गाजराचे (आणि इतर भाज्या) लोणचे - फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 24 January, 2011 - 09:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याचे काय प्रमाण ? भाज्यांचेच लोणचे असल्याने, भाजीसारखे खाता येईल !!
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त आठवण करून दिलीत. माझी आई हे लोणचं थंडीत करतेच. त्यात ओली हळद, ओले हरभरे पण घालते. पण मसाला हा न घालता आपला साध्या लोणच्याचा मसाला घालून करते.

लगे हाथ, या पराठ्यांची पण कृति लिहून टाकतो.
लाल कोबी बारिक चिरून (मी व्ही स्लाईसरवर चिरलाय, किसून घेतला तरी चालेल) दोन कप, चीज क्यूब १ किंवा २, मीठ, मिरची बारिक चिरुन किंवा मिरपूड, तेल, कणीक

कोबीत थोडे मीठ टाकायचे. मग त्यात चीज क्यूब कुस्करुन टाकायचे. थोडे तेल व मिरची किवा मिरपूड घालून, मावेल तितकी कणीक घालायची. साधारण मऊसर गोळा झाला पाहिजे. लागलेच तर थोडे पाणी वापरायचे. जरा वेळ थांबून प्लॅस्टीकच्या कागदावर हातानेच थापून गोल करायचे. आणि तव्यावर तेल सोडून, दोन्ही बाजूने खमंग भाजायचे.

आह्हा.. स्लर्प!!!!! जबलपूरला आमचा पूर्ण शेजार पंजाबी,सरदार लोकांचा होता.. तेंव्हा थंडीच्या दिवसात त्यांचे घी मधले परांठे आणी हे लोणचं म्हंजे पर्वणी असायची ..या व्यतिरिक्त ते लोकं तेलाऐवजी पाणी,मोहरी ठेचलेली,हळद,मीठ,धन्याची पूड घालून ही गोभी,शलगम,गाजरं यांचं पाण्यातलं लोणचं बनवायचे. उन्हात ठेवल्याने हे पाणी फर्मेन्ट होऊन कांजी बनायचे.. आणी आत कच्च्या भाज्यांचे तुकडे उन्हामुळे आपोआप मऊ वव्हायचे.. हया पद्धतीने केलेली लोणची मात्र अगदी टेंपररी टिकतात..आठ दिवसात संपलीच पाहिजेत नाहीतर कांजी फर्मेंट होत होत फार आंबट होते.. लहान पांढर्‍या कांद्याचं पण अश्याच पद्धतीने बनवायचे .. Happy
आजच बनवणार हे लोणचं आता.. Happy

हो वर्षू, गज्जर कि कांजी, म्हणजे ग्रेट. त्यासाठी खास दिल्ली गाजरे पाहिजेत. जास्त टिकवण्यासाठी भाज्या सु़कवून वगैरे घेतात. अगदी १०/१० किलोचे करतात हे लोणचे (आणि मग लेकीच्या घरी पाठवतात.).

वा. काय दिसतेय लोणचे.. प्लेट पळवायचा मोह झाला....

उद्या करतेच.. दोन्ही प्रकारची गाजरे - सध्या मिळतात ती गुलाबी आणि नेहमीची केशरी वापरुन करता येईल ना हे?

आभार मानायचे राहुनच गेले... Happy

मस्तच दिनेशदा... फोटो बघून तर तोंडाला पाणी सुटले... Happy
असे लोणचे फ्रिजमध्येच ठेवावे लागेल का... की बाहेरही टिकेल..
आणि व्हिनेगर नसल्यास चालेल का... ? हिरव्या मिरच्यांच्याऐवजी लोणच्याचा मसाला असल्यास चालेल ना..
शलजम म्हणजे काय ?

जुयी/ अनघा- व्हीनीगर वापरल्यास बाहेरही टिकेल. व्हीनीगर शिवाय अपेक्षित चव येणार नाही. लिंबाच्या रसाचा पर्याय, या लोणच्यासाठी तरी मी सूचवणार नाही. मिरची नसेल तर लाल तिखट वाढवायचे, पण लोणच्याचा मसाला नको.
शलजमला पूण्या मुंबईत, पांढरे बीट म्हणतात. त्याची चव साधारण मूळ्यासारखी असते.

दिनेशदा,
वाह ! झणझणीत फोटो !
हे पाहुन यावर ताव मारायची (मनाची) तयारी झाली आहे, घरी सांगतोच (अजुनतरी मिळतं) पण त्याआधी हे पुण्यात कुठे मिळत का ते सांगा !
Happy

मी आज गाजर्,फ्लॉवर आणि मटार घालून हे लोणचं तयार केलं.फोडणीत पंचपोरण घातलं होतं.बाकी सगळी कॄती वरच्याप्रमाणेच केली.मस्त झालंय.तोंडी लावायला झटपट प्रकार आहे.रेसेपीसाठी धन्यावाद Happy

वा दिनेशदा मस्तच आहे लोणचं.
असाही एक प्रकार - गाजरं धुऊन थोडी सालं काढून त्याच्या उभ्या बारीक सळ्या कापायच्या. इतक्याही पातळ नाही की त्या मऊ पडतील. कडक उभ्या रहातील अश्या.
त्यात मीठ, मोहोरी पावडर आणि बडिशेप भाजून त्याची पावडर घालायची. तेल गरम करून गार करून घालायचं. खूप वेगळी मस्त चव लागते. नेहेमीचं हळद हिंग मायनस असल्याने.

मानुषी, करुन बघायला पाहिजे हाही प्रकार.
या दिवसात आपल्याकडे गाजरे भरपूर असतात नाही ? असे प्रकार करुन खाणे चांगले. गाजर अगदी पूर्ण नको पण थोडे शिजले तर चांगले.

मस्त.

गाजर, गोबी, शलगम वैगरे तर नेहेमीचेच पण याच मसाल्यात बटाट्याचं लोणचं पण छान लागतं. लहान लहान बटाटे अर्धवट उकडून घेवून करतात.टिकत नाही जास्त. आठवडाभरासाठी वैगरे करतात पण ३-४ दिवसात्च संपते. Happy
आता जाणार आहे मी सासरी, सगळी लोणची खाणार सकाळच्या पराठ्याबरोबर ब्रेकफास्टला. Happy

अल्पना, बटाट्याचे लोणचे ऐकले होते, चाखले नाही कधी.

गिर्‍या, सँपल कशाला, मीच येतो की.

तेलाशिवाय लोणचे, हवे तर मँगलोरी पद्धतीचे (मिठाच्या पाण्यात लाल मिरच्या वगैरे वाटून ) किंवा अरेबिक पद्धतीचे (यात भाज्या केवळ व्हीनीगरमधे मूरवलेल्या असतात ) करता येईल.

दिनेशदा, आजच मी लाल कोबीचे थालीपीठ आणि गाजराच लोणच केलं होतं. लोणच खाउन नवरा आणि सा.बा. काय खुश झाले म्हणून सांगु.........

थालीपीठ खाउन मुली तर खुश होउन फुलपाखरासारख्या भिरभिरत होत्या. मला फोटो काढता आला असता, तर खरचं तुम्हाला पाठवला असता. मनापासुन धन्यवाद.