मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या रेसिपीने मी कायम पेढे करते. छोटे मोदक पण छान होतात. मी मोदक करताना बरेचदा ह्यात काजुची पावडर पण मिक्स करते.

condensed milk च्या आइवजि इथे भारतात म्हशिचे दुध घेने. अर्धे दुध आटवणे अनि अर्धे चे पनिर करणे. नन्तर दोन्हि मिक्स करुन त्यात तुरटि चि थोडि पुड घालणे. आणि मग साख्रर घालुन थोडा वेळ gas var thevun mag nantar vadya padane. agadi baherchyasarakhya hotat. hyat mango issence add kelyas mango malai barfi milate.

१ स्टिक म्हणजे किती बटर ? वजनात सांगा पाहू

मिलिंदा, थोडा धीर धर. पुढच्या वेळी सु.मा ला जाईन तेव्हा बघून सांगेन Proud

आज केली होती बर्फी. निम्मी संपली सुद्धा Happy उरलेली बघुन घ्या Wink सायो, कन्डेन्सड मिल्कचा कॅन तू ८ oz लिहिला आहेस. मला ८ मिळालाच नाही, १४ चा मिळाला. मी सर्व दूध घातले. (तरी) छान वड्या पडल्यात. त्यामुळेच कदाचीत साखर न घालता मॉडरेट गोड झाल्यात.

IMG00261.jpg

सिंडे, फोटो बद्दल थॅन्क्स. मलाही ८ चा कॅन मिळाला नाही. १४चा मिळाला. त्यातलं मी मोजून आठ घेतलं. पण तु सगळं घातल्याने तुझ्या वड्या मऊ दिसतायत. माझ्या वड्या पटकन तुटणार्‍या झाल्यात आणि रंगानेही बदामी. बहुतेक मी आणलेली मिल्क/खवा पावडर होती दिप ब्रॅंडची म्हणून असेल. मी ही फोटो उद्या टाकेन.

सिंड्रेला, काय कातील दिसतायेत वड्या. आता मात्र करायलाचच पाहीजेत.:स्मित:

माझा फोटो खूप मोठा आहे. म्हणून ऑर्कुटवर करते अपलोड. नी लिंक देते इथे

तुझा फोटो मोठा आहे हे कळले, पण बर्फीचं काय ? :p
आणि तो फोटो सगळ्यांना का दिसत नाहीये ? Uhoh

सिंडे, बर्फ्या अत्यंत देखण्या. चांदण्यात फोटो काढल्यासारखा वाटतोय.

मिलिंदा, तू ऑर्कुटावर नाहीयेस का?

बर्फ्या अत्यंत देखण्या >>> माझ्यासारख्या(च) असं(च) म्हणायचय का तुला ? Wink

मिलिंदा, बर्फ्या संपल्या असतील म्हणुन दिसत नाहीयेत तुला. (फा को ला काही सुमार ?)

सिंड्रेला, मस्तच झालीये बर्फी..करायला पण सोपी आहे.

सायोनारा
अजून सु.मा. ला जायला वेळ नाही मिळाला का? प्लीज बटर किती घ्यायचे(वजनात) ते सांगा ना!\

एक मिनीट सांगते.
हं. माझ्या बटरच्या पॅकवर १ स्टीक = १/२ कप असं लिहिलंय.

अजबच आहे. वजन नाही लिहीले?
असूदे! अर्धा कप लिहीले आहे तर तेच प्रमाण वापरून करते.
लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!!

१ बटर स्टिक म्हणजे साधारण ११५ ग्रॅम. ( बर्‍याच स्टीक वर ११० ते १२५ ग्रॅमपर्यंत वेगवेगळे वजन लिहीलेले बघीतले आहे)

प्रिया, तू इथे अमेरिकेत असशील तर चार स्टीकचा एक पॅक येतो( १ पाऊंडचा). त्यातली एकच स्टीक घ्यायची.

वा! वा ! सायो/सिंडी काय फोटो दिसतोय. इथे भारतात मिल्कमेड नी जमायला हव्यात असे वाटतेय.

रुनी,सिंड्रेला
धन्यवाद!

सायोनारा, मी सिडनीत आहे. इथे बटरचा २५० ग्रॅमचा ब्लॉक मिळतो. म्हणून बटरस्टिकचे वजनात प्रमाण विचारले मी. पण आता माझ्या प्रश्णाचे उत्तर मिळाले. थँक्स.

माझ्याकडे कन्ट्रीक्रोक चे बटर आहे ते वापरता येईल ना ?
फोटो पाहुनच तोन्डाला पाणी सुटले, करतेच आज Happy

आज पुन्हा एकदा केली बर्फी. गेल्या वेळे एवढा बदामी रंग आज नाही आला जरी मिल्क/मावा पावडर वापरली तरी. ह्यावेळी ८ oz कन्डेन्स्ड मिल्क न वापरता पूर्ण १४ oz चा कॅन वापरला. माझ्या मते बटर जर अगदी पूर्ण स्टिक न घालता पाऊणच घातली तरी चालण्यासारखं आहे. खूप तुपकट होतात नाहीतर.

malai-barphi-maayboli.jpgसायो, बर्फी स्वर्गीय! Happy धन्यवाद धन्यवाद!!!

वॉव, मृ, कसली प्रोफेशनल दिसतेय. सहीच.

सगळ्यांचे थॅन्क्स आजच मैत्रिणीला पोचवलेत जिने मला ही रेसिपी दिलीये.

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं...

अप्रतिम दिसतिये...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

मृण्मयी,
एखादा तूकडा उचलायचा मोह अनावर होतोय.

सायोनारा...धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!
तुझ्या रेसेपी ने केलेली बर्फी खुपच छान झाली ...आहोंनी संपवली पण एका दिवसात.

Pages