ब्रेकफास्टसाठी काय करू?

Submitted by मेघना भुस्कुटे on 19 February, 2010 - 06:53

मला सकाळी सव्वाआठच्या सुमारास घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडण्याआधी काहीतरी खाऊन बाहेर पडलं तर दिवस एकंदर बरा जातो (http://www.maayboli.com/node/14081)! पण रोज तेच पोहे / उपमा / पोहे खाऊन कंटाळा येतो. रोज नवीन काय करायचं (आणि त्यातला न्याहारीकरता आदर्श असा कॅलरी काउण्ट + घटकपदार्थांचा समतोल कसा राखायचा) असा प्रश्न पडतो. तर -

१) ब्रेकफास्टला आदर्श असे पदार्थ (किंवा पदार्थांची कॉम्बिनेशन्स)
२) त्यांच्या कृती
३) इतर सूचना - जसं की अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास सकाळी सकाळी आंबट संत्रे खाऊ नये
इथे सुचवता येतील काय?

(@अ‍ॅडमिनः असाच धागा आधीच अस्तित्वात असल्यास हा धागा त्यात जरूर विलीन करावा. शिवाय मलाही त्या धाग्याची लिंक द्यावी! :))

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या मायबोलीवर वाहत असलेले अप्पमचे वारे आमच्याकडेही आले. आजचा ब्रेकफास्ट :

इडिअप्पम आणि (कालचे) छोले

इडिअप्पम करता मोदकाच्या पारीकरता जसं तांदळाचं पीठ तेल, मीठ घालून उकडून घेतात तसं उकडलं. नंतर तेलपाण्याचा हात लावून मळलं आणि शेवेच्या साच्यातून शेवया पाडल्या. मग पुन्हा मोदकपात्रात घालून (मी कुकरमध्ये केलं - बिनशीटीचं) उकडलं की इडिअप्पम तयार.

हा ब्रेकफास्ट काही दिवसांपूर्वीचा :

पुरी, बटाट्याची भाजी, फ्लॉवरची सुकी भाजी, बुंदी रायतं

ha dhaagaa khoop junaa aahe aaj vachalaa taree malaa maazyaa soochanaa lihaavashyaa vaaTalyaa

actidity kamee karanyaasaathi sakali uthalya uthlya ekhade kele/ aambaa./ chikoo khave. mag 10 mins / ardha taas jastit jast ek tas evadhya velat taja breakfast karava. bread sarvaat vaait acidityla. sakali vel nasato tenvha nachaniche satv, thand dudh (horlicks vagaire ghalun). komat dudhat oats ghaloon tyatoon hand mixer firavoon tehi khallele changale.,. mulannaa oats deu naye. dudh pohe kinva salichya/ jwarichya/ rajgiryachya lahya aani dudh hahi chhaan option aahe. gavhache pith bhajoon thevale tar gool dudhat shijavoon sakhar /gulasobat chhan lagate. god avadat asel tar shakyato sakali khave.

weekend la vel milat asel tar gulpapadi, paushtik ladu karoon (mulannaa aani navaryala sobatila gheun kele tar jast chavisht hotaat) nashtyala dudhasobat mast. ekdam potbharu.

dudh chaha nantar ardhya tasapeksha jast velane khayache asel tar polila jam / sauce lavun tyaat cheese slice ghalun,
batata ukadoon, smash karoon tyaat kisalele gajar, beet, thode masale kinva ratale ukadoon tyat baki sarv ghaloon ek vegale saaran karoon fridge madhe thevayache. sakali uthoon polila sauce lavoon tyat he saran bharoon poli tavyavar thodi kadak karayachi.

kadhi madhi gulpoli, sanjorya asa option suddha chhaan ahe breakfastla.

sakali pot bharoon ( arthaat potalaa vicharaa bharlas ka bharalas ka) breakfast karava. mag dar don jastit jast teen tasane khat rahave.

breakfastla sprouted moog, barik kapalela kanda (thodasa, sadhya bhaav pan vaadhalet aanI acidityla kachchaa kanda khoop chaangla nahi) aanI tomato, chaat masalaa saindhav have tar thode shev aani weekend la banavoon thevlyas chatanya...
moogaeivajee ukadalele chane, ukadaleli mataki.

madhlya khanyasathi dahi, lassi, shendgane, chivada (mazyaamate chivada he poornann aahe) kadhi madhi punha ladu (besan, rava, kanik, hya sagalyache mix and match karoon, rajgira) gulpapadi, kadhi tari mahinya don mahinyatun ekada gharguti chakali, ekhada thepala kinva paratha (batata, kobi, flower, doodhi, methi, palak, aLoo, rataLa, suraN, kand.... kahihi ghaloon kelela) dahyasobat mast. hyatale barechase jinnas jagevar basalya basalya khaataa yetaat.

gavhachee, bnajareechee aaNi jwareechee khichaDee hyachee recipe kavee aahe, koNee deIl kaa?

मिसळपाव वर आहे बाजरीच्या खिचडीची रेसिपी.
जाव्यारीच्या खिचडी पेक्षा ही बाजरीच्या खिचडीची टेस्ट जास्त चांगली लागते.

मी परवा "राक्स किचन" या वेबसाईट वरून अडाई उपमा अशी रेसिपी वाचून करून बघितली. खाली लिंक दिली आहे.
अर्थात या रेसिपीत ७०% तयारी आदल्या रात्री केली तर तुमच्या वेळेत तुम्हाला तो खाऊन निघता येईल.
१. तुरीची डाळ आणि तांदूळ २ तास भिजवून नंतर कापडावर पसरून वाळवून घ्यायचे. मग त्याची मिक्सर मधून भरड काढायची (हे आदल्या दिवशी करायचे)
२. सांबरासाठी डाळ भिजवून ठेवायची, चिंचेचा कोळ करायचा आणि भाज्या चिरून ठेवायच्या किंवा सांबार करून ठेवायचे (आदल्या दिवशी)

मग उठल्यावर एका पातेल्यात पटकन फोडणी करायची आणि त्यात मोहरी, कडीपत्ता, भरपूर हिंग आणि कोथिंबीर घालायची. पाणी आणि मीठ घालायचे आणि त्याला उकळी अली की आपली भरड टाकायची. मस्त उपमा तयार होतो. तो सांबारबरोबर खायचा.

यात तिनी पुढे त्या उपम्याचे थालीपीठ केले होते आणि शॉलो फ्राय करून सुंदर बनवले होते. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि आम्हाला सगळ्यांना खूपच भूक लागली होती. Happy
http://www.rakskitchen.net/2009/11/upma-adai.html

अजून एक पदार्थ मी नेहमी करते तो म्हणजे दलियाचा शिरा. हादेखील आदल्या रात्री ८० % बनवून ठेवता येतो.
दलिया आणि खजूर कुकर मध्ये रात्रीच्या जेवणातील भात नाहीतर डाळीबरोबर उकडून घ्यायचा. मी यात पुढे गूळ किंवा साखर घालत नाही. त्यामुळे मी भरपूर खजूर घालते. उकडलेला दलिया फ्रिज मध्ये ठेवायचा. बदाम नाहीतर आवडीचा सुकामेवा भिजत घालायचा.
दुसऱ्या दिवशी सकाळी तुपावर दलिया परतायचा. त्यात ओले खोबरे आणि हवे असल्यास थोडेसे पाणी घालायचे (दूधही चालेल). त्यात बदामाचे काप टाकायचे अन एकजीव करून घ्यायचे. खाताना किंवा मुलांना देताना पुन्हा एक चमचा तूप घालून खायचे (थोडे हाय कॅलरी आहे पण कमी खाल्ले तरी खूप छान पोट भरल्याचे फलिंग येते आणि परत लवकर भूक लागत नाही)

नॉन व्हेज लोकांसाठी एक खूप सुटसुटीत पदार्थ आहे जो मी असाच इंटरनेटवरून शिकले
अंडे, हव्या त्या भाज्या (जसेकी गाजर, ढबू मिरची, कांदा वगैरे), मीठ आणि मिरी छान फेटून घ्यायचे. त्यात थोडे चीज किसून घालायचे.
हे मिश्रण कपकेक च्या साच्यांमध्ये ओतून ओव्हनमध्ये २० मिंट (१५० डिग्रीला) ठेवायचे. अंडे मस्त फुगून त्याचा मफीन तयार होतो आणि ४ अंड्यांमधून ६ मफिन होतात. त्यामुळे ३ असे मफिन्स खाल्ले की पॉट भरतं आणि खूप कॅलरीज पोटात जात नाहीत.

Pages