक
राजहंस प्रकाशनचे "विश्वास पाटील" लिखित नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संपूर्ण जीवन गाथेवर आधारित "महानायक" पुस्तक नुकतेच वाचून संपवले. पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल सांगायला शब्द अपुरे पडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर हे पुस्तक आधारित आहे त्यांचे व्यक्तिमत्व लिहिण्यासाठी मुळात कितीही शब्द लिहिले तरी अपुरे पडतील. नेताजींचे आयुष्य खूपच वेगळे होते. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या होत्या. केवळ आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या एकाच ध्यासापोटी!
माझी अमेरिका डायरी - ५ - वाचनालये आणि वाचन संस्कृती
अमेरिकेतील अतिशय कौतुकास्पद वाटणारी एक गोष्ट म्हणजे इकडची सार्वजनिक वाचनालये! जाणून घेऊ या थोडंसं त्याविषयी …
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------