ब्रेकफास्टसाठी काय करू?

Submitted by मेघना भुस्कुटे on 19 February, 2010 - 06:53

मला सकाळी सव्वाआठच्या सुमारास घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडण्याआधी काहीतरी खाऊन बाहेर पडलं तर दिवस एकंदर बरा जातो (http://www.maayboli.com/node/14081)! पण रोज तेच पोहे / उपमा / पोहे खाऊन कंटाळा येतो. रोज नवीन काय करायचं (आणि त्यातला न्याहारीकरता आदर्श असा कॅलरी काउण्ट + घटकपदार्थांचा समतोल कसा राखायचा) असा प्रश्न पडतो. तर -

१) ब्रेकफास्टला आदर्श असे पदार्थ (किंवा पदार्थांची कॉम्बिनेशन्स)
२) त्यांच्या कृती
३) इतर सूचना - जसं की अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास सकाळी सकाळी आंबट संत्रे खाऊ नये
इथे सुचवता येतील काय?

(@अ‍ॅडमिनः असाच धागा आधीच अस्तित्वात असल्यास हा धागा त्यात जरूर विलीन करावा. शिवाय मलाही त्या धाग्याची लिंक द्यावी! :))

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुलांसाठी सकाळचा नाश्ता... अगदी सुटसुटीत ( म. टा. मध्ये यावर लेख आलेला )
१. रात्री भिजवलेले ८-९ काळे मनुके, १-२ बदाम
२. दूध
३. एखाद फळ किंवा
४. गरम ताजी पोळी.

झक्की, नाचणीची उकड ची पाकक्रुती टाका ना क्रुपया.
माझी पाककृति:

साहित्यः घरी बायको नसेल तर एक चांगला आचारी ठेवा. तिला किंवा त्याला सांगा की 'उकड कर.' की एकदम उकड तयार होते!

ही पाककृति केवळ उकडच नव्हे तर इतर कित्येक पदार्थांनासुद्धा चालते. ती वापरून मी इतक्या वर्षात अनेSक निरनिराळे पदार्थ केले आहेत. अगदी संपूर्ण स्वयंपाक सुद्धा, वीस पंचवीस माणसांचा. तेंव्हा माझी पाककृति नक्कीच सर्वात जास्त सरस आहे असे मी म्हणू शकतो.

त्यापलीकडे मला माहित नाही. सौ. ला, मी मायबोलीवर आलेले अजिबात आवडत नाही. तेंव्हा तुम्ही भारतातच कुणाला विचारा. शिवाय ती काहीहि मोजून मापून घेत नाही. त्यामुळे सांगता येत नाही की असेच करा म्हणजे चांगली होईल.

साहित्यः घरी बायको नसेल तर एक चांगला आचारी ठेवा. तिला किंवा त्याला सांगा की 'उकड कर.' की एकदम उकड तयार होते! >> Happy आवड्लं. ( तो आचारी ह्यु जॅकमन/ निक केज असलातर बरे!)

मी करून बघेन की. तांदुळाच्या पिठाची उकड येते. पण आता तांदूळ बाद ना.

सबवे चेन चे ब्रेकफास्ट सँडविच असतात. ते घ्यायचे.
वाफल्स व सिरप. फ्रूट्स
चीज आम्लेट व ब्राउन ब्रेड.

भारतात घरी आई न चुकता सकाळचा ब्रेफाला हे पदार्थ करते.
इडली-चटणी-सांबार,
डोसे-चटणी,
धिरडी-चटणी,
पोहे,
उपमा,
साबुदाणा खिचडी,
उकड,
दडपे पोहे
भाजणीचे वडे,
थालिपीठं
सँडविच
आईची खोबर्‍याची चटणी चवीला अतिशय छान असते. त्यामुळे रोज ती होतेच आमच्याकडे.
असंच काही न काही आलटून पालटून असतं. इकडे विक डे ला माझा ब्रेफा फक्त थोडी सिरियल नी दूध. विकेंडला मात्र सनि साईड अप एग्ज, बॉईल्ड एग, क्रॉसाँ, ढोकळा, सामोसे, खिचडी, पोहे, उपमा हेच होतं.

हो धनुडी, दूध आणि च्यवनप्राश एकत्र मधे मी माझ्या मुलाला दिलं थोडे दिवस आणि त्याचा एक्झिमा इतका बाहेर आला की नेहमीच्या क्रीम्स ना अजिबात दाद देइना. शेवटी काय नविन खायला देतोय असा विचार करता लक्षात आलं की च्यवनप्राश सुरु केलय. ते बंद केलं द्यायचं आणि मगच एक्झिमा बरा झाला. मग त्याच्या आयुर्वेदिक डॉ. ला विचारलं तर तिनेही नी म्हणते तसच सांगितलं की च्यवनप्राशचा बेस आवळा असतो. आवळ्याबरोबर दूध योग्य नाही. ते दुध पोटात जाउन नासतं म्हणे आवळ्यामुळे.

आणि दुध आणि फळे पण मी मुलाला देत नाही तसच सीरिअल्स पण सॉल्ट फ्री असतील तरच दुधाबरोबर देता येतात. नाहितर नाही. दूध आणि मीठ पण विरुद्ध अन्न आहे आयुर्वेदाच्या मते. अर्थात लेकाच्या एक्झिमा मुळे मला हे सगळं सांभाळावं लागतं. सगळ्यांना त्रास होत नसावा.

दूध-मीठ, दूध आणि आंबट कधीही एकत्र करू नयेतच. फळांमधे सायट्रिक अ‍ॅसिडमुळे आंबटपणा असतोच.
शिकरण खातो आपण ते पण चूक आहे.
आंबासुद्धा पूर्ण पिकलेला, केशरी झालेला असेल तरच दुधात मिसळावा.

बरोबर आहे नीधपचे,
फुलपाखरु, याला आयुर्वेदात विरुध्दान्न असे म्हणतात. (म्हणजे जे अन्न एकत्र खाल्ले असता शरीरावर वाईट परिणाम होतो ते). अशा अन्नाने विशेषतः त्वचारोग डोके वर काढतात.

सगळ्यांना धन्यवाद इतक्या सार्‍या गोष्टी सुचवल्याबद्दल!
मला सध्या पित्ताचा खूप त्रास होतो आहे. म्हणून मुद्दाम ठरवून नीट नाश्ता करूनच बाहेर पडते. पण काय काय टाळायला हवं? नाश्त्यात आणि एकूणच?

मेघना, इथे कुठेतरी अ‍ॅसिडीटी विषयावरचा बीबी आहे. तिथले वाच.
साधारण आहार असु ध्यावा. फार तिखट, आंबट, चमचमीत खाऊ नये. जेवणाची आणि झोपेची वेळ व्यवस्थित पाळावी. झोपतांना गार दुध प्यावे.

आवळा गुणकारी असतो ना पित्तावर? भारतात असलीस तर आवळा सिरप, मोरावळा, आवळा सुपारी हे प्रकार मिळू शकतील.
तसंच कोकम सरबत, आमसुलाचं सार (आंबट असलं तरी) हे सुद्धा घ्यावं.
अंगावर पित्त उठत असेल तर आमसुल त्वचेवर चोळून लावतात असंही ऐकिवात आहे.

अनियमित आहार आणि तणाव हे पित्त खवळण्याचे खात्रीशीर मार्ग आहेत असं म्हणतात. Happy
त्यामुळे दिवसात कोणत्याही दोन खाण्यांत तीन तासांच्या वर वेळ न जाऊ देणे आणि तणाव नियंत्रण यांचा खूप उपयोग होतो.

(वरील सर्व माहिती ऐकीव आहे. चुभूद्याघ्या.)

अपुर्‍या झोपेमुळेही पित्त खवळते. पित्तावर आवळा गुणकारी आहे. मोरावळा मिळत असेल तर रोज एक आवळा खावा त्यातला. जितका जुना असेल मोरावळा तितका चांगला म्हणे. कोकम सरबत पण चांगलं. चिन्नू म्हणते तसं फार तिखट, आंबट, चमचमीत खाऊ नये. आणि आंबवलेले पदार्थ पण खाऊ नये. ब्रेड शक्यतो टाळावा आणि खायचाच असेल तर भाजून खावा म्हणे. (असं एकलं आहे. खरं खोटं देव जाणे Happy )

ब्रेड शक्यतो टाळावा आणि खायचाच असेल तर भाजून खावा म्हणे.
>>
साध्या ब्रेडने शक्यतो अ‍ॅसिडीटी होते. ब्राऊन ब्रेड वापरुन बघ.

मलाही पित्ताचा खुप त्रास व्हायचा. जर शक्य असेल तर संध्याकाळी ८ च्या आधी जेवण करत जा. फार फरक पडतो.

मस्त धागा आहे. पण वाचल्यावर मला न्युनगंड यायला लागलाय. कधी करणार हे सगळं.
त्यातून अजून दोन बेसिक प्रश्न पडलेत..
बेरीज म्हणजे काय?
आंबोळी, धिरडं, घावन .. हे एकाच अर्थाचे शब्द आहेत ना ? म्हणजे ते धिरडंच बनतं ना ?

फार तिखट-आंबट-चमचमीत-ब्रेड-आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत <<
असं सगळे म्हणताहेत. पण ब्रेड हा हमखास मदतीचा उपाय. बंगळुरी राहत असल्यामुळे इडली-डोसा-वडा तर नित्याचेच. आठवड्यातून एखाददा तरी बाहेर नाश्ता केला जातोच. आणि वजनासाठी गोड खाऊ नये, तळलेलं खाऊ नये, इतपत निर्बंधांची सवय करून घेतलीय. आता तिखट आणि आंबटही खाऊ नये? म्हणजे झालंच. Sad
तूर्तास मी खाण्याच्या वेळा नियमित करणे, वेळेवर निजणे व उठणे, झोपण्याआधी पचनक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करून घेणे, अंजीर व मनुका भिजवून सकळी खाणे, रात्री घोटभर थंड दूध पिणे (आआआणि) तणावनियंत्रण (;-)) करणे हे उपाय अवलंबले आहेत. (तिखटाचं मग पाहू!)
तुमच्या सल्ल्यांबद्दल मनःपूर्वक आभार. आता परत ब्रेकफास्टाकडे वळू या!

मेघना ब्रेड न खाणे कठीण जाते खरे पण पित्तासाठी तो फार वाईट. व्हाईट ब्रेड खात असशील तर तो मैद्याचा आणि परत फर्मेंटेड पण. मग निदान व्हीट ब्रेड तरी खावा. त्यातल्यात्यात चांगला. पण मी तरी रोज ब्रेड नाहीच खाऊ शकत. खूप त्रास होतो. रात्रीच पोळी करुन ठेवते सकाळी खाण्यासाठी. जितकं जमतय तितकं करायचं. सगळी पथ्यं पाळणं अशक्यच असतं.

>> आंबोळी, धिरडं, घावन .. हे एकाच अर्थाचे शब्द आहेत ना ? म्हणजे ते धिरडंच बनतं ना ?

हो - बनतं धिरडंच, पण आंबोळीचं पीठ सहसा काही तास भिजवून (आंबवून - म्हणून आंबोळी) धिरडी घालतात, आणि गोडाच्या धिरड्यांना (असे काकडीचे, भोपळ्याचे वगैरे करतात - साखर आणि किंचित मीठ घालून. नुसते तांदुळाच्या पिठीचेही करतात.) घावन म्हणतात.

वरती बेरींचा उल्लेख आलाय म्हणून. आपल्या बोराना कमी लेखू नका. बोरे, करवंदे, जांभळे हि सर्व फळे, त्या त्या सिझनमधे अवश्य खावीत.

छानच धागा सुरु केलाय हा. पण हा असा ब्रेफा मला रोज शक्यच नाही Sad
सकाळी सव्वासात ला घर सोडते मी. त्यामुळे काय ओट्मील आणि फळ हाच रोजचा नाश्ता. ते सुद्धा ऑफीसमध्ये ९ वाजता.
शनि-रविवारच्या ब्रेफासाठी चांगली लिस्ट मिळालीये पण.

खी खी. अच्छा इंग्रजी बेरीज असं आहे होय .. छ्या फारच येडचाप प्रश्न विचारला मी. Happy म्हणजे हे एक फळ म्हणून खायचं तर.. बर बर.
धन्यवाद फुपा. नीधप आणि स्वाती.

बेरीज मधे खूप antioxidents असतात म्हणे. म्हणुन रोज बेरीज खाव्यात असं म्हणतात. dark fruits मधे पण असतात म्हणे.

आज एक प्रयोग करून पाहिला... माझ्याकडे कॉर्न्फ्लेक्स विथ ओटफ्लेक्स असं मिक्श्चर आहे. रोज रोज ते दूधातून खायचा कंटाळा येतो. Sad अगदी फळं घाला किंवा अजून काही...
आज मी ते फ्लेक्स चक्क पोहे भिजवतात तसे पाण्यात भिजवले ५ मि. (ताकात भिजवले तरी चालतात म्हणे) आणि मग कांदा टोमॅटो चिरून चक्क फोडणी घालून खाल्ले पोह्यासारखे. थोडं पाणी घालून शिजवले तर उपम्यासारखं होईल... पौष्टीक आणि झटपट सुद्धा.
आपल्या नॉर्मल पोह्यात खूप कार्ब्स असतात.

दक्षिणा, साध्या पोह्यात लोह पण असते. ते नूसते दूधात, दह्यात वा ताकात भिजवून खाल्ले तरी छान पोषण होते. (पण ते लालसर असावेत ). पोहे करण्याच्या कृतित, (तसेच उकडा तांदूळ करण्याच्या कृतित ) भातातील एरवी न वाया जाणारी जीवनसत्वे, राखली जातात.
पोहे वरीलप्रमाणे भिजवून, त्यात मेतकुट, तूप व कांदा घालून खाल्ले, तर पुर्ण ब्रेकफास्ट होईल.

Pages