मासे ४१) पिळसा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 January, 2013 - 03:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिळसा मासा किंवा माश्याच्या तुकड्या
हळद अर्धा चमचा
2 चमचे मसाला
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल,लसुण वाटण (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.

(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)

तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या. आवडत असल्यास आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.

तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.

(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )

ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या. तोंडात अगदी पिळून पिळून खा. Lol

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक तुकडी
अधिक टिपा: 

पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेलही.मी एकदा बांगडा हळद, तिखट, मीठ लावून हळदीच्या पानात घालून तेल न घालता तव्यावरठेवून शिजवला होता. तो पण झकास लागत होता.

काय योगायोग आहे पहा स्मिता मी कालच केळीच्या पानावर मातीच्या खापरीवर पापलेट भाजले. Happy घाई होती म्हणून फोटो नाही काढले. पुढच्यावेळी काढेन.

Pages