नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
Submit to kanokani.com

स्वाती, मस्त नी सोपी आहे क्रुती! धन्यवाद स्मित

स्वाती, आधणाच्या पाण्यातच गूळ विरघळवून घेतला तर चालेल का?

मी याच क्रुतिने केलाय आज नारळिभात...खुप मस्त झालाय, (मी पाणी १/२ वाटि जास्त घातले).
क्रुतीसाठि धन्यवाद!

आज करुन बघते या कृतीने.

खरेच नारळीभात एकदम मस्त जमला ! मला देखील पाणी १ वाटी जास्त लागले. मन्जुडी, मी आधणाच्या पाण्यात आधी गुळ वीरघळवून घेतलेला.

माझाही नारळी भात चांगला झाला ह्या पद्धतीने. अति गोडही नव्हता चवीला. पाणी मात्र दुप्पटच घातले.

मी पण केला होता वरचे प्रमाण वापरुन, माझ्यामते छानच झाला होता स्मित

माझ्यामते छानच झाला होता<<<
मग नवर्‍याला आवडला नाही का? डोळा मारा मला किंचित गोड चालला असता असं वाटलं. पुढच्या वेळी गूळ किंचित जास्त घालेन.

स्वाती,
गुळाऐवजी साखर घालून केला तर साखरेचे प्रमाण काय घ्यायचे? आणि मग त्याला 'साखरभात' म्हणायचे का? स्मित

नारळ घालणार नसाल तर साखर तांदुळाच्या पाऊण पट पुरायला हवी. आणि मग पाणीही तांदुळाच्या दुपटीहून थोडं कमीच लागेल.

(ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.)

मी पण टिल्डा बासमती वापरुनच केला.

या रेसिपीने नारळीपौर्णिमेला भात केला होता मी. मस्तच झाला.
धन्यवाद स्वाती. स्मित

वर्षा बरे झाले धागा वर काढलास.

मला रेसिपी हवी होती तेव्हा सापडला होता.. पण काल मिलालाच नाही. मी पण नारळीपौर्णिमेला केलेला भात या पध्दतीने. मस्त आणी सोपा स्मित

ही रेसिपी मिळाल्यापासून मी ह्याच पद्धतीने करते नारळीभात. मस्त होतो. स्मित

आज केला होता या पद्धतीने नारळीभात. एकदम मस्त आणि सोप्पा. स्मित आमच्याकडे गोड जरा जास्त लागतं म्हणून गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं होतं.
स्वाती या पाककृतीसाठी खूप धन्यवाद.

स्वाती, मीपण गेल्या कित्येक वर्षापासुन तुझ्याच पध्दतीने करते. एकदम मस्त होतो हा भात. कधीच बिघडला नाही. स्मित

मी गेल्या वर्षी हीच कृती वाचून २-३ दा केलाय. छान होतो एकदम.

मी कधीच केलेला नाहीये. या क्रुतीने करून बघते सोपी आहे. भात तूप व लवंग यांचा वास किती मस्त येतो ना. भिशीच्या मैत्रीणींसाठी करून नेते.

आस, रेस्पी वर काढायची होती गं डोळा मारा

नारळाचा चव कसा करायचा?

मंजुडी, सोनपरीने लिहिलेय की तिने गुळ आधीच विरघळवुन घेतला होता.

नारळाचा चव कसा करायचा? >> खवणीने खवतात त्यालाच चव म्हणतात ना ?

खवणीने खवतात त्यालाच चव म्हणतात ना ? >>>>>> हो का? अ ओ, आता काय करायचं मला वाटलं काहितरी वेगळंच असेल म्हणून...... शंका समाधानाबद्दल धन्यवाद! स्मित

नारळाचा चव ताजा लागेल की फ्रीजरमधला चालेल आधी करुन ठेवलेला ?
सोपा वाटत आहे या कृती ने. एकदम वाचून आत्ताच करुन बघावासा वाटत आहे. स्मित

मवा, फ्रिजरमधलं खोबरं आधी बाहेर काढून ठेवून नॉर्मल टेम्पला आल्यावर वापर.

काढलं. स्मित धन्यवाद !

आज घरी जाऊन करतेच!!! नारळीभाताबरोबर दुसरं काय करायचं? म्हणजे फक्त नारळीभातच करायचा का?

कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद स्मित

बरं झालं वर आणली कृती. यावर्षी पण करणार .स्मित

कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद>>>> अनुमोदन. स्मित मीही १-२ दिवसांत शोधणारच होते ही कृती. फिदीफिदी
मवा, बिन्धास्त कर. खूप मस्त होतो या कृतीने. स्मित