ब्रेकफास्टसाठी काय करू?

मला सकाळी सव्वाआठच्या सुमारास घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडण्याआधी काहीतरी खाऊन बाहेर पडलं तर दिवस एकंदर बरा जातो (http://www.maayboli.com/node/14081)! पण रोज तेच पोहे / उपमा / पोहे खाऊन कंटाळा येतो. रोज नवीन काय करायचं (आणि त्यातला न्याहारीकरता आदर्श असा कॅलरी काउण्ट + घटकपदार्थांचा समतोल कसा राखायचा) असा प्रश्न पडतो. तर -

१) ब्रेकफास्टला आदर्श असे पदार्थ (किंवा पदार्थांची कॉम्बिनेशन्स)
२) त्यांच्या कृती
३) इतर सूचना - जसं की अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यास सकाळी सकाळी आंबट संत्रे खाऊ नये
इथे सुचवता येतील काय?

(@अ‍ॅडमिनः असाच धागा आधीच अस्तित्वात असल्यास हा धागा त्यात जरूर विलीन करावा. शिवाय मलाही त्या धाग्याची लिंक द्यावी! स्मित)

Submit to kanokani.com

मी रोज सकाळी नाश्ता बनवते .. किती हि घाई असो ऑफिस ला उशीर होत असो .. त्यामुळे काही तरी नवीन बनवायला नक्कीच मदत होइल हे सगळा वाचून ..
अजून दोन पदार्थ बनू शकतील..
कॉर्न चा उपमा भारतात छान होतो .. इथे स्वीट कॉर्न मुळे मजा येत नाही पण कधी तरी चेंज म्हणून छान वाटतं..
गव्हाचा पीठ आणि ज्वारीचा पिठाचा उपमा.. याला वऱ्हाडात उकरपेंडी म्हणतात.. एकदम खमंग आणि पोट भर.

गहू आणि ज्वारी पिठाचा उपमा कसा करायचा गं प्रिती?

वरदा आत्ताच टाकली बघ पाककृती.. उकड्पेंडी शोधून बघ . मिळेल

सॉरी मि पकवतेय पण सर्च कुठे टाकू? आहारशास्त्र आणि पाकक्रुती ग्रुप उघडला की सर्च बॉक्स कुठेच दिसत नाही..

सुंदर धागा आहे.... अजुनही कोणाला नाश्टयासाठी करता येतील असे झटपट व पौष्टिक पदार्थ माहित असतील तर इथे शेअर करा किंवा त्याच्या कृतीची इथे लिंक दया.

माझा नास्टा
१ कोणतीही भाजी + पराठे + सफरचंद न केळी चा ज्युस
२ ताजा भात फोडणी करुन + सफरचंद न केळी चा ज्युस
३ उपवास दिवस= राजगीरी पिठाचे मिरच कोथींबीर घालुन पराठे + भाजी ओपशनल +ज्युस
[सकाळी नवरा जेवण नको म्हणतो मग आसे पदार्थ केले कि त्याचा नाष्टा अन माझे अन पिल्लु च जेवण होते स्मित

मायबोलीकरांनी शेअर केलेले नाश्टयाला करता येतील असे काही पदार्थ :-

१. नाचणी बेसन डोसे - http://www.maayboli.com/node/39882
२. हिरवे मुग व पोह्याचे लाडू - http://www.maayboli.com/node/39830
३. शेवयांच्या इडल्या - http://www.maayboli.com/node/21316
४. पोह्याचे थालीपीठ - http://www.maayboli.com/node/33418
५. पोह्याचे पॅटिस - http://www.maayboli.com/node/39789
६. बाकर वडी - http://www.maayboli.com/node/39781
७. राइस पालक पकोडे (आंन्ध्रा स्टाईल) - http://www.maayboli.com/node/39656
८. मुळ्याचे पराठे.. - http://www.maayboli.com/node/32637
९. ओट्सचा उपमा - http://www.maayboli.com/node/39505
१०. ओल्या मटारचं पिठलं - http://www.maayboli.com/node/39549
११. रवा आणि खोबर्‍याचे लाडू - http://www.maayboli.com/node/11362
१२. गव्हाचा पौष्टीक चिवडा! - http://www.maayboli.com/node/34369
१३. कोथिंबीर वडी + कोथिंबीर गाजर वडी - http://www.maayboli.com/node/33948
१४. लाल भोपळ्याचे थालिपिठ - http://www.maayboli.com/node/38725
१५. ओट्स-मेथीचे पौष्टीक लाडु - http://www.maayboli.com/node/37067
१६. बीटाचे थालीपीठ - http://www.maayboli.com/node/38645
१७. 'हेल्दी ओट मफिन्स' - http://www.maayboli.com/node/35777
१८. हांडवो.. [ओट्स चा] - http://www.maayboli.com/node/38546
१९. बाटी लाडू - http://www.maayboli.com/node/38386
२०. घावनं - http://www.maayboli.com/node/38474
२१. कोळाचे पोहे - http://www.maayboli.com/node/38055
२२. खजुराचे पौष्टिक लाडु - http://www.maayboli.com/node/32655
२३. खोबरा लाडु - http://www.maayboli.com/node/36628
२४. निनावं - http://www.maayboli.com/node/37237
२५. नूडल्स ब्रेकफास्ट - http://www.maayboli.com/node/35537
२६. मिनी मसाला इडली - http://www.maayboli.com/node/35516
२७. उप्पीट - http://www.maayboli.com/node/34672
२८. बार्ली ढोकळा - http://www.maayboli.com/node/35350
२९. आमरसाची खांडवी - http://www.maayboli.com/node/32792
३०. पोह्यांची उकड - http://www.maayboli.com/node/13954
३१. सातुच्या पिठाची कडबोळी आणि मालपुवा - http://www.maayboli.com/node/34808
३२. मक्याच्या कणसांची धिरडी - http://www.maayboli.com/node/29349
३३. ओट्स चे धिरडे - http://www.maayboli.com/node/17912
३४. डाळ/तांदूळ ढोकळा - http://www.maayboli.com/node/10641
३५. मोमो - http://www.maayboli.com/node/34146
३६. कोबी -गाजर पराठे - http://www.maayboli.com/node/33805
३७. बीटाचे कट्लेट्स - http://www.maayboli.com/node/24361
३८. दलिया खिचडी - http://www.maayboli.com/node/12209
३९. नाचणीचा केक - http://www.maayboli.com/node/11723
४०. तिळाची मलई बर्फी - http://www.maayboli.com/node/32047
४१. झटपट ढोकळा : फक्त बेसनाचा - http://www.maayboli.com/node/31878
४२. गूळपोळी - http://www.maayboli.com/node/13162
४३. अंजिर-खजुर-बदाम बटटी - http://www.maayboli.com/node/31830
४४. सुजी ढोकळा - http://www.maayboli.com/node/4621
४५. ब्रेड बेसन टोस्ट - http://www.maayboli.com/node/31611
४६. मटार, पनीर, बटाटा पराठा - http://www.maayboli.com/node/31192
४७. चीज मूग रोल - http://www.maayboli.com/node/2662
४८. पालक वड्या - http://www.maayboli.com/node/29923
४९. तोफू स्टर फ्राय - http://www.maayboli.com/node/30684
५०. धोकर डालना - http://www.maayboli.com/node/30985

हे खालील काही धागे देखील उपयुक्त आहेत -

१. डब्यात नाश्ता काय द्यावा? - http://www.maayboli.com/node/34697
२. मुलांसाठी खाण्याचे प्रकार - http://www.maayboli.com/node/7044
३. बाळांचा खाऊ - http://www.maayboli.com/node/28243

मायबोलीकर मंजूडी यांनी शेअर केलेली उपाहाराच्या पदार्थांची लिंक खालीलप्रमाणे
http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/256

मस्त
धन्स यशस्विनी

वा, यशस्विनी. छान संकलन !

यशस्विनी, छान संकलन केले आहेस. हे पेज आता बूकमार्क करून ठेवते. जियो.

स्सॉलिड काम केलेस यशस्विनी. धन्यवाद!

यशस्विनी, तिळाची मलई बर्फी, गूळपोळी ब्रेकफास्टला????????

मंजूडी हो ग, मी देखील आधी विचार केला कि या लिस्ट मध्ये हे पदार्थ अ‍ॅड करु कि नको, पण हे दोन्ही पदार्थ तसे चांगले पौष्टिक आहेत. हे पदार्थ खाउन त्यावर एक ग्लास दुध पिले कि भरपेट नाश्टा होईल बघ.

यशस्विनी स्मित ती तिळाची मलई बर्फी मीच लिहिली आहे ती लोकं नाश्त्याला खाऊ शकतील हे वाचून आश्चर्य वाटले ते व्यक्त केल्याशिवाय राहवलं नाही. मग त्या न्यायाने पाककृतीचा उगम असलेली सायोची मलई बर्फीही वरच्या यादीत यायला हरकत नाही.
ही लिंकही वरच्या यादीत घाला - http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/256

मंजूडी मी तिळाची मलई बर्फी नाश्टयाच्या पदार्थात लिहिली आहे कारण त्यामधील साहित्य शेंगदाणे,तिळ,मिल्क पावडर, दुध हे मला तरी पौष्टिक व पोटभरीचे वाटले. लहान मुलांना नाश्टयासाठी किंवा मधल्या वेळेचे खाणे म्हणुन देखील हा पदार्थ मला योग्य वाटला. तेच सायोने दिलेली मलई बर्फी मी गोड पदार्थांच्या यादीत नक्कीच लिहु शकेन पण नाश्टयाच्या यादीत नाही लिहु शकत स्मित

तुम्ही शेअर केलेल्या लिंक बद्दल व तिळाच्या मलई बर्फीच्या पाकृबद्दल धन्यवाद.

छान संकलन यशस्विनी, कधी पटकन हवे असल्यास काम सोपे झाले. धन्यवाद स्मित

यशस्विनी, मस्तच काम केलंयस.
पण त्या यादीतले ढोकर दालना आणि ब्रेड बेसन टोस्ट ब्रेफाचे पदार्थ म्हणून पटले नाही . दोन्हीतही प्रामुख्याने चण्याची डाळ असते आणि तळलेले असतात. सकाळी खाल्ले तर पोट डब्ब व्हायची शक्यताच जास्त. शिवाय ढोकर दालना हा शक्यतो (रस्सा करून) जेवणासाठी करण्यात येणारा पदार्थ आहे गं!

धन्यवाद प्रितीभुषण, दिनेशदा, नंदिनी, आशूडी, मंजूडी, शैलजा, वरदा स्मित

या नविन वर्षात मला स्वतःला रोजच्या नाश्टयाचे वेळापत्रक बनवायचे आहे त्यामुळे मी हे पदार्थ एकत्र केले आहेत. म्हणजे उदया नाश्टयाला काय करु? हा प्रश्न वेळापत्रक बनविल्यामुळे सतावणार नाही. आता जसे जसे यातील विविध पदार्थ बनविन व खाईन तसे मला स्वतःलाच अंदाज येइल कि कोणते पदार्थ नाश्टयाला योग्य आहेत. त्यामुळे मी केलेल्या यादीतील पदार्थ तुम्हाला कोणाला नाश्टयासाठी योग्य वाटले नाहीत तर अवश्य ते करायचे टाळा.

यशस्विनी, तिळाची मलई बर्फी, गूळपोळी ब्रेकफास्टला????????
<<

खानदेशात हिवाळ्यात संक्रांतीच्या आसपास एक 'धुंधुरमास' नावाचा प्रकार असतो. (हा मला लहानपणीचा आठवतो आहे.) कुणाला अधिक डीटेल्स ठाऊक असतील तर प्लीज लिहा.

पहाटे उठून गव्हाची/बाजरीची खिचडी, तिळगुळाची पोळी, असे दोन आयटम नक्कीच अन भरीत भाकरी बहुधा असेल असा भरभक्कम जेवण-कम न्याहारी असा तो प्रकार असे. सूर्योदयाच्या आसपासच, म्हणजे सूर्योदयाच्या आधीच पहाटे फटफटताना 'धाब्यावर' जेवण केलेले (म्हणजेच जेवलेलेही) आठवते आहे.(खानदेशात 'धाब्याची' घरे असतात. धाबे म्हणजे लाकडी कडीपाटावर गवत अन त्यावर खारी माती अंथरून बनवलेली गच्ची/छत. हायवेच्या बाजूचा ढाबा नाही.)
***
ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ लॉर्ड अँड डाईन लाइक अ पॉपर अशी (काहीशी) म्हण ऐकली आहे. ब्रेकफास्ट खूप 'हेवी' असावा, दुपारचे जेवण - लंच थोडे कमी अन रात्री गरीबासारखा- परवडत नसल्या सारखा डोळा मारा हलका, मित-आहार घ्यावा असे त्यातून ध्वनित होते.

आपल्याकडेही अंगमेहनतीची कामे करणारे मजूर वगैरे भक्कम न्याहारीचा डबा घेऊन येतात. १० च्या सुमारास आधी जेवून मग कामे सुरु करतात. दुपारचे जेवण हलके असते किंवा नसतेच, मग तासभर थांबून पुन्हा काम करतात. हे तब्येतीस चांगले.
(अवांतरः अंग दुखते म्हणून रात्री दारू पिऊन पडतात ते नॉर्मल लाईफस्टाईल मधे येत नाही. त्यांच्यातल्या बायका बहुधा रोज पीत नाहीत असे निरिक्षण आहे.)

नंदिनी +१ मी ही हे पेज भूकमार्क करुन ठेवतो डोळा मारा

ब्रेकफास्टला थंडीत ज्वारी-बाजरीची तीळ लावलेली तव्यावरची गरमागरम पापुद्रे सुटलेली भाकरी, वर तूप + तिळाची / कारळाची / दाण्याची चटणी हे आयते खायला मिळाले तर त्यासारखे स्वर्गसुख नाही!

अकु, तुझ्या पोस्टमधला 'आयते' हा शब्द फार्फारच महत्वाचा आहे फिदीफिदी

वरदा +१ स्मित

>>>सकाळी खाल्ले तर पोट डब्ब व्हायची शक्यताच जास>>><<
प्रत्येकाचेच पोट डब्ब 'च' होइलची शक्यता कशी काय?

मला वाटते यशस्वीनी फक्त सुचवलेली लिस्ट आहे, ज्याला जसे वाटेल ते व आवडेल ते बनवून व ज्याने पोटाला डब्ब होणार नाही खावु शकतोच की? स्मित

बाकी,
बटाट्याची भाजी व पुरी , त्यानंतर जलेबी किंवा मालपुवा अगदी उत्तरेत पण सकाळी नास्त्याला खातात की. कलकत्याला छोलार दाल व आलू दम पन सकाळी असतात नाश्त्याला.. नंतर गोड ठरलेलंच.
(बटाटा 'हलका' नाहीये) स्मित
किंवा छॉले-भटुरे नंतर हलवा(शिरा) पुरी हि सुद्धा खातातच. आम्ही तरी खायचो.(ती सगळ्यांनी खावी हा आग्रह नाहीये पण). छोले- भटुरे आम्ही हे पुण्यात पण खातो.(सकाळी पळून झाले की काका हलवाईच्या दुकानात जिलेबी दाबून खायचो व घरी यायचो. )

नाश्ता जड असल्याने काही होत नाही. उलट जे काय गोड धोड खायचे'च' असेल ते सकाळीच खा, रक्तातील साखरेचा वापर नीट होतो वा निचरा होतो. स्मित

पण त्या यादीतले ढोकर दालना आणि ब्रेड बेसन टोस्ट ब्रेफाचे पदार्थ म्हणून पटले नाही . दोन्हीतही प्रामुख्याने चण्याची डाळ असते आणि तळलेले असतात. सकाळी खाल्ले तर पोट डब्ब व्हायची शक्यताच जास्त. शिवाय ढोकर दालना हा शक्यतो (रस्सा करून) जेवणासाठी करण्यात येणारा पदार्थ आहे गं!
<<<<<<<<<<<<<<<<<<

वरदा, ब्रेड बेसन टोस्ट व ढोकार दालना या दोन्ही पदार्थांच्या मायबोलीवर दिलेल्या कृतींमध्ये मला कुठेही तळण किंवा रस्सा हा प्रकार दिसला नाही. मायबोलीवर दिलेल्या कृतीप्रमाने ब्रेड बेसन टोस्ट हा पदार्थ ब्रेड बेसनाच्या पिठात घोळवुन तव्यावर मंद आचेवर भाजायला सांगितला आहे (तळायला नाही). लेखिकेने (अरुंधती कुलकर्णी) सदर पदार्थ नाश्टयाला पोटभरीचा होतो असे सांगितले आहे.

ढोकार दालना हा पदार्थ देखील थोडाफार मराठी पाटवडीसारखाच आहे ज्यात लेखकाने (दिनेशदा) तो पदार्थ वडी स्वरुपात दिला असुन कुठेही तळण अथवा रस्सा सांगितलेला नाही. त्या पाकृवर तुम्ही दिलेली प्रतिक्रिया वाचली त्यानुसार मुळ बंगाली प्रकार हा रस्साभाजीसारखा असतो हे कळले.

तसेच चणा डाळ किंवा बेसनामधुन आपल्याला उत्तम प्रथिने मिळतात ( संदर्भ: डॉ.मालती कारवारकर्,सौ.ऋजुता दिवेकर यांची आहारविषयक पुस्तके) त्यामुळे माझ्यासारख्या पुर्ण शाकाहारी व्यक्तिंसाठी तो आहारात आवश्यक पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा समावेश मी नाश्टा व मुख्य जेवण यात वेगवेगळ्या प्रकारे करते. अर्थात नियमितपणे नाही पण एक-दोन दिवसाआड निश्चित करते.

यशस्विनी, झंपी - अग्री टू डिसअ‍ॅग्री स्मित

चणा डाळ किंवा बेसनामधुन आपल्याला उत्तम प्रथिने मिळतात>> अनुमोदन. फुटाण्याचं पीठ (चण्याचा सातू) सहजी मिळत असेल तर तेही नाश्त्याला खावं. दूधसाखर घालून किंवा बिहारी पद्धतीने मीठ, मिरची, थोडं मोहरीचं तेल, कांद्याचा रस वगैरे घालून. पचायला अतिशय हलकं असतं. एकदम पटकन होणारा पदार्थ.

इब्लिस, माझी ओळ कोट केलीत म्हणून या बाफवर लिहितेय स्मित

धुंधुरमासाच्या माहितीसाठी - लिंक १, लिंक २

बाफच्या शीर्षकाप्रमाणे मी जर कोणाला 'ब्रेकफास्टसाठी काय करू?' असा प्रश्न विचारला आणि त्यावर समोरून 'गूळाची पोळी कर' असे उत्तर आले तर निदान मी तरी 'नानाची टांग' असेच प्रत्युत्तर करेन डोळा मारा
नाश्त्याला कोणी काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणात न्याहारीला मऊभात खातात. उत्तरेत पुरीभाजी, पराठे यांची रेलचेल असते. आम्हाला उरलेली पावभाजी, बिर्याणी, मूगडाळीची खिचडी, दहीवडे, रगडापॅटीस इतकंच नव्हे तर केलेल्यातली शिल्लक राहिली तर पुरणपोळी, सांज्याची पोळी, गूळपोळीही चालते. पण हे पदार्थ निश्चितच 'ब्रेकफास्टचे पदार्थ' या लेबलाखाली येत नाहीत, आणि मुद्दाम ब्रेकफास्टसाठी म्हणून बनवायला जाणारही नाही. स्मित

मंजूडी,
तुमच्या पोस्ट वरून सकाळी हा पदार्थ खाण्याची लहानपणची आठवण जागी झाली, इतकाच त्या कोट करण्याचा अर्थ होता.
दोन्ही लिंकांबद्दल धन्यवाद!

हेच्च शोधत होते....स्मित

चांगला धागा.