पुस्तक

पुस्तक प्रकाशित केले.

Submitted by सुर्या--- on 29 May, 2021 - 07:47

आयुुष्यात अनेेक चढउतार प्रत्येकाच्या आयुुष्यात येेत असतात. अश्या संंकटांना सामोरंं जाण्याचंं
सामर्थ्य अथार्तच एका क्षणात येेत नसत. तेे आपल्या संंस्कारांतूून, आपल्या संंगोपनातून, आपल्याला येेणाऱ्या अनुुभवांतूून येेत असतो. आणि या सर्वांमध्ये आपले चांगले संगोपन करून आपल्याला लढण्यासाठी सक्षम करणारे, आपल्या यश-अपयशात आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे, आपल्याला पाठबळ देणारे आपले आई-वडील हेच खरे मार्गदर्शक, शिक्षक, गुरु, आणि दैवत ठरतात. माझे हे पहिले-वहिले पुस्तक माझी आई (कै. सौ. अलका रघुनाथ जाधव) आणि वडील (श्री रघुनाथ बाबू जाधव) यांना समर्पित.

विषय: 

शहर सोडताना..

Submitted by पाचपाटील on 27 May, 2021 - 15:58

सगळ्यांत जास्त काय वाईट?
सवय..!
जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची
बारची वाईन शॉपींची
पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची..
शहर सोडताना अवघड जातं मग

शहर काही वाईट नसतं..
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू
आणि कळतं की आता जावं लागेल..

शब्दखुणा: 

लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !

Submitted by Dr. Satilal Patil on 7 May, 2021 - 13:41

नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.

३. माझी मुशाफिरी!.... आसामच्या चहाचे चाहते !

Submitted by Dr. Satilal Patil on 30 April, 2021 - 11:51

(ड्रीमर अँड डूअर या पुस्तकात समावेश करू न शकलेल्या पर्यावरण आणी शेती संबंधी अनुभवा वर आधारीत लेखमाला- भाग: ३)
Presentation1_0_0.jpg

२. माझी मुशाफिरी!.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती

Submitted by Dr. Satilal Patil on 27 April, 2021 - 04:55

(ड्रीमर अँड डूअर या पुस्तकात समावेश करू न शकलेल्या पर्यावरण, शेती आणी समाज या अनुभवा वर आधारीत लेखमाला.)

१. माझी मुशाफिरी!......सात देशांच्या शेत शिवाराची सैर!

Submitted by Dr. Satilal Patil on 26 April, 2021 - 22:30

दुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्या नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...

अनुवादित पुस्तकं

Submitted by पाचपाटील on 20 April, 2021 - 10:21

वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे, आणि ही यादी परिपूर्ण आहे, असा काही दावा नाहीये..
ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नुसार
मोलाची भर पडू शकेल किंवा ह्यातल्या काही नावांची
निर्दयपणे काटछाटही होऊ शकेल..!

हा उद्योग करण्याचा हेतू असा की 'मायबोली'वर अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातला काही वेगळा धागा मला सापडला नाही, हा एक..

ही ’श्री’ ची इच्छा, पुन्हा ’श्री’ गणेशा

Submitted by मोहना on 19 March, 2021 - 20:41

नुकतीच श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा! कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श करता आला. २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला Happy पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.

काय मिळतं वाचून?

Submitted by पाचपाटील on 11 March, 2021 - 04:09

'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...

म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे

तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.

पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.

मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.

एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पुस्तक