पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजमा + काळे उडीद + हरभरा डाळ (एकास अर्ध्यास पाव - हे प्रमाण) रात्री भिजत घालायचं
सकाळी कुकरला शिजवून घ्यायचं.
तुपावर लवंग-दालचिनी-जिरे-मिरे बारीक करून टाकायचे
वाटलेलं आलं-लसूण टाकायचं
२-३ कांदे बारीक चिरून + एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट टाकायची
तेल सुटेपर्यंत परतायचं
मग शिजवलेला राजमा इत्यादी
मीठ
धने-जिरे पूड, हळद, तिखट, गरम मसाला, आवश्यकतेनुसार पाणी
५ मिनिटं चांगलं उकळायचं / रटरटवायचं. अधेमधे हलवायचं
एक चमचा साय / क्रीम घालून पुन्हा एक वाफ द्यायची.

ऑस्सम लागतं !!

पपई अगदीच कोवळा काढलेला निघाला. धड पिकलेला नाही, धड कच्चा नाही.
त्याचं सॅलड (अंडं घालून्/न घालता) करायचं नाहीए. मायबोलीवर कोशिंबीर टाइपच रेसिपीज मिळाल्या.
करी/भाजी टाइप प्रकार कोणी केलेत का?

मला वाटतं पीठ पेरून /डाळ घालून पैकी एखादया प्रकारे छान लागेल, दुधीची करतात तशी. किसून थालीपीठ किंवा धपाट्यात वापरता येईल. Mor kuzhambu म्हणून तामिळ प्रकार असतो तशी पण चांगली लागेल.

अरे हो! भजी पण छान लागतील. कोफ्ता करी अजून एक आयडिया.

शिंगाडे. इथे हातगाडीवर भाजलेले का उकडलेले मिळतात, बाकी कुठे बघितले नाहीत. मोमोज stuffing/ थाई करी/ lettuce cups मधे खाल्लेत. शिंगाडा लाडू करतात, बेसनाच्या लाडवांसारखे.

वॉटरक्रेस म्हणजे इथे ( नॉर्थ ईस्ट यू एस) तरी सॅलडमधे वापरायची पाने मिळतात. जराशि तिखटसर चवअसते. मोठी जुडी मिळाल्यास पीठ पेरून भाजी ( मेथी, मुळ्याचा पाला करतात तशी) चांगली लागते. इथे बहुतेक वेळा बारकीशी जुडी मिळते. ४ माणसांसाठी एक वेळची भाजी करायला ६-८ जुड्या लागतील. थोडीशीच पाने असतील तर सॅलड मधे छान लागतात

फेमिना मधल्या रेसिपीज मधे शिंगाड्यांना वॉटर चेस्टनट लिहिलेलं आठवतंय.

Oops! गलतीसे mistake हो गया! Water chestnut - शिंगाडे बरोबर. माझी चुकीच्या माहितीची पोस्ट delete करता येते का बघते.

काल पनीर जालफ्रेजीत टमाटोऐवजी पपईच्या फोडी वाटीभर घातल्या.

राजसी , आभार. मुळात दुधीचीच भाजी आवडत नाही. दुधी खाण्यासाठी मुठिए नाहीतर ठेपले करतो,

एखादा करीचा प्रकार नेटवर पाहून करेन.

पपई अगदीच कोवळा काढलेला निघाला. धड पिकलेला नाही, धड कच्चा नाही.>>>>>> आमच्याकडे कच्च्या पाईची भाजी करतात.तेलात हिंग्,नोहरीची फोडणी देऊन पपईच्या बारीक फोडी + बिजवलेली चणाडाळ घालायची.शिजल्यावरतिखट, मीठ,चिमूट्भर साखरघालायची.कांद्याखोबर्‍याचे वाटण (कच्या) घालावे किंवा ओले खोबरे वरून शिवरावे.
तुमच्याकडची पपई अर्धवट पिकली असेल तर कोशिंबीर, भरीत, थालीपिठात चंगली लागेल असे वाटते.

चायनीज स्टरफ्रायवाले वॉटर चेस्टनट हे कंद असतात. शिंगाडा -भारतीय वॉटरचेस्टनट ही फळं असतात. दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत.

पपई अगदीच कोवळा काढलेला निघाला. धड पिकलेला नाही, धड कच्चा नाही.>>>>>> बटाट्याचा किंवा रताळ्याचा जसा कीस करतात तसा पण करतो आम्ही कच्च्या पपईचा.

कोणी पारंपारिक झुणक्याची पाकक्रुती देईल ?
मागे शेगावला गेलो असताना , तिकडच्या एक दोन हॉटेल्समध्ये खाल्ला होता आणि खूप आवडला होता .
अगदी आमटीसारखा नाहि आणि अगदी सुक्का ही नाही .
घरी नाही बनत तसा .

स्वस्ति, कांदा परतून झाला की थोड्या बेसनात पाणी घालून, एकजीव करून ते त्या परतलेल्या कांद्यावर ओतायचं आणि दमदमून वाफा द्यायच्या (कांदा-बेसनाच्या मिश्रणाला). हा झुणका सॉर्ट ऑफ पिठलं विथ एक्सेस कांदा या प्रकारात मोडतो... मात्र खायला घेतांना कच्चं तेल वरून घ्यायला विसरायचं नाही.
परतलेल्या कांद्याला नुसतंच कोरडं बेसन लावलं तर नेहेमीप्रमाणे कोरडा झुणका होईल.

कांदा परतून झाला की थोड्या बेसनात पाणी घालून, एकजीव करून ते त्या परतलेल्या कांद्यावर ओतायचं आणि दमदमून वाफा द्यायच्या>>>>>> मीअश भाजीला राई-लसणाची फोडणी करते.

खेड्यातल्या लग्नामद्धे किंवा देवळांच्या उत्सवामद्धे शाक भात शिरा असा नैवेद्य करण्याची पद्धत आहे.
तर त्या शाक ची रेसिपी कोणाला माहिती आहे का ?
त्यात भरपुर कांदा लसुण खोबरं ई असतं आणि अतिशय मस्त खमंग लागतो शाक भात.
तर तो नक्की कसा करतात कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा.

चवळिच्या शेन्गाची भाजी कशी करतात?......
Hing mohorichi fodanee ghaluun chavaleechya shengaa bareek chirlelya tyat ghalavyat.shijale ki kandyachya ३__४ paakalya,olekhobare hiravi mirchi४२ miriche dane yanche vaatan pani na ghalata bhajit ghalave.chavisathi sakhar ghalavee.

शेंगा बारीक चिरुन घ्याव्या. तेलावर हिंग जिरे मोहरी सुकी मिरची कढीपत्ता फोडणी करावी. त्यावर शेंगा घालून परतून घ्यावे मंद आचेवर , झाकण ठेवून. शिजवावे. चवी प्रमाणे मीठ घालावे. गोडा मसाला, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला यापैकी एक कुठलाही मसाला घालावा. थोडे ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

दूसरी पद्धत म्हणजे हींग राईच्या फोड़णीत कांदा घालायचा,त्यात बारीक चिरलेली चवली घालावी.शिजल्यावर मीठसाखर ओले खोबरे
घालावे .वरुन लिम्बू पिळावे.

थॅन्क्स देवकी, मेधा! काल इथल्या इन्डिअयन ग्रोसरी क्रुपेने चवळिच्या शेन्गा मिळाल्या , दोन प्द्धतिने करता येतिल इतक्या आहेत्च तेव्हा तशी करुन सान्गते कशि झाली ते

वेगळी अशी कृती नाही सापडली. नंदिनी ने लिहिलेल्या पेप्पर रस्सम (मिळाग रस्सम) मध्ये पावडरीची कृती आहे.
बेसिकली सांबार मसाल्यात आणि रस्सम मसाल्यात एक फरक असावा तो म्हणजे थिकनिंग एजंट (डाळी इ). सांबार मसाल्यात जरा जास्त असेल आणि रसम पातळच घ्यायचं असल्यानी रसम मसाल्यात कमी वापरल्या जात असेल + रसम मध्ये डाळही कमीच असते.

Pages