पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पापड ची भाजी नाही माहित. पण आम्ही कुरडयांची करतो. क्रूती वर प्राजक्ता ने दिली तशीच. पण आम्ही लाल तिखट वापरतो.. आणि मुलंही खातात आवडीने. नुडल्स ची भाजी म्हणून. Happy

नलिनी, छान फोटो!
कुरड्या आधी भिजवून मग परतायच्या म्हणजे शिजतील ना? हवं असल्यास झाकण ठेवून वाफ काढता येईल.
माझी आई टोमॅटो सूप मध्ये घालायची क्वचित. उकळताना सोडायची त्यात.

कुरड्या आधी भिजवून मग परतायच्या म्हणजे शिजतील ना? हवं असल्यास झाकण ठेवून वाफ काढता येईल.>> हो.
कुरड्या पाण्यात १०-१५ मिनिट भिजत घालायच्या. मोडुन घ्यायच्या व पाणी निथळून काढायचे.
तेलावर जिर्‍या मोहरीची फोडणी करून हि मिरची, कढीपत्ता घालायचा. उभा कांदा घालून परतवायचा. लसूण घातला / वगळला तरी चालतो. कांदा परतला की हळद घालून भिजवून निथळलेल्या कुरड्या घालायच्या. चवीनुसार मिठ घालायचे. (कुरड्यांमध्ये मिठ असते ),असल्यास कोथिंबीर घालायची. परतवून कमी आचेवर एक वाफ काढायची. चपाती, भाकरी कशाबरोबरही छान लागते. फक्त भाजी खायलाही मस्तच लागते. सोबत लोणचं असलं की विचारायलाच नको.

हातसडीचे तांदूळ आणले. दुकानदार म्हणाला की 10 12 शिट्ट्या घ्या तर शिजेल. म्हणून मग जास्त पाणी घालून 12 शिट्ट्या घेतल्या पण खूप सैल झाला. पण चव चांगली होती.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.. हातसडीचे तांदळाच्या भाताची योग्य कृती सांगा..

धन्यवाद मंजूताई.. तांदूळ भिजवण्याचे माहितच नव्हते मला. पहिल्यांदाच आणले तांदूळ.. आता पुढच्या वेळी करून बघेन असं

खिचडी, आमटी, घेवडा,गवार, श्रावण घेवडा भाजी, नुसते तेल घालून पोळी बरोबर, कोणाला मैत्रिणीला हवा असेल तर देऊन टाकायचा.

राजम्याची उसळ (पोळीबरोबर खाण्यासाठी) करण्यासाठी चांगली रेसिपी आहे का कुणाकडे?
मला नेटवर एक सापडली पण त्याने काही खास चव नाही लागली.

राजम्याची उसळ>>>>> तेलावर कांदा परतून त्यात आलेलसणाची पेस्ट घालायची.त्यात मालवणी मसाला घालून उकडलेला राजमा घालायचा.मीठ घालून १ उकळी आली की चमचा-दीड चमचा भाजलेले सुके खोबरे+ थोडीशी चिंच यांचे वाटण टाकायचे.किण्वा वरुन थोडे भा.सु.घातले तरी चालेल.राजम्याला तशी चव नसल्याने आंबट काही घातले की मस्त लागते.

दुसरी पद्धत म्हणजे कांदा-खोबरे,लवंग्,मिरी,दालचिनी,धणे तेलावर भाजून वाटण करायचे,बाकी वरीलप्रमाणे करणे.

मी तरी साधा घरचा मसाला आणि थोडा कांदा - लसूण मसाला घालतो. खोबरे कधी घालून पाहिले नाही.

आणि आंबटपणाकरता टोमॅटो पण चांगले लागतात.

पण ते ही नसतील तर पटकन उसळ करून त्यावर लिंबू पिळून खाल्ली तरी मस्त चव येते.

राजमा - कांदा, टोमॅटो बारीक चिरून, आलं किसून/वाटून, एव्हरेस्टचा गरम मसाला/किचन किंग मसाला.. आंबटपणासाठी आमचूर किंवा थोडे दही फेटून.. वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर.. मस्त लागते अशी उसळ Happy

राजम्याची अतिशय सौम्य चवीची उसळ म्हणजे राजमा व्यवस्थित शिजवून घेणे. तेलात जिरे, आले, कांदा टोमॅटो अनुक्रमे परतून त्यात शिजवलेला राजमा घालणे. तिखट, थोडा गरम मसाला, मीठ. थोडे पाणी घालून छान उकळी काढायची. शिजलेला राजमा जरा चेचायचा म्हणजे त्याचाच दाटपणा येतो ग्रेव्हीसारखा. झाली उसळ.

Pages