१) बेक्ड बीन्सचा एक टिन (त्या ऐवजी कुठलेही कडधान्य, भिजवून शिजवलेले यात लाल वा पांढरी चवळी, डबल बीन्स, मूग, चणे वगैरे घेता येतील)
२) गाजर, कोबी सारख्या भाज्या लांब कापून, एक कप. (माझ्याकडे या भाज्या चिरून डिहायड्रेट करुन ठेवलेल्या असतात. कधीही वापरता येतात.)
३) अर्धा कप पोहे, भिजवून (मी बार्ली फ्लेक्स वापरलेत. आवडीप्रमाणे ओटस वगैरे वापरता येतील)
४) लाल तिखट व आवडते केचप आवडीप्रमाणे (बेक्ड बीन्स शक्यतो, टोमॅटो सॉसमधेच असतात, त्यामूळे वेगळे केचप लागत नाही.)
५) होल व्हीट मील वापरुन केलेले बन्स, २
६) लो फॅट स्प्रेड. (मी सीड्स पासून केलेला स्प्रेड वापरतो, त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ असते )
७) एक मध्यम काकडी/
८) मीठ किंवा चाट मसाला
सगळे आरोग्यपूर्ण घटक वापरुन केलेला हा एक चवदार अणि भरपेट न्याहारीचा प्रकार आहे. यात तेल तूप नाहीच. कडधान्य शिजवून तयार असेल किंवा बेक्ड बीन्सचा टिन हाताशी असेल तर झटपट होतो हा प्रकार.

